मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंदाज बायकोचा वाटे खरा असावा

अविनाश ओगले ·

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:53
मी पायरीवरी त्या कुडकुड करीत होतो झोंबे मला जो वारा तो बोचरा असावा ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा :))))))))) हे खास आवडलं.. बाकी विडंबनही ठिक आवडलं. -ऋषिकेश

धोंडोपंत Wed, 01/23/2008 - 13:02
वा वा पंत, क्या बात है!!!! हा हा हा हा हा अंदाज बायकोचा वाटे खरा असावा शुद्धीवरी अजूनी नवरा जरा असावा... हसून हसून पुरेवाट. सही. अप्रतिम विडंबन. मुक्तकाचे विडंबनही झकास. क्या बात है!! आपला, (हसरा)धोंडोपंत तात्या, मैफिल जमायला लागलेय रे!!! आपला, (आस्वादक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:49
विडंबन आवडले. अजुनी अशीच येऊ देत. वाट पाहात आहे अशाच विडंबनाची.. ते बंद दार आणि निद्रा न आवरे ही ज्याची उशी मी केली तो उंबरा असावा उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा हे आवडले.

In reply to by दीपा॑जली

अविनाश ओगले गुरुवार, 01/24/2008 - 20:52
अंदाज या नशेचा वाटे खरा असावा बहुतेक बायकोचा तो चेहरा असावा बायको पार्टीला गेल्यावर मी घरी बसून नशेशिवाय दुसरे काय करणार?

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 22:12
भेटून अंगणाला, इतुके विचार आता निजण्यास का न येथे, मज कोपरा असावा वा वा! मस्त विडंबन.. अवांतर - आम्हाला केशवसुमारांचे विडंबन अधिक आवडले... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अविनाश ओगले Fri, 01/25/2008 - 14:35
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे...

In reply to by अविनाश ओगले

विसोबा खेचर Fri, 01/25/2008 - 16:39
आम्हाला पण... ते `सुमार ' म्हणवतात, पण त्यांच्या काव्याचा `खुमार' काही औरच. `... मगर है गालिबका अंदाजे बयां और' हेच खरे... क्या बात है...:)

In reply to by अविनाश ओगले

केशवसुमार Fri, 01/25/2008 - 21:23
अविनाशशेठ, का सुमाराची थट्टा करता... बाय द वे.. ते डोंबिवलीच्या चाळी मधले आणि ते मालिकांचे विडंबन पण येथे येऊ द्या.. दोनी ही उच्च आहेत.. ह्या विडंबनातील 'माणसे गेली कुठे ' च्या सगळ्या द्विपदी जबरा आहेत.. केशवसुमार

राजे Fri, 01/25/2008 - 19:12
कीती तरी पिय्यकडांच्या मनातील विचार बोलून दाखवले तुम्ही.... राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

अविनाशकाका खरंच मजा आली. उघडेल दार तेव्हा संपून राग जावो माझ्या समोर माझा तो मोगरा असावा काय भन्नाट आहे जितेंद्र शिंदे

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा... या गज़लेचे विडंबन. सिच्युएशन अशी.. जिचे माझ्यावर नितांत प्रेम आहे, अशा त्या माझ्या भार्येची रीतसर परवानगी घेऊन, `...पण नऊच्या आत परत या' ही अशक्यप्राय अट मान्य करुन अस्मादिक मित्रांच्या बरोबर मद्यमैफलीला गेले. मित्रांनी आग्रहाने खूप पाजली. `काही काळजी करु नकोस. आम्ही आहोत. वहिनीनी तुला दार उघडून आत घेतल्यावरच आम्ही जाऊ...' अशी आश्वासने दिली. मैफल रात्री बारा वाजता संपन्न झाली. मित्रांनी दगा दिला. कडाक्याच्या थंडीत, निर्मनुष्य रस्त्यावर... मला माझ्या दारासमोर उभे केले. दार वाजवले.

भारतरत्न, सर, नाईटहूड किताबांबद्दल काही ..........

छोटा डॉन ·

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 17:52
या निमित्ताने असे पूरस्कार कोणाला मिळावेत [ राजकारणी, शास्त्रज्ञ, समाजसेवक, कलाकार, अभिनेते की आणखी कोणी ???] , पूरस्कारांचे निकष, निवडीची पध्दत यासारख्या अनेक मुद्द्यांचा उहापोह "मिपा" च्या मंचावर व्हावा अशी माझी ईच्छा आहे ........... स्वरभास्कर, पद्मविभूषण पंडित भीमसेन गुरुराज जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालाच पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे! आमच्या अण्णांनी खर्‍या अर्थाने हिंदुस्थानी अभिजात संगीत अक्षरश: त्रिखंडात पोहोचवले. १९५२ साली सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून, त्यात भारतातल्या उत्तमोत्तम गवयांची/गायिकांची गाणी करून गेली पन्नासहून अधिक वर्ष भारतीय रसिकांना अखंड स्वरस्नान घडवले! १९५२ साली लावलेल्या या रोपट्याचा वेलू आज गगनावेरी गेला आहे हे सांगणे न लगे! 'स्वरभास्कर' ही उपाधी खरोखरंच ज्यांना शोभून दिसावी असे अण्णांचे व्यक्तिगत गायन आणि सवाई गंधर्व संगीत महोत्सव हे हिंदुस्थानी अभिजात संगीतात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावे असे मानाचे पान आणि त्यात आमच्या अण्णांचे अनन्यसाधारण योगदान, हे निकष माझ्या मते अण्णांना 'भारतरत्न' हा पुरस्कार देण्यास पुरेसे आहेत! भारतीय अभिजात संगीताच्या या अध्वर्यूला माझा मानाचा मुजरा! अण्णांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याचे ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी माझ्या घरी दिवाळी असेल!! आपला, (कट्टर भीमसेनभक्त) तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग Tue, 01/22/2008 - 19:17
खरं तर या आधीच तो मिळायला हवा होता असं मला वाटतं. आण्णांच्या शास्त्रीय संगीताबरोबरच 'अभंगवाणीने' सामान्य रसिकांना जे काही दिले आहे त्याची तुलना बसल्याजागी पंढरीची वारी घडवून आणण्याशीच होईल! अभंगवाणीच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्यक्ष विठोबा सुध्दा पंढरी सोडून ऐकायला येऊन बसत असेल! ह्या 'सिध्द्स्वर' गानसूर्याला तो किताब देऊन, त्या किताबाची उंची लवकरात लवकर वाढावी हीच विठूचरणी प्रार्थना!! चतुरंग

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:38
भीमसेन अण्णांची निवड उचित आहेच! आणखी नांवे सुचवायची तर..... मी बाबा आमटे यांचे नांव सुचवीन. बाबांच्या कार्याची माहिती या संकेतस्थळावर करुन देण्याची गरज नाही. त्यांचे नांव माहीत नसलेला मराठी माणूस असणार नाही. इथे सुचवलेले सर्व लोक महान आहेतच परन्तू मला त्यांच्यात व बाबांमध्ये एक फरक जाणवतो की इतर सर्वांनी त्यांची कला, बुद्धि आपल्या उपजिविकेचे साधन म्हणून वापरली. त्यातून अर्थप्राप्तीहि केली (अर्थात त्यात गैर काहीही नाही) पण बाबांचे मोठेपण हे की त्यांनी भरपूर प्राप्ती असलेला वकिलीचा व्यवसाय सोडून महारोग्यांची सेवा केली. बाबांना भारतरत्न देण्याने त्या पुरस्काराचा सन्मान होईल. (नम्र) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

इनोबा म्हणे गुरुवार, 01/24/2008 - 00:44
अगदी बरोबर,अशा निस्वार्थी लोकांना हा पुरस्कार मिळणे हा खरे तर त्या पुरस्काराचाच सम्मान म्हणायला हवा. बाबांच्या कार्यापासून नव्या पिढीला काही प्रेरणा मिळेल. (बाबांचा भक्त) -इनोबा

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग गुरुवार, 01/24/2008 - 01:05
बाबांचं नाव माझ्या डोळ्यांसमोर आलं नाही ह्याची मला लाज वाटते! भीमण्णांइतकेच तेही ह्या पुरस्काराचे सार्थ मानकरी ठरु शकतात. चतुरंग

सुनील Wed, 01/23/2008 - 01:23
मग यातून अजून एक सूर निघाला की सचिनने हा पूरस्कार स्वीकारू नये कारण हा पूरस्कार ब्रिटिष संघराज्यातिल देशात राहणार्‍या लोकांसाठी आहे, म्हणून स्वतंत्र भारतात राहणार्‍या सचिनने तो स्विकारू नये ..... हा पुरस्कार केवळ ब्रिटिश संघराज्यातील देशात (तुम्हाला युनायटेड किंगडम म्हणायचे आहे असे मी गृहित धरतो) राहणार्‍यांसाठीच आहे असे नाही. हा पुरस्कार जगातील कोणत्याही व्यक्तीस दिला जातो. राष्टकूलातील (कॉमनवेल्थ) देशांतील नागरीक, हा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या नावापूर्वी (केवळ आडनावापूर्वी नव्हे), "सर" ही पदवी लावू शकतात. राष्ट्रकूलाबाहेरील नागरीक त्यांच्या संपूर्ण नावानंतर "O.B.E." अशी आद्याक्षरे लावू शकतात. OBE = Order of British Empire न्यू यॉर्कचे माजी महापौर रुडॉल्फ गिलियानी यानींदेखील हा पुरस्कार स्वीकारला आहे. सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. गेल्या कित्येक वर्षात हा पुरस्कार दिला गेला नव्हता तेव्हा अजून काही वर्षे तो न दिल्याने काही फरक पडणार नाही. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 01:58
सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. सहमत! यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. अगदी सहमत!!

In reply to by ऋषिकेश

अभिज्ञ Sun, 01/27/2008 - 15:43
मंला असे वाटते कि अडावाणी यानि जे काहि केले आहे ते अत्यन्त योग्य असेच आहे. अन्यथा कोन्ग्रेस्स ने त्यन्च्या मर्जिमधल्या कोनला तरि हा पूरस्कार दिला असता.

In reply to by सुनील

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:15
यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. नाहीतर काय! यालाच "म्हातारपणात चळ लागणे " असे म्हणतात!! अगोदरच आदर बाळगण्याजोग्या संस्था हळुहळु कमी होत चालल्या आहेत. अडवाणींकडुन यापेक्षा जास्त परिपक्वतेची अपेक्षा होती. आणि निघाले आहेत पंतप्रधान व्हायला!!! (संतप्त) पिवळा डांबिस

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:48
सचिनला हा मिळाला तर त्यात गैर किंवा कमीपणाचे काहीही नाही. - मी ही सहमत.. यापूर्वी कधीही भारतरत्न या पुरस्काराची अशी जाहीर चर्चा झाली नव्हती. अडवानी यांनी एक अत्यंत क्षूद्र असे राजकारणच केले असे माझे स्पष्ट मत आहे! त्याची कारणे काहीही असोत. खरंतर कोणत्याही राजकारणी (आजच्या) माणसाला हा पुरस्कार देऊ नये. त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे. - प्राजु

In reply to by प्राजु

छोटा डॉन Wed, 01/23/2008 - 20:43
"त्यापेक्षा तात्या म्हणतात तसे स्वर भासकारांना द्यावा. तेच अधिकारी आहेत याचे." आम्ही सुध्धा हेच म्हणतो ...... पण हा पूरस्कार जर "संगीतमार्तंड पंडीत जसराज " यांना मिळाला तर तात्या म्हणतात त्याप्रमाणे आमच्याकडे दिवाळी, ईद आणि ख्रिसमस असा तिहेरी आनंदोत्तसव साजरा होईल ...........

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 16:00
त्रिखंडात भारताचे झेंडे ऊंचावले आहेत? वाजपेयीचे जे काही कार्य आहे ते पक्षातीत वा निव्वळ देशासाठी नाही. केवळ सरकार पाडण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षनेते असतांना गोंधळ घालून त्यांनी संसदेचे किती तास फुकट घालवून भारताच्या सर्वजनिक पैशांची उधळपट्टी केली ते आठवा. तसेच अंमली पदार्थ ज्याच्याकडे सापडले म्हणजेच ज्याच्याविरूद्ध दखलपात्र गुन्हा दाखल आहे अशा मुलाबद्दल केवळ तो त्यांच्या पक्षाच्या राजकीय पुढा-याचा मुलगा म्हणून 'होते चूक कधी कधी' अशी टिप्पणी करणा-यांना मुळीच राष्ट्रीय पुरस्कार देऊं नये. पं. भीमसेनजीबद्दल मते योग्य आहेत. सर हा किताब ब्रिटिश सरकार देते. भारतीय नागरिकाला किताब देणारे ब्रिटिश कोण लागून गेले. हा किताब सचीनने स्वीकारणे हा त्या किताबाचा बहुमान होईल. परंतु आपल्या देशाच्या सर्वभौमत्वाला ते धरून होणार नाही. तसा किताब द्यायचा झाल्यास ब्रिटिश सरकारने भारत सरकारची परवानगी घेतली पाहिजे. परंतु स्वतःला श्रेष्ठ समजणारे ब्रिटिश परस्पर एखाद्या व्यक्तीला तो देतात. हे बरोबर नाही. भारत सरकारची रीतसर परवानगी जर ब्रिटिश सरकारने मागितली आणि आपल्या संसदेने जर ती दिली तरच सचीनने तो पुरस्कार घेणे योग्य होईल.

छोटा डॉन Tue, 01/29/2008 - 13:34
मिडियामध्ये व जनमानसात चललेल्या "भारतरत्न" पूरस्कारच्या चर्चेला सरकारने यावर्षी एकही "भारतरत्न " जाहीर न करून पूर्णविराम दिला आहे.... अंदाजे गेल्या ४-५ वर्षापासून हिंदूस्थानच्या जनतेला एकसुध्धा "भारतरत्न " सापडला नाही व यावर्षी सुध्धा ही प्रथा कायम राहिली याबद्दल अस्वस्थ वाटत आहे . खरच आजच्या काळात कोणीसुध्धा या पूरस्काराला लायक नाही का ही पूरस्कार देणारे सरकार योग्य व्यक्ती शोधायला नालायक ठरले ह्याची चर्चा होणे महत्वाचे आहे..... यानिमित्ताने याविषयाचा घेतलेला मागोवा तुम्ही "दैनिक सामनाच्या दि. २८ च्या अग्रलेखात " वाचू शकता ..... अस्वस्थ आणि नाराज [ छोटा डॉन ]

नव्या वर्षाच्या प्रारंभाबरोबरच काही नव्या गोष्टींची चर्चा सूरू होते. पण आज मला एका वेगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करू वाटते ती म्हणजे वेगवेगळे पूरस्कार, ते मिळवणार्‍या व्यक्ती, त्यांचे निकष, समाजावर त्यांचा प्रभाव व समाजाला त्यांच्यापासून मिळणारी प्रेरणा व होणारा फायदा......... गेल्या २-४ दिवसापासून "सचिन तेंडूलकरला" भविष्यात दिल्या जाणार्‍या "सर किंवा नाईटहूड" सन्मानाबद्दल मिडियात चर्चा चालू झाली आहे .... मग यात हा पूरस्कार मिळवणार्‍या ईतिहासातिल व्यक्ती, त्यांचे कर्तूत्व, समाजावर त्यांचा प्रभाव यासारख्या अनेक गोष्टींवर काथ्याकूट झाला.

तुकयाची अवली.. .. अवलोकन

प्राजु ·

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 06:40
प्राजू, 'आपण तुकारामांना सिद्धावस्थेपर्यंत नेण्यासाठी आवलीपासून दूर करतो आहोत, त्यामुळे आपल्याला शिव्या देण्याचा तिला आधिकार आहे' हे मान्य करणारा विठ्ठल मला या कादंबरीत भावला. क्या बात है! प्राजू, उत्तम परिक्षण केलं आहेस. छान, वेगळा विषय आहे. पुस्तक वाचलं पाहिजे! अवांतर - तुकोबा म्हटलं की प्रभातच्या 'संत तुकाराम' चित्रपटातील विष्णूपंत पागनीस आणि आवली म्हटलं की त्याच चित्रपटातील गौरी नांवाच्या अभिनेत्रीचा चेहेराच डोळ्यासमोर येतो, इतका मराठी रसिकांवर या चित्रपटाचा प्रभाव आहे! इतकेच काय, संत तुकारामाचे पूर्ण नांव काय होते या प्रश्नाचे उत्तर वर्गात एका मुलाने 'विष्णूपंत पागनीस' असे दिले होते अशी भाईकाकांनी एक आठवण सांगितली आहे! :) प्राजू, वरील परिक्षण वाचताना संत तुकाराम चित्रपटातील अभिनेत्री गौरी हीच आवली म्हणून माझ्या डोळ्यासमोर येत होती! विठोबाला काळतोंड्या म्हणणारी आणि कुण्या आई मंगळाईचे भक्तिभावाने नामस्मरण करणारी, साधीभोळी परंतु अत्यंत फटकळ, आणि नवर्‍याची सततची विठ्ठलभक्ति पाहून संतापणारी बायको, अशी आवलीची अत्यंत ठसठशीत भूमिका गौरीने उत्तम रितीने वठवली आहे हे इथे आवर्जून सांगावेसे वाटते! तात्या.

चतुरंग Tue, 01/22/2008 - 09:26
माझ्या पुढल्या भेटीत हे पुस्तक निदान चाळले तरी नक्कीच जाणार. आवलीचा विचारही कधी आपल्यामनात येत नाही, तुकारामांच्या समोर. पण हे खरं आहे की तिनं किती हाल सोसले असतील, काही गणतीच नाही. महापुरुषाची पत्नी म्हणजे काट्यांचं जिण! चतुरंग

स्वाती दिनेश Tue, 01/22/2008 - 12:29
प्राजु, परीक्षण छानच लिहिले आहेस,पुस्तक मिळून वाचण्यासाठी मात्र पुढच्या भारतभेटीपर्यंत थांबावे लागणार... स्वाती

प्राजु Tue, 01/22/2008 - 19:55
तात्या, चतुरंग, स्वाती, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मी तर सदर कादंबरी भारतातून मागवून घेतली. तुम्हाला तुमच्या भारत भेटीत ही कादंबरी वाचायला मिळो. कारण घरोघरी 'आवली' ही असतेच .. कधी तिचं भांडण नातेवाईकांशी असतं, कधी करिअरशी, कधी या समाजाशी... पण या ना त्या रूपांत आपल्याला आवली भेटतेच संसारासाठी झटणारी, मुलांसाठी तळमळणारी, नव-यासाठी झुरणारी... आणि म्हणूनच काल्पनिक असली तरी मला ही कादंबरी खूप भावली. - प्राजु.

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:41
प्राजु, तुझे या पुस्तकाचे परेक्षण फारच छान आहे. पुस्तक वाचायची उत्सुकता लागली आहे. जेव्हा भारतवारी होईल तेव्हा जरूर वाचेन. तुकारामांची आवडाबाई आम्ही फक्त "संत तुकाराम" सिनेमात पाहिली. ती कजाग, भांडखोर दाखवली आहे, पण त्याबरोबर आपल्या मुलांविषयी वाटणारे प्रेम.. ते उसाच्या प्रसंगातुन जाणवते.तुकाराम जेव्हा आपल्या मुलांसाठी ऊस आणतात, येताना ये वाटत वाटत येतात.. घरी येईपर्यंत एकच उरतो तेव्हा तिची ती वाक्ये लक्षात राहतात...

विनायक पाचलग Mon, 12/08/2008 - 11:14
तर आज १ वर्शाने या ठिकाणी एक नवी प्रतिक्रिया येत आहे . मी ११ वीत शिकतो.गेल्याच महिन्यात महाविद्यालयात ग्रन्थ्परिक्शण स्पर्धा झाली. मलाही हेच् पुस्तक मिळाले होते परिक्शणाला. खुप छान आहे. सदरचे परिक्शण छानच आहे यात वाद नाही. मात्र असे राहुन राहुन वाटते की हे परिक्शण नसुन ओळाख आहे. पुस्तकातिल भावनिक आन्दोलने,समाज,टाळलेल्या अन्ध्श्रध्दा इत्यादी अजुन लिहावयास हवे होते. असुदे पुस्तक मात्र चान्गले आहे . सम्पादकान्ची परवानगी अस्ल्यास मी माझे परिक्शण येथे देवु इच्छितो

शंकरराव Tue, 12/09/2008 - 03:04
असे वाट्ते देवा घरचे ज्ञात कुणाला विचित्र नेमानेम कुणी रखडति धुळीत आणिक कुणास लाभे हेम ...

