Skip to main content

समुहगीतः भारतभूचे सुपुत्र आम्ही

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 12/11/2019 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू गान वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ|| देशासाठी कितीक झटले कितीक हुतात्मे अमर जाहले स्मृती तयांची आज येतसे स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१|| हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा गर्जले सैनीक पुढे चला लढा शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२|| भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू गान वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||धृ|| - पाषाणभेद १२/११/२०१९
लेखनविषय:

वाचने 2890
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया