Skip to main content

भान

लेखक मका म्हणे यांनी सोमवार, 21/09/2020 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही कसली हळवी गीते मज स्मरति मागोमाग नात्यांवर जमली राख आतून देतसे ऊब ही असली कसली खेळी तू खेळून जासी सहजी हरताना जख्मी होतो तरी वाटे लावू बाजी स्मरणारे जुनेच डाव मी करतो अलगद चाल अन पहाता पहाता देही व्रण उठती लाले लाल या खेळाचे मैदान जरी भासे अंगण वाडी पण नियती लागता मागे पळता भुई वाटे थोडी हे नियम उलटे सुलटे मज कळो लागले जेव्हा बळ सरले त्राणांमधले संपला वेळहि तेव्हा सरले जरी अंतर आता परी देणे टळले नाही तो फेडून घेतो आधी जे दिलेच नव्हते काही

शिक्षक दिन

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 20/09/2020 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
*गुरु महिमा गावत सदा* *मन राखो अतिमोद |* *सो भव फ़िर आवै नहीं* *बैठे प्रभु की गोद ।।* *...संत क़बीर* आज शिक्षक दिन..! ज्याच्या कडून आपण काही ना काही शिकतो, तो आपला शिक्षक..! पहिला मान *"आईचा"*.. बोली भाषेपासून ते जीवनाच्या प्रत्येक वळणावर, ती बिचारी शिकवतच रहाते.. शाळा कॉलेजच्या दिवसात, *"शिक्षकच"* आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यात मोठा वाटा उचलतात.. आपणही लहानमोठ्या *"अनुभवातून"* शिकतो.. कधी दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो.. म्हणतात ना, पुढच्यास ठेच-मागचा शहाणा..!! कधी एखादी *"वेळ"* अशी येते, की आयुष्यभर पुरेलसा अनुभव देऊन जाते..

परतीचा प्रवास

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 20/09/2020 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
मनी ध्यानी नसताना अचानक आज माहेरी जाण्याचा योग आला. ती स्वतःशीच हसली. सणवार, लग्न-मृत्यू, दुखणी-खुपणी असं काही मिशन नसताना स्वच्छंदपणे माहेरी जायला मिळणं, ही तिच्यासाठी पर्वणी होती. दादा-वहिनी मुलांना घेऊन आठवडाभर ट्रीपला गेले म्हणून आईच्या सोबत ती.. असं ठरलं कारण आई आता ७६ वर्षांची होती. एक अनामिक हुरहुर वाटत होती. गरमागरम चहा आणि तिच्या आवडीच्या दडपेपोह्यांनी आईनं स्वागत केलं.. तासभर चहाच्या टेबलावरच गेला.. पण पाण्यात टाकल्यावर अळीव फुलावा,.. तशी ती सुखावली. रात्री कढी खिचडीचा सोपा बेत करून मायलेकी, जुन्या आठवणींच्या गप्पात रंगून गेल्या.. ती निजायला जाणार इतक्यात आईनं बोलवलं.

मन

लेखक Pratham यांनी शनिवार, 19/09/2020 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
मन हे कधी शांतपणे खळखळणारा झरा, तर कधी अथांग सागरी लाट. मन हे कधी कातळ खडकासारखे टणक, तर कधी कापसासारखं नाजूक. मन हे कधी आकाशात उंच झेपावणारे पाखरू, तर कधी अविचल,स्निथप्रज्ञ क्रौंच. मन हे कधी हिमालयासारखे भव्य, तर कधी लाजाळू सारखे संकुचित. मन हे कधी एक संथ पावसाची लहर, तर कधी धो धो कोसळणाऱ्या सरी. -प्रथमेश

शिवप्रतापाची झुंज ( भाग ४)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 19/09/2020 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता शिवप्रतापाची झुंज ( भाग १) शिवप्रतापाची झुंज ( भाग २) शिवप्रतापाची झुंज ( भाग ३) दक्षिणेकडे आडवातिडवा पसरलेला महाबळेश्वरचा डोंगर्,त्याला चिकटून दक्ष असलेला वैराटगड, पुर्वेला चंदन-वंदनची दुर्गजोडी, उत्तरेला एखादी पेटी डोक्यावर घ्यावी तसा दिसणारा आणि आई काळुबाईच्या वाटेवर भुत्या असावा तसा खडा असलेला पांडवगड, कातळ

कोणे एके काळी ...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 19/09/2020 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोणे एके काळी जेव्हा लोक एकमेकांंना सहज भेटत असत, कारणाशिवाय.. तेव्हा मॉलच्या पाय-यांवर भेटलास. इकडचं तिकडचं बोललास. मी हसत होते वेड्यासारखी.