रेवती Tue, 12/09/2008 - 04:35
तू म्हणतेस ते खरे आहे. प्रत्येक घरात एक आवली असते. आजकाल तुकाराम मात्र फारसं कुणी नसेल (सगळ्या अर्थी "तुकाराम") असं वाटतय. रेवती

राघव Tue, 12/09/2008 - 09:49
सुंदर ओळख! आवडली. आता वाचावे लागणार :) मलाही अवलीबद्दल अपार करुणा वाटते, पण वेगळ्या कारणासाठी.. तिलाही जर डोळसपणे विठ्ठलाची आराधना करता आली असती तर किती छान झाले असते!! तुकारामांसारख्या श्रेष्ठ साधकाची सोबत असतांना तर फक्त आनंद नांदला असता.. पण, मुलांची काळजी आईला कधीच सोडत नाही, भगवंतही आपल्या लेकरांची काळजी घेतोच की!!. त्यासाठी एवढ्या खस्ता खाऊन तिला संसारातच राहावे लागले. तिच्याशिवाय तुकारामांचे चरित्र अपूर्ण राहते ते याचमुळे. ती नसती तर?? यातच ती असण्याचे महत्त्व आहे. मुमुक्षु

लेखनप्रकार
मंडळी, १५ दिवसांपूर्वी पुण्यांत "तुकयाची आवली" या प्रा. सौ. मंजुश्री गोखले यांच्या मेहता प्रकाशन ने छापलेल्या कादंबरीचे औपचारिक प्रकाशन झाले. हि कादंबरी नुकतीच मला वाचायला मिळाली. आवलीवर आजपर्यन्त जे वाचले ऐकले होते त्यापेक्षा काय वेगळे आहे हे पाहण्यासाठि ही कादंबरी वाचायला घेतली. आणि खरं सांगते, ती वाचायला सुरूवात केल्यानंतर पूर्ण करूनच खाली ठेवली. झपाटल्या सारखी मी ती वाचली. त्याबद्दल थोडेसे.. लेखिकेची भूमिका : आवली , संत तुकाराम महाराजांची द्वितीय पत्नी, एवढि आणि फक्त एवढीच ओळख आहे आवलीची.

सॄष्टीची युक्ती

मीनल गद्रे. ·

प्राजु Tue, 01/22/2008 - 01:45
हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. हे खूप छान.. आवडले.. - प्राजु

धनंजय Tue, 01/22/2008 - 01:50
हा शब्द खास आवडला. अवांतर : पाऊस राजा थेंब आणि हिमपुष्पे एका दिवशी घेऊन येतो तर मला ते फारसे आवडत नाही. गारठ चिखल आणि घसरडे रस्ते - नाकी नऊ येतात!

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 20:05
हिमपाकळ्या हा शब्द लई भारी!!.. फार फार आवडला. .. पण अलगदल्या म्हणजे? का उलगडल्या म्हणायचंय? बाकी कविता आवडली. अजून येऊ देत -ऋषिकेश

छान कविता. मला वाटते 'अलगदल्या' हाच शब्द असावा आणि मला तोच जास्त आवडला. 'उलगडल्या' सुद्धा असेल, पण अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

चतुरंग Tue, 01/22/2008 - 21:54
कारण हिम सुरु झालं की हिमपाकळ्या (स्नोफ्लेक्स - चे भाषांतर असावे) अलगद, तरंगत - तरंगत खाली येऊन विसावतात. चपखल शब्द! चतुरंग

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:58
अलगदल्या म्हणजे हळूच अलगद खाली आल्या आणि विसावल्या... वा वा!!! बिपिनराव धन्यवाद. ही कल्पना विचारातच घेतली नव्हती. अलगदल्या!!! आता त्यामागची कल्पना कळल्यावर हा शब्दही खूप खूप आवडला :) -ऋषिकेश

मेघानी केली अवनीची पूजा कधी थेंबांनी आला पाऊस राजा हिमपाकळ्या अलगदल्या ताज्या अंगणी माझ्या तृणावरी विसावल्या. नवरस ,नव आल्हाद ताजा वाटे पूजेची मज मौजमजा मेघाची काय वर्णावी भक्ती कळेना अशी ही सॄष्टीची युक्ती.

आनंदयात्री..

प्राजु ·

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Tue, 01/22/2008 - 01:33
मलाही असेच वाटतेय... कविता सुरेख आहे. (काव्यप्रेमी) -इनोबा (शाहिर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीशी निगडीत "माझी मैना गावाकडं राह्यली" हे गाणे अथवा त्यासंबंधी आणखी माहिती कोणाकडे असल्यास कृपया संपर्क साधावा.)

ही कविता माझी नाही. कोणाची आहे ते ही नाही माहिति. मला आवडली म्हणून इथे देत आहे. अफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर-भरती पाचूंची लकेर कुरणाच्या ओठी प्रकाशाचा गर्भ जलवंती-पोटी अखंड नूतन मला ही धरित्री आनंदयात्री मी आनंदयात्री मेघांच्या उत्सवीं जाहलों उन्मन दवांत तीर्थांचे घेतलें दर्शन दूर क्षितिजाची निळी भुलावण पाशांविण मला ठेवी खिळवून अक्षयवीणाच घुमे माझ्या गात्री आनंदयात्री मी आनंदयात्री हलके कढून कंटक पायींचे स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे हासत दु:खाचा केला मी स्वीकार वर्षिलें चादंणें पिऊन अंधार प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं आनंदयात्री मी आनंदयात्री

प्राजक्त..

प्राजु ·

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 23:50
आम्ही स्वत: मोगर्‍याचे प्रेमी आहोत, परंतु हे प्राजक्ताबद्दलचे हे लेखनही आवडले! शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते वा! वा! अतिशय सुरेख लेखन...! प्राजू, तुझ्या मैत्रिणीपाशी मिपातर्फे कृतज्ञता व्यक्त कर! तात्या.

धनंजय Mon, 01/21/2008 - 23:51
माझ्या मनःचक्षूंसमोर माळलेल्या प्राजक्ताचे चित्र आहे. पण ताज्या फुलांचा, पडलेल्या फुलांचा रंग यांत फरक सुचवायला मिनल गद्रे यांनी वापरलेले रूपक फार आवडले.

प्राजक्त म्हटले की मला आठवतात माझ्या लहानपणीचे गणपतिचे दिवस... आम्ही मुले भल्या पहाटे उठायचो आणि फुले वेचायला जायचो. आमच्या जवळपास प्राजक्ताची झाडे भरपूर... सकाळी सकाळी नुसता सडा पडलेला असायचा आणि त्याचा तो विशिष्ट सुगंध सगळिकडे भरून गेलेला असायचा. पु.लं. नी जपान च्या प्रवासवर्णात चेरी ब्लॉसम बद्दल लिहिले आहे... (साकुरा).... पण प्राजक्ताचा सडा पण तसेच वेड लावतो. माहिती आवडली. तुमच्या मैत्रिणिला 'थँक्स' सांगा. बिपिन.

मुक्तसुनीत Tue, 01/22/2008 - 00:30
प्राजक्त म्हणजे पारिजातक असे मला अंधुकसे आठवते. हे खरे ना ? मुक्तकाव्यात्मक चिंतन आवडले. विशेषतः ही ओळ : "शेफ़ालिकेला आता हवं असो की नसो. तिच्या डहाळ्या रोज संध्याकाळी ह्या लालबुंद देठांच्या शुभ्र कांतिमान फ़ुलांनी सजत रहातात आणि उत्तररात्रीपासून त्यांची पखरण जमिनीवर ती करतच रहाते. " लेखिकेची काव्यात्म दृष्टी, त्यांचे या झाडावरचे प्रेम आणि कविमनास शोभून दिसेल असा मनस्वीपणा त्यातून मला दिसला. मीनल गद्रे यानी चेतनागुणोक्ति अलंकाराचा वापर करताना त्यांच्या उपमेयस्वरूपी मैत्रिणीला समोर आणले होते काय ? :-) (हलकेच घ्या !)

चतुरंग Tue, 01/22/2008 - 00:30
माझ्या बहिणीचं नावही प्राजक्ताच आहे त्यामुळे ह्या नावाशी माझं सहाजिकच जिव्हाळ्याचं नातं. इंजिनियरिंग च्या वेळी मी माझ्या मावशीकडे रहात असताना मी ज्या खोलीत झोपत असे त्याच्या बाहेर प्राजक्ताचं झाड होतं. हिवाळ्यातल्या पहाटे कितीतरी वेळा थंड वार्‍याची झुळूक आत येई ती प्राजक्ताचा सुगंध घेऊनच! मग मी बोचर्‍या थंडीत अंगणातल्या प्राजक्ताची फुले वेचून घ्यायला जायचा. (आत्ताही माझ्या अंगावर काटा आला!!) ह्या आठवणी किती खोलवर दडलेल्या असतात ना? पुन्हा एकदा ती प्राजक्तमय सफर घडवून आणल्याबद्द्ल तुला आणि तुझ्या मैत्रिणीला धन्यवाद! चतुरंग

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 00:37
प्राजू, तुल एक विनंती! तुझ्या मैत्रिणीला मोगर्‍यावरदेखील असंच काहितरी छानसं लिहायला सांग! आपला साला जाम जीव आहे मोगर्‍यावर! मोगरा तो मोगरा! साला काय सुरेख वास असतो! खल्लास... बघ बुवा तुझ्या मैत्रिणीला एकदा मोगर्‍यावर लिहिण्याची रिक्वेष्ट करून! आपला, (मोगराप्रेमी) तात्या.

स्वाती राजेश Tue, 01/22/2008 - 01:08
खूपच मस्त... ही गोष्ट फारच छान आहे. गोष्ट वाचता वाचता बालपण च्या आठवणी कधी जाग्या झाल्या कळलच नाही. ते पारिजाकताचे झाड.. फुले कोमेजु नयेत म्हणून अलगद वेचलेली फुले...

मीनल गद्रे. Tue, 01/22/2008 - 01:28
गैरसमज झाला आहे .ले़खिका मी नाही. ती माहिती tulipsintwiligh Blog मधे वाचायला मिळाली. आपली प्रामाणिक मीनल गद्रे.

