सुख म्हणजे काय असते?
सुख म्हणजे काय असते?
- निनाव (१६.०९.२०१६)
सुख म्हणजे काय असते?
ओंजळीत भरलेले पाणीच जणु!
जमवले तर बसते लहानश्या जागेत,
सोडले जर का सैल, जाते वाहून
नवीन काठ शोधत - न सापडणारे!
सुख म्हणजे काय असते?
- निनाव (१६.०९.२०१६)
सुख म्हणजे काय असते?
ओंजळीत भरलेले पाणीच जणु!
जमवले तर बसते लहानश्या जागेत,
सोडले जर का सैल, जाते वाहून
नवीन काठ शोधत - न सापडणारे!
भूमिका :
अनेक वर्षानी जुनी पाने पालटली आज, आणिक हि कविता नजरेस अाली
मिपा वर बरेच नविन कवि वर्ग जुडले आहे, तेव्हा पुन्हा सादर करतो आहे.
"मिठीतली रात्र"
आले आहे पुन्हा सख्या रे
मिठीत तुझ्या आज पाहा रे
आवरे मोह मज न अधिक आता
पडदा तारकांचा पडू दे ना रे...
निजले जग, निजले तारे
अंतर असे हे मिटले सारे
माझ्या कुशीत तु उजळला अधिकच
तुझ्या आलिंगनात मज लाज ना रे
विझले कधी मी मलाच कळेना
तुझ्या कुशीतुन पदर सुटेना
उलगडली वेणी, उलगडले अशी मी
तुझ्या डोळ्यांत मज बघवेना रे
दारी श्रावण दारी साजण....
पाऊस आला पाऊस आला
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला
सरींवर सरी अशा कोसळल्या
डोळ्याच्या कडा ढासळल्या
असा काही बरसला श्रावण
न्हाऊन निघाली तुझी आठवण
रोज खेळते आठवणींची भातुकली
वाट पाहते तुझी एकली, तुझी एकली
कळलेच नाही कधी ठाकला
दारी श्रावण दारी साजण....
राजेंद्र देवी
नाही पुरेसे....
जगात शर्यती खूप आहेत
नाही पुरेसे चपळपण सशांचे
नको राहूस आळशी
ठेव आदर्श कासवांचे
चांगुलपणाचे दाखले नुसते
नाही पुरेसे दाखवायचे
लाव हातभार तू पण
जग हे आसवांचे
विझण्यास सूर्य
नाही पुरेसे ढग पावसांचे
नको राहूस कोरडा
ढाळ चार दोन थेंब आसवांचे
राजेंद्र देवी
दिशा
स्थापना तुझी करतात गणेशा
पण मागत नाहीत बुद्धी हे ईशा
धांगडधिंगा अन सैराट वागणे
लाज वाटत नाही लवलेशा
कोठे चाललो आहोत आपण सारे
कधी करणार विचार हे गणेशा
तूच कर आता चमत्कार काही
थांबव या मानवाच्या विनाशा
ढोल, ताशे, डिजे कल्लोळ नुसता
फाटून गेले कर्ण या कर्कशा
नाही ठेवीत पावित्र्य सणांचे
सापडत नाही यांना योग्य दिशा
राजेंद्र देवी
श्रावणभुल
एक शलाका नभास छेदून गेली
तुझ्या आगमनाची वर्दी देऊन गेली
विचाराने तुझ्या, हृदयी धडधड वाढली
जणू ज्वालामुखीने धरणी कंप पावली
तुझ्या आगमनाची सारी तयारी झाली
मेघांनी सारी सृष्टी न्हाऊन गेली
सारे रस्ते सजले फुलांनी
श्वासात सारे वास मिसळून गेली
ऊन सावलीचे खेळ खेळता
श्रावणभुल पण हरखून गेली
राजेंद्र देवी
आठवणींचा वसंत
वेळी अवेळी भासे मज चाहूल
वाजे तुझे पैंजणांविना पाऊल
लागताच तुझी चाहूल
मम हृदयी भृंगारव झाला
आठवणींची पाणगळ झडली
फुटली पालवी चैत्राला
शोभून दिसते गळ्यात तुझ्या
पर्णफुलांची माला
संपले बळ पंखातले
नाही मिळाले घरटे या पाखराला
काय नेणार बरोबर मज पुसशी
नेणार मी या आठवणींच्या वसंताला
राजेंद्र देवी
कामगार....
सायंकाळी रोजगार सारा
गुत्त्यावर झोकुनी गेले
घंटानाद करीती पुजारी परी
देव अन दैव त्यांचे झोपुनी गेले
मिटले डोळे सरणावरी
घेणेकरी हात शेकून गेले
वाहत्या नदीत राखेबरोबर
कुंकू कुणाचे वाहून गेले
वसूल करावयाचे म्हणुनी उरले सुरले
तेराव्याचे जेवून गेले
माय उपाशी, पदराआड पोर,
ओठ त्याचे सुकून गेले
राजेंद्र देवी
मनात असावा सतत श्रावण....
तुझे येणे जणू असते वादळ, ऐनभरातले
तुझे बोलणे जणू असते गीत, सुरातले
तुझी ओढ असते जणू पाणी, पुरातले
तुझे रुसणे असते जणू लटके, प्रेमज्वरातले
तुझे लाजणे उधळत असते रंग, गुलाबातले
तुझी आठवण येणे असते जणू ऊन, श्रावणातले
एवढेच असावे मनात असावा सतत श्रावण
जरी दीस असले ग्रीष्मातले.....
राजेंद्र देवी