मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कुणी मत देता का मत?

विसोबा खेचर ·

प्राजु 26/01/2008 - 20:41
आहे ही. एस्.एम्.एस. मुळेच तर गायक .. नव्हे महागायक तयार होतात. आणि कित्येक तपं साधना करणारे मूर्ख ठरून "जोश" इ. घराण्यात काही महिने शिकून महागायक ही पदवीही भूषवितात. घराणी फक्त जयपूर, ग्वाल्हेर, किराना , आग्रा ... ही सामान्य लोकांसाठी आहेत. महागायकांची वेगळी असतात. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये. - प्राजु.

धनंजय 26/01/2008 - 21:08
यात तळमळ आहे. हे विडंबन नसून नवी कृती शोभते. पण तरी एक प्रश्न विचारतो - कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे.

In reply to by धनंजय

विसोबा खेचर 27/01/2008 - 11:02
धन्याशेठ, कलाकाराला टाळ्या/वाहावा ची गरज पूर्वीही नव्हती का? हे एसेमेस म्हणजे त्याचाच प्रकार नाही काय? मुळीच नाही! माझ्या मते टाळ्या, वाहवा वेगळ्या आणि समस वेगळे! समस मागवण्यात पैशांचे राजकारण फार मोठ्या प्रमाणावर आहे! टाळ्या किंवा वाहवा याबद्दल कलाकाराला कुणाकडे भीक मागावी लागत नाही. टाळी ही उत्स्फूर्तपणे वाजवली जाते, वाहवा ही हृदयापासून नकळत उमटते!समसच्या बाबतीत, 'माझे गाणे आवडले असेल तर मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो' अशी जशी भीक मागितली जाते तशी टाळ्यावाहवांच्या बाबतीत मागितली जात नाही! कलाकाराचे काम म्हणजे प्रामाणिकपणे अधिकाधिक उत्तम रितीने आपली कला सादर करणे हे आणि एवढेच होय!लोकांकडे समस मागणे, टाळ्या-वाहवा मागणे हे कलाकाराचं काम नव्हे/असू नये! सवंग टाळ्या-जमवू कलाकार, नव्या माध्यमात वावरून जुन्या, तप केलेल्या गायकांवर लोकप्रियतेत विजय मिळवतात, असे पूर्वीही झालेले आहे. याचे उत्तर तुझ्या वरील वाक्यातच दडलेले आहे. टाळ्या-जमवू (हल्लीच्या युगात समस-जमवू!) कलाकारांच्या बाबतीत तूच सवंग हा शब्द वापरला आहेस! सो, यू सेड इट! "हमिदाबाई" हे पात्र या विषयाला हात घालते - रेकॉर्डिंग आणि सिनेमागाण्यांचा पाणचट रतीब घालत पोरकट गायक-गायिकांनी बाजारपेठ काबीज केली, आणि आभिजात संगीत आळवणारी हमिदाबाईची कोठी ओस पडली. हे तर मागच्या (च्या मागच्या) पिढीत झाले. पण शेवटी असेच होते की जे नवीन तंत्रज्ञानातले "महागायक" असतात, ते फोल ठरतात, पाचोळ्यासारखे उडून जातात, आणि खरे कलाकार नवे माध्यमही काबीज करतात. अगदी खरे आहे! परंतु लोकांकडून, तेही खास करून गायन स्पर्धेकरता समस मागवणे, ज्यात पैशांचे मोठे राजकारण आहे, तसेच समस पद्धतीत मोठे मॅन्युप्युलेशनही होऊ शकते, या प्रकाराला 'नवे तंत्रज्ञान' हा शब्द वापरणे हे मला अत्यंत चुकीचे, दिशाभूल करणारे, तसेच हास्यास्पदही वाटते! गाण्याची स्पर्धा असेल तर त्याबाबत निकाल देण्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींकडेच असावा असे माझे मत आहे. शेवटी मायबाप रसिक ही आम जनताच असते, तेव्हा कुणाला दाद द्यायची, कुणाला नाही, कुणाला डोक्यावर घेऊन नाचायचे, कुणाला नाही, हे जनताच ठरवते हे मलाही मान्य, परंतु as far as spardhaa is concerned, त्या बाबतीत मात्र निकालाचे सर्वाधिकार फक्त आणि फक्त तज्ञ मंडळींच्या पॅनलकडेच असावेत. सध्याची समस पद्धती ही कलेला घातक तर आहेच, शिवाय खरोखरंच गुणी आणि लायक स्पर्धक कलाकाराच्या हिताच्या दृष्टीनेही घातक आहे असे माझे मत आहे... हमिदाबाई बेजान डब्यात आवाज बंदिस्त करणार्‍या कलाकारांना तुच्छ लेखते. पण रेकॉर्डिंग हे माध्यम भिमसेन वगैरे श्रेष्ठ कलाकारांनी जिंकले आहे. बेजान डब्यात आवाज भरला म्हणून त्यांना तुच्छ लेखायची कोणाला छाती होऊ नये. एसेमेसची नवलाई संपून खरी स्पर्धा या माध्यमांत येईल तेव्हा उत्तम कलाकार टीव्ही वाहिन्या हे माध्यमही जिंकून दाखवतील. खुद्द नटसम्राटातही त्या महान कलाकारावर, काळ बदलता, थेटराच्या बाहेर उष्टे खायची वेळ येते. पण ते हृदयद्रावक सत्य मानले, तरी त्या नवीन नाट्यसृष्टीत पुढे उत्तम कलाकार निपजले हेही नकारता येत नाही. माझ्या मते स्पर्धेकरता आम जनतेकडून समस मागवून केवळ अन केवळ पैशांचे राजकारण करून समस मागवणे आणि 'ध्वनिमुद्रण-तंत्रज्ञान' या दोन्ही गोष्टी पूर्णत: भिन्न आहेत. या दोन गोष्टींचा आपापसात दुरान्वयेही संबंध नाही. सबब, माझ्या मते वरील दाखला सदर चर्चेसंदर्भात अत्यंत गैरलागू व चुकीचा आहे! हे अवांतर विचार, बरे का... तुमची कविता/नाट्यमय गद्य आवडले, हे आधीच सांगितले आहे. धन्यवाद धन्याशेठ! तुझ्यासारख्या चोखंदळ समिक्षकाने आणि प्रतिभावंताने माझ्या प्रकटनाला क्षणभर का होईना परंतु 'कविता' असे म्हटले, आपल्या प्रतिसादाचे शीर्षक 'शिरवाडकरांना अप्रूप वाटेल' असे ठेवले, हे पाहून काव्यातले फारसे काही न कळणार्‍या माझ्यासारख्या माणसाला लाजेने गोरेगुलाबी अन चूरचूर व्ह्यायला झाले आहे! आज रविवार दुपारचे जेवण अंमळ दोन घास जास्तच जाऊन माझ्या अंगावर संध्याकाळपर्यंत मूठभर मास अधिक चढणार एवढे मात्र खरे! :) आपला, (नवा नवा कवी!) तात्या :))

तात्या, सर्वप्रथम कविता या प्रांतात आपल्या प्रवेशाचे कवींच्या वतीने प्रातेनिधीक स्वरुपात आम्ही आपले स्वागत करतो. :) ( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) मुक्तछंदातील कवितेच्या आशयाच्या संदर्भात डॊ. धनजय यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विसोबा खेचर 27/01/2008 - 11:16
( इथे शाल, श्रीफळ आणि एक फुलांचा गुच्छ दिला असे चित्र डोळ्यासमोर आणावे ) वा वा! आपल्या शाल आणि श्रीफळामुळे मी भारावून गेलो आहे! धन्यवाद शेठ...:) काही काही गायक खरेच छान गातात. पण, ज्या पद्धतीने ते एस.एम.एस ने मते मागतात, ते दृष्य पाहवत नाही. यू सेड इट, मला अगदी हेच म्हणायचे आहे! दुसरा मुद्दा म्हणजे समस पद्धत! स्पर्धा जरूर असाव्यात, परंतु सर्वात लायक आणि पात्र स्पर्धक हा समस पद्धतीने ठरवला जाऊ नये, तर त्याचा अधिकार हा फक्त तज्ञ मंडळींनाच असावा! हल्लीची समस पद्धत म्हणजे केवळ मोबाईल कंपन्यांचे आणि वाहिन्यांचे लाखो कऱोडो रुपये कमवायचे एक माध्यम झाले आहे, चरायचे कुरण झाले आहे! आणि या सगळ्या गदारोळात खरोखरंच एखाद्या गुणी स्पर्धक कलाकारावर अन्याय होऊ नये, तसेच लाखो-हजारोंमध्ये परमेश्वर एखाद्यालाच थोर गायककलेचे दान देऊन सन्मानित करतो अश्या व्यक्तिने, "माझा कोड अबक आहे, मला प्लीज प्लीज प्लीज समस करा हो" अशी लाचारी करणे मला अत्यंत चुकीचे, संतापजनक, लज्जास्पद, आणि घृणास्पद वाटते म्हणूनच केवळ वरील प्रकटनवजा कविता! असो...! आपला, (कुणाकडेही कधीही 'समस' करता हात न पसरलेल्या भीमण्णा-बाबूजींचा एकलव्य शिष्य!) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे 27/01/2008 - 11:42
तात्यांची कविता आवडली आणि त्यांचे विचारही.... समस पद्धती चालू झाल्यामुळे,कलाकार लोक भिकार्‍यासारखे वागू लागले आहेत.समस पद्धतीने खरेतर चांगला व गुणी कलाकार येण्याऐवजी नको तेच निवडून येतात कारण सर्वात जास्त समस अमूक अमूक विजेत्याला मिळाले('सर्वात चांगला भिकारी'म्हणा हवे तर). मध्यंतरी हिंदी वॉईस ऑफ इंडीया मधे आसामच्या देबोजीतला भांडून भांडून विजय मिळाला,असला विजय काय कामाचा? आणि असले कलाकार तरी काय कामाचे? यांना कलाकार तरी कसे म्हणायचे? मराठीतील हास्यसम्राट मधेही असाच किस्सा घडला होता.या कलाकाराने आपला (समस पद्धतीने) पराजय होणार हे आधीच हेरले होते जणू,म्हणूनच अंतीम फेरीपुर्वीच्या कार्यक्रमात त्याने एक किस्सा ऐकवला तो असा.... एका कुस्तीच्या लढती दरम्यान एक नावाजलेला पैलवान जिंकणार जिंकणार असे वाटत असताना एका किरकोळ वाळक्या बांबू एवढ्या पैलवानाकडून चित होतो. आश्चर्याने एक दर्शक त्याला कारण विचारतो तेव्हा तो सांगतो,"मी जिंकणारच होतो,पण मला समस कमी पडले हो!". कालाय तस्मै नमः-दूसरे काय? (हताश) -इनोबा

धोंडोपंत 27/01/2008 - 12:18
वा तात्यासाहेब, आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. आयुष्यभर संगीतसाधना करूनही अत्यंत महान कलाकार आजच्या जमान्यात पडद्याआड गेले आहेत.(काळाच्या नव्हे.) आणि दोन चार अनुकरणे करणारे इंडियन आयडॉल आणि काय काय म्हणून मिरवून घेत आहेत. या परिस्थितीवर आपले भाष्य अत्यंत चांगले झाले आहे. मुक्तछंदातील अजून लेखन आपणाकडून अपेक्षित आहे. आपला, (उतावळा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

In reply to by धोंडोपंत

ऋषिकेश 27/01/2008 - 20:39
आपले मुक्तछंदातील प्रकटन आवडले. तुम्ही वेदना उत्कृष्टपणे मांडली आहे. अभिनंदन. असेच म्हणतो. रचना आवडली आणि व्यथा भिडली -ऋषिकेश

कवितेचा प्रकार वगैरे काही माहिती नाही पण वाचताना मजा आली. आमच्या भाषेत जी मनाला आनंद देते ती कविता उत्तम.