ध्रुव Tue, 01/22/2008 - 14:42
महिती अत्यंत छान आहे, मिनलने तर प्रामाणिकपणे हेदेखील सांगीतले की लेखीका ती नाही. ते काहिही असो, माहिती ही कधीच वाया जात नाही. उलट माहिती असेल तर आपल्यालाच छान वाटते. आता मलाही कुठेही प्राजक्ताचे झाड दिसले की ही माहिती आठवणार. बाकी प्राजक्ताच्या झाडाबद्दल कुठल्यातरी कथेत वाचले होते. लेखक म्हणतो, मला मृत्युनंतर अग्नी देऊ नका, मला मातीत जाऊदे, मला जिथे पुराल तिथे प्राजक्ताचे झाड लावा. माझी आठवण कायम त्या फुलांच्या रुपाने कायम होऊदे आणि मला अमर होऊदे. बाकी या गोष्टीबद्दल संदर्भ/लेखक काही आठवत नाही पण ही लेखकाची इच्छा मात्र मनात घर करुन गेली. -- (प्राजक्ताच्या सुवासात रमणारा)ध्रुव

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 09:38
फुले हा वि स खांडेकरांचा लघुनिबंध आम्हाला एस एस सी (पास झालोय बरे का) ला होता. कवि प्रफुल्ल दत्त उर्फ द. वि. तेंडुलकर आम्हाला शिकवीत. हा लघुनिबंध त्यांनी इतका छान शिकविला की आम्ही लघुनिबंध याप्रकाराच्या प्रेमात पडलो आणि बरेच दिवस अभ्यास सोडुन लघुनिबंध वाचायच्या वेडात होतो. अनंत काणेकर, म ना अदवंत, वि स खांडेकर इ. च्या अनेक लघुनिबंधांनी आमचे आयुष्य सोनेरी केले. माझ्या आजोळी प्राजक्ताचे झाड होते. मी ३ री ४ थीत होतो व सुटीत आजोळी जात असे. फुले वेचून आणणे व हार बनविणे हे आमचे लहान मुलांचे काम असे. मला चांगले हार बनविता येत नसत व ते कामहि आवडत नसे. माझी मामेबहीण माझ्यापेक्षा फक्त ६ महिन्यांनी मोठी असलेली फार सुरेख बनवी. माझ्या वाट्याचेहि तीच बनवी. या मनोरम आठवणी जाग्या झाल्या. हल्ली ती फक्त लग्न इ. समारंभांतच भेटते. मग आम्ही त्या आठवणी पुन्हा जगतो. धन्यवाद. वरिल सदर हे गद्यकाव्य आहे. अशीच सदरे येऊद्यात. लघुनिबंध आला तरी चालेल.

माझी मैत्रिण मीनल गद्रे हिने पाठवलेली ही माहीती. आवडली म्हणून इथे देत आहे. शेफ़ालिका म्हणजे प्राजक्त. प्राजक्ताला आधी खूप दिवस फ़ुलं येत नव्हती. रंगरुपाने सामान्य असलेलं ते झाड बिचारं अबोल होऊन गुमसुम उभं असायचं. पानं काळवंडलेली उदास. वनातले इतर वॄक्ष फ़ुलांनी बहरुन गेलेले. देवानेच दया वाटून सांगितलं की, "बहरशील तु ही. पण फ़ुलांच हे लेणं मिळवायला तुला तपश्चर्या मात्र करावी लागेल. " प्राजक्ताने ती केली. दिवस-महिने-वर्ष उलटले. तपात रमून गेल्यावर फ़ुलांची असोशीचं फ़िकट झाली मनात.

मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो...

अविनाश ओगले ·

धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 22:05
वा वा वा वा पंत, अगदी झकास तिखट मिसळ दिलीत हो. वा वा. मजा आली. मिसळपावावर हार्दिक स्वागत. तुमच्या कविता गझला आणि विडंबने मिसळपावावर येऊ द्यात. रसिकजन आतुरले आहेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत लोकहो, आमचे परममित्र श्री. अविनाशपंत ओगले हे अत्यंत प्रतिभावान साहित्यिक आहेत. कविता, गझल विडंबने असे विविध लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांच्या गझलांची "पाऊस पहिला" ही सीडी प्रकाशित झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांचे "चषक माझा"हे विडंबनात्मक खंडकाव्य प्रसिध्द आहे. वाचनसंस्कृती रुजावी म्हणून जिवापाड कार्य करणारा हा माणूस आहे. पुस्तक हा त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यांची "वाच पुस्तके"ही गझल त्यांनी येथे प्रकाशित करावी. मराठी साहित्यशारदेची पालखी स्वत:च्या खांद्यावरून नेणार्‍या या प्रतिभावंताचे मिसळपाववर जोरदार स्वागत करूया. आपला, (स्वागतोत्सुक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 23:39
ओगलेसाहेब, हे सत्य असे की स्वप्न म्हणावे, भान हरपूनी जाई मिसळीवाचून जीवनास या अर्थच काही नाही ह्या चालत जाता वाटेवरूनी, स्वर्गच हाती येई मिस्सळ मी चापतो, तर्रीची, मिस्सळ मी चापतो... वा! सुंदर विडंबन! धोंडोपंत म्हणतात त्याप्रमाणे आम्ही आपले मिसळपाववर जोरदार स्वागत करतो. आपल्या हातून येथे उत्तमोत्तम लेखन घडावे हीच सदिच्छा! ... (मिसळपावपरायण) अविनाश ओगले, बेळगाव (महाराष्ट्र) चला! म्हणजे मिसळपावपुरता सीमाप्रश्न सुटला म्हणायचा! :) आपला, (बेळगाव आणि भीमण्णांच्या धारवाड डिष्ट्रीकचा प्रेमी!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

अविनाश ओगले Tue, 01/22/2008 - 20:39
विसोबा धन्यवाद... धारवाड परिसराबद्दल आम्हाला अतिशय प्रेम. आमची आई हुबळीची. बायकोचा जन्म धारवाडचा. शिवाय भिमण्णा आणि जी.ए. त्याशिवाय ते प्रसिद्ध धारवाडी पेढे... अहाहा

In reply to by अविनाश ओगले

केशवसुमार Tue, 01/22/2008 - 22:03
मिपा वर स्वागत, चला नवा विडंबनकार आला म्हणजे आता आम्ही हरी हरी करायला मोकळे..कसे.. ते धारवाडच पेढ्याच आठवण कशाला हो काढल.. ते मिश्रा ने पुन्यात दुकान काधून एकदम बेस करून सोडल..निदान परत आल्यावर ते अता धारवाडला जाव लागणार नाही बघा धारवाड आणि बेळगाव च आमच पण जूनं संबंध असत बघा.. केशवसुमार

चतुरंग Tue, 01/22/2008 - 00:10
अहो साक्षात पुलंच्या लाडक्या बेळगावास्नं डायरेक्ट एंट्री! झकास!! मि.पा.चा जन्म बाकी चांगल्या योगावर झाला असे दिसते, दिवसेंदिवस बाळसे धरत आहे! चतुरंग

धमाल मुलगा Tue, 01/22/2008 - 10:46
वा अविनाशराव, आधीच "राधा ही बावरी" आमच लाडक॑, त्यातून मिसळ हा प्रकार जिवलग अन् मि.पा. वर आता जीव जडलेला... सगळ॑च कस॑ छान जुळून आल॑य. एकदम फक्कड आहे तुमची "मिस्सळ मी चापतो" बाकी तुमच्या बेळगावात आमच्या पुल॑चे रावसाहेब अजूनही सापडतात का? -(मिसळवेडा) धमाल.

झकासराव Tue, 01/22/2008 - 11:02
आहे विडंबन :) आवडल आमच्या कोल्हापुरी मिसळीएवढं :) आपलाच झकासराव पाटिल कोल्हापुरकर :)

अविनाशराव, एका पेक्षा एक सरस गझला आम्हाला वाचायला मिळतील असे वाटतंय, आपल्या पुढील लेखनाला आमच्या भरघोस शुभेच्छा !!! अवांतर :- बेळगाव च्या माणसाला इथे भेटल्यावर खूप आनंद झाला, बेळगावच्या मराठी माणसाच्या वेदनाही कधीतरी इथे येऊ दे !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 21:47
मस्तीत दंग, तो लाल रंग, हा गंध कसा दरवळतो येताच वास, घेऊन ध्यास, हा पाय त्या दिशे वळतो.... वा वा अत्यंत नादमय विडंबन.. फार फार आवडले.. अति रुचकर!! अविनाशराव, हार्दिक स्वागत आता आम्हाला मिपा वर आपले उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळो हीच इच्छा!! बाकी बेळगाव (महाराष्ट्र) ही तर्री खासच!! -ऋषिकेश

नंदन Tue, 01/22/2008 - 21:51
मस्त जमलंय विडंबन. घामल धारा, उनाड कांदा...मस्तच :). 'वाच पुस्तके' ही गझल वाचायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

मित्रहो, कोल्हापूरी मिसळ हा आमचा फार `जिव्हा'ळ्याचा विषय. म्हणूनच आमचे परममित्र मा. धोंडोपंत यानी मिसळपाव या स्थळाची वाट दाखवताच आम्हाला विलक्षण आनंद झाला. कोल्हापूरातील विविध मिसळस्थळे आमच्या उत्तम परिचयाची. `येथे उत्तम मिसळ मिळेल' असा फलक असलेल्या हाटेलात मिसळ कधीच चांगली नसते... पण ज्या हाटेलावर नावाचा फलकसुद्धा नसतो, अशी उत्तम मिसळस्थळे केवळ वासावरून आम्ही हुडकत असतो.. परवा कधीतरी `राधा ही बावरी हरीची' हे गाणे मनात घोळत असताना आम्ही मिसळ चापत होतो... या दोन्हीची कधीतरी सरमिसळ झाली... आणि हे विडंबन जन्माला आले...

आंतर्जालावर प्रत-अधिकाराची मालकी कशी ठरावी? मालकाची ओळख काय? चोराची काय?

धनंजय ·

सुनील Mon, 01/21/2008 - 21:53
एकच व्यक्ती दोन विभिन्न संकेतस्थळांवर वेगवेगळ्या नावांनी वावरणे सहज शक्य आहे (किंबहुना, एकच व्यक्ती एकाच संकेतस्थळावरदेखील वेगवेगळ्या नावाने वावरते, हे वास्तव तूर्तास दूर ठेवू!). अशा वेळेस एक करता येईल, की, त्या व्यक्तीस पूर्वप्रसिद्धी असे डिस्क्लेमर देण्यास भाग पाडता येईल. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

इनोबा म्हणे Mon, 01/21/2008 - 22:06
सुन्याशी सहमत, या प्रकारे साहित्य प्रसिद्ध झाले असल्यास मानहानी टाळण्याकरीता लेखकाने स्वतःच ती काळजी घ्यायला हवी. प्रश्न असा आहे की जर ते साहित्य उचललेले असल्यास व नविन लेखकाने पुर्वीचा लेखक आपणच आहे असा दावा केल्यास,ते साहित्यचौर्य कसे ओळखावे? साहित्यचौर्य रोखण्याकरीता क्रिएटीव कॉमन्स या परवान्याचा उपयोग होईल का?

