मी पुन्हा येईन
कच्चा माल
घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन
जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन
नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन
मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन
लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन
- पाषाणभेद
११/११/२०१९
आवडली
मी पण ,, पुन्हा येईन , पुन्हा
ही लाईन घेवुन मला लिहायचे
मजेशीर
=))
मस्तच. ...
कुणी लिहिले
काल पैसे कट झालेत तुमचे.
घ्या, ते परत आले :)
आमची व्यथा वेगळीच....!