मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता.

विवेकवि ·

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 12:58
आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... वा! मिनूताई, तुमची कविता छान आहे. मिपावर स्वागत. अजूनही अश्याचा छान छान कविता येऊ द्या, ही विनंती... अवांतर - मिनूताई, कृपया हे वाचावे! धन्यवाद, आपला, (मराठी) तात्या.

लेखनविषय:
लेखनप्रकार
मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.... मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे, आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे.... मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.... तुझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा, मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा ....................... माझी स्वताची कविता.

उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

डॉ.प्रसाद दाढे ·

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 10:31
दाढेसाहेब, मिपावर उत्तम मिसळ मिळाणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचा हा आपण अत्यंत स्तूत्य उपक्रम सुरू केला आहे. सध्या जरा गडबडीत आहे, परंतु सवडीने मीदेखील यात भर घालीन आणि हे सदर समृद्ध करीन.. मिपावरील सर्व सभासदांनी यात आपल्याला माहीत असलेल्या मिसळीच्या उत्तमोत्तम ठिकाणांबद्दल येथे अवश्य लिहावे अशी कळकळीची विनंती! तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :) आपला, (मिसळप्रेमी) तात्या.

केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 01:35
संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड श्री- शनिपारा जवळ नेवाळे- चिंचवड जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. आज पर्यंत सगळ्यात झणझणीत मिसळ 'नेवाळे चिंचवड' येथे मिळाली. संजिवनी मध्ये उपासाच्या दिवशी , अप्रतिम उपसाची मिसळ मिळते.

In reply to by केशवसुमार

संदीप चित्रे Fri, 09/05/2008 - 02:39
केसु .. हे रेस्टॉरंट तर माझ्या शाळेतल्या मित्राचे आहे पण कधी मिसळ खाण्याचा योग नाही आला तिथे ... आता पुण्याला गेलो की चक्कर मारतो :)

In reply to by केशवराव

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 11:25
१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. दत्त स्नॅक्सची मिसळ बाकी छानच असते! अजून काही, १) जुन्नर बस स्थानक. २) रामनाथ, पुणे. ३) फडतरे, कलानगरी. ४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर ५) गोखले उपहार गृह, ठाणे ६) भगवानदास, नाशिक

In reply to by विसोबा खेचर

हेम गुरुवार, 10/28/2010 - 23:22
भगवानदास नांवाची/प्रकारची कुठलीही मिसळ नासिकमध्ये नाही. मेनरोडवर भगवंतराव आहे, पण सध्या एवढी खास नाही.

In reply to by विसोबा खेचर

सौरभ पारखे गुरुवार, 01/05/2017 - 14:23
श्री वडोबा , येथे ७ प्रकारची मिसळ आणि ११ प्रकारचे बटाटे वडे मिळतात श्री वडोबा

In reply to by सौरभ पारखे

सौरभ पारखे गुरुवार, 01/05/2017 - 14:26
निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते

ध्रुव Wed, 01/30/2008 - 11:19
फडतरे मिसळ कोल्हापुर, मी खास ही मिसळ खायला जातो कधी कधी तिकडे पुण्याहुन. बाकी चोरगे मिसळ कोल्हापुर पण चांगली असते. मिसळ खायला कधीही आवडत असल्यामुळे, कार्यालयाच्या उपहारगृहातील मिसळपण आवडते :) -- ध्रुव

धमाल मुलगा Wed, 01/30/2008 - 11:29
केशवराव, नेवाळ्याची मिसळ जशी झणझणीत, तशीच "आग" लावणारी रामनाथ - ज्ञानप्रबोधिनी,सदाशिव पेठ ईथे मिळते. कात्रजहून बोपदेव-घाटात जाताना, घाटाच्या आधीच्या गावात एका टपरीवजा "हाटिलात" पण अस्सल मावळी टच असलेली तर्रीदार मिसळ मिळते. (गावाच॑ नाव विसरलो आता.) .

In reply to by धमाल मुलगा

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:00
रामनाथ ला मिसळ खाण्यापेक्षाही तिथली हॉटेल बाहेर ची मेन्यु ची पाटी जास्त मजा आणते. अवांतरः पुणेरी पाट्या मधे ही पाटी नेहमीच टॉप ला असते..

मनिष Wed, 01/30/2008 - 11:40
पुण्यातील गरवारे कॉलेज समोर फारच छान कोल्हापुरी मिसळ मिळते -- पण गर्दी खूप असते आणि मालक (तो पुणेरी नसून कोल्हपुरी आहे) दुकान संध्याकाळई ५ वाजता (!!!) बंद करतो. (का उगाच पुणेकरांना शिव्या घालतात लोक देव जाणे? ;)) दुसरी एक कळकट तपरी आहे अलका टॉकीज समोर तिथेही झणझणीत मिसळ छान मिळते.

बेसनलाडू Wed, 01/30/2008 - 12:28
प्रकाश, दादर दत्तात्रय, दादर वृंदावन, दादर आस्वाद, दादर आनंदाश्रम, दादर (दादरकर)बेसनलाडू

कौटील्य Wed, 01/30/2008 - 18:39
नाशिक मधे शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मण मिसळ) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मण मिसळ) गारवा - अंबड (लाल मिसळ) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त) गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) अजुन खुप आहेत पण वरचे एकदा चाखाच

In reply to by कौटील्य

भुमन्यु Wed, 09/04/2013 - 14:37
क्रुष्ण विजय - गंगापूर रोड (विद्या विकास सर्कल जवळ) विहार - गंगापूर रोड

In reply to by कौटील्य

पेस्तन काका Tue, 11/26/2013 - 11:31
भजवति - पंचवटी कारंजा मावशीची मिसळ - रविवार कारंजा मखमलाबाद ला पण आहे. नाव आठवत नाहिये.
तुषार - कोलेज रोड (कॉलेज) (गोड ब्राह्मण मिसळ)
हि गोड नसुन तिखट पाणी मिसळ मिळते.

श्रीकृष्ण - तुळशीबाग श्री उपाहार गृह - शनिपार , पुणे रामनाथ - साहीत्य परीषदेशेजारी, टिळक रस्ता. वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे पुण्याचे पेशवे

प्राजु Wed, 01/30/2008 - 23:10
आमच्या कोल्हापूरच्या मिसळीपुढे काहीच नाहीत. १. फडतरे मिसळ २. खासबागची मिसळ ३. चोरगे मिसळ ४. बावड्याची मिसळ. खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते... त्यात कांदेपोहे (पुणेरी) नसतात घातलेले. तर चक्क मोडाची धान्ये असतात. म्हणूनच कोल्हापूरी मिसळ ती वेगळीच. - (कोल्हापूरी मिरची)प्राजु

In reply to by प्राजु

आपला अभिजित Fri, 01/23/2009 - 17:43
खरे! कोल्हापुरात कुठेही मिसळीची चव सारखीच असते. अगदी मलकापुरातही बेस्ट मिसळ मिळते. मिसळ म्हणजे नुसते फरसाण आणि वर तर्री. त्या तर्रीत जी गंमत आहे, ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!

In reply to by आपला अभिजित

भुमन्यु Wed, 09/04/2013 - 14:39
ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!
१००% सहमत

अन्या दातार Wed, 01/30/2008 - 23:14
प्राजुताई, खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते... एकदम सहमत बरं का. अगदी ५-८ रुपयातही अनेक छोट्या गाड्यांवर उत्तम मिसळ मिळते.

In reply to by अन्या दातार

मदनबाण Sun, 03/30/2008 - 18:17
कोल्हापूरची मोहन ची मिसळ मी गेली अनेक वर्ष अगदी ताव मारुन खात आहे, आणि चोरग्यांची मिसळ खाउन तर नाकी -डोळी लाल बुंद झालेलो आहे. (रंकाळ्यावर स्वच्छंद बागडणारा ) मदनबाण

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/31/2008 - 01:09
टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार, छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात. प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर संजय अभ्यंकर

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/31/2008 - 02:26
खरे आहे. पण मला सर्व चवींची मिसळ आवडते. कोल्हापूरची फडतरे पण आणि वैद्यची पुणेरी मिसळ पण. आणि आम्ही महत्व देतो मिसळीच्या सँपल ला. त्यामुळे कांदेपोहे आहेत का चिवडा आहे याला महत्व कमी. झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब. टीपः वरील मते माझी वैयक्तीक आहेत. (कोणतीही मिसळ चवीने खाणारा ) धन्या. पुण्याचे पेशवे

मानस गुरुवार, 01/31/2008 - 04:00
मुंबईत "पणशीकर" फराळी तसेच साधी मिसळ मुरबाड बस स्थानक सातारा बस स्थानक आणि अनेक ................................ बस स्थानके

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/31/2008 - 06:28
सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम तसेच तीन - चार लहान लहान उपहारगृहातही झण्झणीत मिसळ मिळते. दक्षिण-मध्य आणी मध्य मुंबईतील बहुमजली औद्योगीक वसाहतीतल्या बहुसंख्य कँटीन्स मध्ये झण्झणीत मिसळ मिळ्ते. संजय अभ्यंकर.

डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/31/2008 - 18:12
हे सर्व वाचल्यावर तो॑डाला भलतेच पाणी सुटले आहे..आता ह्या 'तीर्थस्थळा॑ना' भेटी देऊन मिसळरूपी प्रसाद सेविल्याशिवाय आत्म्यास मुक्ती मिळणार नाही!!

विवेकवि गुरुवार, 01/31/2008 - 18:35
आपणास शतषहा धन्यवाद चुकी साठी क्षमस्व आपली मिनु जोशी.

बापु देवकर गुरुवार, 01/31/2008 - 19:33
मुम्बइ पुन्याबाहेरच्या बस स्थानकावर उत्तम मिसळ मिळ्ते...कुठेही खा....

केशवराव Fri, 02/01/2008 - 08:40
समस्त मिसळ पाव प्रेमींनो, यादी छान बनत चालल्ये. महाराष्ट्रात कुठेही हिंडताना हि यादी उपयोगी पडेल. [ मिसळ पाव खात हिंडणारा] केशवराव.

नीलकांत Fri, 02/01/2008 - 09:35
बाजीराव रोड वर भिकारदास मारोती जवळ तापीकर काकांचे होटेल आहे. तेथे मिसळ फार उत्तम मिळते. हॉटेल रामनाथ (टिळक रोड) हे सुध्दा एक झकास आणि झणझणीत मिसळ मिळण्याचे ठिकाण. नीलकांत

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/30/2008 - 18:06
आज सकाळी एक फस्क्लास मिसळ खाल्ली बुवा..कर्वे रोड (पुणे) वरील 'काटा किर्र' ! झकास आहे. धमाल मुलाचे जाहीर आभार!! इतरा॑नाही माझा सल्ला- खाऊन पाहाच, मस्त आहे

सुधीर कांदळकर Sun, 03/30/2008 - 18:30
आंबा टूर काढतात. कोकणात भटकतात व येतांना कॅरिअरवर आंबे घेऊन येतात. तशी आता मिसळ टूर काढावी लागणार. अर्धवटराव आचरटाचार्य, सुधीर कांदळकर.

झकासराव Sun, 03/30/2008 - 21:13
हे खुपच छान आहे की. मी कोल्हापुरात फडतरे मिसळ खाल्ली. चांगली आहे. तिखटपणा जरा कमी वाटला होता मला. इतरवेळी देखील कोल्हापुरात नावाची पाटी नसलेल्या ठिकाणी देखील मिसळ खाल्ली आहे ती देखील चांगलीच मिळाली आजवर. त्यामुळे प्राजुच्या कोल्हापुरात कुठेहि मिसळ चांगलीच मिळते ह्या म्हणण्याला २००% (१००% अनुभवाचे आणि १००% आमच्य कोल्हापुरकराचे:)) अनुमोदन. केशवसुमार ने जसे लिहिले आहे त्याप्रमाणे आकुर्डी येथील जयश्री मिसळ ही देखील फर्मास आहे. तात्या जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ" फेमस आहे. :) गेलो आणि खाल्ली तर इथे लिहिनच शिवाय फोटॉ देखील काढेन :)

In reply to by ॐकार

विसोबा खेचर Mon, 03/31/2008 - 01:17
हम्म! हे ठिकाण नवीनच दिसतंय, सवडीने जरा एकदा इथलीही मिसळ खाईन म्हणतो...! :) धन्यवाद ॐकारशेठ, बाय द वे, दाढे साहेबांनी सांगितलेल्या पुण्यातल्या ठिकाणीही एकदा व्हिजिट द्यायला हवी! तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Mon, 03/31/2008 - 10:45
धमालचे आभार अशासाठी की मी काटा-किर्र मिसळीचा एक्झॅट पत्ता विचारण्यासाठी रविवारी सक्काळी सक्काळी त्याच्या झोपेचे खोबरे केले तरी त्याने मला शिव्या न घालता (पुणेकर असूनही चक्क) बरोबर पत्ता सा॑गितला..:) बाय द वे 'रामनाथ' टिळक रोडची मिसळ इतकी चा॑गली असते काय..?चक्कर मारली पाहिजे

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अहो डॉ. साहेब रामनाथ म्हणजे काय सांगू लाजवाब... मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली.. ... त्यामधे इथली गोल कांदाभजी कुस्करुन टाकायची..एकदम मस्त.. अहाहाहाहा... मजा येते मिसळ खाताना. :) पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

डॉ.प्रसाद दाढे Wed, 04/02/2008 - 22:23
मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली.. माझ्या एका (पोळलेल्या) मित्राने रामनाथ मिसळ खाल्ल्यावर बाजूच्याच मेडिकल स्टोअर्समधून 'कैलास जीवन' खरेदी करण्याचा प्रेमळ सल्ला दिलाय..:))

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

डॉ.प्रसाद दाढे Tue, 06/17/2008 - 23:06
कालच मी रामनाथची मिसळ खाल्ली. मित्रा॑नी सल्ला दिल्यामुळे त्याला कमी तिखट सा॑गितली (कमी तिखट म्हटल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बदलेले पाहून मी मान खाली घातली.. पण इलाज नव्हता.. उद्या टेल लाईट पेटला म्हणजे?) पण कमी तिखट मिसळसुद्धा एकदम झणझणीत होती. चवही उत्कृष्ट होती. घाईत असल्याने फोटू काढू नाही शकलो. मिसळप्रेमी॑नी जरूर हाणावी..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

डॉ.प्रसाद दाढे Tue, 06/17/2008 - 23:16
जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर लोणावळे येथे स्वामी विज्ञानान॑दा॑चा एक आश्रम आहे (मनशक्ति के॑द्र). लहानपणापासून मु॑बई-पुणे प्रवास अस॑ख्य वेळा केला असूनही इथल्या मिसळीचा बरीच वर्षे मला पत्ता नव्हता. एकदा मी आणि माझा मित्र मक्या परा॑जपे बाईकवरून पुण्याला चाललो होते ते॑व्हा त्याने मला इथली दही- मिसळ खाण्याचा सल्ला दिला. पण हरामखोराने मला असेही घाबरविले की इथल्या कॅ॑टीनमधे काही खायचे असेल तर तासभर बसून जप करावा लागतो.. खरे वाटून मी पळच काढणार होतो पण थट्टा करतोय म्हटल्यावर गेलो तिथे. (आता जाता-येता मिसळ खाल्ल्याशिवाय पुढे हलत नाही..) तिथली दही-मिसळ एकदम छान असते. बटाटे वडाही फस्क्लास असतो. हे दोन्ही पदार्थ खाऊन मग त्यावर एक चहा प्यावा अन पुढे सुटावे..

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

मनिष गुरुवार, 06/19/2008 - 00:03
मिसळीत दही म्हणजे मिसळीची "तौहिन" वाटते बुवा.....मिसळ कशी झणझणीत तर्री बरोबरच छान लागते! पण एकदा करतो ट्राय ह्या मनशक्ती केंद्राची.

मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:08
धमाल्या मुळचा बारामतिकर आहे.....अजुन सच्चे पुणेकरी गुण त्याला लागयचे आहेत. असो. बापट उपहारग्रुह ( जुन्या राजा केळकर म्युझीअम शेजारी) इथे मिसळीबरोबर साहित्य प्रेम ही मिळते.....झणझणीत मिसळीबरोबर त्यानन्तर मस्त गुळ टाकलेला खरवस मिळतो.......बाकी बापट उपहार्ग्रुह पुण्याला अपवाद नाही इथे पुणेरी पाट्या चक्क मेन्यु कार्ड मधे बघायला मिळतात. उदा: जेवण मोठे....जेवण लहान्.....किंवा ...आमच्या येथे लस्सी खायची असते...इतरत्र ती प्यायची असते. इथे मिसळी बरोबर असणारा रस्सा.आहाहाहाहा.रसना त्रुप्त होते

In reply to by मनापासुन

मनस्वी Mon, 03/31/2008 - 11:44
मिसळीनंतर खरवस..?? सगळी मजाच गेली मग मिसळीची.. माझी आवडती श्री उपहार गृह (पुणे) चोरगे (कोल्हापूर) कैलास (खेड-शिवापूर) काटा किर्र (पुणे), फडतारे (कोल्हापूर) आता ट्राय करीन नक्की. अवांतर : घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बापट उत्तम पर्याय आहे. इथला दहीभात अवश्य खाउन बघा.

In reply to by मनस्वी

बेसनलाडू Mon, 06/30/2008 - 01:00
घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बापट उत्तम पर्याय आहे. इथला दहीभात अवश्य खाउन बघा. आणि झुणकाभाकर आणि वांग्याची मसालेदार भाजी सुद्धा. आणि जोडीला सोलकढी ग्लास :) (हावरट)बेसनलाडू

मनापासुन गुरुवार, 04/03/2008 - 10:51
पुण्यातले सर्वात आद्य मिसळीचे दुकान वैद्य मिसळ : मोती चौक्/फडके हौद दरम्यान रवीवार पेठ रेल्वे बूकींग शेजारी. ही मिसळ म्हणजे पुण्यातली आद्य मिसळ्...कित्येक वर्षात चवीत जराही बदल नाही थोडी सौम्य असते.पण सकाळी ९:३० च्य अगोदरच मिळते. दुकानातले वातावरण ही आद्य आहे.खुर्च्या टेबले काउंटर काऊटरवरचा माणुस सगळे कसे राजा गोसावी च्या पिक्चर मधुन थेट उचलुन आणल्यासरखे वाटते.भींती वरची चित्रे सुद्धा. मिसळी मधे नायलॉन चे पोहे ही इथली खासीयत.

रितेश गुरुवार, 04/03/2008 - 18:56
महाराष्ट्र सोड्ल्याच खुप दुख: होतय आज.... कुणाल Hyderabad मधे मिसळ कुठे मिळते माहित आहे का?

In reply to by रितेश

विसुनाना Mon, 06/30/2008 - 13:15
हैदराबादमंदी मिस्सळ पायजेल काय? मर्दान्यानो, मस्त झणझणीत कोल्हापुरी मिसळ करू या की. कवा येतायसा? कारभारनीला मटक्या भिजवायला सांगून ठिवतो. ;)

In reply to by रितेश

पांथस्थ गुरुवार, 09/04/2008 - 20:50
करता काय...आम्ही पण पुणे सोडून बंगलोर मधे आलो...आता मारा कपाळावर हात... असो...गृहलक्ष्मी करुन खाऊ घालते कधी कधी....तुमच्या कडे हि सोय आहे कि नाही? :? (तर्रिच्या सुगंधाने मदहोश होणारा) पांथस्थ...

रामराजे Tue, 06/17/2008 - 23:30
टिटवाळ्याला, गणपतीच्या मंदिराबाहेर पुणे-नगर रोडला, वाघोली फाट्याजवळ कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे!

झकासराव गुरुवार, 06/19/2008 - 00:12
सगळीकडे मिसळ छानच मिळते ह्या समजुतीला तडा गेला माझ्या. :( मिसळीची फार तल्लफ आली होती म्हणून कसाबसा वेळ काढुन जवळच म्हणून ष्टँडजवळच्या कॅफे जयभवानी मधे मिसळ खाल्ली. :( वाइट्ट. त्यासोबत दिलेला पाव हा बहुतेक मिल्क ब्रेड होता तो गोड आणि मिसळीचा कट म्हणून बहुतेक पुरी भाजी ची पातळ भाजी होती. कधीच खाउ नका तिथे. थोड अजुन लांब जावुन दुसरीकडे खाल्ल्ली असती तर बर झाल असत रावं. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

In reply to by झकासराव

डॉ.प्रसाद दाढे Fri, 01/23/2009 - 17:33
कोल्हापुरात सगळीकडे छान मिसळ मिळते हा माझाही समज परवा भ॑ग पावला.. कोल्हाप्रास दुपारी तीनला पोचलो, चोरगे, फडतरे इ मिसळी॑ची चौकशी केली पण त्या फक्त सकाळी मिळतात असे कळले आणि मला तर दुसर्‍या दिवशी सकाळी लगेच परतायचे होते. मग स्टॅन्डवर सुब्रैय्या नामक एका हॉटेलात गेलो व मिसळ-पाव खाल्ला. पाव म्हणजे ब्रेड स्लाईस होता (मोस्टली शिळा) आणि तर्री म्हणजे सकाळचे उरलेले सा॑बार होते. अर्थात चूक माझीही होतीच, उडप्याकडे मिसळ कशी चा॑गली मिळेल पण मला वाटल॑ हा कोल्हापुरातला उडपी आहे ते॑व्हा.. जाऊ देत. अवा॑तरः बाकी कोल्हापूर मला फार आवडले, बेष्ट शहर आहे. काय एकेक ब॑गले आहेत, व्वा! हवा आल्हाददायक, माणसेही मेहमाननवाजीत तरबेज. स्वतः पुणेकर असल्याने कोल्हापुरी दिलदारी अन खातीरदारी जास्तच जाणवली.

डॉ.प्रसाद दाढे Sun, 06/29/2008 - 18:37
पुणे- नगर रस्त्यावर शिरूरच्या अलिकडे सरदवाडीस चा॑गली मिसळ मिळते.. आम्ही परवाच हाणली (गडबडीत फोटू राहून गेला)

नमस्कार, पेण ला चावडी नाक्यावर तांडेल ची मिसळ 'लै भारी ' असते. पण सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच मिळते. आणि नाशिक ला कॉलेज रोड ला एक गाडीवाला आहे. झक्कासच बनवतो.तो पण सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंतच असतो. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

सचीन जी Mon, 06/30/2008 - 14:10
उत्तम मिसळिचे माझे निकष असे आहेत - १. मूळ पदार्थ - मोड आलेली मटकिचि उसळ ! यात अत्यंत थोडे फरसाण व बराच कांदा. मिसळिचा दर्जा हा फरसाणाच्या व्यस्त प्रमाणात असतो. काही नाजुक मिसळिमधे भरमसाठ फरसाण असते. काही महान लोक यात बटाट्याची भाजी पण घालतात. ही तर अगदीच फालतु मिसळ. २. अत्यंत तिखट, गरम, झणझणीत तर्रि - हिच्यावर तेलाचा तवंग असलाच पाहिजे. तर्रि ही डायरेक्ट मोठ्या भांड्यातुनच वाढायला हवी आणि ती ही मागाल तितक्या वेळेला. कमीत कमी ३ / ४ वेळा तर्रि मागीतलिच पाहीजे. वाटीतुन तर्रि मिळ्णारी मिसळ ही मिसळ नव्हेच! ३. थोडासा शिळा वाटणारा गोल पाव.( स्लाइस पाव नव्हे ) ४. हॉटेलातल कळकट वातावरण या सगळ्या निकषाला पावणारी बेस्ट मिसळ मीळते - हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव! एकदा अवश्य भेट द्यावी!

नाखु Sat, 07/05/2008 - 17:19
कुणालाच कोल्हापुरची "बावड्यातली " कशी आठवत नाही ????????????????? मी पुण्यातुन कोल्हापुर ला गेल्यावर हि "मीसळ" बर्याच वेळा चापली आहे.. नेवाळे आणि बालाजी चिंचवड ही स्थानीक "तीर्थशेत्रे" आहेतच..... मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

दिनेश५७ Sat, 07/05/2008 - 22:33
फोर्टमध्ये मोती हलवाईकडेपण मस्त मिसळ मिळते. पण संध्याकाळनंतर तीची चव उतरत जाते. दुपारी या मिसळीची मजा काही न्यारीच असते.

कुंदन Sun, 07/06/2008 - 16:45
घाटकोपरला पुर्वेकडे, फलाटाच्या कल्याणच्या बाजुच्या असलेल्या रेल्वे पुलावरुन उतरल्या उतरल्या स्थानका बाहेरच लॉटरीच्या दुकाना शेजारी एक छोटेखानी हॉटेल आहे ( नाव आठवत नाही , पण बहुतेक "नित्यानंद" असे असावे). तिथे मिसळ पाव तसेच कांदा भजी ही छान मिळतात....

मिंटी Fri, 09/05/2008 - 10:44
पुण्यात मिसळ सगळ्यात मस्त मिळते काटाकिर्र्........मधे... वाई फाट्याला अजिंक्य नावाचं हॉटेल आहे तिथे पण फार मस्त मिसळ मिळते....... वाई गावात शेवड्यांकडे तिखट मिसळ मिळते.........

Tue, 01/20/2009 - 16:11
पुण्यात लक्ष्मी रस्त्याला विजय(लि.ना.चि.म.) या चित्रपटगृहात जे हाटेल आहे तिथली मिसळ अतिशय छान असते. तर्री अगदी गरमा गरम आणि त्यात पाव बुडवून सोबत बटाटा वड़ा खावा. फक्त जरा सकाळी सकाळी जावे. साधारण १० च्या आसपास.

अरेरे....मित्रांनो एक नाव राहिले...सहत्र बुध्धे यांच्या बादशाहि भुवन च्या मिसळिचि चव काय वर्णावि..खावे तेंव्हा ठावे...अप्रतिम चव असलेल्या मिसळचि चव नक्कि घ्या..मिसळ खाल्ल्यावर मस्का स्लाईस व चहा..आत्मा खुष...टिळक रोड..नुसत्या खमंग वासावरुन सुध्धा उपहार ग्रुह शोधुन काढताल... अविनाश..बादशाहि मिसळ प्रेमि

mamuvinod Fri, 01/23/2009 - 13:21
चाकणची मिसळ कधी खाल्ली का रे मिपाकरानो, एकदा खा, चव घ्या मग बोला सोबत भेळ पण खा. एक चाकणकर

In reply to by mamuvinod

Fri, 01/23/2009 - 14:31
काही हाटीलाचं नाव पत्ता रस्त्याचं नाव सांगशील की नाही? का चाकण मधे येऊन मिसळ मिसळ असं ओरडायचं?

