मुक्त कविता

तळवे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
13 Apr 2019 - 11:56 pm

हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!

शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...

ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....

नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?

-शिवकन्या

प्रेम कविताभावकवितामुक्त कविताहट्टकरुणधोरणमांडणीवावरसंस्कृतीप्रेमकाव्यमुक्तकसाहित्यिकजीवनमान

...असं काही नसतं

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
6 Apr 2019 - 5:44 pm

नवरा बायकोचं भांडण
असं काहीच नसतं
तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम
बस एवढंच म्हणणं असतं

बघितलं तर ती ही एक गंमत असते

हाताबाहेर जाईल
एवढं ताणायचं नसतं
दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर
आपोआपच नरम व्हायचं असतं
वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं
धरणीला भिजवायचं असतं
तिनं हळूच
कुशीत शिरायचं असतं
त्यानं हळूवार
कुरवळायचं असतं
मायेच्या ओलाव्यात
नवीन जग फुलवायचं असतं

कविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

दाराआडचा बाबा

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 8:02 am

मूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी

एक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार
जिथे एक मुलगी बसली आहे नटून....
करत असेल का ती ही ताटातुटीचा विचार?
जाईल का ती ही
मुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे?
बाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
उभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत,
याची जाणीव नसलेली मुलगी
आपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....
मुलगी हरवलेला बाबा
गळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो...
बघतच राहतो....

फ्री स्टाइलभावकवितामुक्त कविताविडम्बनकरुणविडंबन

डॉक्टर हा निमित्तमात्र..

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
28 Mar 2019 - 8:05 am

मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र..

(मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून)

मग पुढे असं होतं की ..
दातामधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधला नंबर वाढत जातो.
बोळक्यामधलं हसू निवत जातं...
नावं होतात विसरायला..
आणि घरचे लागतात रागवायला..
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
डॉक्टर हा निमित्तमात्र..

vidambanमुक्त कविताहास्यकविताविडंबन

काचेच्या अलिकडून

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
9 Mar 2019 - 9:12 pm

बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो
किंवा लक्ष नाही असं दाखवतो
नाहीच जमलं दुर्लक्ष करणं
तर मानेनेच नाही म्हणतो
आणि कधीकाळी दिलेल्या
दहा रूपड्याचं गणित मांडून
स्वतःचच समर्थन करतो...
पण खरं सांगायचं तर,
आत एक द्वंद्व चालू असतं
कारण मला पक्कं ठाऊक असतं की,
नकार,
अपमान,
एकटेपण,
तिरस्कार,
नाकारलेपण,
संघर्ष,
या शब्दांचे अर्थ
मला नाही कळणार कधीच....
ते कळतील
फक्त
गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या
आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या
....त्या हिजड्याला

मुक्त कविताकविता

ते दोघे

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
16 Feb 2019 - 1:10 am

पानगळीने रेखीव झालेल्या
त्या प्रचंड वृक्षातळी
ते दोघे होते मघामघाशी तर!

मी पाहीले त्यांना
बराच वेळ खाली मान घालून
एकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना,
कुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना,
अन् तेव्हा रस्ता हसताना...

मी पाहिले त्या दोघांना ,
हात हातात घेताना
'बाहों के बाहर
नजरों से ओझल होना ही
लकिरों पे लिखा है
तो वो लकिरे ही मिटा देते हैं'
त्याने एवढेच म्हणलेले
मला ऐकायला आले
नंतर मला ते दिसले नाहीत...

अदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कविताअद्भुतरसमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमान

टोळीगीत इ.स. २०५०?

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
29 Jan 2019 - 7:00 pm

तुमच्या पिढ्यांच्या
अक्षम्य चुकांचे
पातक अम्हाला
रोज भोगायचे
रोज बघायचे
भेसूर रुपडे
भकास पृथ्वीचे
अभद्र कार्बनी
पाऊल ठशांचे
विटल्या फाटल्या
ओझोन थराचे
गटारगंगांचे
विखारी धुराचे
अवकाळी वृष्टीचे
जखमी सृृृष्टीचे
सिमेंटी जंगलांचे
भेगाळ भूमीचे
मरणपंथाच्या
हरितवनांचे

थांबा थांबा ऐका
चीत्कार कुणाचे?
पाण्याचा टँकर
पळवून आणल्या
मरणासन्नांच्या
आमच्या टोळीचे!

मुक्त कवितामुक्तकसमाज

तुझ्या कवितेची ओळ

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Jan 2019 - 11:47 am

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
पाखराच्या लकेरीने
हिर्वी वेल थर्थरते

कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

मुक्त कविताकविता

तुझी कविता

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
18 Jan 2019 - 7:55 am

तुझ्यापाशी जन्मलेली माझी
हट्टी, खोडकर, अल्लड
कविता
तू डोळ्यांत सांभाळून
घेऊन ये....

येता येता वाट चुकली
तर मला जागं कर...पण
मी माझ्याच तंद्रीत असेन
तर
माझ्या कवितेला वाट विचार....

अदभूतकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितामुक्त कवितामांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

माझ्या नकळत

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
18 Sep 2018 - 9:56 pm

मी चालून आलो अशाच वाटा
ज्या माझ्या नकळत
मुक्कामी पोचवून निरोप घेण्याआधी
पुढील प्रवासाच्या धुंदीतच
हरखून गेल्या

मी मोजून आलो अशाच लाटा
ज्या माझ्या नकळत
किनाऱ्यावरी फेनिल होऊन फुटण्याआधी
सागर तळीची अपार शांती
पिऊन आल्या

मी शोधून आलो अशाच ओळी
ज्या माझ्या नकळत
विस्मरणाच्या वादळात पडझडण्याआधी
शब्दभूल पाडीत कुणाच्या
ओठी रुळल्या

मुक्त कविताकविता