सहज 27/01/2008 - 18:24
तात्या तुम्हाला संगीत/गायन आवडते पण हे ऐसेमेस मतदान प्रकरण नाही पण म्हणुन कविता हा प्रांत तुमचा नसला (असे तुम्ही म्हणता) तरी एक कविता निर्माण झाली हे तर छान झाले ना :-) शिवाय असो कलाप्रेमी तात्याला हा ऐसेमेस प्रकार आवडत नसेल पण शेयरसम्राट तात्याला मोबाइल कंपन्यांच्या समभागातून त्या त्रासाची नुकसान भरपाई (थोडी का होईना) होतीय ना? ;-) अहो चालायचेच!!!

तात्यांच्या वरिल कवितेत व विवेचनात म्हटल्याप्रमाणे हा उद्वेगजनक प्रकार बदलायला हवाय. अंतिम विजेता हा तज्ञांच्या निर्णयावर ठरविला जावा. ह्या एस्.एम्.एस. पद्धतीत काही गैरप्रकार घडतात उ.दा., स्पर्धा सुरु असताना एस्.टि.डि. बूथ अडवून, सारखे स.म.स. पाठवणे (त्यासाठी माणसे नेमुन त्यांना त्या कामाचे पैसे देणे इ.). तसेच, गावात घरोघरि जाउन, स्पर्धकाचे माता-पिता, काका-मामा, आजी-आजोबा स.म.स. चा जोगवा मागतात. माझ्या माहितितल्या एका स्पर्धकाच्या संबंधितांनी ह्या साठी अमाप पैसे खर्चले होते. आपल्या पाल्याला सहज सोप्या जीवनाची सवय लावल्यावर, त्याला यशही सहज सोपे हवे असते. पालकही ते मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. शालेय जीवनात, मार्कांसाठी जसे विद्यार्थ्यास घासावे लागते, तेव्हडेच संगीतात (किंबहुना सर्वच क्षेत्रात उच्च गुणवत्तेसाठी) घासावे लागते, हे पालकांनी मुलांवर बिंबवणे आवश्यक आहे. स.म.स. बद्दल बोलायचे, तर, मोबईल कंपन्यांच्या आश्रयाशिवाय, तो सेटचा झगमगाट, परिक्षकांची फी, स्पर्धकांची झगमगीत प्रावरणे कोठुन येणार? आणि स्पर्धा आयोजक पैसे कोठुन कमावणार? संजय अभ्यंकर

केशवसुमार 27/01/2008 - 23:23
तुझी तळमळ समजते आहे.. पण तू म्हणतोस त्या स्पर्धा नसून तो एक मोबाईल कंपन्याचा मार्केटींगचा भाग आहे..पाश्चिमात्य देशातून उचललेले खूळ आहे कोणाला ही कला , कलाकार यांच्याशी मतलब नाही.. ना भाग घेणार्‍याला.. ना त्या परिक्षकाला.. ना त्या प्रयोजकाला..सब से बडा रुपया.. हेच खर बाबा.. उगाच त्रास करून घेऊ नको.. हे कर्यक्रम सुरु झाले की तो इडियट बॉक्स सरळ बंद करत जा.. आवांतर : तात्या, मुक्तछंदात चांगलं लिहिता तुम्ही. उगाच पद्याच्या नावने खडे का फोडता.. लिहा ना अशीच आणखी मुक्तछंदात काव्ये... प्राजुशी एकदम सहमत आहे..

सुनील 28/01/2008 - 07:30
तात्या, कविता आवडली. मुक्तछांदाचा फॉर्म छान जमलाय. समसमध्ये मोबाईल कंपन्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. ते केवळ गाण्याच्या कार्यक्रमाताच नव्हे तर "करोडपती" सारख्या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमातदेखील जाणवून येत होते. मागे ठाण्यातच एका व्य्क्तीला आपल्या पत्नीलाच अश्लील समस पाठवला म्हणून अटक झाली तेव्हा हेही उघडकीस आले की, कार्यक्रमातील व्यक्तीच अनेक सीमकार्डे वितरीत करून आपल्याला अधिक समस येतील याची व्यवस्था करते! पण, ह्या तरुण, नवोदित कलाकारांना समसचा जोगवा मागावासा वाटला तर ते समजून घेता येईल. कारण शेवटी त्या स्पर्धेत जिंकणे ही त्यांचे अंतीम धेय नसते तर त्यांच्या करीयरची ती सुरुवात असते! आणि त्यासाठी जाणकारांच्या नजरेसमोर येणे जरूरीचे असते. आजच्या कित्येक बुजूर्ग नटांनी आपल्या करीयरचा सुरुवातीचा काळ नामवंत स्टुडियोबाहेरील फूटपाथवर घुटमळत घालवला आहे, तोही त्याच कारणासाठी! अर्थात समसपेक्षाही नामवंत परीक्षकांनी दिलेल्या निकालावर स्पर्धेचे विजेते ठरवावेत हे मान्य होण्यासारखे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मुक्तछंदात काही ओळी लिवायचा आमचा एक प्रयत्न! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? खरं सांगतो बाबांनो, गायक आता लाचार झाला आहे! झी, सोनी, आणि स्टारप्लस आणि कुणी कुणी त्याला लाचार केला आहे...! कुणी मत देता का मत? एका गायकाला कुणी मत देता का मत? कुणी सांगितलं की कलाकार एखादाच असतो, अभिमानी असतो? कुणी सांगितलं की त्याचं फक्त कलेशीच इमान असतं म्हणून? खरं सांगतो बाबांनो, गायक आताशा एस एम एस मुळेच लहानमोठा ठरतो! कुणी सांगितलं की एस एम एस मुळे वाहिन्यांना लाख्खो रुपये मिळतात? कुणी सांगितलं की संगीतकला ही वाहिन्यांच्या दारातली एक बाजारबसवी रांड झाली आहे म्हणून? तसं काही नाही बाबा

विडंबनः चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी

अविनाश ओगले ·

विसोबा खेचर 26/01/2008 - 14:10
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी क्या बात है ओगले साहेब! मस्तच... "करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी ही ओळ जाम आवडली...:) चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... विडंबन असूनही हृदयाला हात घालणारा वास्तवदर्शी शेवट! वा वा... ओगले साहेब, ख ल्ला स वि डं ब न! आणि प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... आपल्यासारखे, केशवासारखे उत्तम विडंबनकार मिपावर आहेत याचा मिपाला अभिमान वाटतो!... अजूनही येऊ द्या... केशवा, भातुकलीतील राजाराणीवर तुझ्याकडूनही येऊ देत काही ओळी! आम्ही वाट पाहात आहोत. घाई नाही, टेक युवर ओन टाईम.. आपला, (भातुकलीतला राजा) तात्या.

नंदन 26/01/2008 - 17:04
शेवटचे कडवे विशेष आवडले. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विडंबन जबराच आहे, चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी...!!! किती सुंदर !!!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धनंजय 26/01/2008 - 21:14
मला वाटते की विडंबनात वास्तवाला भिडणारे काहीतरी असले (इथल्यासारखे) तरच ते इतके आवडू शकते - "वाहवा" चे "आहाहा" होऊ शकते.

प्राजु 26/01/2008 - 21:32
नवेच होते लग्न आणखी खेळ नवा तो सारा परि तेथल्या खिडकीमधूनी मुळी न येई वारा झोप न येई, डास चावती, नव्हती मच्छरदाणी या ओळीतून खरंच चाळीतले चित्र उभे रहिले. चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... एकदम छान.. आवडली. - प्राजु

तळीराम 26/01/2008 - 22:08
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे? राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी महिन्यामधले दिवस भासती सर्व सारखेची त्या राजाला फक्त काळजी, एक तारखेची "करा उधारी चुकती सारी" कालच वदला वाणी आमचे अशाच एका चाळीत करपलेले तारुण्य आठवले... विनोद चांगला, पण साला डोळ्यातून पाणीच आलं एकदम.

इनोबा म्हणे 27/01/2008 - 00:56
ओगले साहेब तुमचे हे विडंबनही आम्ही यापुर्वीच ऑर्कुटवर वाचले आहे,बाकी हे विडंबन अगदी झकास जमले आहे. आम्ही तुमची बरीचशी विडंबने वाचलेली आहेत बहूधा,तरीही मिपावासीयांकरिता अशीच आणखी काही येऊ द्या. (राणीचा राजा) -इनोबा

बेसनलाडू 27/01/2008 - 07:23
विडंबन फार आवडले. बरेच दिवसांनी असे चांगले विडंबन वाचनात आले. आणखी येऊ द्यात. (आस्वादक)बेसनलाडू

धोंडोपंत 27/01/2008 - 14:47
पंत, विडंबन झकास. अप्रतिम झालाय. त्याला असलेली कारूण्याची झालर काळजात रुतली. बहोत बढिया | आपला, (संतुष्ट) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धमाल मुलगा 28/01/2008 - 18:03
त्या राजाचा पगार थोडा त्यात कसे भागावे? राणीनेही समजून सारे काहीच ना मागावे संध्याकाळी कुठे न फीरती, खिशात नसती नाणी... वाईट्ट हो! टचकन डोळ्यात पाणी आल॑. साला माझे जुने - उमेदवारीचे ( लाज वाटते ना "बेकारीचे / बेरोजगारीचे" म्हणायला, बाकी हा उमेदवारी शब्द भारदस्त वाटतो) दिवस आठवले. मी अन् माझी ती...तिच॑ शिक्षण चालू अन् आमच॑ पाकिट सदा उताण॑ ! ते॑व्हा नाही जाणवल॑ पण किती समजुतदार ती, कधी काही मागितल॑ नाही की हट्ट नाही....साला आता पैसा आहे तर ते गुलाबी दिवस कुठे गायब झालेत कोण जाणे. बर्‍याचदा तर एकच चहा दोघा॑त...जाऊदे, माझी कसली ला॑बड लाऊन बसलो मी. छ्या: लै वाईट ल्हिता राव तुमी...भर हापिसात बापयगड्याच्या डोळ्यातून पाणी काढताना कसला हो आन॑द मानता? च्यायला, उगाचच मी साहित्यिक दु:खी झालोय..ते काळजात कालवाकालव इ.इ. अविनाशराव, सलाम तुम्हाला अन् तुमच्या ह्या चाळीमधल्या... ला. (कधीतरी हळवा होणारा) धमाल.

