वाङ्मयशेती

रानपाखरं.......!

psajid's picture
psajid in जे न देखे रवी...
28 Jan 2014 - 2:45 pm

बांधलं मचाण
वर गाण्यात गळा,
मधुरता मंधी
दुमला शेतमळा !!

येऊन चोर
जोंधळ्यात दडं,
शिवार टिपीत
चाललीत पुढं !!

भिरभिरली गोफण
सुटला दगड,
चोर जोंधळ्यात
त्येनं केलं उघड !!

का म्हून सतावता
सुखानं जगू द्यावं,
किती सोसलं पिकासाठी
तुम्हा ते नाय ठावं !!

घरी तान्हं ठिवून
आलिया राखणीला,
सोनं ठिवलं तरच
वरीसभर पीठ भाकरीला !!

- साजीद यासीन पठाण
दह्यारी
(पलूस, सांगली, महाराष्ट्र)

वाङ्मयशेतीजीवनमान

टिकले तुफान काही

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
28 Dec 2013 - 12:47 am

टिकले तुफान काही

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

उडत्या धुळीकणांना पदरात घेत ज्यांनी
आभाळ झेलले ते उरले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

अभय-गझलमराठी गझलवाङ्मयशेतीवाङ्मयकवितागझल

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Dec 2013 - 5:26 am

दॅट्स व्हाय इंडिया महान है : नागपुरी तडका

इकडे अमुच्या भारताचा सातबारा गहाण है।
दॅट्स व्हाय शायनिंग यह इंडिया महान है॥

पोशिंद्याच्या घामाभवती बांडगुळांचे कडे
नितनेमाने रोज पाडती प्रेत-मढ्यांचे सडे
महासत्तेचे स्वप्न दावुनी तज्ज्ञ धावती पुढे
तिकडे त्रेपन-चौपन मजले मजल्यावरती चढे
चेले-चमचे, खुर्ची-एजंट गातसे गुणगान है ॥

अभय-काव्यनागपुरी तडकावाङ्मयशेतीकरुणरौद्ररसवाङ्मय

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 3:49 pm

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.

चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..

***************************************************

अभय-काव्यकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा

(चल परत नव्याने सुरू करू सारे)

धन्या's picture
धन्या in जे न देखे रवी...
14 Oct 2013 - 6:26 pm

चल परत नव्याने सुरू करू सारे
नांगरले नव्हते कधीच शेत असे पुन्हा नांगरु

पाटाला येईलच पाणी वरच्या
त्या पाण्या समेच आपलं बियाणं पेरुन टाकू

खुप केले आपण नियोजनाने पीक घेणे
त्या पल्ल्याड जाऊन फक्त पीकासाठी राबू

असेल अजूनही सळसळता जोम आपल्यातही
त्या रगेल पणाची थोडी चव चाखून पाहू

चल बरोबर मिळून राबू जरासे
भूगर्भातील अंकुरापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू

शेतात असणारच उंचसखल थोडेसे खोलगट
त्यातूनच आपल्या मेहनतीचा अर्थही नव्याने उमजू

वाङ्मयशेतीविडंबन

तिन कविता तिन ठिगळे

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
8 Oct 2013 - 4:09 pm

पहिले ठिगळ मि.का. च्या कवितेला.
वरिगिनल कविता <a href="http://www.misalpav.com/node/17298" title="प्रलय">प्रलय</a>

शंख करत माझ्या नावाचा
बाप धावतो मागे मागे
गुणपत्रक ते बघता बघता
नेत्र तिसरा उघडु लागे

अकडा मोठा बॅकलॉगचा
तरी भटकतो मित्रांसंगे
लेक्चर बुडवुन कट्ट्या वरती
रात्रं दिन करीतसे दंगे

निर्लज्ज हात पुढे पसरतो
पॉकेटमनी संपताच तो
छळायस जन्मला कारटा
हताश बाबा करवदतो

मग

कोडाईकनालगरम पाण्याचे कुंडभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबिभत्सकरुणवीररसअद्भुतरसरौद्ररसबालकथाविडंबनविनोदऔषधोपचारविज्ञानकृष्णमुर्तीमौजमजा

बोल बैला बोल : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
18 Sep 2013 - 9:46 am

बोल बैला बोल : नागपुरी तडका

        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे...!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे....!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
        वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
        तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
        तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
        लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे...!

अभय-काव्यअभय-लेखननागपुरी तडकावाङ्मयशेतीकविता

सरडा आणि इतर क्षणिका

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जे न देखे रवी...
14 Sep 2013 - 7:35 am

सरड्यांकरता आता सुगीचे (निवडणुकीचे) दिवस आले आहे:

लाल-पिवळा, हिरवा-निळा
सरडा तुझा रंग कोणता?

ज्या रंगाचा किडा, त्या रंगाचा चोला.
शिकारी मी आला, रंगनिरपेक्षवाला.

*चोला = वस्त्र
**आला = मोठा (उदा: आला अधिकारी)

(२)

डोळे झाले अधू
दिसत नाही दिल्ली.

मिळेल कुठे तो जादूचा चश्मा
दावेल मला जो लालकिल्ला.

(३) द्विभाषिक क्षणिका

शरीर असले जरी म्हातारे
दिल अभी जवान है.
वरेल का मला ती सुंदरी
उम्मीद अभी कायम है.

वाङ्मयशेतीसमाज

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in भटकंती
16 Aug 2013 - 10:53 pm

नागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा 

प्रकाशचित्रणगरम पाण्याचे कुंडचौरागढनागद्वारप्रवासवर्णनवाङ्मयशेती

लोकशाहीचा अभंग

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
14 Aug 2013 - 1:57 pm

लोकशाहीचा अभंग
आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥

चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥

अभय-काव्यकवितावाङ्मयशेतीअभंग