तहान
झाडांचे उंच पिसारे
वारा हलतो जरासा
माझ्याही ओठावरती
थिजली शुष्क पिपासा
पेटले आभाळ वरती
दूरस्थ शीतल जाळ
पाण्यावर मंद लहरींच्या
पायी बांधले चाळ
पोकळीत वैशाखाच्या
तरंगते उष्ण हवा
डोंगरात झाडामध्ये
शोधते शांत विसावा
दगड झाड अन पाणी
मी याहून वेगळा नाही
कोलाहलातून शहराच्या
अलगद निसटू पाही
बुडता सूर्य मावळतीला
घरट्यात परतती रावे
कणाकणात या सृष्टीच्या
अलगद मिसळून जावे
जाग झोपेमधुनी येता
जाणीव याची व्हावी
आकाशी डुलत्या फांद्या
मुळे जमिनीत असावी
रोकडा क्षण आत्ताचा
जाणिवेत पूर्ण भरावा
साजरे पुरे अस्तित्व अन
जगण्याचा उत्सव व्हावा
-अनुप
मिसळपाव
या धाग्यावर प्रियालींनी आल्या आल्या माझा बोल्ड उडवला. म्हणाल्या, मिपाचा दिवाळी अंक २००८चा येण्याच्या आधीच हा लेख प्रकाशित केला आहे? आता पाहता ९८०० टिचक्या त्याला पडल्या. नाडी ग्रंथ विषयाने धमाकेदार एन्ट्री घेतली.
त्यानंतर विविध विषयावर माझे लेखन सादर करायला हा मंच फारच उपकारक झाला. मिपाकरांच्या मेळाव्यात नवे मित्र झाले. मुंबईला जाऊन बोटीतील प्रवासकरून घारापुरीच्या लेण्याची माहितीपुर्ण सफर झाली.