मी आत्तापर्य॑त चापलेल्या बेष्ट मिसळी॑ची लिस्ट देत आहे, कृपया ऍडिशन करावी. १) अण्णा बेडेकर, पुणे २) मनशक्ती के॑द्र, लोणावळा ३) मामलेदार, ठाणे ४) मूनमून मिसळ, डो॑बिवली

नर्मदे हर हर

डॉ.प्रसाद दाढे ·

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 10:18
ह्या पुस्तकाबद्दल मीदेखील बरेच ऐकून आहे! कुंट्यांच्या हिंमतीला आणि चिकाटीला निश्चितच दाद दिली पाहिजे. ही अत्यंत कठीण आणि खडतर परिक्रमा त्यांनी एक दोन वेळा नव्हे तर अनेकदा केली आहे असेही मी ऐकून आहे.. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का? माझ्या माहितीप्रमाणे डॉ वर्तक यांचे गूढ अनुभव असलेले एक पुस्तक प्रसिद्ध आहे. परंतु माझ्या मते वर्तक बर्‍याच थापा मारतात! दोन तास डोळे मिटून बसतात आणि आज काय मंगळावर जाऊन आलो, उद्या काय न्येपच्यूनवर गेलो होतो अशा बिनदिक्कत, बेलाशक थापा मारतात! अहो कसला आलाय मंगळ वगैरे? डोळे मिटून झक्कपैकी झोप वगैरे काढत असतील! :) असो, आपला, (शनिवर अनेकदा फिरायला जाणारा!) तात्या.

डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/30/2008 - 10:43
मी गूढविद्या अथवा तशा प्रकारची आणखी काही पुस्तके वाचली आहेत १) तृतीय नेत्र- लामा लो॑बस॑ग राम्पा २) आप्पा प॑त, एक प्रवास- नलिनी प॑त ३) ब्रम्हर्षी॑ची स्मरणगाथा- डॉ. प.वि. वर्तक ४) योगीकथामृत

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

इनोबा म्हणे Wed, 01/30/2008 - 15:30
योगीकथामृत मी एकदा वाचले आहे. खरंच अद्भूत आहे. पण प्रत्येकालाच पटेल असे नाही. खासकरुन त्यांचे केवळ मनातील विचांराद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे... वगैरे अशा प्रकारच्या गूढ विद्या खरेच अस्तित्वात असतील का? -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 18:26
योगीकथामृत मी एकदा वाचले आहे. खरंच अद्भूत आहे. पण प्रत्येकालाच पटेल असे नाही. कसे पटणार? अहो हे वर्तक भयंकर थापाडे आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे! :) खासकरुन त्यांचे केवळ मनातील विचांराद्वारे एकमेकांशी संपर्क साधणे... वगैरे अशा प्रकारच्या गूढ विद्या खरेच अस्तित्वात असतील का? नक्कीच नसतील/नाहीत! तात्या.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

ऋषिकेश Wed, 01/30/2008 - 20:49
तृतीय नेत्र- लामा लो॑बस॑ग राम्पा हे लो॑बस॑ग राम्पा यांच्या पुस्तकांच्या सिरीज मधील एक. या सिरिजमधे अन्य दोन पुस्तकेहि आहेत त्यातील एक "तिबेटी डॉक्टर" नावाचे आहे दुसरे विसरलो. (गुढ) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सागर Fri, 02/01/2008 - 12:09
राम्पाची कहाणी हे तिसरे पुस्तक आहे तसेच, साद देती हिमशिखरे हे अतिशय अत्भुत या सदरात मोडणारे पुस्तक आहे. या पुस्तकात बुवाबाजी आणि पाखंडीपणाचा विरोध तर आहेच, पण योग्य मार्ग प्रत्येकाने ज्याचा त्यानेच शोधायचा असतो हे ही ठामपणे सांगितले आहे. माझ्यामते हे पुस्तक जास्त विश्वासार्ह आहे. पुस्तक हे मुळात इंग्रजीतून एका मराठी माणसाने लिहिले आहे पुस्तकाचे मूळ नाव : Towards the Silver Chrest of the Himalayas पुस्तकाचे मूळ लेखक: ग.प्र.प्रधान पुस्तकाचे मराठी नाव : साद देती हिमशिखरे पुस्तकाचे मराठी अनुवादक : आठवत नाही ... बहुतेक राम कदम या पुस्तकाच्या वाचनाने अनेकांना एक वेगळा विचार मिळेल यात काही शंका नाही (हिमालयाच्या ओढीने भारावलेला) सागर

ध्रुव Wed, 01/30/2008 - 11:17
हे एक अनुभव कथन म्हणून वाचले तर ठीक आहे, पण खर बघता, पुस्तकातले काही अनुभव विश्वास ठेवण्याजोगे नाहीत. बाकी पुस्तकात, सिगारेट ओढली, पुढच्या गावात गेलो आणि तिथे माझी कशी सोय झाली (नर्मदेच्या कृपेने) हेच वर्णन जास्त आहे. एकदा वाचल्यानंतर परत वाचताना काही विशेष वाटत नाही. गूढ अनुभव वगैरे आहेत असं काही फार वाटत नाही, अंधश्रद्धाच जास्त वाढण्याची शक्यता आहे असे वाटते. -- ध्रुव

चतुरंग Wed, 01/30/2008 - 21:18
"इन सर्च ऑफ सीक्रेट इंडिया", हे पॉल ब्रंटन चे पुस्तक वाचले होते. रंजक अनुभवांनी भरलेले आहे. पुन्हा वाचायला सुद्धा आवडेल. लोब्संग रांपाची ३ पुस्तके - द थर्ड आय, डॉ. फ्रॉम ल्हासा, द रांपा स्टोरी अवांतर - रेडियोचा शोध लागण्यापूर्वीही विद्युतचुंबकीय लहरी होत्याच, फक्त त्यातली गूढता रेडियोच्या शोधाने नाहिशी झाली. अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत. एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये. चतुरंग

In reply to by चतुरंग

एक Wed, 01/30/2008 - 22:39
"...अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत. एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये....." अगदी बरोब्बर.. पण सावधान. असचं मत मी एकदा मनोगतावर नोंदवलं होतं. तिथल्या एकाने मला मनोरुग्ण ठरवून ट्रीटमेंटचा अनाहूत सल्ला दिला होता.. तोच इसम मिसळपाववर पण मुक्त पणे बागडतो आहे. तेव्हा सावधान.

In reply to by एक

इनोबा म्हणे गुरुवार, 01/31/2008 - 00:35
"...अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत. एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये....." सहमत. मुळातच मी केवळ प्रश्न उपस्थीत केला होता, कोणाचेही मत खोडले नव्हते. एकराव हे मनोगत नाही, मिसळपाव आहे. इथे प्रत्येकाला आपले मत व्यक्त करायचा अधिकार आहे. तेव्हा बेधडक बोला. राहिले त्या सदस्याचे तर मिसळपावचे गावकरी त्याला पुरुन उरतील. काळजी करु नका. (मिसळ'लेला) -इनोबा

In reply to by इनोबा म्हणे

एक गुरुवार, 01/31/2008 - 01:24
ऐकून बरं वाटलं कि त्याला मिपा चे सदस्य पुरून उरतील ते. बघुया त्याची या लेखावर काय प्रतिक्रिया येते ते..;-)

In reply to by चतुरंग

ध्रुव गुरुवार, 01/31/2008 - 12:35
अवांतर - रेडियोचा शोध लागण्यापूर्वीही विद्युतचुंबकीय लहरी होत्याच, फक्त त्यातली गूढता रेडियोच्या शोधाने नाहिशी झाली. अनुभवांमागचे कारण जो पर्यंत समजत नाही तोपर्यंत प्रत्येक वेगळा अनुभव एका अर्थाने गूढच असतो, असे माझे मत. एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये. हे मान्य! पण झोपेतुन उठल्यावर (नर्मदेच्या कृपेने) खिशात सिगारेटचे पाकीट व पैसे आले. हे थोडे अनुभव (गूढ असो वा नसो) म्हणून पचायला जड आहे मला. नर्मदेच्या सहवासातली शांतता आणि त्यामुळे होणारे एकाग्र चित्त व ध्यानाचा अनुभव... ह गूढ म्हणताअ येईल पण काही गोष्टी शुद्ध काल्पनिक कथा अथवा अंधश्रद्धाच म्हणता येतील. -- ध्रुव

In reply to by ध्रुव

चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 18:59
म्हणतोस तसे असेलही. मी हे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्याबद्द्ल मत नाहि देऊ शकत. एकदम श्रद्धा किंवा अंधश्रद्धा अशी उडी घेऊ नये. हे विधान मी आपल्या प्रवृत्तीबद्दल केले होते, असे काही ऐकले की आपण लगेच एक बाजू घेतो. चतुरंग

In reply to by चतुरंग

ध्रुव गुरुवार, 01/31/2008 - 19:07
हे विधान मी आपल्या प्रवृत्तीबद्दल केले होते तसे असेल तर तुम्ही मला ओळखायला अजून वेळ आहे असे मी म्हणेन. मी स्वतः कधीही एकदम मत मांडत नाही. नाण्याच्या दोन्ही बाजू बघायच्या व जे मनाला पटते ते बोलावे/करावे असा मी आहे. बाकी माझे मत फक्त नर्मदे हर या पुस्तकाबद्दल होते, योगीकथामृत याबद्दल नाही कारण तुम्ही जसे नर्मदे... वचले नाही तसंच मी योगी.... -- ध्रुव

चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 19:29
अरे मी चुकीचा शब्द वापरला - "आपल्या" ऐवजी "मानवी" प्रवृत्तीबद्द्ल म्हणायचे होते. वैयक्तिक तुझी आणि माझी ओळखही नाही रे, तेव्हा गैरसमज नसावा! चतुरंग

सागर Fri, 02/01/2008 - 12:15
अरुण ताम्हणकर आणि प्रदीप दळवी ह्या २ लेखकांची पुस्तके कादंबरी या सदरात मोडतात पण ताम्हणकरांच्या पुस्तकांत दळवींच्या लेखनापेक्षा आध्यात्मिक टच जास्त आहे पण खालील पुस्तके वाचनीय आहेत यात काही शंका नाही. अरुण ताम्हणकर - सर्पगंध - दिक्-बंधन - कुठे फिरविशी जगदिशा - जन्मांतर प्रदीप दळवी - संभवामि युगे युगे - कालांकित (गूढ विद्यामय झालेला) सागर

डॉ.प्रसाद दाढे Sat, 02/02/2008 - 18:23
बॅरिस्टर अप्पासाहेब प॑त तिबेट व सिक्कीममध्ये भारत सरकारचे पोलिटीकल ऑफीसर होते. ते अतिशय बुद्धीप्रामाण्यवादी व अ॑धश्रद्धाविरोधी होते. मात्र त्या॑च्या आत्मचरित्रात तिबेट व सिक्कीममधील बौद्ध लामा॑चे काहीसे अविश्वसनीय वाटावेत असे चमत्कार नमूद केले आहेत. जिज्ञासू वाचका॑नी ते जरूर वाचावेत. अप्पासाहेब इजिप्त व इ॑डोनेशियात सुद्धा राजदूत होते, तिथेही काही गूढ अनुभव त्या॑ना आले. उपरोक्त पुस्तकास श्रीमती इ॑दिरा गा॑धी या॑ची प्रस्तावना आहे. तसेच काही चमत्कार तर प॑. नेहरू सिक्कीम दौर्‍यावर असताना घडले आहेत. वानगीदाखल एक सा॑गतो. सिक्किममध्ये 'आजो रिम्पोचे' नामक एक बौद्ध लामा होते जे हवामान क॑ट्रोल करू शकत. सिक्किमजवळ नथूला खि॑ड आहे जेथे सतत बर्फाची वादळे होत असतात. जेव्हा अप्पासाहेब प॑ताना नथूला ओला॑डावयाची असे, ते आजो रिम्पोचेना निरोप पाठवीत असत. रिम्पोचे 'च्छो' नामक एक प्रकारची पूजा करीत असत ज्यामुळे नथूला खि॑डीतील हिमवादळ काही काळापुरते था॑बत असे! सुरूवातीला प॑तानासुद्धा हे अशक्य वाटले होते पण त्या॑च्या सिक्कीम वास्तव्यात त्या॑नी अनेकदा नथूला पार केली व प्रत्येक वेळी त्याना असाच अनुभव आला. हाच अनुभव नेहरू॑नासुद्धा आला होता. अशा पुष्कळ गोष्टी त्या॑नी दिल्या आहेत. बॅ. प॑तासारखा गृहस्थ असत्य लिहिण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे मला असे वाटते की अशा काही सिद्धी निश्चितपणे आहेत पर॑तु त्या फारच थोड्या लोका॑ना खरोखरच अवगत आहेत. या सिद्धी॑नाही काही मर्यादा असाव्यात कारण चीनचे तिबेटवरील आक्रमण कोणताही लामा रोखू शकला नाही. मात्र सिद्धी॑चा वापर करून दलाई लामा चीनचा उद्देश आधीच जाणू शकले व भारतात सुरक्षित निसटू शकले. (पाहा: तृतीय नेत्र) खर्‍या साधका॑ना सिद्धी॑चे प्रदर्शन करण्यात स्वारस्य नसते, ते त्या॑चे ध्येयच नाही. इथे जी काही बुवाबाजी चालते ती या सगळ्याची भ्रष्ट नक्कल आहे. त्यामुळे कोणताही चमत्कार सहजासहजी स्वीकारू नयेच! पण सरसकट सगळ्याला खोटेही म्हणू नये.