चतुरंग 28/01/2008 - 21:42
खिशात ५००रु. आणि ४००रु. चा आहेर करायचाय कारण जवळच्याचं लग्न (ही 'जवळची' माणसं खरंच किती 'लांबची' निघाली ते नंतर कळतं - पण आपण काही करु शकत नाही - गरीब लोकांना चॉइस नसतो!) १००रु.यात पुढचे पंधरा दिवस?? डोळ्यापुढे काहीच नाही! त्या कठिण दिवसात बायकोने जी साथ दिली त्याला तोड नाही! मी आयुष्यभरासाठी तिचा ऋणी आहे!! गोड बोलून कामं करुन घेणारे जवळचे नातेवाईकच निघाले! त्यानंतर लौकिकार्थाने सगळेच यश मिळत गेलं तेव्हा आता तेच लोक लाळघोटेपणा करत येतात तेव्हा कीव येते. असो. जुन्या खपल्या काढल्या गेल्यामुळे डोळ्यात आलेलं पाणी पुसून पुढे जाऊयात! सुंदर काव्य अविनाशराव. (ह्याला विडंबन म्हणणे म्हणजे त्या काव्याची विटंबना आहे! दुसरा शब्द सुचवतोय "विरुपिणी" - जाणकारांनी मत द्यावे). आणि पुरस्काराबद्द्ल अभिनंदनही! चतुरंग

झकासराव 29/01/2008 - 00:00
क्या बात है. हसवता हसवता डोळ्यात चटकन पाणी आणलत की हो. जबरा आहे तुमची लेखणी.

अघळ पघळ 30/01/2008 - 08:41
मागे एकदा हेच विडंबन 'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' असे ऐकले होते. ते पण असेच मार्मिक आणि छान होते. आपणच रचले होते का?

In reply to by अघळ पघळ

सुनील 30/01/2008 - 09:00
'डोंबीवलीच्या चाळी मधली राजा आणिक राणी' हे विडंबन प्रसाद शिरगावकर यांचे आहे (ते मायबोली आणि मनोगतावर कार्यरत असतात). तेदेखील अविनाशरावांच्या विडंबनाइतकेच उत्तम आहे! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दीपा॑जली 30/01/2008 - 11:45
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... मस्त जमलय.

वडापाव 30/01/2008 - 17:52
मलाही कविता करायला फार आवडते. पण मी अशी मस्त विडंबने तर काय, साधं विडंबन सुध्दा नाही करू शकत. कुटुंं्ब रंगलंय काव्यात, ही कविता मी कधी ऐकली नाही, पण तरीही मला हे विडंबन खूपच आवडलं. आपण आपल्या ह्या कविता व विडंबने www.blogger.com वर देखील प्रकाशित करू शकता. जर आधीपासूनच तेथे असाल, तर उत्तमच. तुमच्या बरोबर मैत्री करण्यास खूप उत्सूक आहे मी. आपला नम्र, किन्गके

In reply to by वडापाव

तळीराम 30/01/2008 - 20:49
कुटुंब रंगलंय काव्यात हा श्री. विसुभाऊ बापट सादर करत असलेला कार्यक्रम आहे. ते स्वतः कवी नाहीत. पण प्रसिद्ध कवींच्या अप्रसिद्ध कविता आणि अप्रसिद्ध कवींच्या गुणवान कविता या कार्यक्रमात असतात. एकदा हा कार्यक्रम मी पाहीला होता.

मनिष 31/01/2008 - 13:35
चाळीचाळीमधुनी असती असंख्य राजाराणी सुरावाचूनी तालावाचूनी गुदमरलेली गाणी डोळ्यामधूनी अन ओघळती स्वप्ने केविलवाणी... काय बोलावे??? मुळ गाण्याइतकेच सुरेख!!!

भातुकलीच्या खेळामधली... या कवितेचे विडंबन (प्रा. विसुभाऊ बापट यांच्या "कुटुंब रंगलंय काव्यात" या कार्यक्रमाच्या १००१व्या प्रयोगानिमित्त आयोजित विडंबन स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त विडंबन...

संथ चालते मालिका ही...

अविनाश ओगले ·

विसोबा खेचर 26/01/2008 - 14:15
वा ओगलेसाहेब, अत्यंत सुरेख आणि मार्मिक विडंबन.. दूरचित्रवाणीवरील कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या एकापेक्षा एक फालतू मालिकांना आपण अगदी झकास हाणले आहे! साला, वाचून मौज वाटली! आपला, (टीव्हीवरील मालिका पाहणे हा स्वत:च्या रसिकतेचा अपमान आहे असं समजणारा) तात्या.

तळीराम 26/01/2008 - 22:13
साले तुमी काय भारी मानसं जमला मिसळपाव खायला? मी आपला कालपासून हिकडेच हाय. ते स्साला जेवणखाणचा पण शुद्ध नाय राहीला.. ते मूळ कविता आनि तुमचा आभिप्राय दोनी लै भारी... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... हे मस्त...

इनोबा म्हणे 27/01/2008 - 00:50
ओगले... तुमचे हे विडंबन आम्ही फार पुर्वी ऑर्कुटवर वाचले आहे, तुमच्या नावाने की कुणा तिर्‍हाईताच्या नावाने हे आठवत नाही. (आम्हालाही आवडत नाहीत मालिका)-इनोबा

नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई............... >>>>> अहाहा....अगदी तंतोतंत्.....मस्तच..... अवंतिका नावाच्या एका अतिलांब्लचक मालिकेत ती अभिनेत्री घर सोडून दुसर्या सोसायटीत राहायला जाते आणि त्या सोसायटीमधील *( मुख्य गोष्टीशी संपूर्णपणे असंबंधित)बाळे,तरूण म्हातारे कोतारे, यांचे प्रश्न / समस्या पाहत राहायच्या आपण... :)

ऋषिकेश 03/02/2008 - 00:46
सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... हा हा हा हे सगळ्यात आवडले

छान केले आहे. मालिका जरी २ महिन्यांनी पाहिली तरी काही बिघडत नाही ती आहे तिथे च असते. १० वर्षे झाली तरी कोणतेही पात्र चेज( वयात) होत नाही. केसाला कोणते तेल वापरतात? क्रिम कोणती वापरतात? हे विचारले पाहिजे..:))))))))))))))))

In reply to by स्वाती राजेश

अविनाश ओगले 03/02/2008 - 21:42
''प्रेक्षकांचा बिन'डोक'पणा'' नावाचे तेल केसाना चोपडल्याने व टीआरपी नावाचे 'क्रीम' चेहर्‍याला फासल्याने ही पात्रे तरुण रहात असावीत.

संथ चालते मालिका ही... 'पात्रे' बदलून का होईना पण बारमाही वाहणा-या सर्व मराठी मालिकांना अर्पण.. (संथ वाहणा-या कृष्णामाईची क्षमा मागून..) संथ चालते मालिका ही... दर्शक देती दीर्घ जांभया, जाणीव तिजला नाही! कथानकाचा थांग न लागे पुढे तीळभर, गहूभर मागे 'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई.. संथ चालते मालिका ही... नसे कुणी का तिला नियंता कंटाळून करी प्रश्न ही जनता नदीस फुटावे नाले, ओहळ, तशी 'वाहवत' जाई.. संथ चालते मालिका ही... सूना, सासवा, आजी, नाती मालिकांचे च्युईंगम खाती सरला रस अन उरला चोथा, तरी थुंकवत नाही... संथ चालते मालिका ही... -अविनाश ओगले

बोधकथा

पिवळा डांबिस ·

इनोबा म्हणे 26/01/2008 - 11:27
वाह!खरे आहे. मन शांत ठेवायचे तर असले प्रयोग करायला हरकत नाही. पण फक्त शिव्याशापापुरते... आपल्याला कोणी हात लावल्यावर मात्र हा विचार डोक्यात येत नाही,त्यावेळी डोक्यात असते ते फक्त आपला हात आणि मारणार्‍याचे थोबाड. भगवान गौतम बुद्धांनी सांगीतलेले एक वाक्य आठवते;ते म्हणाले होते "स्वतःला जिंकणारा हा विश्वविजेत्यापेक्षा मोठा विजेता असतो". (बुद्धं शरणं गच्छामी) -इनोबा

विसोबा खेचर 26/01/2008 - 11:37
मला याचा स्वानुभव आलेला आहे म्हणून हे मी सर्वांसाठी शेअर करीत आहे. थोडे दिवस उपयोग करुन पहा व मला तुमचा अनुभव कळवा. शाब्बास रे माझ्या गौतमा! :) पाहू पाहू, आम्हीही हा अनुभव घेऊन पाहू... बाय द वे, बोधकथेची ष्टोरी आवडली बरं का रे पिवळ्या डांबिसा... आपला, तात्या आंबेडकर.

खरंच बुद्धाच्या सगळ्याच बोधकथा छान आहेत. आवडली. अशीच एक गोष्ट म. गांधींची पण आहे बहुतेक. लहानपणी शाळेत एक धडा होता आम्हाला. एकदा त्यांना एक अतिशय शिव्या देणारे पत्र येते. ते त्या पत्राला लावलेली टाचणी काढून घेतात आणि बाकीचे पत्र परत त्या पाठवणारर्‍या व्यक्तिलाच पाठवून देतात. सोबत एक ओळ लिहितात, "तुम्ही जे पाठवले त्यातले मला जे उपयोगी होते तेवढे मी ठेवून घेतले, ज्याचा मला उपयोग नाही ते मी परत पाठवत आहे." बिपिन.

प्राजु 27/01/2008 - 09:28
कोणी एक स्वामी असेच शांत असत . प्रसन्न असत. राग त्याना माहितीच नव्हता. एकदा काही लोकांनी त्यांची फजिती करायचे ठरवले. स्वामी स्नान आटोपून नदीतून बाहेर येताना पाहून त्यातील काही लोकांनी पान खाऊन त्यांच्या अंगावर पिंक थुंकली. ते स्वामी पुन्हा नदीत गेले आणि स्नान करून बाहेर आले. पुन्हा तसेच झाले. असेच ५-६ वेळा झाले. पण ते स्वामी काहीही न बोलता नदीतून पुन्हा पुन्हा स्नान करून बाहेर येत होते. शेवटी त्या लोकांनी स्वामींना विचारले, "आम्ही इतक्या वेळेला ही घाण आपल्या अंगावर थुंकली, तुम्हाला राग नाही का आला?" स्वामी म्हणाले, "घाण? पण ही तर काही वेळापूर्वी तुमच्या तोंडात होती.. तुम्ही घाण खाता का?" ते लोक काय समजायचे ते समजले आणि स्वामींची माफी मागून खाली मान घालून निघून गेले. लहानपणी बाबांनी सांगितली होती ही गोष्ट. - (गोष्टीत रमणारी) प्राजु

In reply to by प्राजु

लिखाळ 21/11/2008 - 20:07
बहुधा एकनांथाच्या जीवनातील प्रसंग आहे. ते म्हणतात की चला या योगे मला १०८ वेळा स्नान घडले.. असे काहीतरी.. -- लिखाळ.

