Skip to main content

माणूस आणि एकलेपण

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 16/09/2020 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात. माणूस या जगात एकटा जगू शकेल?

वर्षादूत

लेखक मका म्हणे यांनी बुधवार, 16/09/2020 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
काळ्या झालरीची नक्षी नभी लोलक विजांचे वाजे चौघडा नगारे वाऱ्यासंगे हे ढगांचे आला,आला म्हणताना दारी येउनी ठाकला वर्षातला नवा ऋतु माझ्या डोळ्यात साठला किती किती त्याचा दंगा किती रूपे, किती रंग काळ्या फत्तराला देई एक ओलसर अंग त्याचे थेंब, त्याच्या सरी येती धावून धावून आर्त तापल्या भुईला भेटी कवेत घेऊन कोसळल्या धरेवरी जशा धारांवर धारा काळी माय झाली सर्द बिलगून लेकराला मग धावले बाहेरी तिच्या अंतरीचे काही वाहे भरून भरून जाऊ दश दिशा पाही मंद गंध जीवघेणा कसा पसरे भरारा गेला दाटून कोंदून ओल्या सृष्टीचा गाभारा वाटे हवासा हवासा पाहुणा हा अनाहूत निथळूनी गेले मन पाहुनी हा वर्षा दूत

देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा!

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 16/09/2020 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
p { text-align: justify; font-size: 17px; } देशवासियांनो जरा जपून व्यक्त व्हा! ‘हजारो भारतीय चीनच्या हेरगिरीचे लक्ष्य’ , ‘भारताच्या 10 हजार व्यक्तींवर चीनची नजर’ अशा मथळ्याच्या बातम्या आपल्यापैकी बहुतेकांनी नुकत्याच वृत्तपत्रांमधून वाचल्या असतील. चीन सरकार आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित एक मोठी डेटा कंपनी कमीत कमी 10 हजार भारतीयांच्या रिअल टाईम डेटावर लक्ष ठेवून आहे. यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते सोनिया गांधी, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, न्यायपालिका आणि उद्योगपतींचाही समावेश आहे.

स्मायली / Emoji

लेखक टर्मीनेटर यांनी मंगळवार, 15/09/2020 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, सोशल मिडिया आता आपल्या दैनंदिन जीवनातला एक अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम अशा अनेक रुपात आपण त्याचा वापर करतो. इतकेच काय आपल्या सर्वांचे आवडते मिसळपाव हे संकेतस्थळही त्याचेच एक रूप आहे. इथे आपण अनेक लेखकांचे लेख, कथा, कविता, पाककृती वाचतो, त्यावर प्रतिसाद देऊन व्यक्त होतो. सोशल मिडीयावर वावरताना आपण कित्येक प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी 😀 🙏 🙂 👍 😎 अशा अनेक स्मायली / एमोजींचा वापरही सढळहस्ते करत असतो.

#ALAN WALKER #MUSIC

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 15/09/2020 18:38 या दिवशी प्रकाशित केले.
#ALAN WALKER #MUSIC Alan walker चे on my way आणि इतर गाण्यांची “World of Walker triology” mini film च आहे,त्याबद्दल इथे थोडे लिहिते आहे,साधारण २०१५ -१६ पासून टप्प्या टप्प्याने याची वेगवेगळी गाणी youtubeवर प्रदर्शित होत राहिली आहेत.२०२० मध्ये या गाण्यांच्या मालिकेचा शेवट झाला आहे. Faded (2015) and Sky नावाच्या गाण्याने या seriesची सुरुवात होते . ..कथा अशी आहे की, १. Tired या गाण्यात दाखविले आहे की, Alan walker हि संस्कृती प्राकृतिक आपदेमुळे नष्ट झाली असते.तेव्हा Walker black team (अनुयायी) हे नष्ट होतात. २.

मज सुचले गं

लेखक अन्या बुद्धे यांनी मंगळवार, 15/09/2020 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
मज सुचले गं सुचले मंजुळ गाणे हिंडता डोंगरापाठी सापडले कोरीव लेणे विसरल्या उन्हातली वाटा विसरले पथातील काटे ही गुहा भयावह आता स्वप्नासम सुंदर वाटे रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे बोलाविण घुमती वाटे तालात नाचती प्रीती शब्दाविण होती गीते बेभान भावना गाती हा लाभ अचानक झाला हे कुण्या प्रभुचे देणे आकृती मनोहर इथल्या मी एक त्यातली झाले लावण्य बरसते येथे सर्वात तयात मी न्हाले सौंदर्य जीवना आले जन्माचे झाले सोने गीत:शांताबाई शेळके संगीत:दत्ता डावजेकर स्वर:आशा भोसले ################# शब्दापलीकडे जाऊन काहीतरी सुचवणारं.

शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 15/09/2020 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता शिवप्रतापाची झुंज ( भाग १) शिवप्रतापाची झुंज ( भाग २) राजगडाच्या सदरेवर नेहमीप्रमाणेच कामकाज सुरु होते.बराच नवीन मुलुख स्वराज्याला जोडला गेला होता.त्याचे खलिते,महजर सदरेवर येत होते.कल्याणच्या बंदरात जहाजाची उभारणी सुरु होती.त्याच्या खर्चाची तजवीज लावायची होती.राजे स्वत उसंत न घेता या सार्‍या मसल्यात जातीने लक्ष घालत होते.ईतक्यात एक खलिता घेउन हेजीब विजापुरावरून आला आणि त्याने लखोटा थेट राजांच

कार्गो - एक फसलेला प्रयोग

लेखक साहना यांनी मंगळवार, 15/09/2020 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान कथा हा प्रकार मला विशेष प्रिय आहे. कार्गो हा नेटफ्लिक्स चा चित्रपट पाहायची उत्सुकता होती. आमचे एक मित्र ह्या प्रकल्पावर काम करत असल्याने सुद्धा विशेष उत्सुकता होती. पण हा चित्रपट सपशेल फेल आहे. कथानक तुम्हाला सांगितले तरी काहीही फरक पडणार नाही कारण ह्यांत स्पॉईलर असे काहीच नाही. "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ह्यांत जसे मथळ्यांतच कलाईमेक्स सांगून कारण जोहर मोकळा झाला होता त्याच प्रमाणे कार्गो म्हणजे सुद्धा एक अवजड ओझे आहे जे तुम्हाला सहन करावे लागते. राक्षस आणि मानवांचा एक तह झाला आहे. राक्षस लोक म्हणजे X-men प्रमाणे विशेष शक्ती असलेले खूप वर्षे जगणारे लोक आहेत.