भडकमकर मास्तर Sun, 02/03/2008 - 01:29
साद देती हिमशिखरे चे लेखक ग प्र प्रधान नाहीत......... जी.के. प्रधान नावाचे एक आय ए एस किंवा तत्सम सरकारी अधिकारी होते....... पण हे पुस्तक छान आहे...सहमत :)

In reply to by भडकमकर मास्तर

सागर गुरुवार, 04/10/2008 - 19:21
साद देती हिमशिखरे चे लेखक ग प्र प्रधान नाहीत......... जी.के. प्रधान नावाचे एक आय ए एस किंवा तत्सम सरकारी अधिकारी होते....... सहमत....चूक मान्य लेखकाच्या आद्याक्षरांबाबत माझा घोळ झाला होता. जी.के. प्रधान हेच 'साद देती हिमशिखरे' चे लेखक आहेत (अध्यात्माकडे वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहणारा)सागर

चतुरंग Sun, 02/03/2008 - 02:30
मी सुद्धा वाचलेले आहेत. सर्वसाधारणपणे आकलनाच्या बाहेर असणार्‍या काही गोष्टी आपल्याही आयुष्यात घडत असतात पण आपण कदाचित त्याकडे तेवढे लक्ष देत नसू किंवा योगायोग समजून सोडून देत असू. अनुभव १- तुम्हाला तीव्रतेने एखादी गोष्ट हवी असे वाटणे आणि अचानकपणे कल्पनाही नसताना ती गोष्ट आपणहोऊन समोर येणे असे माझ्या बाबतीत तर इतक्या वेळा होते की त्याला मी योगायोग मानणे सोडून दिले आहे. त्याला काय म्हणायचे हे मला माहीत नाही, तो चमत्कार नाही, पण त्याची कारणमीमांसा मला तरी सहज देता येत नाही! अनुभव २ - इथे अमेरिकेत हाय वे ला किंवा आतल्या रस्त्यांवरही पोलीस रडार लावून वाट बघत लपून बसलेले असतात. सहजा सहजी दिसत नाहीत आणि दिसतात तेव्हा वेळ गेलेली असते! गाडीत लावण्यासाठी इथे रडार डिटेक्ट्रर्स मिळतात त्यावर तुम्हाला पोलिसांची गाडी रडार लावून जवळ आहे हे समजते. मग तुमचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असला तर तुम्ही तो कमी करायचा. कारण जबर दंड - साधारण पणे १२५$ होतो! माझ्या गाडीत डिटेक्टर नाही पण मला पोलिसांची गाडी जवळपास असलेली जाणवते हे मी तुम्हाला सांगितले तर तुम्ही मला वेड्यात काढाल! पण हे सत्य आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन मी फार क्वचित करतो. साधारण वेगाने गाडी चालवता चालवता, आसपास कुठेही पोलीस गाडी दिसत नसताना, अचानक मला जाणवतंकी पोलीस आहेत, आणि काही सेकंदातच गाडी दिसते. आणि अजून पर्यंत म्हणजे गेल्या ६ वर्षात हे १००% वेळा बरोबर आलं आहे (२०० च्या आसपास तरी घटना असतील)! त्याचं कारणही मला माहीत नाही पण ह्याला मी तरी योगायोग मानणार नाही. आपल्यालाही असे काही अनुभव असतील त्याकडे बारकाईने पहाणे जरुरीचे आहे. आणि डॉ.प्रसाद म्हणतात त्या प्रमाणे त्यांची एकदम श्रद्धा/अंधश्रद्धा अशी वर्गवारी टाळावी. चतुरंग

नरुभाऊ Sun, 02/03/2008 - 11:04
मित्रहो सप्रेम नमस्कार, मी आपला एक नवीन मित्र! मु़क्काम पोस्ट पुणे. आपला, नरुभाऊ.

अशा काही घटना नक्कीच घडत असतात माझ्या बाबतीत देखील. उदाहरणार्थ- आम्ही इकडे बॉलिंग नावाचा खेळ खेळायला जातो. मी त्यात मुळीच तरबेज नाही. पण कधीकधी मला आतून ( अंतरात्मा की आवाज :) ) असे वाटते की आता १० च्या १० बाटल्या पडतील मी अशावेळी सर्व उपस्थिताना सांगतो बघा आता मी १० च्या १० बाटल्या पाडून दाखवतो. आणि खरोखरच त्या सर्व बाटल्या पडतात. पण प्रत्येक वेळेला मला असे वाटतेच असे नाही. तेव्हा मी कोणालाही सांगतही नाही. आणि इतर वेळेला मी कितीही मनापासून ठरवले की मी सर्व बाटल्या पाडीन तेव्हा तसे ते हमखास होत नाही. त्या फक्त काहीच वेळा अशा असतात्.(बॉलिंग मधल्या या बाटल्याना काय म्हणतात ते मला माहीत नाही. कोणाला माहीत असल्यास जरूर सांगावे) अधूनमधून अंतर्ज्ञानी डॅनी पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

सागर गुरुवार, 04/10/2008 - 19:48
प्रत्येकाकडे बाह्य मन आणि अंतर्मन असते. अंतर्मन हे खूप शक्तिशाली असते. काही व्यक्तींमध्ये ते जास्त प्रमाणात जागृत असते. आणि त्याअनुषंगाने प्रत्येकाला तसे अनुभव येतात. बर्‍याच वेळा एखादी घटना घडत असताना असे जाणवते की ही घटना याआधी घडून गेलेली आहे वा आपण कोठेतरी अनुभवलेली वा पाहिलेली आहे. नेमका संदर्भ त्या वेळी अजिबातच आठवत नाही यालाच आपण आभास होणे असे म्हणतो. ही सगळी अंतर्मनाची कृपा असते.... भविष्यातील घटनांचा आपले अंतर्मन कसे अवलोकन करते याचे आजच्या विज्ञानाला अजूनही ठाम उत्तर गवसले नाही. मी स्वतःही खूप वेळा अनुभव घेतला आहे. एखाद्या विचारावर मन पूर्ण एकाग्र झाले की त्या विषयी मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे आपोआप उमटतात असे मी तरी अनुभवले आहे. थोड्या फार प्रयत्नानंतर याची प्रचिती कोणीही घेऊ शकतो असे माझे मत आहे. पण यामागचे लॉजिक मात्र मला माहित नाही. उदाहरणादाखल एक किस्सा सांगतो. मागच्याच आठवड्यात घडला. मी अधूनमधून ऑनलाईन ट्रेडींग करतो. सहजच Tulsi Extrusions या कंपनीच्या शेअरच्या किंमतीकडे माझी नजर गेली. त्यावेळी तो ७८ रुपये होता. मी सहजच विचार केला की हा शेअर घ्यावा की न घ्यावा? लगेच मनात उत्तर उमटले की घेऊन टाक पण ४ दिवसांत विकूनही टाक. तेव्हा सहजच रिस्क नको म्हणून फक्त ५० शेअर्स ७८ रु. या भावाने विकत घेतले. ४ दिवसांनी सकाळी सहज पाहिले तर शेअर ८६ ने होता. मी सहज एक गम्मत म्हणून १०५ ही विक्रीची लिमिट दिली. अर्थात आकडा टाईप करण्याआधी मी मनात विचार केला होता की काय आकडा टाईप करावा बरे?... तर मनात १०५ हे उत्तर उमटले होते. त्याप्रमाणे मी १०५ ने सेल ऑर्डर दिली. दुपारी लॉग-इन करुन पाहतो तर काय आश्चर्य मी दिलेल्या लिमिटवर शेअर विकले गेले होते. त्या दिवसाचा उच्च भाव १०७ रु. या शेअरने गाठला होता. फक्त ४ दिवसांत १३०० रुपये फायदा मला मिळाला. तेव्हापासून आज लिहिताना याच शेअरचा भाव परत ७८ वर आला आहे. अर्थात लाँग टर्म साठी हा शेअर चांगला आहे. पण आपला विषय भविष्याची चाहूल लागण्याचा आहे. अंतर्मन हा खरेच खूप गूढ विषय आहे. ज्याच्या त्याच्या अनुभवाप्रमाणे प्रत्येकाचे मत तयार होते हेही तितकेच खरे... असो... (अधून मधून भविष्यदर्शन होणारा) सागर

अभय Fri, 04/11/2008 - 06:34
सम़जा , मोटार च्।लवताना आपण सिग्नल ला वाट पहात आहात आणि आपण पलीकड्ल्या गाडीकडे पाहिले कि लगेचच तो ड्रायव्ह्रर आपल्या कडे पहातो. (अगदी न हालचाल करता पाहीले तरी !). खुप वेळा आपल्याला असे जाणवते की ए़खादा माणुस आपल्या कडे पहात आहे आणी आपण त्या दिशेला पाहिले तर तो खरच आपल्या कडे पाहात असतो. काहीजण याला टेलिपथी म्हणतात पण ऩक्की आणखी कोणतीतरी वेगळी शक्ती असली पाहीजे. अभय

भोचक Fri, 04/11/2008 - 13:13
दुर्गा भागवतांच्या एका आत्मकथनात्मक पुस्तकातही गूढ अनुभवांविषयी दिले आहेत. मध्य प्रदेशातील बस्तरच्या आदिवासी जिल्ह्यात आदिवासींवर संशोधन करताना आलेले 'गूढ' अनुभव त्यात आहेत. एकदा त्यांचे कपडे अचानक पेटले, ते ज्या बैलगाडीवरून जात होत्या ती पडली, पण त्या वाचल्या. शिवाय संशोधनापूर्वी त्या खूप आजारी होत्या. त्यावेळी संशोधन करू नये असे वाटत असताना एकदा झोपेत असताना त्यांना संशोधनाची आज्ञा झाली. उठून पाहिल्यानंतर त्यांच्या पलंगाची दिशाही बदललेली दिसली. त्याहून महत्त्वाचा अनुभव. प्लॅंचेटचा. प्लॅंचेटद्वारे त्यांनी त्यांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांच्याशी बोलणे केले. आणि माध्यम म्हणून असलेला मुलगा हा अमराठी होता. राजारामशास्त्री आणि दुर्गा भागवतांदरम्यान सुरू असलेला संवाद लेखी होता. तो मुलगा मराठी लिहिता येत नसताना मराठीत लिहित होता. दुर्गा भागवतांसारख्या प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर घासून पहाणार्‍या विदुषीने हे अनुभव लिहिल्यानंतर तर मी चाट पडलो होतो. हे खरे मानावे की काय या संभ्रमात मी अजूनही आहे. आणखी एक अनुभव. लोकसत्ताच्या एका दिवाळी अंकात एका मराठी लेखिकेने लेख लिहिला होता. त्यात अमेरिकेतील वास्तव्यात तिला आलेले अनुभव दिले होते. संबंधित लेखिका अमेरिकेत ज्या ठिकाणी रहात होती, त्याच्या आसपास एक अत्यंत जराजर्जर झालेल्या व्यक्तींचे एक केंद्र होते. तिला ही माणसे खूप वेगळी वाटत. एकदा काही कारणांमुळे ती या केंद्राच्या कॅम्पसमधून घराकडे यायला निघते आणि रस्त्यात अतिशय विचित्र अनुभव तिला यायला लागले. दरदरून घाम फुटतो आणि ती धावत घरात येते. घरांत येईतो असे अनुभव तिला येत होते. या लेखाची तार्किक संगती लावणारा तिच्या पतीचाही लेख त्यात होता. त्यात एक निष्कर्ष काढला, तो मला पटला. त्या केंद्रातील मंडळी मरणाच्या दारात होती. मरण केव्हा येईल याची वाट पहात होती. त्यामुळे त्यांच्यातल्या नकारात्मक शक्तींचा काही प्रभाव आजूबाजूच्या वातावरणात पडून त्या बाईंना अस्वस्थ, असुरक्षित वाटले असावे.

In reply to by भोचक

त्यामुळे त्यांच्यातल्या नकारात्मक शक्तींचा काही प्रभाव आजूबाजूच्या वातावरणात पडून त्या बाईंना अस्वस्थ, असुरक्षित वाटले असावे. थापा आहेत ह्या. असं काही नसत सगळे मनाचे खेळ आहेत. बाईंनी प्रभुमास्तरां कडून समुपदेशन घ्यायला हवं सगळ ठीक झालं असतं ;)

In reply to by भोचक

विकास Mon, 03/23/2009 - 01:09
लोकसत्ताच्या एका दिवाळी अंकात एका मराठी लेखिकेने लेख लिहिला होता. त्यात अमेरिकेतील वास्तव्यात तिला आलेले अनुभव दिले होते. त्या लेखिकेचे नाव आहे पद्मजा फाटक. त्यांनी मॅसॅचुसेट्स राज्यातीलच ती आठवण दिली होती. मला वाटते पीबडी नावाच्या एका गावापासची ती आठवण होती.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विकास Mon, 03/23/2009 - 01:06
दुर्गा भागवतांच्या त्या पुस्तकाचे नाव आहे, "आठवले तसे". हे पुस्तक मी वाचायला घेतले, कदाचीत वेगळा मूड असताना असेल अथवा काहीही... पण असे वाटले की आयुष्यात ज्या गोष्टी विसरायच्या असतात त्याच या बाईंनी आठवून का बरं लिहील्या असाव्यात? वास्तवीक दुर्गाबाईंच्या लेखनाचा मी फॅन आहे पण हे पुस्तक मी मधेच वाचायचे सोडून दिले.