आजानुकर्ण 21/11/2008 - 19:49
डांबीसपंत, नाक पुसून कथा वाचली. बोधकथा फार आवडली. आम्हालाही कोणी सहजपणे शिव्या घातल्या तर आम्ही त्या स्वतःकडे घेत नाही. त्या त्यांच्याकडेच राहतात. आपला, (बुद्धम् शरणम् गच्छामि) आजानुकर्ण

लिखाळ 21/11/2008 - 20:06
देणार्‍यांची तोंडे हजारो.. माझ्याकडे आरसा :) कथा छान आहे.. आवडली.. याचसारखी एक कथा (बहुधा ओशोंच्या पुस्तकात) वाचली होती. एका साधूला एक मनुष्य शिवी देतो. त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो त्यावर तो साधू त्याला आशिर्वाद देतो. माणूस चमकतो.. साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '. -- लिखाळ.

In reply to by लिखाळ

आजानुकर्ण 21/11/2008 - 20:19
साधू म्हणतो 'तुझ्याकडे जे देण्यासारखे होते ते तू दिलेस.. माझ्याकडे जे देण्यासारखे होते ते मी दिले '.
मस्त!!! आपला, (साधू) ओशो आजानुकर्ण

सुनील 21/11/2008 - 20:16
हम्म. वाचायला छान पण आचरणात आणायला कठीण आहे बॉ. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कपिल काळे 21/11/2008 - 20:18
सध्याच्या तंग वातावरणात सर्वांनी हे आचरणात आणावे . http://kalekapil.blogspot.com/

In reply to by कपिल काळे

लिखाळ 21/11/2008 - 20:23
सर्वांनी? अहो कुणी एकाने शिव्या दिल्या तर दुसर्‍याला शिकवण आचरणात आणण्याची संधी मिळणार ना ! त्यामुळे जो शिव्या देईल तो समोरच्याला बुद्धाची शिकवण आचरण्याची संधी देत आहे असे समजावे. कुणी आपणहून समाजसेवा करत असेल तर करु द्यावी :) (हघ्याहेसांनलगे) -- लिखाळ.

In reply to by कपिल काळे

अभिज्ञ 21/11/2008 - 21:01
डांबिसि बोधकथा आवडली. अभिनंदन. असो, अभिज्ञ. अवांतर (फाटे)-सध्याचे तंग वातावरण? असे अचानक काय घडले आहे कि वातावरण तंग व्हावे? कपिलदादा तुम्ही बुवा फारच लोड घेताय असे दिसते. ;) नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते.

In reply to by अभिज्ञ

सर्किट 23/11/2008 - 06:08
नवीन सदस्यांकरिता इतिहासाची उठाठेव खरच गरजेची आहे असे नमुद करावेसे वाटते. अभिज्ञशी सहमत आहे... -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शितल 21/11/2008 - 20:19
कथा माहित होती, आणि त्या कथे नुसार वागण्याचा प्रयत्न तरी नक्की करेन. :) आता पर्यत अधे मध्ये तो प्रयत्न डळमळायचा, पण जाणिव पुर्वक तो न डळमळण्याचा प्रयत्न करेन. :)

टवाळचिखलू 21/11/2008 - 20:21
मस्तच. मीही ही युक्ती वापरुन पाहीन. - (बॉस या व्यक्तीपासुन वैतागलेला) चिखलू

कोलबेर 21/11/2008 - 21:07
एका किराणा मालाच्या दुकानात रोज एक गिर्‍हाइक तिथल्या शेठजीला अर्वाच्य शिव्या देउन जात असतो. ह्यावर एकदा न राहवुन तिथला पोर्‍या शेठजीला विचारतो, 'आपको गुस्सा नही आता क्या?' ह्यावर शेठजी थंडपणे उत्तर देतो ' कुछ देकेही जा रहा है ना? कुछ लेके तो नही ना जा रहा..फिर ठीक है! " (बनिया) कोलबेर

In reply to by कोलबेर

सर्किट 23/11/2008 - 06:10
कोलबेरा, हल्ली आपले शेठजीही असेच काहीसे थंडसे झालेले आहेत, असे फक्त मलाच वाटते आहे, की तुलाही ?? (मार्केट धबाधबा पडल्याने तशी बरीच देवमाणसे सध्या थंड झाली आहेत रे !) -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

टारझन 21/11/2008 - 21:07
आहो डांबिषकाका ... हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत .. तेंव्हाच्या गोष्टी आता चालतील असं पटत नाही. चुकी असेल तर शिव्या खाण्याचा संयम अंगी आहे, पण कोणी विणाकारण णडला तर फोडण्याशिवाय पर्याय आम्हाला णाही. महाभारतात आम्हाला युधिष्ठीरापेक्षा भिमार्जून आवडले. कारण त्या बैल युधिष्ठीरामुळेच महायुद्ध झालं,नको ते फंडे लाउन दुर्योधनाला सुधारण्याचा मुर्खपणा केला. आजकाल दुर्योधनांची संख्या जास्त आहे . (आडव्या डोक्याचा) टारझन उभे

In reply to by टारझन

हे असले प्रकार काय जमणार णाही , हो शिव्यांची उत्तरं तितक्याच घाण शिव्याणी णाही देणार ... मी माझ्याच शारिरीक भाषेत उत्तर देईल ... बुद्द , गांधी , किंवा संत हे भूतकाळ आहेत ...... टारू, म्हणूनच प्लास्टिक सर्जरीची गरज पडते. बाकी बोधकथा आवडली/ल्या. अदिती (टारूबाळाची आज्जी)

वेताळ 21/11/2008 - 22:41
आता कोण विनाकारण शिव्या देत असेल तर त्याला कृतीतुन उत्तर देण्याचा जमाना आहे. कथा छान आहे. आजकाल रागावर नियंत्रण राहणे खुप कठिण आहे. पण पिडांकाका तुमचा सल्ला लक्षात नक्की ठेऊ. वेताळ

तुम्हा मिपाकर मित्रांची पण कमाल आहे राव!!! मी ही कथा लिहिली होती जानेवारी मध्ये... तुम्ही अभिप्राय देताय नोव्हेंबर मध्ये..... नाय म्हणजे इतके महिने काय कथेवर चिंतन-मनन करत होता काय? ही तर खुद्द गौतम बुद्धाच्या वरताण झाली की!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

अभिज्ञ 22/11/2008 - 01:03
काका, तुम्ही म्हणता ते खरे आहे, पण माझ्या वाचनातून हि कथा खरच मिस झाली होती. अभिज्ञ.

यशोधरा 22/11/2008 - 00:09
तुम्ही उदाहरणच असा दणदणीत दिल्यात मां काका, मगे काय करतीत मिपाकर तरी?? :)

मनीषा 22/11/2008 - 05:50
(मी आजच वाचली) खरोखर बोध घेण्या सारखी .. या कथेत सांगीतल्या प्रमाणे वागणे जमले तर सगळेच बुद्ध होतील. पण तसे होत नाही म्हणून इतकी वर्ष झाली तरी दूसरा बुद्ध झाला नाही .

In reply to by मनीषा

कोण म्हणतो दुसरा बुद्ध झाला नाही? एकदा सदर्न कॅलिफोर्नियात चक्कर मारा..... दुसरा बुद्ध दाखवतो!!!! :) आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... :)

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 22/11/2008 - 09:14
आणि जर स्वतःबरोबर शिवास रीगल घेऊन आलांत तर.... बुद्ध, पैगंबर, श्रीकृष्ण, सगळे दाखवतो....... मस्त !!!! मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

In reply to by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

मी मात्र महावीर... -- (बाहुबली) सर्किट होय रे होय!!!! तो दिगंबर महावीर मात्र तूच!!!:) ती "जालनागडा" (संदर्भः मिसळप्रेमी!) ही पदवी काय उगाचच मिळाली काय तुला?:) कासोटा घट्ट आवळलेला, पिडां

In reply to by पिवळा डांबिस

चतुरंग 23/11/2008 - 02:13
असे हे आधुनिक बुद्ध आणि महावीर बघून मी मात्र हतबुद्ध झालोय खरा!! ;) (खुद के साथ बातां : रंगा, आता तू ही शंकराचार्य बनणे सुरु कर बाबा!! ;) ) चतुरंग

In reply to by पिवळा डांबिस

सर्किट 23/11/2008 - 06:13
Namo ariha.ntaaNaM Namo siddhaaNaM Namo aayariyaaNaM Namo uvajjhaayaaNaM Namo loe savvasaahuNaM eso pa.ncha Namokaaro savva paavapaNaasaNo ma.ngalaaNaM cha savvesim paDhamaM hava{ii} ma.ngalaM -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

जैनाचं कार्ट 23/11/2008 - 09:02
क्या बात है ! आमच्या खानदानात एकुलता एक मी ज्यानं याची देही.. याची डोळी.... विदेशी भाषा मध्ये नमोकार मत्रं वाचला =)) धन्य हो प्रभु सर्किट ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by मनीषा

ती शिवास रिगल कि काय ... ती कुठे मिळते? आरारारं! तुमच्यासारख्या झंटलमन लोकान्ला इकती शिंपल गोष्ट म्हायती नाय? सांगतो.... मध्य रेल्वेची लोकलगाडी पकडून ठाण्याला उतरायचं.... तिथे अभ्यंकरभटजी कुठे रहातात म्हणून विचारायचं...... त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे "उसाचा रस" मागायचा...... आणि ते फडताळात लपवलेली (त्यांच्या मातोश्री लय कडक आहेत!!!!) बाटली देतील ती घेऊन तडक आमच्याकडे यायचं!!!! :) पुजे साठी आणखी काय काय साहित्य लागते? आणखी बर्फ लागतो. पण तो आम्ही देवस्थानातर्फे मोफत पुरवतो.... :)

अनामिका 23/11/2008 - 00:15
तुमची बोधकथा आवडली पण हे करता आल तर बर्‍याच अंशी आमच देखिल आयुष्य सुसह्य होईल. प्रयत्न करुन बघु एकदा जमतय का ते? कठीण दिसतय पण????????? "अनामिका"

लेखनप्रकार
गौतम बुद्धांची एक कथा. बुद्ध हे मनोविजयी होते हे सर्वज्ञात आहे. ते नेहमी शांत, सस्मित, आणि प्रसन्न असत. त्यांच्या सहवासात येणारया लोकांनाही या प्रसन्नतेचा लाभ होत असे. पण काही लोक असेही होते की त्यांना गौतमांना मिळणारा सन्मान सहन होत नसे. त्यांचा अगदी जळफळाट होत असे. असाच एक माणूस एकदा गौतमांना रागवावयास भाग पाडायचेच, त्यांचा अपमान करायचाच, फजिती करायचीच असे ठरवून त्यांच्या प्रवचनाच्या ठिकाणी आला. प्रचंड जनसमुदाय जमला होता. तथागत शांतपणे त्या समुदायाला मार्गदर्शन करत होते. तेंव्हा हा माणूस तेथे पोचला आणि सर्वांसमोर त्याने गौतमांना न भूतो न भविष्यति अश्या शिव्या दिल्या.

