✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<"ऊभारू का पण डु आय्डी">

न — नाखु, Mon, 03/28/2016 - 16:20
मूळ कलाकृती

संदर्भ फक्त चालीसाठी आणि गाभा हेतु: मिपावर पुन्हा पुन्हा प्रवेश करणार्या आणि मिपावर दंग्यासाठी ठरावीक आयडीने येणार्या महाभागांना हा भाग समर्पीत आहे

( हल्ली मिपावर वावर आहे ‘एक्स्पर्ट(?) टॉकर’चा! अशीच एक टॉकर येतो ‘डु आय्डी बनून’. जुन्या आय्डीने बदल्यासाठी नवी कोरी डु आयडी सलामत! मग काय? जुन्या आय्डीची 'फुकाची घालमेल'. नव्या डु आय्डीची 'उत्साही सुरर्सुरी. पण, त्या जुन्या आयडीला काय बरे सांगायचे असावे? ) लढत होतो मी पूर्वी जेव्हा सुसंवादक मिपा दारी तेव्हा अजून याद येतात मला रोचक आणि मधुर माळा चर्च्या चोथ्याला बहर आला कायमचुर्णाचा वसा पाहिला उगी तगमग, फुका ऐट झटके फसवे, बघ्येच कैक काथ्याकुटांच्या शिंदळीकतून बनलो मी लाडीक, भांडखोर केले साजिरे अनेक धागे चालवाट ती पुरती लागे नियमांची ती पाचर मारुनी संपादक ते पट्ट्यात घेई तक्रार थैली जशी भरत जाई रामप्रहरी मग उड्डाण होई नवा डु आय्डी आणि जुनेच विचार थकले मिपा मात्र नाही सुमार धुतली माया, सुटले बोळे पाठवणींचे मज देती शहाळे पण मिपाला कसे हे कळत नाही? की थकेन कसा का कधी मीही श्वान पुच्छ घालीता नळी बाहेर येता कधी सरळ ते होत नाही येत राहील माझीच नवी बिडी चल काढ, तुझीही जुनी काडी! – शंका नडले

प्रतिक्रिया द्या
8643 वाचन

💬 प्रतिसाद (31)

नाखुकाका फॉर्मात.

प्रचेतस
Mon, 03/28/2016 - 16:30 नवीन
नाखुकाका फॉर्मात.
  • Log in or register to post comments

हौ ना.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/29/2016 - 10:37 नवीन
काका लै फार्मात आहेत. लिहित राहा. हयगय नका करु. आपल्या पाबळ कट्ट्याचा वृत्तांत कधी लिहिणार तुम्ही ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बस का सर.....:(

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 10:38 नवीन
बस का सर.....:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवं तुम्ही म्हणजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/29/2016 - 10:40 नवीन
नाखु काकांनी लिहिलं पाहिजे, असं विड्या काड्या सोडून. (मरा आता पुढच्या भेटीत) आणि तुम्ही त्यांना मदत करा. असं म्हणतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

विषय

नाखु
Tue, 03/29/2016 - 10:49 नवीन
मस्तानीशी संबधीत असल्याने वल्लींनीच ही जबाबदारी घ्यावी ही म़्ंडळाकडून विनंती. विज्ञान आश्रमला मात्र पुन्हा एकदा (किमान अर्ध्या दिवसासाठी) वेळ काढून जाणे आवश्यक आहे. मी सध्या जवळपास काही लेणी/दगडी चुंबक आहेत का ते शोधतोय. म्हणजे वल्ली यायला तयार होतील. धन्या शेठनी आधीच होय म्हटलय (भला मनुष्य आहे तो). वि.का.सुचना नोंद घेण्यात आली आहे. नाखु कट्टेवाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाय हो.

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 10:51 नवीन
नाय हो. पेशवे इतिहासात मी शून्य आहे. प्रतिसादात मात्र तिथल्या प्राचीन मंदिराच्या अवेशेषांबाबत, तिथल्या भल्या थोरल्या स्तंभाबाबत आनी तिथल्या पुष्करिणीबद्दल लिहिन. रा. रा. बिरुटे सरांनीच पाबळ कट्टा लिहिण्याची जबाबदारी घ्यावी असे मी त्यांना येथे आवाहन करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मी

viraj thale
Mon, 03/28/2016 - 16:35 नवीन
मी पण विचारात आहे दो आइडि च्य
  • Log in or register to post comments

अहहाहाहा. मला नाखुकाकाची

अभ्या..
Mon, 03/28/2016 - 16:42 नवीन
अहहाहाहा. मला नाखुकाकाची कविता समजली. धॅण्टॅड्ढॅण. आस्सल कंदीलछाप लाल धागा. काढा बंडल. लावा बत्ती.
  • Log in or register to post comments

if a=b........(1)

चेक आणि मेट
Mon, 03/28/2016 - 16:49 नवीन
if a=b........(1) and b=c........(2) from equation 1 and 2 a=c we can also say that a=b=c
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त

अन्या दातार
Mon, 03/28/2016 - 17:09 नवीन
जब्बरदस्त
  • Log in or register to post comments

खाजवून खरुज काढणे

भिकापाटील
Mon, 03/28/2016 - 17:29 नवीन
तुम्हाला नाही पटत त्यांचे मुद्दे तर प्रतिवाद करा. नाय कोण बोल्लय. पण हा धागा म्हणजे एकमेकांची पाठ खाजवत बळचकर केविलवाणी धडपड वाटली. कोणाला राग आला तर येवूद्या. पान आपण खरे बोलायला अज्जिबात घाबरत नाही.
  • Log in or register to post comments