साहित्य चोरणे याला फार मोठी परंपरा आहे, असे वाटते. :) पण,असे प्रकार रोखण्यासाठी काय केले पाहिजे हा प्रश्न मात्र कठीणच आहे. टोपण नावाने लिहिणा-याने पुर्वप्रसिद्धीचा उल्लेख केला पाहिजे. पण,उचललेल्या लेखनाबाबत काही नियम आहेत, जसे संशोधनात आपण पुर्वसुरींच्या मताचा परामर्ष घेतो. पण, निव्वळ चालूगिरीच्या बाबतीत काय करु शकतो हे मात्र काही माहित नाही बॊ..........!!! उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर Tue, 01/22/2008 - 20:39
उदाहरणार्थ :- रौशनीच्या आंतरजालावरील लेखनाच्या प्रिन्ट काढून जर मी लेखक म्हणुन माझे नाव टाकले तर ? कायदा काय म्हणतो.........आणि त्याचा लेखक काय कार्यवाही करु शकतो त्याची माहिती कोणी देईल काय ? ओ बिरुटेशेठ, अहो माझी रौशनी अजून लिहून पूर्ण होऊ द्या की! मग ढापा अगदी जरूर!! :)) ( ह घ्या ) असो, माझ्यापुरतं बोलायचं तर आम्ही पडलो साला फकीर माणूस. आमचं लेखन कुणी ढापलं तर ढापू दे तिच्यायला! आमचं लेखन कुणी ढापलं आणि स्वत:चं म्हणून छापलं तर आमचं लेखन कुणाला ढापावंसं वाटण्याइतपत तरी बरं आहे, एवढंच आम्ही समाधान मानू! बाकी, खुदा सब देख रहा है. तात्या मिपात नाही, तात्या नाही मनोगती तात्या चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई! एवढं म्हणून आम्ही गप्प बसू... :) काय बिरुटेशेठ, खरं की नाही? आपलाच, तात्या.

सुधीर कांदळकर Sun, 01/27/2008 - 15:20
"हा चोरीचा माल आहे" असे लेबल नसते. तसेच सरपंच अथवा प्रशासक यांना अंतर्ज्ञान नाही. त्यामुळे ते प्रेषकाचेच आहे असे गृहीत धरणे क्रमप्राप्त आहे. सरपंचांनी प्रत्येक सदराबरोबर ते स्वतःचेच असल्याबद्दल प्रेषकाचे एक प्रतिज्ञापत्र घ्यावे. तरीहि चोरी झालीच तर मिपा त्याबद्दल जबाबदार राहणार नाही. चोरी आढळल्यास त्या सदस्यावर कायम बहिष्कार टाकावा. शक्य असल्यास कायदेशीर कार्यवाही करून पोलिसांचा ससेमिरा मागे लावून द्यावा.

हल्लीच मिसळपावावर काही सदस्यांच्या अशा लक्षात आले आहे की येथे प्रकाशित झालेले काही लेखन त्यांनी पूर्वी वाचलेले होते. (एक दुवा.) यावर सरपंचांनी धोरणाचे सूतोवाच केले. (सरपंचांचे धोरण) ते धोरण चोख असले, नैतिक असले, तरी त्याच्या अंमलबजावणीविषयी मनात प्रश्न उभा राहातो. मिसळपावकर क्षक्ष आणि मायबोलीकर यय दोघेही एकच असू शकतात ही कल्पना मनात चमकून गेली. आता त्यांच्या अन्य प्रतिसादांत दोघांची लेखनशैली एकच की वेगळी, वेगळी असल्यास तो प्रतिभेचा भाग आहे काय?

रौशनी.. ५

विसोबा खेचर ·

तात्या,
रौशनीचा ह्या भागात तुमच्या गप्पा चालू असतांना  आम्ही शेजारी उभे राहून हे सर्व ऐकतोय असे चित्र उभे राहिले. हा भागही अगदी ओघवता आणि अतिशय सुंदर झाला आहे. या भागात तिला असलेली गाण्याची आवड, तीची मुलगी आणि जाफरभाइच्या  बिर्यानीची याद राहील. हा भाग आवडला हे सांगने न लगे, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहेच !!!!

अवांतर :- लेखकाला गाण्याची आवड आहे, म्हणुन प्रसंगाच्या निमित्ताने गाण्याविषयी लेखक भरुभरुन लिहितो असे नाही ना ? 

तात्याच्या लेखनाचा फॅन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऋषिकेश Tue, 01/22/2008 - 07:43
तात्या, रौशनीचा ह्या भागात तुमच्या गप्पा चालू असतांना आम्ही शेजारी उभे राहून हे सर्व ऐकतोय असे चित्र उभे राहिले. हा भागही अगदी ओघवता आणि अतिशय सुंदर झाला आहे. हा भाग आवडला हे सांगने न लगे, पुढील भागात काय असेल याची उत्सुकता आहेच !!!! अगदी अस्सच!!! आता मात्र पुढला भाग लवकरात लवकर टाका बॉ :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

नंदन Tue, 01/22/2008 - 10:32
म्हणतो, तात्या. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे. [शिवाय, तुला सवड मिळेल तेव्हा 'शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई'चे पुढचे भागही लिही. त्याची सुरुवात फार छान झाली आहे.] नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 21:32
वा तात्या, पहिल्या चार भागांसारखा हा भागही उत्तम आहे. उत्कंठा शिगेला पोहोचलेय. ही रौशनी अजून काय काय गुपिते उघड करेल हा विचार करतांनाच हा भाग संपला. उत्कंठा अजून ताणली गेली. पुढील भाग आता लवकरात लवकर येऊदे. झकास लेखन झालाय. शुभेच्छा. आपला, (वाचक) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

चतुरंग Mon, 01/21/2008 - 21:37
इतकी थोडी-थोडी बिर्याणी वाढताय की अंमळ "अडजीभ खाऊन पडजीभ बोंबलली" असं वाटतयं हो! जरा जोरकस ताटभरुन येऊ द्या की राव! लिखाण बाकी फक्कड हों तुमचें:)!! चतुरंग

In reply to by चतुरंग

केशवसुमार Tue, 01/22/2008 - 14:16
अगदी हेच म्हणातो.. पुढचे भाग जरा भरभर लिहा नाहीतर कथा तरी भरभर पुठे पळवा..असे आशेला लावून ठेऊ नका.. हा ही भाग उत्तम हे सांगणे न लगे.. केशवसुमार

प्राजु Mon, 01/21/2008 - 22:57
अशा उत्कंठावर्धक ठिकाणी भाग संपवायचा आणि पुढचा भाग १ महिन्यानी लिहायचा.. तात्या शोभतं तुम्हाला हे. हा भाग ही इतर भागांप्रमाणे तरल झाला आहे. आता पुढच्या भागासाठी किती प्रतिक्षा करावी लागणार आहे हे देव आणि तात्याच जाणोत.. लवकरच यावा ही देवाला आणि तात्याना प्रार्थना.. (ह्.घ्या.) :))) - प्राजु

संजय अभ्यंकर Mon, 01/21/2008 - 23:03
तात्या, फारच सुंदर लेखन! मी लहानाचा मोठा मोरलँड रोड, नागपाडा भागात झालो. फोरास रोड, कामाठीपुरा, फॉकलंड रोड, चोर बाजार इ. भाग हा आमचा परिसर. आमची शाळेची वाटही ह्या भागातुन जात असे. आम्ही रात्री बेरात्री याभागात मिळणारे विविध खाद्य पदार्थ खाण्यासाठि फिरत असु. परंतु आम्हाला याचा (इथल्या घटना, नित्यक्रम यांचा)ताप नसे. फोरास रोड वरच्या बच्चुभाईच्या वाडीत शिग कबाब व पराठे खाण्यासाठी आम्ही तेथे फेरफटका मारायचो. मोहंमद अली रोड ते भायखळा हा भाग अपना एरिया, इतके त्याभागावर प्रेम. नागपाडा सोडताना अतिव दु:ख झाले. आमचे शाळामित्र ह्याच भागातले. गुन्हेगारी, स्मगलिंग, टोळियुद्धे हे आमच्या नित्य पहाण्यातले. परंतु आम्ही स्वतःला या प्रकारांपासुन अलिप्त ठेवले. हे सर्व प्रकार करणारे, स्थानीक लोकांना याचा उपद्रव होउ देत नसत. नागपाडा सोडल्याला आता आठ वषे झाली. आपली रोशनी वाचताना मी परत माझ्या भागात फिरतोय असे वाटते. संजय अभ्यंकर

प्रमोद देव Mon, 01/21/2008 - 23:06
सुरुवातीची नोमतोम संपून आता बड्या ख्यालाला सुरुवात झालेय. तात्या तब्येतीत होऊन जाऊ द्या. आम्ही मैफिलीत आहोतच... तुम्हाला दाद द्यायला. चांगला रंग भरा.

वरदा Tue, 01/22/2008 - 07:38
पुन्हा एकदा उत्कंठा ताणलेय्...तुमची लिहिण्याची स्टाईल एकदम मस्तंच्....

विसुनाना Tue, 01/22/2008 - 12:20
तात्या, रौशनी मस्त होते आहे. जरा लवकर लिहा बुवा. अवांतर - आता रामनाथबरोबर पळून गेलेली रौशनी त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरवाली कशी बनते ते वाचण्याची उत्सुकता आहे. 'निवडुंग' चित्रपटातली लालन सारंगची व्यक्तीरेखा (नाव आठवत नाही) काहीशी अशीच होती नाही का? परवाच दिलखुलास या 'मी मराठी' वाहिनीवरच्या कार्यक्रमात वेश्याव्यवसायावर उघड चर्चा झाली. त्यातल्या बर्‍याच वेश्यांची हीच कहाणी होती. त्या चर्चेत भाग घेणार्‍या एका समाजसेवकाचे (पुन्हा नाव आठवत नाही) म्हणणे मनात घुसून बसले आहे - "वेश्याव्यवसाय हा समाजाचा सेफ्टी व्हॉल्व आहे असे म्हणणारी माणसे करंटी आहेत. वेश्यांमुळे आपल्या आया-बहिणी सुरक्षित राहू शकतात म्हणून तो व्यवसाय चालू द्यावा असे मत असणार्‍यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या आया-बहीणी तिथे पाठवाव्यात आणि सामाजिक सुरक्षिततेला मोलाचा हातभार लावावा."- इति.