कादंबरी "शाळा " ...लेखक .. मिलिंद बोकील

भडकमकर मास्तर ·

प्राजु 25/01/2008 - 18:20
परिक्षण वाचून मलाही आमच्या शाळेची आठवण झाली. पण कादंबरीची ही खूपच थोडी ओळख इथे दिली आहे आपण. नुसती शाळा कशी होती आणि त्या शाळेशी मुलाचा संबंध इतकाच विषय आहे की , त्यात त्या मुलाची कथाही आहे? बाकीचा पात्र परिचय थोडा आला असता तर आणखी उत्सुकता वाढली असती. असो.. भारतात आल्यावर मिळाली वाचायला तर बघू.. - प्राजु.

छोटा डॉन 25/01/2008 - 20:23
काय झकास व थोडक्यात परिक्षण लिहले आहे राव तुम्ही... मान गये ऊस्ताद ............. आम्ही पण बरेच महिने झाले हे पूस्तक वाचण्याची मनिषा बाळगून आहोत, पण अजून योग जमला नाही... बरेच ऐकले आहे पूस्तकाविषयी, पण आज तुमचा लेख वाचून पूस्तक वाचण्याच्या ईच्छेला पून्हा एकदा "किल्ली दिली" गेली.... पूण्यात असताना हे पूस्तक कधी वाचयला मिळालेच नाही. आता पूण्यापासून दूर एकही मराथी शब्द न बोलला न जाणार्‍या भागात तर मिळण्याची आशाच सोडा... हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा .....

In reply to by छोटा डॉन

माझी दुनिया 01/02/2009 - 15:20
हे पूस्तक "ऑनलाईन" विकायला असल्याची कोणास माहिती असल्यास संपर्क साधावा
'पंकज कुरूलकरां'च्या ग्रंथायन ला विचारा की राव ! :)] माझी दुनिया

ओळख थोडी आहे हे खरंच्...फक्त "किती विस्ताराने सांगितल्यावर रसभंग होणार नाही!" याचा अंदाज घेत लिहिले इतकेच.... गोष्ट मुकुंद जोशी या मुलाचीच आहे, त्याच्या ग्रुपची आहे,त्याला आवडणार्‍या मुलीला पटवण्यासाठी , तिला इम्प्रेस करण्यासाठी (साधारणपणे नववीचे वर्ष सुरू झाल्यापासून नववीचा रिझल्ट लागेपर्यंत ) त्याने केलेल्या नाना खटपटी लटपटी यांची आहे.... ..........जोशा चाळीत राहतो.....त्याला कॉलेजात जाणारी बहीण आहे, शिक्षण खात्यात नोकरी करणारे बाबा आहेत...आई आहे, तिला तो वर्णनात आईसाहेब म्हणतो...आणि त्याचा एक नरूमामा आहे, ( वयाने तरूण आणि मित्रासारखा) तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो आणि "प्रेमात पडणार्‍यांनी कसे वागले पाहिजे , काय टाळले पाहिजे" याविषयी त्याला सल्ले देतो... .......................शाळेतल्या मास्तरांची मास्तरणींची तर अप्रतिम शब्दचित्रे आहेत...."प्रिंसिपल च्या खोलीचे वर्णन आमच्या शाळेतल्यासारखेच कसे काय ?" असे वाटावे इतके तंतोतंत जुळले.... ....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल....सज्जन, सुसंस्कारी फ़क्त त्याला मोठं करून प्रेमात पाडायचे...

In reply to by भडकमकर मास्तर

....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल.... आता तो मोठा होईल? :-(

सुनील 25/01/2008 - 23:53
पुस्ताकाचे प्रकाशक, पृष्ठांची संख्या, किंमत तसेच उपलब्धता यावरही काही सांगा. परीक्षण उत्कंठावर्धक आहे. आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू! (भरपूर लायनी मारलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

एक 26/01/2008 - 00:04
"..आम्ही लाईन देणे ऐवजी लाईन मारणे असा शब्द्प्रयोग वापरीत असू!..." दोन्ही क्रियापदं बरोबर आहेत. पण त्यांचे कर्ते वेगळे आहेत ;-) मुले लाईन मारतात (नेहमीच) मुली लाईन देतात (फार फार दुर्मिळ प्रकार :-()

पुस्तक उपलब्ध होण्यासाठी हा दुवा मदत करेल काय पाहावे... http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16280&cat=266&page=1 ....पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे... ____________________________________________ ___________________________________________ त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.............. ___________________________________________

धन्यवाद प्प्राजु,छोटा डॊन आणि सुनिल आणि एक.. ______________________________ आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... ज्या वाचकाला हे समजून घेणे अवघड जाईल ( सद्ध्या असले काही नसते म्हणे, माझा एक तरूण मित्र सांगतो की त्याच्या इंग्रजी शाळेत प्रत्येक मुलाला नियमाप्रमाणे एका मुलीच्या शेजारीच बसावे लागे, इच्छा असो वा नसो...) असा वाचक "जोशा आवडत्या मुलीशी एखादे वाक्य बोलता यावे म्हणून एवढ्या खटपटी करतो " त्या कशा समजून घेईल ??असे मला वाटते...

वाटाड्या... 26/01/2008 - 00:32
हेवा वाटतो तुमच्या सगळ्यांचा...आमच्या शाळेत पोरिच नव्हत्या..

In reply to by वाटाड्या...

शुचि 02/03/2010 - 03:18
आमच्या शाळेत मुलंच नव्हती. दातार क्लासला मला एक लाल चुटूक स्वेटर घलणारा गोरापान , वर्गातील सर्वात हुशार मुलगा आवडायचा. वर्गात प्रश्न विचार्ला की याचा हात वर असायचा नेहेमी. नंतर आता आम्ही एकमेकांचे बर्‍यापैकी म्हणजे ओके ओके मित्र आहोत. पण तो त्याच्या संसारात , मी माझ्या. ********************************** या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

मिलिंद बोकिलांचे वैचारिक लेख असलेले एक पुस्तक अलिकडेच प्रसिध्द झाले. त्याचे नाव "समुद्रापारचे समाज". ...उदकाचिया आर्ती आणि झेन गार्डन पण त्यांचे खूप चांगले कथासंग्रह आहेत

नुकतेच 'शाळा' वाचून संपवले. (मास्तरांचे परीक्षण वाचून ह्या भारतवारीतून ते घेऊनच आले होते.) शाळेच्या दिवसांची आठवण करून देणारे पुस्तक आहे. एका कुमारवयीन मुलाचे भावविश्व वाचताना काळाची पाने पलटून कधी मागे जातात ते समजतच नाही.. आणखी एक सांगायचे राहिले, की मुलींनी मुलांशी अजिबात म्हणजे अजिबातच बोलायचे नसे त्या काळातल्या शाळेतल्या या घटना आहेत.... अगदी .. पुस्तक ३०० पानी आहे, किंमत २०० रू. ; मला वाटते मॆजेस्टिक प्रकाशन असावे... मौज प्रकाशन स्वाती

सुचेल तसं 22/08/2008 - 16:58
मास्तर, चांगल्या विषयाला हात घातलात तुम्ही. माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे "शाळा". शेवट तर एकदम चटका लावणारा आहे. ("आणि उरतं दहावी नावाचं भयाण वर्ष" असं काहीतरी शेवटचं वाक्य आहे.) नववी-दहावीतल्या मुलाच्या भावविश्वाचे फार सुंदर वर्णन आहे. त्या वयातलं त्याला आणि त्याच्या मित्रांना वाटणारं मुलींबद्दलचं आकर्षण, प्रत्येकाला आवडणारी एक मुलगी . मग शाळेच्या अलिकडल्या एका बांधकाम चालू असलेल्या घरातून जेव्हा "ती" शाळेत जायची तेव्हा तिला पहायचं. शब्दप्रयोग तर केवळ अप्रतिम "इचिभना", "आंबे पाडले पाहिजेत", इत्यादि. http://sucheltas.blogspot.com

मास्तर ... माझ्या एकदम आवडत्या पुस्तकाचा विषय काढलात ... धन्स :) ---------------- शाळा वाचल्यानंतर असं जाणवलं की नकळत मराठीमधे एक ट्रायोलॉजीसारखा प्रकार झाला आहे. तीन वेगवेगळ्या दशकांत, तीन वेगवेगळ्या लेखक...पण तीनही पुस्तके मस्त आहेत. जिज्ञासूंसाठी अधिक माहिती --- 'कोसला' -- भालचंद्र नेमाडे 'दुनियादारी' -- सुहास शिरवळकर 'शाळा' - मिलिंद बोकील

In reply to by संदीप चित्रे

मुक्तसुनीत 22/08/2008 - 18:54
कोसला हे स्वतंत्र पुस्तक. कोसलाचा नायक : पांडुरंग सांगवीकर. ट्रिलॉजी ची पुस्तके : झूल जरीला बिढार नायक : चांगदेव पाटील

In reply to by संदीप चित्रे

कोसला +२१९८७८२७८२७४८३४ कोसला जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा पांडुरंग सांगवीकर मला अस्वस्थ करुन जातो. दर वेळी त्या पुस्तकाचा एक नवाचं अर्थ लागत जातो.

शितल 22/08/2008 - 18:57
पुस्तक परिक्षण आवडले. संदीप तु़झ्याकडे आहे ना मग ते पुस्तक आणि अजुन जी तु़झ्याकडे असतील ती मी आमच्या घरी आणण्याची व्यवस्थित व्यवस्था करीन. ;) शाळा हा विषयच सर्वाच्या जिव्हाळ्याचा असतो.

मास्तर, मस्त झालंय परीक्षण. पण जरा लहान झालंय. शिवाय बोकिलांच्या बाकीच्या कथासंग्रहांवरपण लिहा ना. बाय दी वे, तुम्ही त्यांची 'एकम' ही दीर्घकथा / लघुकादंबरी वाचलीय का हो? कुणी वाचली असेल तर प्लीज आपलं मत सांगा. मला अजिबात नाही आवडलीय. बोकिलांच्या लौकिकाला अज्याबात साजेशी नाहीय.