गूढ शक्तिंविषयी नक्की काही निष्कर्श काढता येत नाहीत पण जंगलात येणार्‍या विविध अनुभवांवर नॅट जिओ ने बरेच संशोधन केले आहे. त्यातील काही. वाघांबद्दलः वाघ हा प्राणी शक्यतो एकटा रहाणारा आहे. तो सिंहाप्रमाणे समूहाने शिकार करत नाही. त्यामुळे शिकारकरण्याची जी पद्धत वाघांमधे आली आहे (म्हणजे वाघ उत्क्रांत होत असताना ) ती अशी. वाघ हा अत्यंत दबक्या पावलाने शिकार करतो. परंतु तो ज्या भक्ष्याच्या दिशेने जात असतो त्याच्यावर तो अतिसूक्ष्म ध्वनीलहरी सोडत असतो. त्या सूक्ष्म लहरी ह्या भक्ष्याच्या कानाच्या पडद्यांवर पडतात व ते संदेश मेंदूपर्यतही पोचतात. पण याचा परीणाम भक्ष्य सावध होऊन पळून जाण्यात न होता बरोबर उलटा होतो व ते भक्ष्य जागच्या जागी थिजून जाते. आणि या धक्क्यातून बाहेर पडे पर्यंत वाघ बराच जवळ येऊन ठेपतो. आणि वाघ तुलनेने सहज शिकार करु शकतो. जंगलात जाऊन आलेल्या बर्‍याच लोकाना असा अनुभव येतो की त्याना वाटते की आपल्या आसपास कुठेतरी वाघ आहे आणि खरेच अल्पावधीत तो वाघ त्याना दिसतो. याचे कारण वाघाच्या त्या सूक्ष्मलहरी त्यांच्या मेंदूने ग्रहण केलेल्या असतात. बर्‍याच लोकाना वाघ समोर दिसताच जागीच थिजून गेल्याचा, सर्वांगाला दरदरून घाम फुटल्याचा, बोबडी वळल्याचा अनुभव येतो याला कारण भिती हे असतेच पण त्यापेक्षा जास्त मोठे कारण मेंदूने या सूक्ष्म ध्वनीलहरी ग्रहण केल्यावर झालेली प्रतिक्षिप्त क्रिया हे असते असे संशोधकांचे मत आहे. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

मुक्ता २० Mon, 03/23/2009 - 09:44
अंधश्रद्धा म्हणा किंवा थापा, हा ज्याचा-त्याचा प्र.!! पण माझ्या अनुभवावरुन सांगते कि मलाही जरा वेगळे अनुभव आले. १३ वर्शांपुर्वी माझे आजोबा वारले. ते वारले त्याच्या १ आठवड्या आधी, एकदा अचानक फार भिती वाटली, दरदरुन घाम फुटला, ह्रुदयाचे ठोके वाढले, असं का होतय कहीच कळेना. पण कहीतरी विचित्रं होणार अशी सारखी हुरहुर मनाला होती. पुर्ण १ आठवडा अशीच हुरहुर, पण जेव्हां आजोबा वारले, त्या दिवशी ती हुरहुर थांबली. त्या नंतर आमचे एक जवळचे नातलग वारले त्याआधी सुद्धा तसंच. मग मावशी वारली त्या आधी परत तेच. आणि असं १-२ दा नसुन बरेचदा होतं तेव्हां जरा विचित्र वाटतं. आता ह्याला काय म्हणायचं? :/

जगन्नाथ कु॑टे या॑चे हे बरेच गाजलेले पुस्तक मी दोन्-तीन वेळा वाचले. नर्मदा परिक्रमेबद्दल माझ्या मनात पुष्कळ दिवस कुतुहल होते. नर्मदा तीरावर अनेका॑ना अदभुत आणि गूढ अनुभव येतात. कु॑टे या॑चे अनुभव तर केवळ अच॑बित करणारे आहेत. शूलपाणीच्या ज॑गलात लुटण्याबद्दल त्या॑नी लिहीले आहे, पर॑तु नुकतीच माझ्या परिचयाच्या एका भूगोल तज्ञ गृहस्था॑नी त्या॑च्या काही मित्रा॑सोबत नर्मदा परीक्रमा केली, त्या॑ना शूलपाणीत लुटले नाही. अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. अशा प्रकारचे गूढ अनुभव वाचायला मला फार आवडतात, कुणाला अशी काही पुस्तके माहीती आहेत का?

टाळण्याची कला

आपला अभिजित ·

प्राजु Wed, 01/30/2008 - 00:13
स्वातीची प्रतिक्रीया आवडली... मी सुद्धा प्रतिक्रिया टाळणेच पसंत करेन :)) - प्राजु

विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 06:25
आम्हीही स्वातीताईंचेच शिष्यत्व पत्करून प्रतिक्रिया देण्याचे टाळतो आहोत! :) तात्या. अवांतर - टाळण्याची कला ज्यांना येते त्यांच्याकडून ती शिकून घ्यावी, हे बरं. उद्या त्यांनाच टाळायचं झाल्यास "गुरूची विद्या गुरूला' वापरता येईल. असो. टाळाटाळीवर बरीच टकळी चालवली. अभिजितराव, लेख बाकी छान आहे... आपला, (टाळाटाळ करणारा) तात्या.

सुनील Wed, 01/30/2008 - 09:09
मला वाटते, असे टाळण्यापेक्षा थेट "नाही" म्हणणे अधिक श्रेयस्कर! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन Wed, 01/30/2008 - 10:07
"अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना." बरोबरच आहे. पण सभ्यपणे त्यांना न दूखवता "टाळण्याचे " काही उपाय देत आहे. बघा जमलं तर एखद्यावेळी प्रयोग करून बघा ....... [ अर्थातच नेटवरून साभार .......... ] १. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. लग्न करशील माझ्याशी ?'' २. टेलिमाकेर्टिंगवाल्याला सांगा , '' मी आत्ता जरा बिझी आहे. तुमचा घरचा नंबर द्याल का प्लीज! मी मोकळा झाल्यावर करतो तुम्हाला फोन. '' ३. एकदा माहिती दिली की पुन्हा विचारा , '' हं , काय सांगत होतात तुम्ही ?'' असं तीन चार वेळा करा. ४. तुम्ही जेवत असताना असा फोन आला की सांगा , '' मी जेवतोय. दोन मिनिटं जरा होल्ड करा हां. '' मग स्पीकर फोन ऑन करून फोन बाजूला ठेवा आणि आरामात जेवत राहा. खाण्याचे मचमच आवाज करा आणि इतरांशी गप्पाही मारत राहा. ५. फोनवरच्या माणसाला सांगा, ''माझे सर्व व्यवहार माझा मुलगा पाहतो, त्याच्याशी बोला.' आणि फोन आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात द्या (किंवा स्वत:च पाच वर्षांच्या मुलाच्या आवाजात बोलू लागा.) ६. ''हॅलो, हां कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? जरा मोठ्यानं बोला... आणखी मोठ्यानं बोला हो जरा... अजिबात ऐकायला येत नाहीये तुमचं... फोन आहे का चुन्याची डबी? हॅलो... आणखी मोठ्याने बोला...'' ही वैश्विक युक्ती टेलिमाकेर्टिंगवाल्यांवरही लागू पडतेच. ७. त्यांना सांगा, ''एक मिनिट. एकेक शब्द बोला. मी तुमचं सगळं बोलणं लिहून घेतोय. माझ्या काहीही लक्षात राहात नाही. एकेक शब्द आणि अगदी हळूहळू... घाई नको... हां कुठून फोन केलाय तुम्ही... आय... सी... आय... हळू हळू सांगा...'' ७. त्यांनी विचारलं, ''हाऊ आर यू सर?'' की लगेच सुरुवात करा, ''मला हे तुमचं फार आवडलं. तुम्ही फक्त व्यापार करत नाही. माणुसकी जपता. आजकाल कोण कुणाला विचारतं हो की कसे आहात? माझे तर तुम्हाला सांगतो इतके प्रॉब्लेम सुरू आहेत...'' टेलिमार्केटिंगमुळे 'टाळके' हललेला [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

पिवळा डांबिस Fri, 02/01/2008 - 10:56
झकास आयडिया आहेत एकेक! आमचे हे २ पैसे... १. फोनवर त्याने/तिने प्रस्तावना केल्यावर आपण लगेच गंभीर खर्जातल्या स्वरात म्हणायचं, "यू हॅव रीचड अ सिक्युअर नंबर. धिस कॉल इज बीइंग रेकॉर्डेड फॉर सिक्युरिटी रीझन्स. अ कॉपी विल बी फॉरवर्डेड टू *** (इथे तुम्ही जिथे रहात असाल त्याप्रमाणे सीबीआय, एम आय, एफबीआय वगैरे!)" बरयाच टेलेमार्केटर्सचा धीर सुटतो. २. आपली भाषा बदलत रहायची. म्हणजे असं की तो/ती इंग्रजीतून बोलली की आपण हिंदीतून सुरवात करायची. त्याला/तिला हिंदी येत असेल तर मग तो/ती हिंदीतून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आपण लगेच मराठी सुरु करायचं. मग वरहाडी/ कोकणी असं हळूहळू सुक्ष्मात जात रहायचं. हा एक चांगला खेळही आहे, कोण हरतो ते पहायचा! बहुतेक वेळा आपण जिंकतो कारण कधी कोणत्या भाषेत बदल करायचा हे आपल्याच हातात असतं. समोरचा/ची हरतात तरी किंवा कंटाळून फोन ठेवतात तरी. :) आपला, पिवळा डांबिस ता. क. : मध्येच कुठे गायब झाला होता इतके दिवस? तुम्हाला आम्ही मिस केलं राव!

धमाल मुलगा Wed, 01/30/2008 - 11:21
च्यायला... हे म्हणजे अथपासून इतिपर्य॑त सगळच "हाण तिच्याआयला" (काय करणार, आमच्यामध्ये शिरलेले रावसाहेब काही केल्या बाहेरच पडत नाहियेत.) अभिजीत, एकदम "कल्ला" लिहिलय, अन् डॉनभाव, ते तुमच॑ एक एक कल्पना तर यकदम फर्मास हा॑ ! हे सगळे क्रेडिट कार्डवाले तिच्याआयला नेऊन घातले पायजेत तिकड॑...सात गडगड्याच्या विहीरीत. - ("कोल्ड कॉल" वाल्या॑नी विस्कटवलेला) धमाल.

वरदा Wed, 01/30/2008 - 22:38
सहीच्..खरंच टाळाटाळ करणं सोप्पं नाही....चांगला लेख्...डॉन तुमच्या सगळ्या आयडीया झक्कास...

वरदा Wed, 01/30/2008 - 22:42
महत्वाच्या किंवा आपल्या चांगल्या मैत्रीणींशी मेसेंजर वर बोलत असताना नको त्या ऑनलाईन असलेल्या लोकांना कसं टाळावं? जीमेल वर स्टेल्थ सेटींग्ज पण नाहीयेत. बिझी स्टेटस असूनही बोलणारे लोक असतात आणि उत्तर दिलं नाही की ओळख नाही ठेवत असं म्हणायला मोकळे.....जाम कंटाळा येतो कधी कधी.....

In reply to by वरदा

एक गुरुवार, 01/31/2008 - 02:32
अश्या लोकांना ब्लॉक करता येतं. (नावापुढे राईट क्लिक करून सिलेक्ट ब्लॉक) माझ्या एका मैत्रिणीला मी ही ट्रीक सांगितली होती.. बरेच दिवस झाले पण त्या नंतर ती कधी ऑनलाईन आलीच नाही. :-(

सुनील गुरुवार, 01/31/2008 - 02:35
बरेच दिवस झाले पण त्या नंतर ती कधी ऑनलाईन आलीच नाही. ती तुम्हाला टाळत असावी!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

व्यंकट गुरुवार, 01/31/2008 - 03:49
मला एकदा आय सी आय सी आय मधून फोन आलेला की १ लाखाचे कर्ज १८% च्या कमी व्याज दरावर देण्यास तयार आहेत; मी काही कर्ज मागितलं नव्हतं, पण आवाज गोड होता, लगेच फोन ठेऊन द्यावा वाटला नाही. त्यांना १६% च्या दरानी २ लाखाचे कर्ज मी बँकेला देतो अशी ऑफर दिली.

In reply to by व्यंकट

विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:29
त्यांना १६% च्या दरानी २ लाखाचे कर्ज मी बँकेला देतो अशी ऑफर दिली. मी इंटरेस्टेड आहे बरं का व्यंकटराव! :) आपला, (धंदेवाईक) तात्या.

विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 14:55
टेली मार्केटर ला टाळ्ण्याचा आण्खी एक प्रकारः कोणि काहि म्हणाले कि त्यान म्हणयचे कि थाम्बा ....एक मिनिट्......एक मिनिट हं..... मी जरा टोइलेट ल जाउन येतो .....तो पर्यन्त थाम्बा हं..... किंवा मी आत्ता टोइलेट मधे आहे. तुम्ही बोल्णे चालु ठेवा.... ह प्रकार मी मझ्या एक नातेवैकान्सठी वापरला होता...... त्यानी त्यानन्तर आयुश्यात पुन्हा फोन नाही केला.....( अरे नातेवाइकाना टाळण्याची एक नविन युक्ति मि तुमच्याशी शेअर केली .........) वापरून बघा. (कोणाचातरी नातेवाइक)विजुभाऊ

आपला अभिजित गुरुवार, 11/13/2008 - 13:08
एक लेख पूर्वी इथे लिहिला होता. या पोस्टशी संबंधित त्यातील काही मुद्दे : काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्‍य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना. वरील अनुभव माझ्या बाबतीतला आहे. एकदा मी ऑफिसात असताना असाच एका मधाळ आवाजाच्या युवतीचा फोन आला. मी तिच्या प्रतिनिधीला (तिला नव्हे बरं का राजकुमारा!) भेटण्याची वेळ दिली. ऑफिसचा पत्ता दिला. जवळची खूण (लॅंडमार्क) विचारल्यावर `शनिवारवाडा' असं सांगितलं. त्यावर ती म्हणते, `सर, कोई `लॅंडमार्क' नहीं हैं क्या?` मी कोसळायचाच बाकी होतो. शनिवारवाड्याव्यतिरिक्त कुठला दुसरा लॅंडमार्क ह्या बयेला हवा होता? `वो पेशवा का पुराना हवेली है ना, उसके बाजू में जो नीरा का दुकान है ना, उसके सामने हैं हमारा कार्यालय' असं सांगायला हवं होतं का हिला?