स्वाती दिनेश Tue, 01/22/2008 - 12:20
बर्‍याच प्रतिक्षेनंतर रौशनी आली परत, आता मात्र लवकर लिही पुढे,उत्सुकता जास्त ताणू नको बाबा,:)..असे इतरांसारखेच म्हणते. नेहमीप्रमाणेच हा भाग सुध्दा छान जमून आला आहे. स्वाती

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 09:43
प्रतिसाद देणार्‍या आणि न देणार्‍या (केसु ष्टाईल) सर्व वाचकांचे आभार... काही उत्तरे - बिरुटेशेठ, अवांतर :- लेखकाला गाण्याची आवड आहे, म्हणुन प्रसंगाच्या निमित्ताने गाण्याविषयी लेखक भरुभरुन लिहितो असे नाही ना ? हो, असे काहीसे आहे खरे! :) नंदनशेठ, [शिवाय, तुला सवड मिळेल तेव्हा 'शब्द आणि स्वर, वक्ता आणि गवई'चे पुढचे भागही लिही. त्याची सुरुवात फार छान झाली आहे.] हो, नक्की लिहीन... संजय अभ्यंकर नागपाडा सोडल्याला आता आठ वषे झाली. आपली रोशनी वाचताना मी परत माझ्या भागात फिरतोय असे वाटते. धन्यवाद संजयराव! विसूनाना, अवांतर - आता रामनाथबरोबर पळून गेलेली रौशनी त्याच्या व्यसनाधीनतेमुळे घरवाली कशी बनते ते वाचण्याची उत्सुकता आहे. हा शोध तुम्हाला केव्हा लागला? रौशनी रामनाथसोबत पळून गेलेली नव्हती, तसेच रामनाथ व्यसनाधीन होता असेही कधी मला रौशनीने सांगितले नाही! असो, विसूनाना तुम्ही एक काम करा. नाहीतरी तुम्ही वेगवेगळे शोध लावताच आहात तर आत्तापर्यंतच्या कथेनुसार रौशनीची पुढील कथा तुम्हीच लिहा तिच्यायला! ती वाचायला मी उत्सुक आहे. रौशनीची आत्तापर्यंतची कथा ही सत्यकथा आहे. त्यावर आधारीत काल्पनिक अंदाजच जर तुम्हाला बांधायचे असतील तर या पुढील कथा तुम्हीच पूर्ण करा. माझं काहीच म्हणणं नाही! च्यामारी मी तरी पुढे लिहिण्याचा त्रास कशाला घेऊ? ऑर्कुटवर देखील कुण्या महाभागाने रौशनीची कथा लिहिलेली आहे असे कुठेतरी वाचनात आले, त्याचेही कुणी दुवे दिल्यास मी आभारी राहीन. म्हणजे तो सद्गृहस्थ पुढे काय लिहितो हे वाचनास मी उत्सुक राहीन! असो, लोक रौशनीबद्दल पुढचे अंदाज बांधू लागले आहेत, विसूनानांसारखे छातीठोकपणे पुढचे दावे करू लागली आहेत, कुण्या महाभागाला ती ढापून ऑर्कुटवर आणाविशी वाटली हेच मी रौशनीचे यश समजतो..! असो, पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार... आपला, (खुद्द रौशनीला पाहिलेला मूळ लेखक!) तात्या.

स्वाती राजेश Sat, 01/26/2008 - 14:53
रोशनी चे पुढील भाग लवकरच टाका खूप उत्सुकता लागली आहे.. रोशनी चे पहिले सर्व भाग अप्रतिम लिहिले आहेत.. ते वाचत होते त्यामुळे प्रतिक्रियेस उशीर झाला. एवढ्या छान लेखकाला उशीरा प्रतिक्रिया दिल्याबद्द्ल क्षमस्व. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत...

सुधीर कांदळकर Mon, 01/28/2008 - 20:14
बार, इ. चित्रपट डोळ्यांसमोर उभे राहिले. खरे म्हणजे १ ते ५ भाग आतांच वाचले. अमिताची कहाणी हृदयद्रावक आहे. सत्याची दाहकता वर्णन करून सांगता येत नाही. आपण बरेच कणखर आहात. अमिताची कहाणी ऐकून मी तर कृष्णाचे काम त्वरित केले असते. निदान जीवतोड प्रयत्न केले असते. हल्लीच एक भाषांतरित कादंबरी वाचली. मूळ काश्मिरी कादंबरी. कश्मीर्मधील दहशतवादाच्या पार्श्वभूमीवरील. त्यात एका वेश्येसाठी एक मनस्वी तरूण आयुष्य कसे उधळतो ते आठवले. सुन्न झालो. पुढील भाग लवकर येऊ द्यात.

प्राजु Tue, 01/29/2008 - 02:27
अहो, रागावू नका. पण तुम्हीच लवकर लिहायला घ्या रोशनी. कारण, जितका तुम्ही वेळ कराल तितके अंदाज किंवा काल्पनिक कथा बांधल्या जातील. तुमची रोशनी.. तुमच्याच शब्दांत वाचायची आहे. कारण तुम्ही तिला पाहिली आहे. तिच्याशी गोष्टी केल्या आहेत तुम्ही. तिला तुमच्याइतके स्पष्ट आणि तरल कोण वर्णु शकेल? तेव्हा आता... लग जाईये काम पे! - प्राजु

झंप्या Tue, 01/29/2008 - 05:56
तात्या ये भाग कुछ जम्या नही! एखाद्या सिरियल प्रमाणे चिंगम सारखे हे भाग आता तू ताणत आहेस असे वाटत आहे. वर कुणीतरी म्हंटल्या प्रमाणे पुढच्या 'एपिसोड' मध्ये जरा जास्त बिर्याणी वाढ आता!!

तात्या.. आपल्या 'रौशनी' चा प्रत्येक अपूर्ण भाग कायम आम्हाला 'तडपाना ' म्हणजे काय याचा प्रत्यय देत आहे....कृपया पुढचे भाग लवकर लिहुन ही हूरहूर थांबवा... (तात्यांच्या लेखनाला दाद देणारा) डॅनी..... पुण्याचे पेशवे

आंबोळी Fri, 02/22/2008 - 10:32
तात्या मजा आणलीत राव..... एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली. पण किती दिवस नुसति बिर्याणीच खात बसलाय ...पुढचे भाग लवकर लिहा. (बिर्यणी चाहता) आम्बोळी

In reply to by आंबोळी

सन्जोप राव Sun, 03/16/2008 - 20:11
एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली हेच म्हणतो. बाबा कदम, सरकारी रेस्ट हाऊस, सोनेरी रंगाचे पेग, करुणेची झालर असणारी (लेकिन दिल की अच्छी!) अशी नायिका, वाफाळत्या बिर्याण्या, फिश फ्राय, शास्त्रीय संगीतातल्या उस्तादांचे उल्लेख.... मराठीत एकता कपूरसारखी निर्माती नाही याचे शल्य वाटते. The meek shall inherit the earth. Are you sufficiently meek? Ask yourself! सन्जोप राव

विसोबा खेचर Fri, 02/22/2008 - 12:41
स्वाती राजेश, सुधीरराव, प्राजू, झंप्या, मिराशीसाहेब, आंबोळी, आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.... पुढचा भाग लिहितो लवकरच. सध्या कामाच्या गडबडीत असल्यामुळे हवा तसा निवांतपणा मिळत नाही. थोडी सवड मिळाली की पुन्हा एकदा रौशनीच्या विश्वात जाईन.. तात्या.

सर्किट Sat, 03/08/2008 - 22:26
हा भाग वाचण्यात आलाच नव्हता. आज वाचला.. इतर काही वाचकांनी लेखमाला "हळू हळू पुढे सरकते आहे" असे अभिप्राय दिले आहेत. पण आम्ही त्यांच्याशी अजीबात सहमत नाही. - सर्किट

िव्कास०१५४ तात्या तो महाभाग सापडला......त्यानेच रौशनी ऑर्कुटवर copy-paste केली आहे http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=21132317&tid=2576143168354681902&na=4 त्याने तुम्ह्च्याच नावाने रौशनी ऑर्कुटवर copy-paste केली आहे ...... "रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही. http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=21132317&tid=2576143168354681902&na=2&nst=47 .......................................................................... आप्ला लेख्नाचा एक िनिस्सम चाह्ता.... िवकास िशदे....

In reply to by विकास्_मी मराठी

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 15:15
धन्यवाद साहेब! आपण मुद्दामून ऑर्कुटवर जाऊन रौशनीचा शोध घेतलात याचे खरंच कौतुक वाटते! "रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही. याचे आम्हाला लेखक म्हणून समाधान आहे. तो महाभाग साहित्यचोर नाही हे कळले आणि खूप खूप बरे वाटले. आता उलटपक्षी आम्ही त्याला रौशनीला त्याने स्वत:हून ऑर्कुटवर प्रसिद्धी दिल्याबद्दल त्याचे आभार मानतो! ऑर्कुटवरदेखील काही लोक रौशनी वाचत आहेत, तिच्या दुव्यांचा ट्रॅक ठेवीत आहेत, प्रतिसादही देत आहेत हे पाहून खरंच खूप बरे वाटले. प्रत्यक्षात आंतरजालीय जगताशी पूर्णत: अनभिज्ञ असलेल्या आमच्या रौशनीला, आज आंतरजालीय जगतात ओळख मिळते आहे याचे समाधान वाटते! आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद िव्कासराव! आपला, (रौशनीच्या आठवणीने किंचित ह़ळवा झालेला!) तात्या.

अभिज्ञ Sun, 03/16/2008 - 15:40
नमस्कार. तात्या, विकास राव ह्यानि दिलेलि लिंक पाहिलि.आपला त्यावर आलेला प्रतिसाद हि वाचला. परन्तु ,हि कथा मराठी विनोद --हसण्यातच मजा आहे अशा कम्युनिटिवर प्रसिद्द झालि आहे. आता या कथेत हसण्यासारखे काहिहि नाहि.उलट हि एक चान्गलि साहित्यकृति आहे. मिसळपाव वरिल लेख नुसते लिन्क देउनहि पाठवता आले असते. ते पेस्ट करण्याचे काय कारण?आणी ते पण कुठल्या ठिकाणि? हे प्रश्न राहतातच. (रोशनि प्रेमि)अबब

In reply to by अभिज्ञ

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 16:06
अबबराव, तुमचं म्हणणं खरं आहे. पण जाऊ द्या! काय करणार? अहो जिथे सार्‍या जगानेच आमच्या रौशनीचं हसं केलं त्याला ऑर्कुट तरी कसं अपवाद असणार?! तेव्हा चालायचंच! तात्या.

नन्दु Sun, 03/16/2008 - 20:29
तात्या लवकर पुडचा भाग येऊ द्या मी रोशनि ओर्कुत वेर प्रथम वाचलि अनि त्या खना पासुन तुम्चा फ्यान झालो "रौशनी" या कथेचे मूळ लेखक - तात्या अभ्यंकर. हे आहेत मी फक्त misalpav.com वरुण coppy पेस्ट केली आहे. मी या कथेचा लेखक नाही. हेय वाचुन मग मिसल् पाव ल भेट दिलि अनि हेय क्य इथे अलो व इथ् लाच झालो मिसल पव चि पहिलि ओल्ख रोशनी मुले झालि माझि तर तात्या लवकर पुड्चा भाग लिहा

हर्शल Sun, 03/16/2008 - 20:36

इसम Sun, 03/16/2008 - 21:09
तात्या मजा आणलीत राव..... एकदम बाबा कदमान्ची आठवण झाली. काय चुकतंय तात्या? उत्साहाच्या भरात अतिरन्जित लिखाण होतेय का? शब्द्संपत्ति तोकडी पडतेय की नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का? मग पिटातून शिट्ट्या का ऐकू येतायत? -एक इसम

In reply to by इसम

विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 22:57
काय चुकतंय तात्या? माझ्या मते काहीच चुकत नाहीये! उत्साहाच्या भरात अतिरन्जित लिखाण होतेय का? नाही. जे काही लेखन आहे ते केवळ अन् केवळ सत्य घटनेवर आधारीत आहे. सत्य घटनेवर आधारीत, जे घडलं तसं लिहिलं आहे, ते जर कुणाला अतिरंजित वाटलं तर वास्तव किती भयानक असेल याची कल्पना करा! असो, स्वत:च्या ए सी दिवाणखान्यात बसून अतिरंजित लेखन किंवा बाबा कदमांची कांदंबरी वाटते आहे असे शेरे मारणे हे मी समजू शकतो! अहो ज्यांनी कधी रंडीबाजारात नौकरी तर सोडाच, परंतु साधी चक्करही मारली नाही, दारूच्या गुत्त्यावर काम केले नाही, त्या सुशिक्षित, उच्चशिक्षित पांढरपेशी वर्गाला या लेखनाबद्दल काय वाटेल, कसं वाटेल हे मी कसं सांगू? शब्द्संपत्ति तोकडी पडतेय की नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? शब्दसंपत्तीची काहीच गरज नाही. कारण जे आहे जसं आहे, जसं घडलं, ते घडताना मला जे वाटलं तेच मी माझ्या शब्दात मांडलं आहे. शब्दसंपत्तीची गरज कल्पित साहित्य लिहिणार्‍याला लागते! नको त्या ठिकाणी नको ती वर्णने येतायत? मुळीच नाही. कारण सगळी वर्णनं ही सत्य घटनेनुसारच लिहिली आहेत आणि ती सत्यकथा जशी समोर आली तशीच लिहिली आहेत! प्रश्न आहे तो मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे असंही काही घडू शकतं हे समजण्याच्या कुवतीचा! क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का? असं मला वाटत नाही. मूळ गाभ्याकडे कुठे दुर्लक्ष झाले आहे असं आपल्याला वाटतंय? मुळात आपल्याला मूळ गाभा काय आहे तो माहित्ये का? मग पिटातून शिट्ट्या का ऐकू येतायत? ते कृपया पिटातल्या माणसांना विचारा! मी ते कसं काय सांगू शकणार? असो, आपण आपुलकीने काही प्रश्न विचारल्याबद्दल मी आपला आभारी आहे! आपला, (मुंबईच्या रंडीबाजारात नौकरी केलेला!) तात्या.

आंबोळी Mon, 03/17/2008 - 10:34
मला तात्यान्ची आणि बाबा कदमान्ची अजिबात तुलना करावयाचि नव्हती .. दोघेही स्वतन्त्र प्रतिभा आसलेले लेखकु आहेत असा आमचा दावा आहे... फक्त ही कथा वाचुन बाबान्ची आठवण होण्यापलिकडे आम्हाला काहीही सुचवायचे नव्हते. असो. क्रमश: च्या नादात मूळ गाभ्या कडे दुर्लक्ष झालेय का? एक वाचक म्हणुन आम्हाला तसे वाटत नाही.... पण दुसर्या कुठल्यातरी कामात गुन्तून पडून कथा पुर्ण करण्याकडे दुर्लक्श होत आहे असा आमचा आरोप आहे. (दावेदार) आम्बोळी

सन्दीप Tue, 04/01/2008 - 11:50
तात्या उत्कन्था शिगेला पोहचवुन अर्ध्यवर का बरे सोदलेत आम्हला. पुधचा भाग लवकर येउन्दे. (आसुसलेला) सन्दीप

शैलेन्द्र Wed, 06/18/2008 - 13:46
तात्या, तुम्ही आमचा मामा केलात हो...., पुढ्च्या महीन्याची वर्गणी नाहि भरणार मी...

यशोधरा Wed, 06/18/2008 - 14:33
आला, आला ५ वा भाग आला!! वाचते मग शांतपणे.. :) अजुनही क्रमशः आहेच का? लवकर लवकर टाका.

रामदास Wed, 06/18/2008 - 22:04
सौ गज दिखाते हो दो गज फाडते हो. तहान भागत नाही हो चारच घोटात. जे जसे आहे तसेच सादर करण्याच्या शैलीमुळे रंगतदार झाले आहे. ( प्रतीक्षेत) रामदास

In reply to by नि३

विसोबा खेचर Fri, 08/15/2008 - 22:59
गांधीसाहेब, आपल्या उत्सुकतेबद्दल अन् आपुलकीबद्दल धन्यवाद, परंतु रौशनी आम्ही दिवाळीत प्रसिद्ध करू. एकंदरीत लोकांच्या प्रतिसादावरून रौशनी हे लेखन चांगले असून लोकांना आवडते आहे असे दिसते. मिपाचा दिवाळी अंक नसल्यामुळे दिवाळीतदेखील लोकांना काही चांगले वाचायला मिळावे या हेतूने रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे! ;) इतके दिवस थांबलात, कृपया अजून काही दिवस थांबावे ही विनंती! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टुकुल गुरुवार, 10/09/2008 - 04:44
काय तात्या, किती शोधल पुढच्या भागांना आणि शेवटि प्रतिसाद वाचायला घेतले.. चला ठिक आहे, दिवाळीत का होइना पण येवुद्यात तुमच्या लेखनाचा पंखा :-) टुकुल.

स्नेहश्री गुरुवार, 10/09/2008 - 17:35
भाग तर फारच छान आहेच...... पण अरे परत तोच शब्द........."क्रमशः".......आता ह्या शब्दाने मी बेजार झाले आहे......!!!! ~X( @) अरे नविन भाग कधी ????????? --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 10/09/2008 - 22:42
तात्याराव, आता फिरून मागे पहाणे नाही."निर्मितीने" आपला चार्ज घेतलेला आहे.लिहिणार नाही म्हटलंत तरी ती तसं करू देणार नाही. "रौशनीचा "आणि आपल्या जवळ असलेल्या "संगीता" चं अगदी जवळच नातं आहे. 'लेकर सुहाने सपनो की कलिया आके बसा दे पलको की गलिया पलको की छोटीसी गलियन मे निंदिया आजा री आ जा' "संगीता" आणि "रौशनी"आपल्या आता थारा देणार नाही. म्हणून म्हणतो, "प्रत्येक फुलाने अपुल्या परि उमलावे सुगंध देवून सर्वा उल्हासित करावे गुलाब जाई जुई आणि मोगरा घाणेरी लाजेरी कण्हेरी आणि धत्तूरा नाविन्य असते प्रत्येक कृतिचे निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com

अनिल हटेला Fri, 10/10/2008 - 12:16
वाह !! क्या बात है !!! तात्या , घ्या वेळ आम्ही वाट बघु पूढच्या भागाची !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आंबोळी Sun, 04/12/2009 - 21:28
रौशनीचे अंतीम भाग आम्ही दिवाळीतच प्रसिद्ध करायचे ठरवले आहे! तात्या, दिवाळी गेली, शिमगा गेला, ३१ मार्च संपला .... आता ईस्टर पण झाला...... कधी पुर्ण करताय रौशनी? आंबोळी

In reply to by विसोबा खेचर

खालिद Fri, 07/03/2009 - 09:49
काय तात्यांनु तुमी बी ह्ये रीशेशन संपायच्या वायद्यापरमाने वायदे करुन र्‍हायला की राव!! १५ दिवसात संपेल १ महिन्यात संपेल!!! (रीशेशन ग्रस्त) खालिद

छान लिखान्...अधाश्यासारखे वाचुन काढलेत सगळे भाग....या लेखाचे पुढचे भाग प्रकाशीत झाले आहेत का ??? नसल्यास तात्यासाहेबाना विनन्ति कि त्वरित पुर्ण करावे..

II विकास II Sun, 03/14/2010 - 22:08
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, असे एका बातमीच्या वाहीनीवर सांगत आहेत. तोपर्यंत कराल तर बरे आहे.

जेनी... गुरुवार, 01/10/2013 - 05:25
ओह्ह माय गॉड ! झपाटल्यासारखे सगळे भाग वाचले . तात्या रौशनी ला तुमच्या विश्वातुन आमच्या पर्यंत पोचवल्याबद्दल खुप खुप आभार फक्त तिला अर्धवट ठेवु नका . कळकळीची विनंती .

In reply to by प्यारे१

मोदक Tue, 03/19/2013 - 22:32
हल्ली पाकृंव्यतिरिक्त कशातही नावीन्य दिसत नाही. फिरुन फिरुन त्याच चौकात...! अल्जेरियाच्या प्रवासवर्णनाची वाट पहात आहे...

In reply to by मोदक

प्यारे१ Tue, 03/19/2013 - 22:36
पोटासाठी आलोय राजा! मी काय फिरायला आलोय काय? काढू दे थोडे दिवस. तसं असतं तर मुक्तपीठावर नसता टाकला लेख? ;) तात्याच्या रोशनीवर आपले कारनामे नकोत. भेट तिकडे. ख व मध्ये. ;)

3

मधुशाला - अर्थ आणि संदर्भ

धनंजय ·

विसोबा खेचर Mon, 01/21/2008 - 18:48
धन्याशेठ, खुद्द बच्चनसाहेबांनी याची काही कडवी गायली आहेत, ती इथे ऐका.. मधुशालेतील काही कडवी मलाही खूप आवडतात. जसे, एक बरस में एक बार ही जगती होली की ज्वाला एक बार ही लगती बाजी जलती दीपों की माला दुनियावाले किन्तु किसी दिन आ मदिरालय में देखो दिन को होली, रात दिवाली रोज मनाती मधुशाला! क्या बात है..:) अर्थात, ही कविता नक्की कुठल्या संदर्भात लिहिली गेली आहे हे जाणून घ्यायला मीही उत्सुक आहे. मला वाटतं, धोंड्याशेठ या विषयावर अधिक काही प्रकाश टाकू शकतील. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा बर्‍यापैकी अभ्यास आहे मधुशालेचा. असो! धन्याशेठ, इतका सुंदर विषय मिपावर चर्चेला आणल्याबद्दल मी तुझे अभिनंदन करतो... आपला, (मधुशालाप्रेमी) तात्या.