अभिज्ञ 23/08/2008 - 01:28
"शाळा" कादंबरी अफलातुनच आहे.पौगंडा अवस्थेतील मुलांच्या भारलेल्या दिवंसाचे अतिशय वास्तविक चित्रण ह्या कादंबरीत जाणवले.वाचून तर चाटच पडलो. लेखकाने दाखवलेला काळ हा आणिबाणीतला आहे ,साधारण १९७५-१९७६ च्या आसपासचा. कादंबरितील वर्णने आमच्या वेळेसहि फिट बसतात. परिक्षण आवडले. अभिज्ञ. अवांतर : "शाळा" व "बाकि शुन्य" ची सुरुवातीची काहि पाने एकाच धाटणीची आहेत. आधि "शाळा" वाचले अन मग "बाकि शुन्य" वाचले. "शाळा" चा प्रभाव असेल का ते सांगता येत नाही परंतु "बाकि शुन्य" पहिल्या काहि पानातच "शुन्य" व "कृत्रिम" वाटू लागले. "बाकि शुन्य" हे थोडेसे "भडक" रंग वापरून रंगवलेले वाटले.

आपला अभिजित 24/08/2008 - 17:22
मला पण भन्नाट आवडली `शाळा.' एकतर माझी वाचन परंपरा फारच अफाट आहे. सलग आणि संपूर्ण वाचलेली अगदी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी पुस्तकं आहेत माझी. `शाळा' उटी दौर्‍यात निलं होतं वाचायला. ट्रेनमध्येच वाचून पूर्ण केलं. `शाळा'तले बरेच धंदे आम्हीही शाळेत केलेत. त्यामुळे अगदी भावलं पुस्तक. अगदी पोरींवर लायनी मारणं, तिच्या लाइन देण्याविषयी चर्चा, सायकल फास्ट मारून केलेलं शायनिंग, बायांना वेगवेगळी नावं ठेवणं अगदी मनापासून केलं. पण शाळेला दांड्या बिंड्या नाही मारल्या. आठवणी खूप आहेत. एकदा वर्गात कुणीतरी खाजकुयली टाकली म्हणून अख्ख्या वर्गाला मैदानावर उभं केलं होतं. आम्ही टेक्निकलला ज्या दिवशी जायचो, नेमकी त्या दिवशी दुसर्‍या दिवसाच्या शाळेच्या वेळेत बदलाची नोटीस फिरवायचे. आमचे टेक्निकल शाळेबाहेर असल्याने आम्हाला तो निरोपच मिळायचा नाही. मग आम्ही निरोप कळला, तरी मुद्दाम नेहमीच्या वेळी शाळेत जायचो. या `बंडखोरी'बद्दल अनेकदा काळ्या यादीत पण जायचो. पण खुमखुमी जास्त होती. ही कादंबरी वाचून शाळेतले सगळे धंदे आठवले. धमाल आली! मी पण कादंबरीविषयी टॉपिक टाकणार होतो. पण मुहूर्त लागला नव्हता. भडकमकर मास्तरांचे अभिनंदन!

आज हा धागा परत वर आला. त्या मुळे अजून हे पुस्तक वाचायचे आहे अशी टोचणी परत लागली आहे. मास्तर छान ओळख करुन दिलीत. बिपिन.

मैत्र 08/10/2008 - 00:47
पुस्तक वाचलंच पाहिजे आता... शाळा आणि ते सातवी ते दहावीचे मस्त दिवस. आणि किमान बोकीलांच्या समान आडनावाला जागलं पाहिजे... मास्तर धन्यवाद...

विजुभाऊ 08/10/2008 - 11:11
आमच्या शाळेत कशी कोण जाणे पण एक विचित्र प्रथा होती दहावीतली मुले एकमेकाना वडीलांच्या नावाने हाक मारीत. आणि ऐकणारालाही ते सवयीचे झालेले असायचे. एकदा मी एका मित्राच्या घरी गेलो. त्याचे नाव सुधीर व त्याच्या वडीलांचे नाव मधुकर होते. त्या मित्राला आम्ही मधु म्हणुनच हाक मारायचो. तो ही ओ द्यायचा मी त्याच्या घरी गेलो आणि दारातुन हाक मारली मधु आहे का? कोण हवे विचारत त्याचे वडील बाहेर आले. मी पुन्हा विचारले की मधु आहे का ? त्यानी पुन्हा विचारले कोण हवे आहे म्हणुन मी पुन्हा तेच म्हणालो " मधु आहे का?" त्यानी माझ्याकडे पूर्ण पाहिले. कसला तरी मजेदार चेहेरा करुन ते म्हणाले मीच मधु ...तुला बहुतेक सुधीर हवा असेल. तो दहावीत आहे. एव्हाना तो मित्रही दारात आला होता. मला आणि सुधीरला दोघानाही रामायणात घडले होते तसे धरती दुभंगुन आपण त्यात गडप व्हावे असे झाले होते.

मास्तर तुम्हाला सान्गु इचितो कि या कादंबरी वर प्रथम एक एकांकिका लिहली गेलि ति होति ग्.म्.भ.न. रुईया महविद्यालय त्यात प्रथम आले होते नंतर आले ते नाटक माझ्याकडे त्या एकांकिके चि सिडि आहे.................... मी असा कसा असा कसा वेगळा वेगळा?

बर्‍याच दिवसांपासून 'टू बी रेड' यादीत असलेली 'शाळा' कादंबरी ह्या भारतभेटीत लक्षात ठेवून विकत घेतलं. (खरं तर विसरलोच होतो, मुसुभाऊने आठवण नीट करून दिली होती.) पुस्तक घेऊन पण १-२ आठवडे गेले. परवा एक कंटाळवाणा प्रवास नशिबी आला होता. म्हणून प्रवासात वाचायला म्हणून घेतलं पुस्तक बरोबर. तेव्हा पासून आत्तापर्यंत दोनदा वाचून झालंय!!! वरती मास्तरांनी पात्र परिचय दिलाच आहे. 'मुकुंद जोशी' ह्या नववीमधल्या मुलाची ही कथा. ही कथा साधारण सप्टेंबर ते एप्रिल (साल साधारण १९७६ असावं... आणिबाणीचे संदर्भ आणि मॅट्रिक संपून एसेस्सी नुकतीच सुरू झालेली असते) ह्या एवढ्याच कालावधीत घडते. ह्या छोट्या कालावधीत 'जोशा' एका खूप मोठ्या मानसिक (आणि शारिरीक) स्थित्यंतरातून जातो... त्या स्थित्यंतराची ही कहाणी. त्याचे 'बाबा', 'आईसाहेब' (आई) आणि 'अंबाबाई' (मोठी बहिण) असं हे कुटुंब. मित्रा सारखा वागणारा नरूमामा. शाळेतले ३ जवळचे मित्र आणि इतर मित्र. वर्गातल्या मुली आणी 'केवडा', 'शिरोडकर' वगैरे नामवंत मुली. चाळीतली इतर मंडळी, पोंक्षेकाका, वरच्या मजल्यावर राहणारे ३ जण आणि त्यांचे आणिबाणीविरोधातले काम ही अजून काही पात्रं. एवढ्या भांडवलावर लेखकाने अक्षरशः एक वेगळीच सृष्टी निर्माण केली आहे. अशी सृष्टी की शाळेत गेलेला / ली प्रत्येक जण तिथे काही काळ का होईना राहून आलेला / ली आहे आणि ही कादंबरी वाचल्यावर परत एकदा तिथे राहून येतो / ते. जोशा आणि शिरोडकर ह्या दोघांच्या मधे काय चाललंय हा जरी मुख्य धागा असला तरी नववीतल्या मुलाच्या नजरेतून जग कसे दिसते आहे हे पण तितक्याच प्रभावी पणे लिहिले आहे. त्या अनुषंगाने ह्या मुलांच्या तोंडची भाषा पण हुबेहूब जमली आहे. (माझ्या ज्ञानात भर म्हणजे काही शब्द अमर आहेत... कधीच बदलणार नाहीत... 'लाईन', 'बाटली' वगैरे!!!) माझ्या पुरतं बोलायचं तर ह्यातल्या काही घटना हुबेहूब माझ्या बाबतीत पण घडल्या आहेत!!! साला ह्या मिलिंद बोकिलला कश्या कळल्या? हा माझ्याच शाळेत तर नव्हता? प्रत्येकाने जरूर वाचावे असे हे पुस्तक. लोकप्रियतेचे एकच उदाहरण द्यायचे तर --- पहिली आवृत्ति १४ जून २००४ ........... सहावी आवृत्ति २० फेब्रुवारी २००८.... अजून काय लिहू? शाळा मिलिंद बोकिल मौज प्रकाशन गृह किंमत रू. २००/- पृष्ठ संख्या ३०३ बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मास्तर आणि बिपीनने पुस्तकाचा आत्मा पकडला आहे. मी पण अलिकडेच पुस्तक वाचलं. हातात घेतलं आणि सोडवतच नव्हतं. रस्त्यात चालतानाही जरा कमी गर्दीचा रस्ता होता तिथे पुस्तक वाचत चालत होते.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त रे... खूप चांगलं केलंस की ते पुस्तक विकत घेतलयस. अदिती म्हणाली तसं हे पुस्तक वाचायला घेतलं की खाली ठेववतच नाही. तू भालचंद्र नेमाडेंचं 'कोसला' आणि सुहास शिरवळकरांचं 'दुनियादारी' वाचली आहेत का? नसतील तर जरूर वाच.

In reply to by संदीप चित्रे

शाळा कादंबरीवर आधारित 'ग म भ न' ही रूईया महाविद्यालयाने सादर केलेली एकांकिक आपली मराठी या वेबसाईटवर पाहिली. कादंबरीचं सादरीकरण खूप छान केलं आहे. ’शाळा’च्या पंख्यांनी जरूर पहावी.

बोका 25/12/2008 - 11:07
वरील बहुतेक जणांना हे पुस्तक वाचून आपले शाळेतील दिवस आठवले. मलाही ! आणि आपण अनुभवलेले शालेय जीवन व कादंबरीतील वर्णन यातील साम्यामुळे ही कादंबरी अधिकच आवडते. मिपा वरील बहुतेक वाचकवर्ग १९७५- १९९० या काळात शाळेत गेलेला असावा. त्यामुळे बहुतेकांना 'शाळा' आवडली. मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ? 'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ?

