Skip to main content

शिवप्रतापाची झुंज ( भाग ५)

लेखक दुर्गविहारी यांनी बुधवार, 23/09/2020 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता शिवप्रतापाची झुंज ( भाग १) शिवप्रतापाची झुंज ( भाग २) शिवप्रतापाची झुंज ( भाग ३) शिवप्रतापाची झुंज ( भाग ४) टेहळणी बुरुजावर उभे राहून राजे उगवतीला महाबळेश्वराचा डोंगर निरखत होते.

आठवण

लेखक Prajakta Sarwade यांनी बुधवार, 23/09/2020 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ -प्राजक्ता

पल्स ऑक्सीमीटरचे गमभन

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 22/09/2020 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
कोविड महासाथीच्या निमित्ताने बऱ्याच सुशिक्षित कुटुंबांमध्ये पल्स ऑक्सीमीटर या उपकरणाचे आगमन झालेले आहे. या आजारात काही रुग्णांना श्वसन अवरोध होऊ शकतो. परिणामी शरीरपेशींना रक्ताद्वारे मिळणाऱ्या ऑक्सीजनचे प्रमाण बरेच कमी होऊ शकते. या परिस्थितीचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता यावा, या उद्देशाने या घरगुती उपकरणाचे उत्पादन केलेले आहे. सध्या त्याचा लाभ बरेच जण घेत आहेत. त्याचबरोबर अनेक सामाजिक आरोग्य सर्वेक्षणातही त्याचा चाळणी चाचणीसारखा वापर होत आहे. या उपकरणातून ऑक्सीजन संबंधीचे जे मापन दिसते त्याबद्दल सामान्यांत कुतूहल दिसून आले.

चक्र (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 22/09/2020 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
ती लगबगीने लोकलमधून खाली उतरली. लोकल तशीच पुढे निघून गेली. रात्र बरीच झाली होती. सगळीकडे सामसूम जाणवत होती. तिचा हा नित्याचाच प्रवास होता, पण आज उशीर जरा जास्त जाणवत होता. लोकलचा प्रवास नित्याचाच असला तरी, एवढा उशीर तिला अपेक्षित नव्हता.      ते उपनगर नवीनच वसलेले असावे. जास्त रहदारी, धावपळ जाणवत नव्हती. ती स्टेशनवर उतरली, तेव्हा दोन-चार रिक्षा, काही तुरळक माणसे स्टेशनवर  दिसत होती. बाकी सर्व शांतता जाणवत होती. ती लगबगीने स्टेशन बाहेर आली. तिने एकदाआजूबाजूला नजर फिरवली. रिक्षा करावी का? हा विचार मनात डोकावला.

जमतारा (की जामतारा) पॅटर्न : कॅशबॅकच्या नावाखाली लुटीचा नविन प्रकार

लेखक सॅनफ्लॉवर्स यांनी मंगळवार, 22/09/2020 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(बरेच वर्ष मिसळपावचा सभासद आहे पण लिहिण्याचा योग आज आला. काही शुद्धलेखण्याच्या चुका असतील तर जरून सांगा. मी हे लेखन गूगल इनपुट टूल वापरून केलेलं आहे जे मला खूपच सोपं वाटत. पण नंतर गमभन टंकलिपी वापरुन पाहिली, तीपण सोपी आहे वापरायला, त्यामुळे यानंतरच लेखन तेच वापरुन करेन. ) आजचा (18 सप्टेंबर 2020) माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला अज्ञात क्रमांकावरून फोन आला की तो मुंबईतील फोनपे मुख्य कार्यालयातून कॉल करीत आहे आणि मला काही फोनपे कॅशबॅक मिळाली आहे पण त्यासाठी त्याला माझ्याकडून काही माहिती हवी आहे. भाषा खूप सभ्य होती परंतु इंग्रजी खूपच खराब होती.

पायनॅपल स्वीट करी Pineapple sweet curry

लेखक Gk यांनी मंगळवार, 22/09/2020 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: १ तास लागणारे जिन्नस: 1 अननस बारीक चिरून तिखट , मीठ कांदा कापून फोडणी साठी तेल , मोहरी , जिरे , हिंग , आले किस, सुक्या मिरच्या 4 , कढीपत्ता अर्धी वाटी गूळ क्रमवार पाककृती: अननस बारीक चिरून थोडेसे पाणी , मीठ व भरपूर लाल तिखट घालून कुकरच्या भांड्यात ठेवून कुकर मधून शिजवून घ्यावे P शिजल्यानंतर फोडी एका ताटात गार करून घ्यावे , पाणी बाजूला काढून ठेवावे , फेकू नये , मग मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यावे . मग फोडणी करावी - तेल , मोहरी , जिरे , हिंग
Taxonomy upgrade extras

कोविड योद्धा - अथर्व

लेखक विटेकर यांनी सोमवार, 21/09/2020 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
दि २३ ऑगस्ट ला माझा मोठा मुलगा ( वय २४ ) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोविद केयर सेंटर मध्ये सेवेसाठी म्हणून दाखल झाला. घरात गणपती बसले होते पण त्याने ठरविल्याप्रमाणे तिथे जायचे ठरविले आणि बाप्पाना सांगून तो गरवारे कॉलेज पुणे येथील सेंटरमध्ये दाखल झाला. त्यापुर्वी ही त्याने स्क्रीनिंगचे काम केले होते पण आता थेट पॉझिटिव्ह लोकांच्याबरोबर काम करायचे होते. त्याला नव्हता पण आम्हाला थोडा ताण आला होता. दि ३० ऑगस्ट पर्यंत त्याने एक आठवडा काम केले ,त्यानंतर विलगीकरण असे ठरले होते पण स्वयंसेवकांची कमतरता म्हणून तो पुढच्या बॅच मध्येही सामील झाला ..