आटपाट नगरात......
आटपाट नगरात
जिवंत माणसांना गाडीखाली चिरडतात
आणि पायातल्या वहाणांना डोक्यावर घेतात
आटपाट नगरात
माणसे किड्यांसारखी मारतात
आणि मारणारे हुतात्मा म्हणून मिरवतात
आटपाट नगरात
कष्टकरी अन्नाला महाग होतात
आणि सवंग नाचे दैवताचा मान घेतात
आटपाट नगरात
विकाऊ माध्यमे टी आर पी वर जगतात
आणि खुन्यांचे गोडवे गात फिरतात
समयोचित कविता, आवडली.
मान्यवरांच्या यादीतून ही