In reply to by बोका

मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ? 'वर्गातल्या मुलामुलींनी आपापसात न बोलणे' या सारख्या गोष्टी त्यांना पचतील का ? बोकोबा, मी ९६साली दहावी झाले. ठाण्यातली मराठी माध्यमाची प्रसिद्ध शाळा आणि हेच असंच सगळं. अर्थात मी काही बिल्डींगमधे बसून मुलींवर कमेंटस मारायचे नाही! ;-) पण आमच्याही वर्गात मुलं-मुली एकमेकांशी बोलायचे नाहीत. माझ्या बिल्डींगमधलाच एक मुलगा माझ्या वर्गात होता. लहानपणी अगदी झिंजा उपटणे, चिखल उडवणे, चिमटे काढणे इथपासून भांडणं केली, पुढेसुद्धा एकत्र बसून अभ्यास करायचो, पण वर्गात ... मी एकदा कधीतरी व्हरांड्यात त्याच्याशी बोलले तर घरी आल्या-आल्या त्याने मला दम मारला. माझा सख्खा भाऊ दोन वर्ष पुढे होता, मी ही एकदा त्याच्याशी बोलले तर घरी आल्यावर काय संकट कोसळलं होतं असा आव आणला होता.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी २००२ ला १०वी झालो. मराठी मीडीयम. १० वी च्या गॅदरींगपर्यंत मुला-मुलींनी एकमेकांशी बोलायची प्रथा नव्हती. गॅदरींगनंतर जरा मोकळेपणा आला तोपर्यंत शाळा संपुन पण गेली. तेव्हा आमचे गुर्जी गुर्जीणी शिक्षा म्हणुन दोन मुलींच्या मधे बसवायचे. वाळीत टाकल्यापे़क्षा भयानक शिक्षा वाटायची ही. कॉलेजमधे गेल्यावर पण पहीली दोन वर्ष असा अवघडलेपणा असायचा. कॉन्व्हेंट मधले पोरं पोरी खुशाल डेट बिट करत फिरायचे. हेवा वाटायचा त्यांचा.

In reply to by बोका

आजानुकर्ण 26/12/2008 - 08:34
बोकापंत, आमच्या शाळेतही मुलामुलींनी एकमेकांशी बोललेले (आवडत असले तरी) खपवून घेतले जात नसे. त्यामुळे आम्ही कॉलेजात पण मुलींशी बोलायला (मास्तरांना आवडणार नाही असे वाटून) घाबरायचो. आपला (आज्ञाधारक) आजानुकर्ण मात्र शाळेतल्याच काही मंडळींनी एकमेकांशी लग्ने केल्याच्या बातम्या आता कळत आहेत त्यामुळे बरेच छुपे रुस्तम यशस्वी झाल्याचा (व मास्तरांवर सूड उगवल्याचा) आनंद होत आहे. (व आम्ही तसे काहीच न करता पुस्तकात माना खुपसून बसलो याचे दुःख होत आहे) मात्र त्यामुळेच ह्या कादंबरीतील वातावरणाला समजून घेता आले असे वाटते. आपला (गप्पिष्ट) आजानुकर्ण

आबा 25/12/2008 - 20:55
"शाळेत गेलेल्या सर्वांसाठी" अशी या पुस्तकाचि अर्पणपत्रिका आहे गणपतीच्या देवळातला प्रसंग फारच छान आहे. बाकी मास्तर, परीक्षण सुरेख झालंय हो!

तुम्ही लिहिलेला पुस्तक परिचय आणि मिपा सदस्यांच्या प्रतिक्रीया वाचुन आता कधी एकदा पुस्तक वाचेन असे झाले आहे... खुप आभारी आहे.... अवांतर : लंपू ची आठवण करुन दिल्याबद्दल पण खुप खुप आभार...लंपू चे सगळे कारनामे मी ५३० वेळा तरी ( लंपूच्या भाषेत) वाचले आहेत..आज गेल्या गेल्या परत पुस्तक नक्की उघडणार :-) ....सहज एक विचार आला की ( प्रकाश ना. संतांचा ) लंपन (वनवास, शारदासंगीत, झुंबर,पंखा) मोठा झाला की या मुकुंद जोशासारखाच होईल.... आता तो मोठा होईल? :-( हेच म्हणते :-( -(लंपूची मैत्रिण)स्मिता

बबलु 31/01/2009 - 14:54
मागच्याच आठवड्यात "शाळा" ३ वेळा वाचून संपवलं..... सूम मध्ये. या वेळच्या भारतभेटीत विकत घेतलं. ज. ब. रा. कादंबरी. आयला... हा मिलिंद बोकिल लैच भरी की राव. सालं... शेवटचं पान वाचून झालं की पुन्हा पहिल्या पासून सुरुवात आपली. खास बोले तो खासच. डाउट खायला जागाच नाही. कौतुक करावं तेव्हढं थोडंच आहे. "A MUST READ". ....बबलु

मिहिर 31/01/2009 - 22:36
मला पुस्तकाचा पुर्वार्ध (सुर्या वगैरे) आवडला नाही. मध्य ठीक. शेवट आवडला

हुप्प्या 01/02/2009 - 04:46
इतकी वर्षे होऊन गेली तरी चांगले काही मराठी वाचू असा विचार केला की नेहमीचेच पुल, चि.वि. जोशी, अत्रे, क्वचित गो नी दाण्डेकर अशीच नावे सुचायची. कुणी नवा लेखक का सापडत नाही आपल्याला अशी खंत वाटायची. एकदा कुणीतरी हे पुस्तक सुचवले. मला इतके आवडले की काही विचारू नका. एक अगदी ब्रँड न्यू स्टाईल, वेगळा विषय, वेगळा काळ जो मी अगदी जवळून पाहिला होता. मलाही ह्यात वर्णन केलेल्या अनेक घटना अगदी माझ्या शाळेतल्याच आहेत असे वाटून गेले. एक द्विधा मनःस्थिती झाली म्हणजे हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असेही वाटायचे आणि पुस्तक संपू नये असेही वाटायचे. शेवट खूपच रुखरुख लावून गेला. (माझ्याकरता) एका नव्या मराठी साहित्यिकाशी ओळख झाल्याचा आनंद झाला. बोकिलांची अजून काही पुस्तके कुणी वाचली आहेत का? कशी आहेत? पुढच्या भारतभेटीत आणखी काही वाचेन म्हणतो.

बबलु 01/02/2009 - 10:36
माझंही अगदी असच झालं. हे पुस्तक वाचायला लागल्यावर थांबूच नये असंही वाटायचं आणि पुस्तक कधीच संपू नये असंही वाटायचं. स्वतः मिलिंद बोकिलांशी या पुस्तकावर चर्चा करायला मिळाली तर किती बहार येइल असा विचार आला मनात. ("शाळे"चा जबरदस्त फॅन) ....बबलु

अस्मी 01/03/2010 - 11:05
अगदी कालच 'शाळा' वाचून पूर्ण केल आणि आज हे परीक्षण वाचनात आलं... खरच मला खूप आवडल शाळा...
मला पडलेला प्रश्न असा की, १९९०-२००० या काळात ९वी/१०वी त असलेल्यांना ही कथा / वातावरण जवळचे वाटेल का ?
ह्म्म्म...मला पण आधी असंच वाटलं होत की मुल-मुली बोलत नाहीत म्हणजे... :? पण तो काळ लक्षात घेता ते ठीक आहे.... - मधुमती

In reply to by अस्मी

बेसनलाडू 01/03/2010 - 23:33
मी १९९९ मध्ये १०वी पास झालो. त्यावेळीही मुले-मुली बोलत नसत. आमची शाळा फक्त मुलांची शाळा होती आणि मुलींची शाळाही आमच्या बाजूलाच होती. त्या शाळेतील मुली इयत्ता १ली ते ४थी पर्यंत आमच्याच वर्गात, आमच्याबरोबरच एकत्र शिकल्या होत्या. मात्र ५वी ते १०वी मध्ये शाळा वेगळ्या होत. त्यामुळे वर्गातील एखादा मुलगा त्यांच्या शाळेतील मुलींशी बोलताना आढळल्यास (शाळेबाहेर ट्यूशनच्या वगैरे निमित्ताने) तसेच एखदी मुलगी मुलाशी बोलताना आढळल्यास पुढे त्या दोघांवर काय परिस्थिती बेतायची याबाबत न बोललेलेच बरे ;) आता हे चित्र बदलले आहे आणि दोन्ही शाळांमध्ये वर्गांमध्ये मुलामुलींचे 'नांदा सौख्यभरे' चित्र दिसते आहे. १९९३ ते १९९९ पर्यंतचे माझे शालेय जीवन लक्षात घेता याबद्दल काहीसे हळहळायला होते ;) 'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली. आता पारायणे झाली आहेत. पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही. यावर आधारीत 'गमभन' ही एकांकिकाही पाहिली. ती फारशी आवडली नाही. मात्र सुर्‍याचे पात्र खास झाले आहे. पुस्तकातील चित्र्याचे पात्र जास्त आवडले. लेखकाच्या भगिनींचा 'अंबाबाई' असा उल्लेख फारच लक्षात राहण्याजोगा. घासू गोखल्या, बिबीकर, चिमण्या, शिरोडकर, सुकडी सगळीच मंडळी आपलीशी वाटणारी, लक्षात राहणारी. अंबाबाई नि शिरोडकरचे नाव शेवटपर्यंत कळत नाही, ही आणखी एक गूढ, मनोरंजक बाब. असो. 'शाळा' बद्दल जितके बोलावे-लिहावे तितके कमीच! (शाळकरी)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

टारझन 02/03/2010 - 00:36
'शाळा' मी एका अमेरिका ते भारत प्रवासात जाताना-येताना अशी दोन वेळा वाचली.
हो का? मी अमेरिकेला जाताना दोन पेग मारुन झोपणे प्रिफर करतो यू नो :)
पहिल्या पानापासून वाचायला घेतले की शेवट होईतोवर खाली ठेववत नाही.
अहो खरं काय? माझ्या मित्राला पण असल्यास घाणेरड्या सवयी आहेत..पण बेला तुम्ही तसे वाटत नाही...म्हणूनच विचारले काय? बाकी प्रतिसाद छाणच! -(माळकरी) झेला

In reply to by टारझन

पाषाणभेद 02/03/2010 - 05:58
टार्‍या, मागे तू काही पेग वैगेरे घेत नाही असा उल्लेख केलेला आठवतोय. अन आपले पुणेरी पत्रकार यांच्या समावेत तुम्ही सगळे "बसलेले" असतांना तुझ्या पुढ्यात थंड असल्याचा फोटोही बघीतल्याचे आठवते. खरे काय समजावे? आत्ताचे बोलणे की तो फोटो अन तो उल्लेख? की आत्ता सुरू केलीय? बाकी भडकमकर मास्तर खरे बोललात: "सगळ्या शाळा सारख्याच...जो तो पोरगा आपापल्या कर्त्रुत्त्वाने पुढे जातो, हेच खरे..." आत्ताचे आमचे कर्तृत्व पाहून आमचे मास्तर अन आमची शाळा (त्यांच्या) तोंडात बोटेच घालतील. The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी|| महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद शके १५६३

