तो मी नव्हेच --- कीती समान नामधारी?
मिपाच्या प्रमोद देवांचे तो मी नव्हेच डिसक्लेमर वाचून हा चर्चेचा विषय सुचला. आपल्याच सारखे नाव असणारी आणखी इतर व्यक्तीमत्वे जगात असतात. (कधी कधी आपल्यासारखे तंतोतंत दिसणारेही असतात. ते जरा पचवायला कठीणच जाते.) मिपाकरांपैकी कोणाला आपापले समान नामधारी सापडले आहेत का?
मी माझ्यापासून सुरवात करतो.
मी अरुण मनोहर रहाणार सिंगापूर. ललीत साहित्य लिहीणे आणि वाचणे हा छंद.
याशिवाय मला दोन आणखी अरुण मनोहर माहित आहेत.
एक अरुण मनोहर हे नागपूरचे नावाजलेले सिनीयर लॉयर प्रसीद्धच आहेत.
दुसरे अरुण मनोहर graduate student working towards PhD at the Department of structural engineering, UCSD.
फरसबीची भाजी
आनंदघन यांचे राजवाड्यांचे गाव वाचले आणि आमची म्हैसूर ट्रीप आठवली.त्यावेळी आम्ही एका गेस्ट हाऊस मध्ये राहिलो असताना तेथल्या खानसाम्याने फरसबीची इतकी झक्कास भाजी केली होती की त्याच्याकडून रेसिपी घेतल्याशिवाय राहवले नाही.तीच पाकृ तुम्हाला सांगत आहे.
साहित्य- २५० ग्राम फरसबी,१ मध्यम कांदा, १/२ वाटी ओले खोबरे,२ सुक्या लाल मिरच्या,कढीलिंबाची ४,५ पाने,१/२ चमचा उडीदडाळ,फोडणीचे सामान,तेल,मीठ चवीनुसार,साखर १ चहाचा चमचा,कोथिंबिर
कृती- कांदा चौकोनी चिरा,फरसबी चौकोनी चिरा.१ टेबलस्पून तेलात फोडणी करा.त्यात कढिलिंबाची पाने,उडदाची डाळ,लाल सुक्या मिरच्या घाला व परता.कांदा घाला व परता.खोबरे घाला व परता.झाकण ठे
सोलमेट
२५ वर्ष.. किती पटपट जातात दिवस.. २५ वर्षांचा सहवास.. मेघाचा आणि माझा.. इच्छा खूप होती पण अस खरच घडेल, वाटलच नव्हत..
आज सगळे कौतुक करत होते.. सिद्धू आणि आपली जोडि म्हणजे आदर्श घेण्यासारखी आहे म्हणे.. आणि काय काय.. पण.. २५ वर्ष!
सगळ श्रेय खरतर मेघा, तुझ आहे.. काय कमी होत तुला.. चांगल शिक्षण, नोकरी.. स्वतःच्या पायावर उभी.. खर्या अर्थाने कर्त्रूत्ववान मेघा.. पण माझ्यासारख्या सामान्य मुलाशी लग्नाला तयार झालीस.. मेघा, खरच सगळ श्रेय तुला आहे..
पं यशवंतबुवा महाले, एक आभाळाइतका मोठा माणूस!
"अरे तू येणार होतास ना? कधी येणार आहेस? अरे किती रे वाट पाहयची तुझी! एकदा घरी येऊन माझ्या तंबोर्यांच्या जवारीचं काम तेवढं कर की रे जरा!"
"हो महालेसाहेब. आता एकदा नक्की येतो, जमवतो!"
महालेसाहेबांच्यात आणि माझ्यात फोनवर असा संवाद अनेकदा झाला आहे. त्यांचा फोन आला की मलाच अपराधी वाटतं आणि कामांची सगळी गडबड बाजूला सारून महालेसाहेबांकडे आता अगदी नक्की जायचंच, असं मी ठरवतो!
पं यशवंतबुवा महाले. गाण्यातला एक मोठा माणूस! परंतु हे नांव अगदी सर्वांनाच माहिती नाही.
खाना खजाना
खाना खजाना
आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!)
टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही.
अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य
हैदराबाद:
येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".
शिवस्तुती
अति शितल मृदू शांत
चंद्र्मा तो ललाटी
जटी जया उगम पावे
जन्हवी पुण्यदाती
लेपुन तनू भस्मा
स्वात्मनंदा विराजी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी
अणू रणू व्यापणारी
लोचने तीन दिव्य
करी धरी ड्मरू
आणि त्रिशुळ भव्य
अति धवल दिव्य कांति
तेजसी ती प्रकाशी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यराशी
अर्धांगी आदी शक्ती
वाम अंगास ज्याच्या
जगत वंद्य पुत्र
गणपती स्कंदराजा
देखणा करी प्रपंचा
शिव विरक्त योगी
नमन तव करीतो
शंकरा पुण्यश्लोकी
अविरत जपी रामा
भक्त श्रेष्ठा दयाळा
शरण तव येता
उद्ध्ररसी कृपाळा
सहज तरूनी जाइ
प्राथ्रितो जो शिवाला
नमन तव करीतो
शंकरा विश्वनाथा
नृत्यनिपुण नटराजा
मोहसी तू जगाला
तांडव परि करीता
विश्व जाते लयाला
क
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