आजच्या "सुपरफास्ट' जगात सर्वांना भेडसावणारी प्रमुख समस्या कुठली असेल...? नको असलेल्या लोकांना टाळायचं कसं, याची. व्यक्तिमत्त्व विकास, बुद्धिमत्ता वर्ग वगैरे घेतले जातात, तसा टाळण्याच्या कलेचा वर्गही घेण्याची नितांत गरज आहे...ही कला अवगत असलेल्या आणि नसलेल्यांविषयी एक "स्वैर' चिंतन... ----------- एका सहकाऱ्यानं टाळण्याच्या कलेवर लेख लिहायला सुचवलं, तेव्हा प्रथम टाळण्याचाच प्रयत्न केला; पण नंतर टाळण्याची कला अवगत आहे की नाही, असा विचार केला, तेव्हा अंतरात्म्याचं (या अंतरात्म्याचा भाव हल्ली फारच वाढलाय) नकारार्थी उत्तर आलं.

चर्चिलची "शापवाणी"

तळेकर ·

सुनील Tue, 01/29/2008 - 21:40
आपला दृष्टीकोन नकारात्मक वाटला. चर्चिल हे वर्णद्वेषी होते. भारतीयांना स्वतः राज्य करण्याची अक्कल नाही, त्यांच्यावर आम्ही (पाश्चात्यांनी) राज्य केले पाहिजे असे त्यांचे मत होते (हिटलरचे मत याहून वेगळे नव्हते). परंतु खरोखरच तसे घडले का? गेल्या सहा दशकात भारताने काहीच प्रगती केली नाही का? कदाचित जेवढी अपेक्षित होती तेवढी म्हणा किंवा जेवढी प्रगती करणे शक्य होते तेवढी झाली नाही म्हणा, हे शक्य आहे. पण गेल्या सहा दशकात काहीच झाले नाही हे म्हणणे अगदीच नकारात्मक वाटते. आपण आपल्या achievements चे तीन भागात वर्गीकरण करू शकतो. १) अन्नधान्य व शेती - भारत स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या हाती भिकेचा वाडगा होता. आपल्याला धान्य आयात करावे लागत होते. गुरेदेखील तोंड लावणार नाहीत असला गहू (बहुधा त्याचे नाव मिलो असे होते) अमेरिकेने आपल्या झोळीत फेकला होता. आज परिस्थिती काय आहे? आपण अन्नधान्याच्या बाबतीत बहुतांशी स्वयंपूर्ण आहोत. भिकेचा वाडगातर आम्ही केव्हाच फेकून दिला आहे. मोठमोठ्या प्रकल्पासाठी आपण आज जागतिक बॅकेकडून वगैरे कर्ज घेतो (लक्षात ठेवा, कर्ज हे पत दर्शविते. अमेरिका हा जगातील सर्वात अधिक कर्जबाजारी देश आहे). २) उद्योगधंदे - सहा दशकांपूर्वी भारतीय industry कोणत्या परिस्थितीत होती हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आज आपण संपूर्ण भारतीय बनावटीची मोटरगाडी बनवू शकतो इतकेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रह वाहून नेण्याची सेवादेखील देऊ शकतो! ३) Last but not the least. भारताच्या बरोबरीने स्वतंत्र झालेले तिसर्‍या जगातील अन्य देश पहा. कुठे लष्करशाही तर कुठे हुकुमशाही! अनेक धर्म, भाषा, पंथ, जाती-उपजाती यांनी पोखरलेला हा देश सलग सहा दशके लोकशाहीची वाटचाल करतो आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकशाही हा कदाचित राज्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग नसेलही, पण त्यापेक्षा उत्तम मार्ग दुसरा नाही (हे वाक्य चर्चिलसाहेबांचेच ना?). ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हे तुम्हीच ठरवा. टीप : टाटांनी कोरेस घेतली तो क्षण पाहायला चर्चिलसाहेब हवे होते, असे राहून राहून वाटते!!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ग्लास अर्धा रिकामा की अर्धा भरलेला हे तुम्हीच ठरवा.>> हे वाक्य आता इतक गुळगुळीत झालं आहे. मला वाटत पाडगावकरांनी तो अर्धा पिउन इतरांना प्यायला मिळावा म्हणुन अर्धा रिकामा ठेवला आहे. काही लोक तोंडाला तो लाऊन पटकन रिकामा करुन टाकावा नाहीतर इतर पिउन टाकतील या धास्तीत असतात. काही लोक तो उर्वरित कसा भरता येईल असा विचार करतात. सत्य हे आहे कि तो एकाच वेळी अर्धा भरलेला व अर्धा रिकामा आहे. प्रकाश घाटपांडे

व्यंकट Wed, 01/30/2008 - 12:37
>>तुम्हाला काय वाटते.? तळेकर साहेब, आम्हाला असे वाटते की, आम्हास कोणाचीच मते पटत नाहीत, आणि आमची मते आम्ही कोणास पटवून देऊ शकत नाही. तुर्तास आम्हास पृथ्वीतलावरील आमच्या एकट्याच्या वाट्याची हवा, पाणी, समुद्र, भूमी , सुखं दु:ख, पशू, पक्षी, धन-संपदा, पुत्र-पौत्र वैगेरे हवे आहेत ज्यावर आमची अनभिक्षित सत्ता चालेल. परंतू, ते घडेलसे वाटते नाही; तोवर, लाच देऊन, लबाडी करून, टॅक्स भरून,शिव्याशाप खाऊन, तळतळाट घेउन, सचोटीने, मेहनतीने, आशिर्वादांनी, नशिबाने, जसे जमेल तसे, जे जे मिळेल ते घेऊ आणि द्यावे लागेल, देता येईल ते देऊ, असे आमचे वयक्तीक मत आहे.

In reply to by व्यंकट

मुक्तसुनीत Wed, 01/30/2008 - 19:08
हा विषय वाचताना दोन्हीकडचे दृष्टिकोन समोर येत आहेत. या दोन्ही बाजू अर्थातच पूर्वसूरींनी मांडलेल्या आहेत. घाटपांडे यानी म्हण्टल्याप्रमाणे , या चर्चा थोड्याशा गुळगुळीत झाल्यासारख्या आहेत. मात्र व्यंकट यांची प्रतिक्रिया मला फार बोलकी वाटली. फार तीव्र, चटका लावणारी. विश्लेषणांच्या, वाद-विवादांच्यामधे (जे अर्थातच आवश्यक आहेत ! ) सामान्य नागरिकांच्या भावना नेमक्या सांगणारी. "हर किसीको चाहिये इक मुठ्ठी आसमां" या शब्दांची आठवण झाली.

मोहन Wed, 01/30/2008 - 14:31
तळेकरजी प्रत्येक प्रश्नाचे खापर राजकारण्याच्या माथी मारायला फारच सोईचे आहे. काय होऊ शकले असते पेक्षा काय साध्य केले व काय करता येऊ शकेल ह्या कडे लक्ष आपण सर्वांनीच द्दयायला हवे. चर्चिलची "शापवाणी" ही भारत सोडायला लागल्यामूळेची ऊद्विग्न प्रतीक्रिया असावी. मी श्री. सुनीलच्या मतांशी जास्त सहमत आहे. न्यूयॉर्कला कामानिमित्त फिरतांना " The pierre" या पंचतारांकित हॉटेलवर भारताचा तिरंगा व टाटांच्या ताजचा झेंडा पाहुन माझा ऊर अभीमानाने भरुन आला होता. हे सुध्दा चर्चिलसाहेबांना दाखवायला मिळाले असते तर फार बरे झाले असते. असो अजून आपल्या सगळ्यांना बराच पल्ला गाठायचा आहे ... राजकारण्यांसोबत वा राजकारणी असतांना देखील!!! आपला मोहन

संजय अभ्यंकर Fri, 02/01/2008 - 01:40
लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिश संसदेस २, फेब्रुवारी १८३५ रोजी पाठवलेला हा खलिता बराच बोलका आहे. " I have travelled across length & breadth of India and I have not seen one person who is a begger, who is a thief.Such a wealth I have seen in this country, such high moral values, such high calibre, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and , therefore I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is Good and Greater than their own, they will loose their self esteem, their native culture and they will become what we want them, a truely dominated nation. " ब्रिटिशांनी पेरलेली बिजे आजही फळे देत आहेत. अशी दूर दृष्टि! संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

In reply to by संजय अभ्यंकर

इनोबा म्हणे Fri, 02/01/2008 - 01:50
संजयराव मध्यंतरी कुणा ऑर्कुट सदस्याच्या अल्बममधे हे पत्र वाचले होते. खरेच... इंग्रजांच्या दूरदृष्टीला मात्र तोड नव्हती/नाही.

१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती . "स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील.

शुद्ध मराठी, वापरण्याजोगे मराठी!

विसोबा खेचर ·

नेने Tue, 01/29/2008 - 23:05
याहू ग्रुपवरील चर्चा मीही वाचतो आहे. त्या लिंकवरूनच मी ह्या साईटवर आलो. (पण माझे तेथले नाव वेगळे आहे). मराठी विकिपीडिया ही चळवळ मराठीला संजीवनी देईल असे मला प्रामाणिकपणे वाटते. मराठी विश्वकोशाचा शासनाकडे अडकून पडलेला प्रकल्प मार्गी लागणे कठीण आहे. म्हणूनच मराठी विकिपीडिया हा एकमेव आशेचा किरण दिसतो. मराठी विकिपीडिया ह्या विषयावरील माझी ही नोंद पाहावी. (सध्या मला इतकेच जमलेले आहे). आता ह्या थ्रेडसंबंधी : मराठीत रुळलेले परकीय शब्द वापरण्यास काहीही हरकत नाही. भाषा अशाच रीतीने समृद्ध होतात. पण व्याकरण आपल्या भाषेचे वापरायला हवे. 'टेबलवर' म्हणायचे नाही 'टेबलावर' असे म्हणा. सामान्यरूप करणे ही मराठीची खासियत आहे. ती सोडायची नाही. वगैरे. विषय मोठा आहे, सध्या एक विचार देऊन थांबतो. वि.सू. ह्या साईटवर खाली दिसत असलेल्या टॅबमधील शब्द 'पूर्वपरीक्षण' असा हवा. री दीर्घ हवी.

In reply to by नेने

विसोबा खेचर Tue, 01/29/2008 - 23:17
नेनेसाहेब, याहू ग्रुपवरील चर्चा मीही वाचतो आहे. त्या लिंकवरूनच मी ह्या साईटवर आलो. या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. इथे येऊन आपले मत नोंदवल्याबद्दल आभारी आहे. मराठीत रुळलेले परकीय शब्द वापरण्यास काहीही हरकत नाही. भाषा अशाच रीतीने समृद्ध होतात. पण व्याकरण आपल्या भाषेचे वापरायला हवे. 'टेबलवर' म्हणायचे नाही 'टेबलावर' असे म्हणा. सामान्यरूप करणे ही मराठीची खासियत आहे. ती सोडायची नाही. वगैरे. मी आपल्याशी सहमत आहे... तात्या.

वेद Wed, 01/30/2008 - 00:34
But we do not see any version of Marathi softwares, because the attempt to keep Marathi pure makes the it unusable. मागणी आणी पुरवठा तत्वावर मराठी सॉफ्टवेअर किती तग धरू शकेल असे वाटते हे जाणून घेण्यास आवडेल. चीन मध्ये २ आणी जपानमध्ये १ भाषा सर्वत्र बोलली जाते. त्यानुसार मागणी वाढते. मराठी ही भारतातल्या एका राज्यात बोलली जाणारी भाषा आहे. त्यामुळे मागणीलाही मर्यादा पडणारच. शिवाय, मराठी बोलणारया एका मोठ्या वर्गाला इंग्रजीही येते, आणी इंग्रजीमध्ये सॉफ्टवेअर वापरणे त्यांना बहुधा सोपे जाइल, कारण इंग्रजी सॉफ्टवेअर नेहेमीच ग्राहक संख्येमुळे सुधारणांमध्ये आघाडीवर असेल, स्वस्तही असू शकेल. मला असे अजिबात म्हणायचे नाही की मराठीमध्ये सॉफ्टवेअर लिहू नये. पण व्यावसायिक यशाची अपेक्षा फारशी ठेवता येणार नाही. आणी जर स्वतःचा खर्च स्वतः वाहू शकणार नसेल तर कुठलीही गोष्ट फार काळ तग धरू शकणार नाही हे सर्वांना ज्ञातच आहे. बाकी दोघांचीही मते पटतात. फार क्लिष्टता न आणता मूळ भाषा जपणे महत्वाचे आहे.

