✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लोहगड विसापूर प्रकाशचित्रे

ज
जुना अभिजित यांनी
Mon, 10/01/2007 - 18:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13371 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ध
धनंजय Mon, 10/01/2007 - 19:21 नवीन

आहाहा

सगळीच चित्रे ए-वन भिंतीवर टांगण्यासारखी आहेत. एक खास म्हणजे खासच लक्षात राहील ते पिवळ्या फुलांना मुख्यभागात घेऊन विंचूकाट्याला पार्श्वभूमीत टाकलेले. एखादी बाब ओझरत्या धूसर उल्लेखाने अधिक ठसा उमटवते, ही छायाचित्रातली शुद्ध कविता आहे, कविता. ते रोडक्या गुराचे चित्र काहीही गाजावाजा न करता मोठी गोष्ट सांगून जाते. आता गप्प बसतो, कारण एकेका चित्राची प्रशंसा करायला लागलो तर मिसळपावाचे मेगाबाईट संपतील.
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Mon, 10/01/2007 - 20:32 नवीन

असेच

त्या चित्राचा विशेष उल्लेख मीदेखील केला होता. :) सर्व चित्रे सुंदर आली आहेत. लोहगडाच्या मानाने विसापूर अधिक रांगडा आणि अवघड आहे. लोहगडावर मंदिर, दरवाजे, गुहा वगैरे बांधकामे जास्त तर विसापूरची तटबंदी अप्रतिम आहे. पेशव्यांच्या काळात लोहगड हा लुटलेल्या खजिन्याचे कोठार तर विसापूर हा कैदखाना होता असे कळले. मीदेखील स्वतंत्रपणे गणेशविसर्जनाच्या दिवशी जाऊन आलो. अभिजितने लिहिले नाही तर माझे लिखाण सहन करावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 10/01/2007 - 21:43 नवीन

उत्कृष्ट

ते चित्र (पिवळी फुले) खरंच सुंदर आहे. प्रचंड आवडले. - (आनंदित) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
प
प्रियाली Mon, 10/01/2007 - 19:59 नवीन

मस्त

फोटो मस्त आहेत पण जरा लेख लिहा की वेळ मिळाला की. फोटोंची वर्णनेही तेवढीच मस्त असतील असे वाटते. ;-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 08:14 नवीन

सुरेख चित्रे..

अभिजिता, अतिशय सुरेख चित्रे आहेत. क्या बात है..'फुलराणी इथेच तर नसेल ना खेळत.' या चित्राने तर मन वेडावून टाकलं. ढगाळलेल्या सूर्याचं चित्रंही मस्त! घनमेघांनी भास्कररावांची प्रखरता साफ निष्प्रभ करून टाकली आहे! :) कार्यबाहुल्यामुळे लेख लिहीता येत नाहिये. पण तोपर्यंत ह्या प्रकाशचित्रांवर नजर फिरवा. लेखाचीही वाट पाहात आहे रे अभिजिता! लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित. आहाहा! हे वाचून मात्र तुझा हेवा वाटला रे अभिजिता!:) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Tue, 10/02/2007 - 09:52 नवीन

छान

फुलांची प्रकाशचित्रे चांगलीच आहेत पण गडाच्या भिंतीची चित्रे जास्तीच आवडली. लेखही लिहा लवकरच.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 10/02/2007 - 13:03 नवीन

लोहगड

कितीतरी वर्षांपूर्वी केलेल्या लोहगड,कार्ले भाजे च्या ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या,सुंदर चित्रे! सवड मिळाली की लेख टाकाच ! स्वाती
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 09:42 नवीन

हो नक्की

अजून हातपाय दुखायचे थांबले नाहीत तोवर लेख लिहून घेतो. :-) सर्वांच्या उत्साहवर्धक प्रतिसादांबद्दल धन्यवाद. लोहगडाच्या पायथ्याशी भाजे गावात कडक मिसळ खाऊन आलेला अभिजित.
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 10/03/2007 - 11:53 नवीन

छान चित्रे!!

मस्त छायाचित्रे!! पुढे फुले आणि मागे विंचूकाटा छानच आहे. लोणावळ्याजवळचा परिसर वेगवेगळ्या किल्ल्यांनी नटलेला आहे. प्रत्येक किल्ला काहीतरी वेगळेपण दाखवतो. फुले आणि हिरवाईने नटलेला हा भाग आपली एक वेगळीच आठ्वण ठेवून जातो.येथील काही किल्ले (लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, घनगड, राजमाची, तैल-बैला, कोराई, नागफणी) माझे करून झाले आहेत. काही राहीलेले (ढाक, मोरगिरी) आहेत ते करायला कोणी येत असेल तर कळवावे, कधीतरी जाउ. जमेल तेव्हा लिहायचा प्रयत्नही करीन. तोपर्यंत टाटा ध्रुव
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 17:50 नवीन

लोहगड माहिती

http://picasaweb.google.com/abhijit.yadav/KilleLohgad/photo#5088015881608025874 हे चित्र मोठे करून पाहिल्यास बरीच माहिती मिळेल. रविवारी फक्त मिसळ मिळते अशा श्री मिसळ नारायण पेठ येथे नियमित मिसळ खाणारा अभिजित
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा