पाणी

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
19 Apr 2019 - 6:27 am

इतक्या पाण्याचे शरीरमन बनवताना
विचार करायचा देवा,

पाण्याला इतके झोके देताना
उसंत घ्यायची देवा....

उसळून पुन्हा आदळते पाणी
खडक द्यायचा देवा...

दोन डोळे पुरत नाहीत
पाण्याचा संसार पेलताना...

देवा, आता पाण्याचे तीर्थ करा
अन् पाण्यातून मुक्ती द्या....

शिवकन्या

कविता माझीकालगंगाभावकवितामाझी कवितासांत्वनाकरुणशांतरसकवितासाहित्यिकजीवनमान

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

23 Apr 2019 - 12:12 pm | पाषाणभेद

दिवसेंदिवस प्रश्न गहन होत आहेत.

गोंधळी's picture

23 Apr 2019 - 2:02 pm | गोंधळी

काव्या मागच्या भावना नाही समजत आहेत.
पुर किवा त्सुनामी च्या संबंधी असावी.