मुक्त कविता

रहाटगाडगं.

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 9:59 am

आज जरा निवांत वाटतय..
सीझन संपला म्हणूनंही, आणी पुढचा येणार.. म्हणूनंही.!

रहाटगाडगं म्हणतात ना हो या चक्राला?
बराच वेळ करकचूsssन फिरल्यावर मग ते शां...त होतं , पुन्हा फिरण्यासाठी...!?

हे टळणारं नाही, हे नीट माहित असूनंही स्विकारत नाही मनाला. हे ठिकच. पण हे असलच पाहिजे जीवनात.. प्रगती साधायला.
असं का वाटत नाही? ? ?

पॉझिटिव्ह एप्रोचवाले २०० मार्क देतील माझ्या या दुसय्रा भावनेला. ! पण पहिलीचं निराकरण त्यांनाही झटकन सुचायचं नाही, हे माहिती आहे मला!

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तकसमाजजीवनमान

गौराई...

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 9:11 am

गौराई...

झाली तीच्या आगमनाची घाई
आता जोडीने येईल गौराई

दारी उमटतील पाउले कुंकवाची
सुख शांती अन समृद्धींची

सजतील लेऊन शालू भरजरी
असेल मध्ये गणराया मखरी

दोन दिसांची असेल माहेरवाशीण
पंचपक्वान्नाचे असेल जेवण

देता निरोप येईल डोळा पाणी
गौराई माझी लाडाची गं राणी

राजेंद्र देवी

कविता माझीभावकवितामुक्त कविताधर्मकवितामुक्तक

आता मला वाटते भिती

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
9 Sep 2016 - 4:27 pm

आता मला वाटते भिती

कोठे गुंड त्रास देती
कोठे पोलीस मार खाती
अशा या समाजाची
आता मला वाटते भिती

कधी तरुणाईचे भांडण तर
कधी रस्त्यावरचे भांडण
सुशिक्षित समाजातले असंस्कृत जन
अशा या जनाची आता मला वाटते भिती

रामराज्याची अपेक्षा पण
वागण्याची रावणनिती
या समाजाला आता नाही कोणाची भीती
अशा या समाजाची आता मला वाटते भिती

या समाजाच मी एक भाग
मला माझ्या सावलीची आता मला वाटते भिती

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कवितासंस्कृतीकवितामुक्तकसमाजजीवनमानराहणीराजकारण

रात्रीस खेळ चाले....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
9 Sep 2016 - 11:23 am

रात्रीस खेळ चाले....

गूढं त्या महाली
केस सोडून ती बसलेली
काळा मिट्ट अंधार अन
काजव्याने पण मान टाकलेली
अचानक एक टिटवी ओरडली
आढ्याशी भुते खदखदली
वारा नव्हता तरी अचानक
तावदानाची दारे खडखडली
रात्र खूपं वाढलेली
कोल्हे कुत्री केकाटली
झरोक्यातून सावली उतरली
मांजराने बाहुली पळवली....

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताभयानककवितामुक्तक

मी एकटी ....

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
8 Sep 2016 - 3:42 pm

मी एकटी ....

एल तीरावर मी एकटी
पैलतीर त्याला नाही
समोर पसरला अथांग दर्या
साजणाचा पत्ता नाही

परतुनी आले सारे
अजून तो आला नाही
रात्रीचा चंद्र देतसे
तो येईल याची ग्वाही

रंग हळदीचा अन मेंदीचा
अजून उतरला नाही
स्वप्नांचे जहाज बुडाले
साजणाचे तारू वाचले का नाही ?

बघत बसते खुणा वाळूतल्या
निरखीत असते लाटांनाही
नकोत रत्ने मज सागरा
का साजण माझा परत देत नाही ?

राजेंद्र देवी

कविता माझीप्रेम कविताभावकवितामुक्त कविताकरुणकविताप्रेमकाव्य

मनाचा एकांत - रवा आणि खसखस

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:36 pm

रवा आणि खसखस
वेगवेगळे करायची
शिक्षा भोगताना,
सूक्ष्म नजरेने,
एकाग्र चित्ताने,
वेचत राहते मन
जनामनातले साम्यभेद
तासनतास,
.
.
.
दुसरं काय असतो
एकांत म्हणजे तरी!

शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकविता

ईच्छा

पथिक's picture
पथिक in जे न देखे रवी...
2 Sep 2016 - 11:08 am

चांदण्यात एकदा न्हायचंय मला
ताऱ्यांच्या गावाला जायचंय मला

वेळूच्या बनात दूर किर्र रानात
गातो जे गीत वारा, गायचंय मला

रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात
सोडलेल्या दिव्यासंगे वाहायचंय मला

अंधारात सुगंधाचा मागोवा घेत घेत
स्वप्नांच्या गावाला जायचंय मला

माझ्यात जो खोल खोल बसलाय दडून
त्याचा रूप एकदा पहायचंय मला

मुक्त कवितामुक्तक

सुखासन

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
12 Aug 2016 - 12:49 am

आले कोण गेले कोण
कवतुक आता वाटत नाही ,
कुणी थांबले हसून बोलले
मनात किणकिण वाजत नाही ,
पानाफुलापक्ष्यांसाठीही
दार सुखाचे उघडत नाही
.
.
.
इतके माणूस छिलून निघते
एकांताच्या सुखासनावर!

-शिवकन्या

कविता माझीकाणकोणमुक्त कविताकरुणवावरवाङ्मयकवितासाहित्यिकजीवनमान

चंद्र चांदण्या समुद्र पाऊस

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
6 Aug 2016 - 2:11 pm

चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
सगळ्या कविता झाल्या करून
मग पाटी कोरी केली
आणि खूप वाट पाहिली
पण काहीच सुचेना

मग एक चंद्र काढला
आभाळासारख्या पाटीवर उठून दिसला
मग त्याला सोबत म्हणून चार चांदण्या
भरतीच्या लाटा आदळल्या खडकांवर
मग लगोलग पाऊसही बरसला
ओलेत्या वाळूत तुझं नावही लिहिलं

तुला आवडतात म्हणून
सगळ्यांना आणलं होतं सोबत
चंद्र चांदण्या समुद्र पाऊस
पण नेमकी तू आली नाहीस

मुक्त कविताकविता