✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(दाराआडचा यजमान)

न — नाखु, Fri, 04/26/2019 - 19:59
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो किती बाहेर? दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा .... असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ? येत असेल का तो ही आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे? यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही... (पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते) मग तो कल्पनेचे पंख पसरतो, त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन यजमान शांतपणे खुष राहतो.... दूरदेशी लेकरे आपल्याच जगात पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात... भेटतच राहतात.... (यजमान पुन्हा एकदा ताजातवाना होतो नव्या स्वप्नांसाठी ) ..

प्रतिक्रिया द्या
3458 वाचन

💬 प्रतिसाद (6)

हा .... हा .....

चौथा कोनाडा
Sat, 04/27/2019 - 13:12 नवीन
हा .... हा ..... बिचार्‍या यजमानाची कुचंबण !
मग तो कल्पनेचे पंख पसरतो, त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन यजमान शांतपणे खुष राहतो.... दूरदेशी लेकरे आपल्याच जगात पाक्षिक आठवणीत ठेवून जमेल तसं (तर) चिमुकल्यांच्या हट्टाने दृकश्राव्य माध्यमातून (च) भेटत राहतात... भेटतच राहतात....
हे सुरेखच !
  • Log in or register to post comments

+१

यशोधरा
Sat, 04/27/2019 - 13:43 नवीन
हाच भाग मलाही आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा

+१

चौथा कोनाडा
Tue, 04/30/2019 - 12:47 नवीन
+१ .... आणि याच परिच्छेदातले कंसातले च (च) "भिवविती संध्याछाया"ची आठवण देऊन उदासवाणं करून जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मस्त

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 04/27/2019 - 14:05 नवीन
या दारा आड अजून काय काय दडले आहे कोण जाणे? पैजारबुवा
  • Log in or register to post comments

सांप्रत

नाखु
Sat, 04/27/2019 - 15:08 नवीन
कुठलीही दारं (मनाची आणि जनांची) उघडी नसल्याने,दारामागे अंमळ गर्दी जमली आहे. दाराच्या दोन्ही बाजूंचा अभ्यंगत पांढरपेशा मध्यमवर्गीय नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

जे पैंबू काकांचं मत आहे तेच

खिलजि
Tue, 04/30/2019 - 19:16 नवीन
जे पैंबू काकांचं मत आहे तेच माझेही आहे .. काय काय लिहिलं जाणार आहे ते तो वरचाच जाणे .... आणि हो कविता आवडली गेलीय हे वेगळे सांगायला नको ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा