करुण

बसते बिचारी एकटी आजी -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
1 Mar 2016 - 11:20 am

बसते बिचारी एकटी आजी
देवापुढती वाती वळत
असते मुखात नामस्मरण
कधी तिचे ना कंटाळत..

गत आयुष्याचा पाढा
असते स्वत:शीच उगाळत
गालावर एखादा अश्रू
नकळत येई ओघळत..

सोसले जे आयुष्यभरात
जाईे डोळ्यासमोर तरळत
वेग वाती वळण्याचाही
जाई वाढत तसाच नकळत..

सखा जीवनातुन का गेला
सोडून अर्ध्यावरुनी पळत
आसवात का भिजती वाती
जिणे रोजचे राहीे छळत..
.

कविताकरुण

< मिसळपावात... >

नीलमोहर's picture
नीलमोहर in जे न देखे रवी...
29 Feb 2016 - 1:05 pm

नेटावर जे नामी मोट्ठं संस्थळ आहे ना
तिथे खूप वाचक असतात, जबर ट्यारपी मिळतो
डुप्लिकेट आयडी तिथे पडीक असतात
ते अगदीच पकाऊ असतात
मला अशा सायटी आवडत नाहीत

ऐसे खचाखच पाडलेले धागे बघितल्यावर मला भोवळ येते
तैसे ज्ञानामृत पाजू संस्थळावर जिलबीबरोबर पिठल्याचा आस्वाद घेतल्यावर मला अशीच भोवळ आली होती
तेव्हापासून पिठलं हा पदार्थ मी व्यर्ज केलाय

विडंबनप्रवासवर्णनसांत्वनाकरुण

(अशी कबुतरे येती)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
18 Feb 2016 - 9:53 pm

अशी कबुतरे येती;
आणिक घाण ठेवुनी जाती
दोन घरांची पुण्यकमाई
दहा घरांच्या खाती

कपोत आला, पहिला वहिला
खिड़कीमागे उभा राहिला
तया मागे, येई साजणी
गूटर्गूच्या साथी...

दुरून येती थवे देखिले
मी ग्याल्रीचे दार लोटिले
धड़क मारती तरी निरंतर
गंधित झाल्या भिंती

पंख दोन ते हळु फ़डफ़डले
खोलीभर मायेने फिरले
हॉलकिचनाच्या भिंतीमधुनि
लागेना मज हाती

'पुण्यवान' तो येता गाठी
शिव्या पाच मोहरल्या ओठी
त्या तुटल्या दातांची गाथा
क्रूर कबुतरे गाती

-- स्वामी कपोतगावकर

जीवनमानकरुण

अस्तित्वाची बोंब

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in जे न देखे रवी...
8 Feb 2016 - 1:24 am

स्फुर्तीदाते: मितभाषी आणि त्यांचे लाघवी मूल.

प्रश्न पहिला माझा,
रे गड्या मितभाष्या,
काय पिवुनि तुवा
वाजवला हा ढोल-ताश्या!

मूळ बघता सर्व वादांचे
असे बस फक्त पिण्याचे
अध्यात्म नाहीरे षंढाचे
हे तुज नाही कळायाचे.

भेद भावा तु बघ जरा
अज्ञानास फाडती टरा टरा
डोळे फिरवती गरा गरा
दंभ नाहीच इथे खरा

तुम्हा नसे त्याची प्रचिती
म्हणुनि त्या खोटा म्हणती
मनापासुनि ते ओरडती
अंधारासी मी एकच पणती.

कविताचारोळ्याबालगीतविडंबनसुभाषितेअनर्थशास्त्रअभंगअभय-लेखनइशाराकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीमराठीचे श्लोकमुक्त कवितावाङ्मयशेतीकरुण

चाफा

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
4 Feb 2016 - 10:58 am

वाटेवरी कुणाच्या
आहे अजून चाफा!
मंद परी जीवघेणा,
आहे तसा पसारा!

ऊन उठून येते रात्री,
घर गोळा होते नेत्री!
कुणी दिसते, कुणी विरते!
परी चाफ्यापाशी सारे,
हताश होऊन बसते!

मंद परी जीवघेणा
आहे तसा पसारा
वाटेवरी कुणाच्याही
असू नये गं चाफा!

-शिवकन्या

बालकथाकविताप्रेमकाव्यसाहित्यिकदेशांतरकविता माझीभावकविताविराणीसांत्वनाकरुण

राहील कुठे आता ही चिमणी?

खेडूत's picture
खेडूत in जे न देखे रवी...
28 Jan 2016 - 11:18 pm

वारा वादळ हे जोराचे
शाखा तुटल्या झंजावाते
उडले घरटे फुटली अंडी
सांगेल कुणाला व्यथा मनिची
राहील कुठे आता ही चिमणी?

उघडून जरी मी कपाट माझे
बोलावत आहे तिजला
नुसती चिव-चिव करते आहे
नकळे मजला आणिक तिजला
घरात परि ती कशी रहावी

घरी वृक्ष तो आणू कैसा
घरटे मग ती कोठे बांधिल
आणेल कुठून ती पिले बिचारी
सांगेल कुणाला व्यथा आपली
राहील कुठे आता ही चिमणी?

(महादेवी वर्मा यांच्या मूळ हिंदी कवितेवर आधारित)
२८/०१/२०१६

वाङ्मयबालगीतमुक्तकभाषाअनुवादबालसाहित्यमुक्त कविताविराणीकरुण

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जे न देखे रवी...
7 Jan 2016 - 12:12 pm

माननिय गुर्जी यास,
प्रेर्ना

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !

काय म्हणता ?
'बायको' हे प्रकरण नक्की कांय असतें ?
अहो दशरथ असो वा राघोबा, असो परवाचा आमिर,
युगानुयुगे हे कोणालाही न कळले दिसतें,
पन तरिही तुमचं वा त्यांचे अगदी 'सेमचं' असतें !

रुसली तर रुसू दे, भडकली तर भडकू दे !
तरीसुद्धा तरीसुद्धा, तुम्हाला म्हणुन सान्गतो

बायको म्हणजे बायको म्हणजे बायकोचं असतें,
तुमचं किंवा आमची अगदी 'सेमचं' असतें !

धोरणकरुण

घरट्याची ओढ

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
14 Dec 2015 - 1:10 pm

वेळूच्या बनात
एक पाखरू एकटे
शीळ देई वारियाला
        सांगे जा तू घरट्याला

वारा उनाड बावरा
घुमे वेळूच्या भवती
म्हणे वेळूचे गे गाणे
        गळा भर, पाखराला

पारा उन्हाचा महान
लखलख मृगजळ करी
कंठी पाखराच्या परि
        पाऊस घरचा ओला

जीव बनी अडकला
जीव एक घरट्यात
देई हळवा संधिकाल
        बळ नाजूक पंखाला

- संदीप चांदणे

कविताकविता माझीकरुण

आटपाट नगरात......

भानिम's picture
भानिम in जे न देखे रवी...
11 Dec 2015 - 9:16 am

आटपाट नगरात 
जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात 
आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात

आटपाट नगरात 
माणसे किड्यांसारखी मारतात 
आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात

आटपाट नगरात 
कष्टकरी अन्नाला महाग होतात 
आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात

आटपाट नगरात 
विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात 
आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात

कविताकरुण

अमृतप्याला

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Nov 2015 - 12:11 pm

ब्लॉग दुवा हा

कविता - अमृतप्याला

प्रेरणा : https://www.youtube.com/watch?v=f4qqdbRMYG0
www.azlyrics.com/lyrics/lukebryan/drinkabeer.html

----------------------------------------------------------------

अमृतप्याला

आज ऐकुनि रुचले नाही
काय म्हणावे सुचले नाही
दिला ठेवुनि फोन तसाचि
जे झाले ते पचले नाही

कविताप्रेमकाव्यअनुवादप्रेम कविताकरुण