This is simply circles of

कंजूस
Mon, 03/28/2016 - 20:36 नवीन
This is simply circles of batter fried and soaked in shugar syrup.
  • Log in or register to post comments

=))

अत्रुप्त आत्मा
Mon, 03/28/2016 - 20:41 नवीन
=))
  • Log in or register to post comments

काय आहे हे

मितभाषी
Mon, 03/28/2016 - 22:18 नवीन
चांगले विडंबन हे कोणाचे लेख / बातम्या चोप्य पेस्ते करणे आणि परत अमूक अमूक ला फोन कराच हे आर्जवे नसते एवढे कळाले तरी जमलं म्हणायच.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नाखु
Tue, 03/29/2016 - 08:56 नवीन
आपल्याला कुणाचं चांगल्या कामाच कौतुकं करावे अशी विनंती बरीच झोंबलेली दिसतेय. तेव्हा त्या धाग्यावरची चर्चा इथे करू नका आणि तिथे चर्चेस मी नेहमी तयार आहे.फक्त त्या पुर्वी लेखाची सुरुवात किमान ४-५ वेळा वाचा आणि मग चर्चा सुरू करू. हमाल भारवाही नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी

तुम्ही बातम्या देत रहा,

यशोधरा
Tue, 03/29/2016 - 09:08 नवीन
तुम्ही बातम्या देत रहा, सकारात्मक बातम्या वाचतानाही बरे वाटते. बाकी जौद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मस्त जमले आहे

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 03/29/2016 - 09:55 नवीन
काठिण्य पातळी कमी केल्या मुळे जास्त डोके न खाजवता समजलेही. आता आमची काऊ स्टॅम्प घेण्याची वेळ झाली. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

वा वा..

नीलमोहर
Tue, 03/29/2016 - 10:17 नवीन
कितीला मिळती आता पुडी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

नऊ रुपये फकस्त. दहाची नोट

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 11:08 नवीन
नऊ रुपये फकस्त. दहाची नोट दिली की एक चुना डबी देतेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

ओSsssssssss , धा ला झाली कि

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/29/2016 - 12:18 नवीन
ओSsssssssss , धा ला झाली कि अता. काय तुम्ही ? आं!? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

याला म्हणतेत

नाखु
Tue, 03/29/2016 - 14:07 नवीन
"हातो हात" उत्तर !!! बुवा घ्या डब्बल अभ्यासाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तंबाखू खाणं आणि नंतर पचापचा

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 14:14 नवीन
तंबाखू खाणं आणि नंतर पचापचा थुंकणं हे अतिशय गलिच्छ आणि इतरांना किळस आणणारं व्यसन आहे. काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हो राव. लैच त्रास होतो.

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 14:23 नवीन
हो राव. लैच त्रास होतो. . . अजिंठ्याची चित्रे रंगवणारे कारागीर चक्क शिंपल्याचा चुना वापरायचा म्हणे. तुम्हाला काय माहीतीय का हो वल्लीसेठ? शिवाय ते कशास जाशी मथुरा कान्हा, तिथे तमाखू नाही असे काहीतरी लिव्हलेय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कृष्ण चालले वैकुंठाला| राधा

तर्राट जोकर
Tue, 03/29/2016 - 15:27 नवीन
कृष्ण चालले वैकुंठाला| राधा विनवी पकडून बाही|| इथे तमाखू खाऊन घे रे| तिथे कन्हैया तमाखू नाही||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ह्या वरुन

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 16:07 नवीन
ह्या वरुन स्वयें श्री रामप्रभू पाहती कुशलव तंबाखू चोळती|| ह्या महान विडंबनाची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

खिक्क...लिंक द्या की

टवाळ कार्टा
Tue, 03/29/2016 - 16:15 नवीन
खिक्क...लिंक द्या की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आठवत नै.

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 16:17 नवीन
आठवत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धमाल आहे. आठवलं तर टाका जरुर.

तर्राट जोकर
Tue, 03/29/2016 - 16:30 नवीन
धमाल आहे. आठवलं तर टाका जरुर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी.

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 16:06 नवीन
खी खी खी. ते चुनकळीच्या खडकांपासून मिळणारा चुना वापरायचे बहुधा. शिंपल्यांपासूनचा कदाचित वापरतही असावेत नक्की माहीत नै पण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरे अजिंठ्याची चित्रे

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 16:36 नवीन
अरे अजिंठ्याची चित्रे फ्रेस्को आहेत ना. मग त्याला शिंपल्याच्या चुन्याच, गेरुचे अस्तर करावे लागायचे ना आधी. मग चुन्याला काय कमी? शिवाय तेथल्या छोट्याश्या चुन्याच्या घाणीत सापडले पण आहेत शिंपले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चुन्याचं अस्तर होतंच रे.

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 16:47 नवीन
चुन्याचं अस्तर होतंच रे. त्याबाबत शंकाच नै. शेण, चुना, काथ्या, माती इत्यादींचं मिश्रण. पण तो चुना शिंपल्यांपासूनही बनवलेला आणत होते का ह्याविषयी जरा साशंक आहे इतकेच. चुन्याच्या घाण्यात शिंपले सापडले हे माहित नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा