करुण

घरट्याची ओढ

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2015 - 1:10 pm

वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
        सांगे जा तू घरट्याला

वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
        गळा भर, पाखराला

पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
        पाऊस घरचा ओला

जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
        बळ नाजूक पंखाला

- संदीप चांदणे

कविता माझीकरुणकविता

आटपाट नगरात......

भानिम's picture
भानिम in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 9:16 am

आटपाट नगरात 
जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात 
आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात

आटपाट नगरात 
माणसे किड्यांसारखी मारतात 
आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात

आटपाट नगरात 
कष्टकरी अन्नाला महाग होतात 
आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात

आटपाट नगरात 
विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात 
आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात

करुणकविता

अमृतप्याला

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Nov 2015 - 12:11 pm

ब्लॉग दुवा हा

कविता - अमृतप्याला

प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0
www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html

----------------------------------------------------------------

अमृतप्याला

आज ऐकुनि रुचले नाही
काय म्हणावे सुचले नाही
दिला ठेवुनि फोन तसाचि
जे झाले ते पचले नाही

अनुवादप्रेम कविताकरुणकविताप्रेमकाव्य

जगणं

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
23 Nov 2015 - 1:14 am

आलं सागरा उधाणं पेट घेतला वार्यानं
स्वप्न सारीच मोडून खेळ मांडला दैवानं ।।

डोळयामंदी दाटलं आभाळ रं
     आभाळाच्या मनामंदी काही आगळं
पाण्यामंदी पेटलेला जाळ रं
      जाळाच्या ह्या ऊभा मागं काळ रं
उरलं सुरलं हरलं.. नशिबाचं वारं फिरलं  ।।

कुणा मनी जपलेलं सारं चांदणं
      चांदण्याच्या छायेखाली मोठं अंगण
आन् कुणा मनी काटेरी बाभळं
       बाभळीच्या काट्यावानी सारं जीवन
कळलं कळलं जगणं.. समदं सारं उसनं ।।

करुणकविता

गॅलरी .....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
21 Nov 2015 - 11:07 pm

एक हात कठड्यावर ठेऊन,
अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन,
मी उभा आहे गॅलरीत!

तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर
मन रमून गेले फार!
इथेच बसून नाही का लावत
तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला!

नाही.....वेडा नव्हतोच कधी
समंजस होतो खूप म्हणून
गॅलरी नाही ओलांडत
आजही!

मला नाही जमत लिहायला,
तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला!
इतकं जग पाहूनही
प्रेमबीम पण नाही कळत मला!

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताविराणीसांत्वनाकरुणकवितामुक्तकदेशांतरस्थिरचित्र

कै च्या कै कविता ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Nov 2015 - 12:44 pm

कविता..कवि...आणि कै च्या कै कविता...
कधी मुक्यानेच बोलणारी कविता,
तर कधी बिअरसवे डोलणारी..
येता जाता माफी मागणारी कविता....!

झुरळावर स्वार होवून जोमाने
ढेकणावर चढाई करणारी कविता..
आरसे फोडत, वादळात सापडत..
सिगरेटी फुकायला लावणारी कविता...!

अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन्
गोमुत्राची चव शिकवणारी कविता..
आमच्यासारखे समिक्षक असताना..
सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..!

बालसाहित्यभूछत्रीमुक्त कवितावाङ्मयशेतीशृंगारहास्यकरुणअद्भुतरसकविताविनोदसमाजजीवनमान

सांज प्रहरी

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
11 Nov 2015 - 8:07 pm

राम प्रहरी, या सुंदर गाण्याचे एक करुण विडंबन.
सर्व पीडित स्त्रियांना अर्पण
मूळ गाणे:
http://www.aathavanitli-gani.com/Song/Ram_Prahari_Ram_Gatha

सांज प्रहरी मार गाथा, वेदना ओठांवरी
या वळांनी आसूडाचे चित्र हे पाठीवरी
आवडीने चोळितो तो मीठ हे जखमांवरी
मार खाता क्षीण काया कोसळे या भूवरी
एककल्ली, संशयी तो, नशाधुंदी ज्या सदा
भोगदासी मी तयाची दु:ख साही सर्वदा
तोचि तारण, तोचि मारण, तोचि माझा सोयरी

करुणविडंबन

तिथली दिवाळी.....

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 7:18 pm

तिथली दिवाळी.....

तीरकामठा रंगीत कागद
चिखलमाती अर्धा किल्ला....
शिवाजीच्या मावळ्यांहाती,
परत फराळ ठेवशील का?

पहाट झोपेत हळूच उठवून
घमघमणारी आंघोळ घालून,
फुलबाजांची हजार फुले
परत हातात ठेवशील का?

रांगोळीतील हुकले ठिपके
रेषांमधील नाजूक वळणे,
तुळशीमाईचे लगीन लटके
परत दणक्यात लावशील का?

किणकिण बांगड्या काचेच्या
घिरघीर झालरी पोरींच्या!
सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या
परत उडवण्या येशील का?

कविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुणसंस्कृतीकवितासाहित्यिकसमाजजीवनमानदेशांतर

एक माणूस मिशी काढून..............

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
29 Oct 2015 - 8:08 pm

एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!

हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!

इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....

कविता माझीप्रेम कविताभावकवितासांत्वनाकरुणकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजशिक्षण

भुकेल वासरू

माहीराज's picture
माहीराज in जे न देखे रवी...
14 Oct 2015 - 11:09 am

माळरानी चालुन पुरतं थकुन गेलं होतं..
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,

लहानपणीच नशिबानं ज्याला औताला जुंपल होतं
घाम फुटण्याआधीच  मात्र त्याच काळीज तुटलं होतं..

मुक्या बिचार्या जिवाला कधी रडताही आलं नाही
दमलोय,थकलोय असं काही बोलताही आलं नाही..

नांगराचा फाळ त्याला कधी ओढताच आला नाही,
गळ्यावरचा फास देखिल कधी सोडताच आला नाही..

थकलं होतं, दमलं होतं, जन्माला ञासुनं गेलं होतं,
पायातलं ञान हरपुन भुकेनं व्याकुळ झालं होतं..

डोळ्यामधलं पाणी सारं सारं सुकुन गेलं होतं
चुकलेलं वासरू आता जिवनाला मुकुन गेलं होतं,

करुणकविता