धनंजय Wed, 01/30/2008 - 02:48
गुंडोपंतांशी झालेल्या एका ई-संवादात (http://www.mr.upakram.org/node/678#comment-10547) मी माझे मत दिले आहे. ते साधारण वर लिहिल्याप्रमाणेच आहे "However, the flexibility *must not* come at the price of structural and fundamental changes." केवळ जडणघडणीचे आणि मूलभूत नियम प्रत्यक्षात आपोआप ठरतात (म्हणजे मराठी बोलणारे तो शब्द स्वीकारतात, वापरतात; किंवा आव्हेरतात, हसण्यावारी नेतात) असे माझे मत आहे. ज्याला नवीन शब्द मराठी तोंडात रुळवायचा आहे, त्याने या बाबतीत अभ्यास करावा - कुठले शब्द स्वीकारले जातात, कुठल्या शब्दांची टिंगल होते? आणि मराठी जिभेचे वळण समजून योग्य तर्‍हेचे शब्द नवीन घडवावेत. आता माझे मत : १. वस्तूंची नावे इंग्रजी घेतल्यास मराठीची मूलभूत जडणघडण बिघडत नाही. "होंडा कारच्या इंजिनसाठी अधिक ऑक्टेनचे पेट्रोल लागते." (मला हे चालते.) २. मराठीतील शब्द-बदल (ज्याला "शब्द चालवणे" म्हणतात) शक्यतोवर तसेच ठेवावेत. "इन टाटा कंपनी फॉर रिसर्च खूप सपोर्ट मिळतो" (नाही आवडत!) "टाटा कंपनीमध्ये रिसर्चसाठी खूप सपोर्ट मिळतो. (हे त्यातल्या त्यात बरे.) "टाटा कंपनीमध्ये संशोधनासाठी खूप आधार देतात. (हे आणखी बरे.) "टाटा उद्योगसंस्थेत संशोधनासाठी खूप आधार देतात. (हे दुसर्‍या टोकाला जायला लागले.) ३. क्रियापदे वेगळ्या भाषेतली घेतली तर मराठी भाषक सहज सहन करून घेत नाहीत. "ऑफिसला गो करताना मी वॉक करतो, रिटर्न करताना लिफ्ट टेक करतो." (नाही आवडत.) "ऑफिसला जाताना मी चालत जातो, परत येताना मी लिफ्ट घेतो." (हे त्यातल्या त्यात बरे.) ४. शिवाय एखादा जुनाच सोपा मराठी शब्द असेल तर उगाच इंग्रजी शब्द वापरल्यास मराठीची मराठमोळी लय बिघडते. पण इंग्रजी ऐवजी अति-संस्कृत शब्द वापरले तरीही मराठमोळी लय बिघडते. त्यामुळे तारतम्य वापरावे. "या सेंटेन्समध्ये काही वर्ड राँग असेल तर शब्दलेखनप्रणालीच्या शब्दचिकित्सायंत्राने तो करेक्ट करूया." (दोन्ही कडून नाही आवडत.) "या वाक्यात कुठला शब्द चुकला असेल तर वर्ड प्रोसेसरच्या स्पेलचेकने तो दुरुस्त करूया/सुधारूया. (हे जरा बरे वाटते.)

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/31/2008 - 22:54
या विषयाम माझ्या मते एखाद्या प्रतिशब्दाची लोकप्रियता हा महत्वाचा घटक ठरतो. उदा. बाळ पंडितांनी मराठीत live commentry ला धावते समालोचन हा शब्द वापरला. तो आकाशवाणीवरील नियमीत वापरामुळे लोकप्रिय झाला. तसेच catch ला झेल, stump ला यष्टी, pitch ला खेळपट्टी, batsman ला फलंदाज, bowler ला गोलंदाज असे अनेक शब्द मराठीत लोकप्रिय केले. त्यामुळे अजूनही मराठी वृत्तपत्रे त्याचा वापर करतात आणि तो हास्यस्पद वाटत नाही. प्रतिशब्द हे लांबलचक न काढता साधारण समान अर्थी आणि समान लांबीचे काढले तर ते लोकप्रिय होतील जरूर. या सर्व गोष्टिंचा साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे. (मराठीचा अभिमानी) -डॅनी पुण्याचे पेशवे

भडकमकर मास्तर Tue, 02/05/2008 - 08:48
प्रतिशब्द हे लांबलचक न काढता साधारण समान अर्थी आणि समान लांबीचे काढले तर ते लोकप्रिय होतील जरूर. या सर्व गोष्टिंचा साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे..... अगदी बरोबर... अवांतर : मी मेडिकल चा अभ्यास करत असताना काही इंग्रजी माध्यमात शिकलेले विद्यार्थी (मेडिकल टर्म्स ला मराठी प्रतिशब्द सांगितल्यावर्)त्या शब्दांच्या संस्क्रुतोद्भव मराठीला हसत असत...उदा. युस्टेशिअन ट्यूबला ग्रसनीमध्यकर्णनलिका...मग मी त्यांना सोदाहरण पटवून देत असे की इंग्रजीत्सुद्धा खरेतर असेच उगीच अवघड केलेले वैद्यकीय शब्द आहेत्...उदा.: ओरोफॅरिंजियल....आता याला तुम्ही माउथ आणि थ्रोट म्हटले तर सोपे होते पण उगीच लॅटिन (की काय ते शब्द )वापरल्याने शब्द अवघड भासतात सुरुवातीला पण भरपूर वापर केला की सगळे सवयीचे होते इतकेच...

In reply to by भडकमकर मास्तर

अमित खोजे Fri, 09/20/2013 - 21:32
सध्या मिपा वर नविनच असल्याने हे जुने लेख वाचत आहे. आणि हा लेख वाचताना मला माझ्या बर्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. उगीचच संस्कृत (ज्याचे spelling "sanskrit" - "Krishna" आणि "skrishti" सारखे करतात) प्रतिशब्द शोधून काढून मराठी भाषा अवघड करायची कि सरळसोट english शब्द आत्मसात करून 'मराठी भाषेवर अन्याय तर करत नाही आहोत ना' या पश्चात्तापामध्ये जळत राहायचे हा माझ्या समोर असलेला मोठा प्रश्न होता. बायको सहित सर्वजण "उगी जास्त मराठी वापरू नको बे" म्हणून हिणवतात त्याचे वाईट वाटते आणि या संभ्रमात पडतो. अजून छोटी पिल्ले यायची आहेत पण त्यांनी हि अशी इंग्रजाळलेली भाषा वापरू नये असे फार वाटते. वर उल्लेखल्या प्रमाणे sanskit, Krishna, Shristi (Sanskrut, krushna आणि srushti) वरूनही खूप वाद झाले आहेत. बोलीभाषेत प्रचलित असल्याने हे सर्व शब्द सर्रास वापरले जातात पण हे चुकीचे आहेत असे मला वाटते. बरोबर - कृष्ण, संस्कृत, सृष्टी ज्यामध्ये 'उ' वापरला जातो. चुकीचे - क्रिष्ण, क्रिष्णा, स्रीष्टी, संस्क्रीत ज्यामध्ये 'इ' वापरला जातो. - असे माझे मत आहे. spelling चे थोडेसे अवांतर होते आहे मान्य आहे पण सुचले म्हणून विचारावेसे वाटले. पुण्याच्या पेशव्यांनी (हा मिपा वरील संकेताक्षर म्हणून अर्थ घ्यावा) बाळ पंडितांचे उदाहरण देऊन मराठीमध्ये नविन शब्द रूढ करता येतात हे पटवून दिले. तसे नवीन सोपे शब्दांची भर टाकायला काहीच हरकत नसावी असे बहुतेकांचे मत वाचून आनंद झाला. आता नवीन शब्दांसाठी शोधायला सुरुवात केली पाहिजे. मिपा वरच मला वापरता येण्याजोगे बरेच नवीन शब्द मिळत आहेत. त्याबद्दल धन्यवाद!! सूचना - मराठी लिहिण्यासाठी मिपा च्या "इनपुट साधना" पेक्षा मला हे गुगल चे "हत्यार" अधिक आवडले. बरेच सोपे आहे वापरायला. मिपा वर हे अंतर्भूत करता येईल का? http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

In reply to by अमित खोजे

भाते Tue, 10/01/2013 - 22:42
मिपा मालक (नीलकांत) किंवा संपादक मंडळ सदस्य यापैकी कोणालाही व्यनी करून आपण आपल्या सुचना/बदल सुचवू शकता. मिपा वर प्रतिक्रिया नोंदवताना मी सुद्धा आपण दिलेले गुगलचे हत्यारच वापरतो.

In reply to by भाते

मिपा मालक (नीलकांत) किंवा संपादक मंडळ सदस्य यापैकी कोणालाही व्यनी करून आपण आपल्या सुचना/बदल सुचवू शकता. >>> इथे 'सूचना' असं हवं! मिपा वर प्रतिक्रिया नोंदवताना मी सुद्धा आपण दिलेले गुगलचे हत्यारच वापरतो. >>> गूगलचे :दिवा: घ्या!

In reply to by भडकमकर मास्तर

खटपट्या Sat, 09/21/2013 - 02:38
प्रतिशब्द हे लांबलचक न काढता साधारण समान अर्थी आणि समान लांबीचे काढले तर ते लोकप्रिय होतील जरूर. या सर्व गोष्टिंचा साधक बाधक विचार होणे आवश्यक आहे..... सहमत agnirathagamanaagam = या साठी आगगाडी हा साधा शब्द वापरता येईल.

राही Fri, 09/20/2013 - 23:41
कृष्ण शब्दात 'ऋ' हा स्वर आहे. तो एक स्वतंत्र स्वर आहे. त्याचा उच्चार 'रु'' सारखाही नाही आणि 'रि' सारखाही नाही. जेव्हा आपण क्रिष्ण किंवा क्रुष्ण असा उच्चार करतो तेव्हा 'ऋ' ह्या स्वराला आपण 'र' हे व्यंजन मानीत असतो आणि त्याच्यापुढे 'इ' किंवा 'उ' हे स्वर जोडत असतो. स्वरापुढे दुसरा कोणताही स्वर जोडण्याची आवश्यकता नसते. असे करणे हे चुकीचे आहे. र्र्र्र्र्राम किंवा र्रावण असा उच्चार करताना आपण जिभेचे टोक थोडेसे आतल्या बाजूला वळवून टाळ्याला चिकटवतो तसेच थोडेफार 'ऋ' या उच्चाराच्यावेळी करायचे असते.

@ अमित खोजे इनपुट साधन खूपच मस्त आणि फारच सोपे आहे. मिपा वर मी सुद्धा नवीन आहे. Type करायला अवघड जाते म्हणुन बरयाच वेळा प्रतिसाद द्यायचा कंटाळा यायचा. पण हे फारच छान झाले. शतश: धन्यवाद.

राम राम मंडळी, आमचे दोन मित्रवर्य अभय नातू आणि केदार सोमण यांची मराठी विकिपिडियाकरता मोलाची कामगिरी आहे. हे दोघेही मराठी विकिकरता खूप काम करत असतात. मराठी विकिशी निगडीत एक याहू समुहही आहे, जिथे मराठी विकिसंदर्भात रस असलेली माणसं एकत्र येऊन चर्चा करू शकतात, आपापले विचार एकमेकात वाटू शकतात. नुकतीच अभय नातू आणि केदर बोडस या दोघांची, शुद्ध मराठी (प्युअर मराठी), व वापरण्याजोगी मराठी (युजेबल मराठी) या संदर्भातील विकिच्या याहू समुहावरीलएक चर्चा आमच्या वाचनात आली. आम्हाला ही चर्चा खूप मोलाची वाटली व दोघांचेही विचार महत्वाचे वाटले.

याँऽयुकऽ नोऽएल: मेरी ख्रिसमस

ऋषिकेश ·

सहज Tue, 01/29/2008 - 10:45
सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!!

In reply to by सहज

स्वाती दिनेश Tue, 01/29/2008 - 12:29
सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख!!! असेच म्हणते, आणि 'पाहिलाच पाहिजे' च्या यादीत या चित्रपटाचे नाव घालते. स्वाती

In reply to by सहज

केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 14:13
दाभोळकरशेठ, सुंदर कथानक असलेल्या चित्रपटाची सुंदर ओळख करून दिल्या बद्दल धन्यवाद! (आभारी) केशवसुमार आजच टोरेन्ट डाउनलोड ला लावतो ;)

स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 16:12
कथानकाची छान मांडणी केली आहे. हा सिनेमा मस्त आहे यात वादच नाही. मी पाहिला आहे ,मला चित्रिकरण छान असल्यामुळे लक्षात राहिला.

ऋषिकेश Wed, 01/30/2008 - 21:38
सहजराव आणि दोघी स्वातीताईंचे प्रतिसादाबद्दल आभार.. (आभारी) ऋषिकेश

विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:42
ऋषिकेशा, सुंदर परिचय करून दिला आहेस.. मी नक्की पाहीन... अजूनही अशीच उत्तमोत्तम परिक्षणे मिपावर येऊ द्यात.. तात्या.

चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 09:49
मानवी स्वभावाचा सुंदर वेध. पहायलाच हवा, पळतोच लायब्ररीमधे! धन्यवाद ऋषीकेश! चतुरंग

पहिले महायुद्ध आणि त्यावरचे अनेक चित्रपट यामुळे तेव्हा लढल्या गेलेल्या बर्‍याचशा लढाया सगळ्यांना माहीत आहेत. काही चित्रपट लढाई व्यतिरिक्त सैनिकांच्या समस्या, त्यांची मानसिकता, संघर्ष आदि विषयांचेही सुंदर चित्रण करतात. "नो मॅन्स लँड" पासून "सेविंग प्रायवेट रायन" असो, एक सैनिक आणि त्याच्या पुढील आव्हाने याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केले गेले आहे. यापैकीच आणखी एक पैलू उजेडात आणणार एक फ्रेंच चित्रपट आज पाहिला. २००६ मध्ये प्रसिद्ध झालेला "याँऽयुक नोऽएल".(Joyeux Noël) किंवा इंग्रजी मध्ये "मेरी ख्रिसमस". युद्धावरील अनेक चित्रपटांच्या पैकी एक असला तरी आपले असे वेगळेपण जपणारा.. नव्हे ..

सरदारजीचे पत्र

सुनिल डोईफोडे ·

एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि पत्ता लिहिला. हे नक्की काय केले ते समजे पर्यंत आमचा विनोदातला विंटारेष्ट संपला. =))

अबोल Sat, 03/21/2009 - 19:00
आयला डोई फोडलि ना राव ! आता एक काम करा , अजुन एक पत्र लिवा आनि फ्रॉम च्या जागि तुमचे नाव लिवा आनि............... क्रुपा करुन टु च्या जागि माझे नाव लिवु नका.

