कै च्या कै कविता ...

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
13 Nov 2015 - 12:44 pm

कविता..कवि...आणि कै च्या कै कविता...
कधी मुक्यानेच बोलणारी कविता,
तर कधी बिअरसवे डोलणारी..
येता जाता माफी मागणारी कविता....!

झुरळावर स्वार होवून जोमाने
ढेकणावर चढाई करणारी कविता..
आरसे फोडत, वादळात सापडत..
सिगरेटी फुकायला लावणारी कविता...!

अतिव दु:खाने झडणारे (?) ढग अन्
गोमुत्राची चव शिकवणारी कविता..
आमच्यासारखे समिक्षक असताना..
सफाईसाठी डेटॉल शोधणारी कविता..!

गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना
तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता..
विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत,
आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...!

डोळ्यासमोरून अलगद फिरताना..
डोक्यावरून जाणारी कविता..
आमच्या मंद डोक्यात मंदपणे..
कै च्या कै भरवणारी कविता...!

(वरील कवितेतील आशय कुणाला समजला आहे का? असल्यास त्याला भर चौकात ढोलताशाच्या गजरात, हार तुरे घालुन सुळावर देण्यात येइल. )

कै च्या कै नवकवि ईरसाल म्हमईकर

बालसाहित्यभूछत्रीमुक्त कवितावाङ्मयशेतीशृंगारहास्यकरुणअद्भुतरसकविताविनोदसमाजजीवनमान

प्रतिक्रिया

एस's picture

13 Nov 2015 - 12:48 pm | एस

काळजाला खच्याकखच्याक बिळे, आपलं ते, घरे पाडणारी कविता!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Nov 2015 - 1:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुपचुप चुंबनाच्या व्याख्या शोधताना
तुम्ही-आम्ही मध्ये अडकलेली कविता..
विझलेल्या स्वप्नांची सारीभरणं करत,
आ वासलेल्या सत्यात रुतलेली कविता...!

मला या चार ओळीचा अर्थ लागतो आहे, सायंकाळी रसग्रहण.

-दिलीप बिरुटे
(गुपचुप चुंबनाचा नाद असलेला)

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 1:55 pm | विशाल कुलकर्णी

मिलते तो फिर एक बार, चर्चा करना वास्ते. ऊनो नाखुशेट होर बाक़ी लोगा भी होयंगे तो होरच रौनक होती ना बाबा !

एक एकटा एकटाच's picture

13 Nov 2015 - 1:12 pm | एक एकटा एकटाच

सही आहे

विशाल दा

पैसा's picture

13 Nov 2015 - 1:27 pm | पैसा

समजायचं सोडूनच दे. ही कविता लिहिल्याबद्दल तुझा लकडीपुलावर सत्कार करायला पाहिजे! =)) ही कविता प्रसवायच्या आधी काही "खास" मिपाकरांच्या "भय"कथा किंवा "पप्पू वि. फेकू" सामना वाचला होतास काय? असं काहीतरी वाचलं तर मला अगदी अस्संच होतं.

विशाल कुलकर्णी's picture

13 Nov 2015 - 1:52 pm | विशाल कुलकर्णी

मिपावरचे काही वर्षांपूर्वीचे 'काही ख़ास लेख' वाचनात आले , मायबोलीवरील काही महान कविता वाचनात आल्या. मग छ्या, आपल्याला कधी जमणार असं लिहायला असं वैफल्य आलं आणि त्यातून हे जन्मलं.

पैसा's picture

13 Nov 2015 - 1:56 pm | पैसा

=))