नंदन Mon, 01/21/2008 - 18:51
गूगलून येथे, येथे आणि येथे तुरळक माहिती मिळाली. पहिल्या पत्नीचे (श्यामा) निधन झाल्याने आलेली विमनस्कता ही या कवितेमागची प्रेरणा असावी. तसेच तिसर्‍या दुव्यात म्हटल्याप्रमाणे, एकाच रुपकाचा वेगवेगळ्या कडव्यांत वेगवेगळा उपयोग करून घेतलेला दिसतो आहे. बाकी, याबाबत काही विशेष माहिती नाही. तात्याने म्हटल्याप्रमाणे, धोंडोपंतांसारख्या जाणकारांकडून या कवितेबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

धोंडोपंत Mon, 01/21/2008 - 21:52
मधुशाला इथे आणल्याबद्दल धन्यवाद. नंदनरावांनी व्यक्त केलेल्या विचारांशी आम्ही सहमत आहोत. श्यामाजींच्या मृत्यूनंतर अत्यंत खिन्न अवस्थेत असलेल्या हरिवंशरायजींकडून हे "महाकाव्य"लिहून झाले. स्वातंत्र्यलढ्याशी याचा संबंध काय? मधुशालेचा थेट संबंध उमर ख़य्यामशी जोडला जातो. आम्हाला स्वत:ला ते पटत नाही. उमर ख़य्याम ही मधुशालेमागची प्रेरणा असू शकेल, पण प्रतिभा ही हरिवंशरायजींचीच आहे. ही उमर ख़य्यामच्या रूबाईयांची नक्कल नव्हे. केवळ हाला, प्याला, डाला, साक़िबाला, वाला, आणि मधुशाला एवढ्या यमकांवर जे भावविश्व हरिवंशरायजींनी उभे केले ते अजब आहे. त्यांच्या प्रतिभेला आमचा दंडवत. यदि इन अधरोंसे दो बातें प्रेमभरी करती हाला; यदि इन सूने हाथोंका जी पलभर बहलाता प्याला; हानि बता जग तेरी क्या है? व्यर्थ मुझे बदनाम न कर, मेरे टुटे दिल का है बस एक खिलौना मधुशाला.... आपला, (प्रभावित) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

धनंजय Wed, 01/23/2008 - 05:19
ज्वाला, छाला, माला, ताला, काला... अशी यमकेही आहेत :-) पण तरीही त्या थोड्यांच यमकांची मर्यादा न होता पुरेपूर अर्थ छलकतो.

In reply to by मुक्तसुनीत

धनंजय Wed, 01/23/2008 - 05:26
ती तुरळक थोडी कडवी सोडलीत तर भारतमातेचा, स्वातंत्र्यलढ्याचा संदर्भ लागत नाही. कवीच्या तल्लीनतेचा देशभक्ती म्हणून अर्थ लावून पुष्कळ कडवी वाचता येतात, पण तो अर्थ ओढल्या-ताणल्यासारखा भासतो. आता १९३५ मध्ये उल्लेख छुपेच असणार असे कोणी म्हटल्यास त्याला काय उत्तर द्यावे? तरी श्यामा यांच्या निधनामुळे झालेला शोक ही स्फूर्ती असल्याचा उल्लेख हाच अधिक सयुक्तिक वाटतो.

धनंजय Wed, 01/23/2008 - 05:13
मेंहदी रंजित मृदुल हथेली पर माणिक मधु का प्याला, अंगूरी अवगुंठन डाले स्वर्ण वर्ण साकीबाला, पाग बैंजनी, जामा नीला डाट डटे पीनेवाले, इन्द्रधनुष से होड़ लगाती आज रंगीली मधुशाला।।१२। येथे तिसर्‍या ओळीचा अर्थ काय? पाग : ?मिठाईचा प्रकार? जामा : ?वस्त्र? (साकीबालेचे?) डाट : बूच (सुरईचे बूच)? इंद्रधनुषी विविधरंग कळण्यासाठी या वस्तू आणि त्यांचे रंग कळणे आवश्यक वाटते. अवांतर : आताच्या बारगर्ल्स सोडा, पण १९३५ काळात (पाश्चिमात्य न झालेले) हिंदुस्थानी जात त्या गुत्त्यांत मुली वेटरकाम करत काय? गोव्यातील बारमध्ये पूर्वी केवळ पुरुष वेटर असत. की ही मधुशाला कोठ्याचे चित्रण आहे (रूपकात्मक, उपमास्वरूप, काही असो), असे मानावे?

In reply to by धनंजय

चतुरंग Wed, 01/23/2008 - 09:32
पाग = फेटा/डोक्यावरील वस्त्र बैंजनी = जांभळा जामा = साकीबालेचे वस्त्र डाट = बूच डटे = जमकर ता (तांबडा = मेंदी) -ना (नारिंगी = ?) पि (पिवळा = स्वर्ण वर्ण) हि (हिरवा = अंगूर) -नि (निळा = वस्त्र) -आ (आकाशी = ?) जा (जांभळा = फेटा) मेंदी रंगित नाजुक हाती घेउन तो प्याला सोमरसा त्या पुरवितसे ती स्वर्ण वर्ण बाला नील-जांबु त्या वसनांसंगे वारुणि 'तो प्याला' सप्तरंगही फिकेच पडतिल आज रंगण्या मधूशाला चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश Fri, 01/25/2008 - 00:32
मेंदी रंगित नाजुक हाती घेउन तो प्याला सोमरसा त्या पुरवितसे ती स्वर्ण वर्ण बाला नील-जांबु त्या वसनांसंगे वारुणि 'तो प्याला' सप्तरंगही फिकेच पडतिल आज रंगण्या मधूशाला वाह क्या बात है चतुरंगराव! आवडलं -ऋषिकेश

धनंजय Fri, 01/25/2008 - 00:44
म्हणजे तसे विभाग नाहीत. पण असे दिसते की एका-एका विशाल रूपकाची छोटी छोटी रूपके करून सांगणार्‍या रुबाया एकत्रित केलेल्या आहेत. त्यामुळे एक रूपक काही रुबायांसाठी समर्पक दिसते, मग पुढच्या काही रुबायांत रूपक बदलत जाताना आपल्याला दिसते. इतकेच काय, पूर्वार्धातील रूपकांत मधुशाला ही चांगल्या अशा कुठल्या-कुठल्या ध्येयाचे, ध्यासाचे, नैसर्गिक कल्पनेचे रूपक आहे. उत्तरार्धात मधुशाला नाशिवंत सौख्य देणारी फसवी आहे, अशी रूपके आहेत. त्यामुळे प्रत्येक रुबाई स्वतंत्र असली तरी क्रमाला काही अर्थ आहे, त्या क्रमात वाचल्याने काव्याची काही अधिक अनुभूती होते. येथे जरी मी कल्पनेने "विभाग" पाडत असलो, तरी कल्पना एकातून पुढची खुलत जाते - विभागांच्या मध्ये स्पष्ट सरहद्दी नाहीत... --- १.ते ५. (माझ्या मते प्रास्ताविक रुबाया) मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला, प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला, पहले भोग लगा लूँ तेरा फिर प्रसाद जग पाएगा, सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१। ... मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला, भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला, उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ, अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।।५। या पाच रुबायांत मधुशाला हे कवीच्या काव्यासाठीच रूपक म्हणून योजले आहे. पण प्रथम वाचकाला पिलवणारा साकी कवी आहे, तर शेवटी काव्यमय हाला पिलवणारा आणि पीणारा खुद्द कवीच आहे. श्रोत्याला काव्य सुनवता-सुनवता कवीच अंतर्मुख होतो. या प्रकारे या प्रास्ताविकातून या कल्पनेने पुढच्या आत्मचिंतनात्मक/तत्त्वबोधी रुबायांच्या उंबरठ्यावर बच्चन आपल्याला आणून सोडतात.

प्राजु Fri, 01/25/2008 - 00:45
चतुरंग राव, आपण संपूर्ण मधुशाला का नाही अनुवाद करत..? कराल का? आवडेल आम्हाला. - प्राजु.

चतुरंग Fri, 01/25/2008 - 01:08
हे भलतं अवघडच च्यालेंज टाकलत की हो समोर. अहो डॉ. बच्चन साहेब कुठे आम्ही कुठे? ...पण तरीही हरकत नाही.....पुलंच्या भिकंभट काकांसारखे मी ही म्हणेन "राजहंसाचे चालणे, असेल देखणे.. पण म्हणोन ह्या भिकंभटाने चालोचि नयें ऽऽ कांय!!" असो, ह्यात काही प्रगती करु शकलो तर मि.पा.वर लिहीनच. चतुरंग

धनंजय Sat, 01/26/2008 - 02:14
रुबाया ६ ते १० (हरवलेल्या, इच्छुक मतवाल्याने मधुशालेपर्यंत कसे पोचावे) मदिरालय जाने को घर से चलता है पीनेवला, 'किस पथ से जाऊँ?' असमंजस में है वह भोलाभाला, अलग-अलग पथ बतलाते सब पर मैं यह बतलाता हूँ - 'राह पकड़ तू एक चला चल, पा जाएगा मधुशाला।'। ६। ... सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला, सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला, बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है, चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।।१०। मागच्या विभागात मधुशाला हे काव्याचे रूपक होते. येथे ते गंतव्य ठिकाणाचे रूपक आहे. तिथे पोचायची इच्छा असली तरी जाणार्‍याला रस्ता ठाऊक नाही. "चालायला लाग, आपोआप पोचशील", असा कृतीशील संदेश वेगवेगळ्या प्रकारे या पाच कडव्यांत बच्चन देतात. यात शेवटच्या कडव्यात कानांना मधुशालेतली रुणझुण आणि कलकल, छलछल ऐकू येते आहे. यातून पुढच्या विभागाच्या उंबरठ्यावर पोचतो, जिथे पोचल्यानंतर मधुशालेच्या दृश्य, श्राव्य अनुभवांचे वर्णन आहे.

हल्लीच मधुर जाफरी यांच्या पुस्तकात एक वाक्य वाचून आश्चर्य वाटले. (एका हिंदी शिक्षकाबद्दल) "मला वाचनाचे प्रेम आहे हे जाणून, त्याने मला आमच्या अभ्यासक्रमाच्या अगदी बाहेरील हिंदी कादंबर्‍या आणि कविता वाचायचे सुचवले, ... जशी आमच्या स्वातंत्र्यलढ्याविषयीची हरिवंश राय बच्चनांची कविता, मधुशाला." (पुस्तक नाव : क्लाइंबिंग द मँगो ट्रीज़, २००५) "मधुशाला" ही हरिवंश राय बच्चनांची कविता मी पूर्ण कधीच वाचलेली नाही. पण काही थोडी कडवी मन्ना दे यांनी चाल लावून म्हटली आहेत ती ऐकलेली आहेत - तीही शब्दांच्या अर्थाकडे लक्ष न देता त्या मस्त ओघात गुंग होऊन डुबल्यासारखे, आणखी काही नाही.