नरेश_ Sat, 03/21/2009 - 19:06
एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी नातेवाईकाचे नाव आणि नातेवाईकाचा पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं .. सकाळी पत्र पाठवलं आणि दुपारी उत्तर पण आलं " हां आता वाचा, वरचे कोडे सुटले असल्यास ;-) सही /- आगरी बोली - आगरी बाना.

एका सरदारजीने आपल्या नातेवाईकाला पत्र लिहिले आणि चूकीने To च्या जागी त्याच्या नातेवाईकाच्या नाव आणि पत्याच्या एवजी स्वतःचा नाव आणि पत्ता लिहिला. आणि From च्या जागी स्वत:चे नाव आणि पत्याच्या एवजी त्याच्या नातेवाईकाचे नाव आणि पत्ता लिहिला. पहिल्या डाकेने पत्र गेले पाहिजे म्हणून सकाळीच पोस्टाच्या पेटीत नेवून टाकले. दूपारी तेच पत्र घेवून पोस्टमन सरदारजीच्या घरी पोहोचला. पत्र घेवून सरदारजीने आलटून पालटून बघितले आणि पोस्टमनला म्हणाला " वा वा भाई कमाल होगया... तुमचं पोस्ट डीपार्टमेंट केव्हापासून एवढं प्रॉम्प्ट झालं ..

मी एक अशिष्टाचारी !

आपला अभिजित ·

प्राजु Tue, 01/29/2008 - 01:36
शिष्टाचराचं पुराण मस्त जमलंय. एक प्रसंग. माझी आई तासगांवात माझे आजी-आजोबा होते तेव्हा, आजोबांच्या एकसष्ठीची आमंत्रणे करायला गेली होती. भर दुपारी ती सगळीकडे हिंडून आमंत्रणे करत होती. शेवटचे घर, आमच्या वाड्याजवळचेच होते. तिथे आजीची मैत्रिण रहात असे. आई तिथे गेल्यावर, त्यांनी आईला लगेच काय म्हणावे...??? म्हणाल्या, " अगं, इतक्या दुपारची, रणरणणा-या उन्हात आली आहेस... आत बैस तरी कशी म्हणू तुला?? घरी परतायचे असेल ना लगेच..?" .. काय म्हणावं या शिष्टाचाराला? - प्राजु.

छोटा डॉन Tue, 01/29/2008 - 11:07
वास्तविक पाहता कार्यालयीन शिष्ठाचाराबद्दल एक वेगळा मोठा लेख लिहणे गरजेचे आहे..... कार्यालयातील बर्‍याच अनावश्यक व तापदायक गोष्टींपैकी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शिष्ठाचार. [ आता तसे म्हणायला गेले तर बॉस , तांत्रिक बैठका , कधिच न झेपणारा वर्कलोड व त्याची कधिच न साधली गेलेली डेडलाईन या गोष्टींचा गेखील समावेश होतो पण त्याबद्दल नंतर कधीतरी ... ] च्यायला हे शिष्ठाचार पाळता पाळता डोक्याची पार मंडई होऊन जाते. त्याबद्दल थोडे सविस्तर ... * दूरध्वनीवर संभाषण करताना पाळायचे शिष्ठाचार : यात फोनवर अतिहळू बोलणे [ कारण दूसर्‍याला त्रास होतो ] ही सर्वात गाढवपणची गोष्ट आहे मग पलिकडच्याला ऐकू न गेले तरी बेहत्तर. ठीक आहे आम्हालाही तेवढी समज आहे पण समजा पलिकडून फोनवर तूमचा "लंगोटीयार मित्र" प्रेमाने ४ शिव्या घालत आहे त्यावेळी तुमच्या ह्या शिष्ठाचारामुळे झक मारून त्या शांतपणे त्या ऐकून घ्याव्या लागतात. जर आपल्यालापण शिव्या द्यायच्या असतील तर शिष्ठाचारामुळे त्या हळू आवाजात द्याव्या लागतात. आता तुम्हीच सांगा यात काही दम आहे का ? शिव्या कशा ह्या एकदम "कचकचीत व दणदणीत "हव्यात त्याशिवाय त्याचा "ईफेक्ट" जाणवत नाही. दूसरे म्हणजे काही खास "प्रेमळ" व्यक्तींशी बोलताना ह्या शिष्ठाचारामुळे पंचाईत होते. कारण ह्यांच्याशी बोलताना "वेगवेगळ्या पट्टीतील आवाज, थोडे लाडिकवाळ पणाकडे झूकणारे बोलणे, काही खासगी समजले जाणारे आवाज, वारंवार फूटणारे हास्य " या गोष्टी अत्यावश्यक असतात पण ह्या शिष्ठाचारामुळे त्यांच्या वापरावर गदा येते ..... * एकत्र जेवण करतेवेळी पाळायचे शिष्ठाचार : ह्या कलमाअंतर्गत "उभारून जेवणे [ यामुळे होते काय, हात प्लेट पकडून भरून आल्यामुळे ती पडण्याची शक्यता निर्माण होते, शिवाय प्लेट भरताना भाजी /चटणी /लोणचे ह्यांची चव आपल्या शर्ट / प्यांट ला पण चाखली जाते, आपल्या टायचे भाजीत बूडणे अथवा आमटीच्या वाटी मस्तपैकी डूंबणे ही तर अगदी वारंवार घडणारी गोष्ट आहे ] , जेवताना मूर्खासारखा काट्याचमच्याचा वापर करणे [ आता वरण्-भात खाताना केलेला काटा-चमच्याचा वापर ही अजूनपणे भेज्यात न घूसलेली व आता डोक्यात गेलेली गोष्ट आहे. ] , कितीही भूक लागली तरी शक्यतो एका प्लेटमधे मावेल एवढेच अन्न घेणे व शक्यतो त्यातच उरकणे [ हो, वारंवार जर तुम्ही प्लेट भरत असाल तर ते अशिष्ठ समजले जाते.] , सर्वात म्हणजे जेवताना अगम्य व अतिशय रटाळवाण्या विषयावर गप्पा मारणे त्याही ईंग्लीशमधून. यामूळे होते काय जेवण राहीले बाजूला पण आपल्याकडून काही घोडचूक होत नाही याकडे सारखे लक्ष द्यावे लागते. नाहीतर त्यामुळे आपल्या कार्यालयीन "ईमेज" वर परिणाम होऊ शकतो ....... अजून बरेच काही आहे पण कार्यालयीन शिष्ठाचाराअनूसार आता "दैनंदीन व रटाळ कामाला सूरवात" करणे अत्यावश्यक आहे.... तेव्हा राहिलेले पून्हा कधितरी ..........

आज मी तुम्हाला माझीच (राम)कहाणी सांगणार आहे. तुम्हाला कदाचित बोअर होईल, कदाचित अगदीच रुटीन वाटेल. पण माझ्या आयुष्यातली ही एक गंभीर समस्या झाली आहे, एवढं मात्र नक्की. मी आजच्या काळात जगायला अगदी नालायक आहे. हो..."नालायक'च ! "अकार्यक्षम', "अयोग्य', "अपात्र' वगैरे नाही. नालायक म्हणजे नालायक ! ज्याची लायकी नाही, तो. आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आणि जीवनाचं मूल्यच बनलेला, "शिष्टाचार' कशाशी खातात, हे मला माहित नाही. तसं मासे, मटण, खेकडे, चिकन, शेपू-कार्ल्याची भाजी, पिझ्झा, बर्गर, पास्ता, पैसे, आदी अनेक गोष्टी कशाशी खातात, हे मला माहित नाही. (या यादीत सिगारेट आणि दारूही येते.

सुभाषित

धोंडोपंत ·

चतुरंग Mon, 01/28/2008 - 21:03
मि.पा.वरील लेखकूंसाठी तर अगदी चपखलच! एकूणच आयुष्यात समतोल साधत पुढे जाणं फारच अवघड पण अत्यंत आवश्यकही आहे. त्यामुळे प्रयत्न चालूच ठेवणे आवश्यक. अशीच अजून सुभाषिते वाचायला मिळोत. चतुरंग

धनंजय Mon, 01/28/2008 - 21:12
स्त्रीवेषाच्या उपमा गमतीदार असतात. आणि कधीकधी चपखल असतात आणि अगदी पटतात. (आंध्रमधले लोक ओरिसातल्यांना अति-उघड्या, महाराष्ट्रातल्यांना अति-झाकलेल्या मानत असतील; गुजरातेतील लोक महाराष्ट्रातल्यांना अति-उघड्या, अरबस्तानातल्यांना अति-झाकलेल्या मानत असतील - पण तो फरक करून ते लोकही हे सुभाषित "आपले" मानून घेऊ शकतील.) अवांतर : आकडेशास्त्र (स्टॅटिस्टिक्स) हे सत्याकडे पोचण्याचा उत्तम मार्ग आहे, पण स्वतःहून ते चरम उद्देश्य नाही याबाबत आमच्या प्रोफेसरने हे वाक्य सांगितले : स्टॅटिस्टिक्सचे आकडे 'बिकिनी'सारखे असतात - जे उघड करतात ते लक्षवेधक असते, पण जे झाकून ठेवतात त्यातच गोम असते. व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टिंग, व्हॉट दे कनसील इज व्हायटल!

पंत, शब्द योजतांना ते अतिशय गूढ अनाकलनीय नसावेत त्याचप्रमाणे अगदी उघड्यानागड्या अर्थाचेही नसावेत. हे दोन्ही घातक आहे. त्यामुळे ही दोन टोके न गाठता समतोलपणा राखणारे शब्द लेखन करतांना योजावेत. आवडले !!! तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत. या बाबतीत सुभाषितकाराने वापरलेल्या उपमांचा उद्देश सहीच आहे. पण, स्टॅटिस्टिक्सचे आकडे 'बिकिनी'सारखे असतात - जे उघड करतात ते लक्षवेधक असते, पण जे झाकून ठेवतात त्यातच गोम असते. व्हॉट दे रिव्हील इज इंटरेस्टिंग, व्हॉट दे कनसील इज व्हायटल! याच्याशीही सहमत आहे . :)))
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केशवराव Mon, 01/28/2008 - 22:29
व्वा धोंडोपंत, तुमच्या या सुभाषिताने [ ? ] मि.पा. चे व्यासपिठ अगदी सम्रुद्ध झाले. [ आता तिन्ही राज्यांच्या स्त्रीयांकडून येणार्‍या प्रतीसादांना सामोरे जा.]

In reply to by धोंडोपंत

केशवराव Tue, 01/29/2008 - 16:05
धोंडोपंत, शब्द कसा लिहीतात ते माहीत होते , पण ' ग म भ न ' वर लिहायला जमत नव्हते. तुम्ही सांगितल्यावर अनेक प्रयत्न करून जमले एकदाचे. सुचना केल्याबद्दल आभारी. केशवराव.

विसोबा खेचर Mon, 01/28/2008 - 23:50
तसे असले म्हणजे, ते शब्द महाराष्ट्रीय स्त्री च्या स्तनांसारखे सौंदर्यपोषक होतात. आंध्रस्री प्रमाणे अगदी उघडे नसावेत आणि गुर्जर स्री सारखे फार झाकलेले नसावेत. खल्लास रे धोंड्या! सुभाषित छानच आहे... आपला, (सुभाषितप्रेमी) तात्या.

पिवळा डांबिस Tue, 01/29/2008 - 00:19
काहीतरीच काय! .. हे धोंडोपंत अगदी रंगेलच होत चाललेत दिवसेंदिवस!! .. जनाची नाही तर मनाची तरी? .. वहिनीला जाऊन सांगायलाच पाहिजे! आ*** (आता यांना 'आपली' तरी कसं म्हणायचं!) पिवळी शेवंता

In reply to by पिवळा डांबिस

धोंडोपंत Tue, 01/29/2008 - 12:33
आ*** (आता यांना 'आपली' तरी कसं म्हणायचं!) पिवळी शेवंता खरं आहे. तुम्ही आम्हांला आपली वगैरे म्हणू नका. please spare me. धन्यवाद. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

केशवसुमार Tue, 01/29/2008 - 16:24
सुभाषित... धोंडोपंत... संस्कृत सगळ डोक्यावरून गेले.. पण आपण सांगितलेला अर्थ वाचून सुभाषित खूपच मार्मिक आहे असे म्हणावेसे वाटते.. (संस्कृत निरक्षर) केशवसुमार

नेने Tue, 01/29/2008 - 22:36
'ज्याप्रमाणे कुलवधू आपले अवयव झाकून घेते त्याप्रमाणे ज्ञानी माणूस आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन मांडीत नाही' अशा अर्थीच्या ज्ञानेश्वरीतील एका सुंदर ओवीची आठवण झाली. " नातरि कुळवधू लपवी अवेवातें "

नमस्कार, आज एक सुंदर सुभाषित वाचनात आले. ते मिपाकरांच्या आस्वादासाठी येथे देत आहोत. अनेक विद्वांनाना ते माहित असेल. पण ज्यांना माहित नाही, त्यांना कळावे आणि मिपा विविध गोष्टींनी समृद्ध व्यासपीठ व्हावे, यासाठी हा खटाटोप. येथे लेखन करणार्‍या अनेकांना हे सुभाषित उपयोगी पडेल असे वाटते. वृत्त वसंततिलका अर्थो गिरामपिहितः विहितश्च कश्चित् सौभाग्यमेति मरहट्टवधूकुचाभः | नान्ध्रीपयोधर इवातितरां प्रकाशो नो गुर्जरीस्तन इवातितरां निगूढः|| अर्थ - शब्द योजतांना ते अतिशय गूढ अनाकलनीय नसावेत त्याचप्रमाणे अगदी उघड्यानागड्या अर्थाचेही नसावेत. हे दोन्ही घातक आहे.