बाकी सगळं आधीच इतरांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे मला जे नवीन वाटतं तेवढंच लिहितो. ही जरी त्या मुलाची गोष्ट असली, आणि पौगंडावस्थेत पदार्पण करण्याच्या वयाचा कॅनव्हास घेतला असला तरी ही जास्त व्यापक कथा आहे असं वाटलं. बालपणात, तारुण्यात जीवनाविषयी खूप अपेक्षा असतात. सगळीकडे काहीना काही रस घेण्यासारखं घडत असतं, इतकं की कुठे लक्ष देऊ आणि कुठे नको असं झालेलं असतं. एक वेळ अशी येते की आपण जगरहाटीला जुंपले जातो. या गमतीजमती मागे पडतात आणि पुढे उरतं ते भकास कष्टप्रद सत्य जीवन. याची ही कथा आहे. लेखकाने हे साधण्यासाठी तंत्र उत्कृष्ट रीतीने वापरलेलं आहे. घनिष्ठ मैत्र्या, स्वच्छंद जीवन, पहिलंवहिलं प्रेम, राजकीय घडामोडींशी जवळून संबंध, बिल्डिंगमधल्या लोकांची संगत या सगळ्या आकर्षक, तारुण्याशी संलग्न गोष्टी समांतरपणे खुलवलेल्या आहेत. शेवटच्या काही पानांत या सगळ्या एकामागोमाग एक मोडून पडतात. ते इतकं चांगल्या प्रकारे साधलंय की तो हे तंत्र वापरतो आहे हे जाणवत पण नाही. सगळी जादू उत्तम रीतीने गुंफलेल्या मोहक बारकाव्यांमध्ये आहे. राजेश

In reply to by राजेश घासकडवी

शैलेन्द्र 01/03/2010 - 16:20
अगदी अगदी, शेवटच्या पानावरची काही वाक्य अगदी मनावर कोरली गेलीत, "आता हळु-हळु माझ्या सगळ लक्षात यायला लागलं-----" आणि मग शिरोड्करच निघुन जाण, सुर्‍याचे मागे पडण, नरुमामाचं लग्न इत्यादी इत्यादी... शेवट चटका देतो.

In reply to by राजेश घासकडवी

आशु जोग 30/07/2014 - 12:27
अगदी बरोबर राजेश. तुम्ही नेमक्या शब्दात सांगितलेत.

बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं.... .....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंब

किरीट सोमय्या यांचा आरोप , म.टा.तील लेख.

शरुबाबा ·

विसोबा खेचर 25/01/2008 - 16:49
दरम्यान सोमवार व मंगळवारच्या क्रॅशमध्ये नुकसान झालेल्या गुंतवणूकदारांनी 'सेबी'कडे तक्रारी कराव्यात असे आवाहन सोमय्या यांनी केले आहे. हम्म! काही फायदा होईलसे मला वाटत नाही...! असो, केवळ बाजार २१००० आहे आणि तो २५००० जाणार आहे यावर विश्वास ठेवून, पीई रेश्यो, व्हॅल्युएशन वगैरे न बघता चढ्या भावाने समभाग घेणार्‍या, फ्युचर ऑप्शन मध्ये सौदे करणार्‍या मंडळींबद्दल माझ्या मनात जराही सहानुभूती नाही. जे झालं ते उत्तमच झालं! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आणि मला तर वाटते की आता झाल्या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्याबद्दल वाईट वाटते परंतु अभ्यासाशिवाय गुंतवणूक म्हणजे तोट्याला आमंत्रण!! द बुल्स मेक मनी, द बेअर्स मेक मनी; द पिग्ज गेट स्लॉटर्ड!!! पिवळा डांबिस

किरीट सोमय्या यांचा आरोप सोमवार व मंगळवारी झालेली शेअर बाजाराची घसरण काही बड्या दलालांना फायद्याची आणि लाखो किरकोळ गुंतवणूकदारांना मात्र तोट्यात ढकलणारी होती. या माकेर्ट क्रॅशची चौकशी करावी, कुणाला फायदा झाला याचा शोध घ्यावा आणि सदोष यंत्रणा बदलावी अशी मागणी इन्व्हेस्टर ग्रिव्हन्सेस फोरमचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केली आहे. या क्रॅशचा फायदा विदेशी वित्त संस्था, मोजके बडे दलाल आणि काही प्रमोटर्सना झाल्याची आपली माहिती असल्याचे सोमय्या यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सोमवार व मंगळवारचा क्रॅश हा माकेर्ट स्कॅमच असल्याचा आरोप त्यांनी केला.

खच्चीकरणाची पंचवीस वर्षं.. म.टा.तील लेख.

प्राजु ·

प्राजु, तू आज सार्‍या जुन्या आठवणी जाग्या केल्यास. त्या संपाने गिरणी कामगार आणि त्यांची कुटुंबे पुरती उध्वस्त झाली. जेमेतेम पगारावर काम करणारा, सतत कर्जबाजारी असणारा गिरणी कामगार किती असहाय्य होता हे आम्ही पहात असू, ते शब्दात सांगणे कठिण. त्या संपाने गिरणिकामगारांच्या दोन पिढ्या उध्वस्त झाल्या. माझे काका व त्यांचा मुलगा असे घरातले दोन्हीहि कमावते पुरुष घरात कित्येक महिने बसुन होते. काकांची तुटपुंजी भिक्षुकी आणी कोकणस्थांची चिवट बचत करायची प्रव्रुत्ती या वरच ते कुटुंब तरले. आज त्या विषयावर बोलणे नको वाटते. केवळ विचारही अस्वस्थ करतो. संजय अभ्यंकर

त्या गिरणी संपाचा नविन संदर्भात विचार करणे आज आवश्यक आहे. गिरणी कामगार संकटात येण्याचे एक कारण म्हणजे, त्यातल्या बहुसंख्यांना गिरणीत चालणार्‍या कामाशिवाय इतर काम येत नसे. विशेषतः आज सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करणारे लोकांच्या बाबतित हा संदर्भ विचार करण्याजोगा आहे. आज प्रत्येक व्यक्तिने बहुविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. अन्यथा एक काम बंद पडल्यावर कठिण प्रसंग उद्भवतो. सॉफ्टवेअर तज्ञाला आज भरमसाठ पगार मिळतो, परंतु सॉफ्टवेअर कं. ल्या नोकर्‍या ह्या कधी कमी होतील ह्याची शाश्वती नाही. बहुविध कौशल्ये नसतिल तर सॉफ्टवेअर इं. कसे संकटात येतात हे मी पाहिलेले आहे. अमेरिकेतून परत येणारे तंत्रज्ञ जर औद्योगीक क्षेत्रात अनुभवि नसतील तर योग्य पगाराच्या नोकर्‍या मिळणे, केवळ दुरापास्त होऊन बसते. आमच्या कं. तील एक. वरिष्ठ व्यवस्थापक, अमेरिकेतिल नोकरी गेल्यावर, केवळ औद्योगीक अनुभवावर तरला. सॉफ्टवेअर क्षेत्रातील उदाहरण केवळ प्रातिनीधिक आहे. ते देण्याचे कारण म्हणजे, ह्या क्षेत्रातले लोक चंगळवादाच्या आहारी लवकर जातात आणि तेथुन मागे फिरणे कठिण होऊन बसते. कोणाला दुखावणे हा इथे हेतु नाही. आपण स्वतःला आजच्या काळा पलिकडे पहाण्याची सवय लावणे आवश्यक आहे. संजय अभ्यंकर

विसोबा खेचर 25/01/2008 - 07:06
अभ्यंकरांच्या मताशी सहमत. या संपामुळे कित्येक कुटुंबं देशोधडीला लागल्याचे माझ्या पाहण्यात आहे. सगळा गिरणगाव विभाग हा प्रामुख्याने कोकणातला. गिरणगाव म्हणजे प्रामुख्याने भोईवाडा, परळ, लालबाग, काळाचौकी, खेतवाडी हा विभाग. अनेक कोकणी इथे आले आणि मुंबईतील गिरण्यात चाकरमानी झाले व गिरणगावात त्यांनी आपापले संसार थाटले. कधी काळी हा सगळा विभाग खूप सुखी होता, समाधानी होता. पण हळूहळू गिरणीसंपाचे ग्रहण लागले आणी इथली सुखशांती नष्ट होऊ लागली. लालबागचा राजा रुसला! गिरणीसंपामुळे लालबाग, काळाचौकी येथील वाताहात झालेली काही कुटुंबांशी माझा चांगला परिचय आहे. त्यांची हालाखी, त्यांचे मनस्ताप, त्यांची उपासमार आठवली की आजही अंगावर काटा येतो! तात्या.

ऋषिकेश 25/01/2008 - 07:26
माझ्या आईचे वडिल आणि काका म्हणजे घरातील एक अख्खी कमावती पिढी एका दिवसात घरी बसले! आणि जे बसले ते बसले पुन्हा काहि करु शकलेच नाहित! घरातल्या मुलांवर शिक्षण सांभाळून पैसे कमावण्याच वेळ आली. आईचे अथवा मामाचे अनूभव ऐकून अंगवर काटा येतो. रोजच्या स्वतःच्या जेवणापुरते पैसे तरी दररोज प्रत्येकाला कमवावे लागत :( हा संप म्हणजे अनेक मुंबईतील कुटुंबांसाठी कर्दन काळ होता. आणि त्याहूनही मोठा तोटा म्हणजे यामुळे झालेले मराठी समाजाच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण :(.. इथे मुंबईतून जो मराठी माणूस उठला तो आजतागायत मुंबईत मान वर करून चालू शकलेला नाहि. (याच संपामुळे बिहारी कामगारांचीहि आयात झाली आणि त्यांना ह्या शहराची चटक लागली. याआधी केवळ युपीचे भय्ये होते ) प्राजू, या लेखाबद्दल आभार! पण वाचून मन अस्वस्थ झालंय :(( -ऋषिकेश

प्राजु 25/01/2008 - 08:41
हा संप जरी अधिकृतरित्या बंद झाला नाही तर मग पुढे दत्ता सामंत यांनी त्या संपाचं काय केलं? म्हणजे शासनाने त्यांच्याशी कधी बोलणी केलीच नाहीत का? की पर राज्यातील कामगार आणून गिरण्या सुरू केल्या? आणि मग दत्ता सामंत यांची हत्या झाली याच संपाच्या वादातून का? कोणी सांगू शकेल का?

In reply to by प्राजु

हा संप अधिकृतरीत्या बंद झाल नाही. बहुसंख्य गिरण्या जेमतेम चालु झाल्या व बंदही पडल्या. बहुसंख्य मालकांनी दरम्यानच्या काळात गुजरातेतला आपला पसार वाढवला. तेथे त्यांना उ.प्र., बिहारचा स्वस्त मजुर मिळाला. मुंबईतल्या आपापल्या जमिनिंवर काहीनी व्यापारि संकुले उभी केली. काहीनी आपल्या जमिनि बिल्डरना विकल्या. आज ह्या भागात सर्वत्र मोठ्मोठाली कार्यालये उभी आहेत. आज गिरणगावाचे रुप परत पालटत आहे. जे गिरणी कामगार तग धरुन तेथे टिकले, त्यांच्या मुलांनी तेथे वडा पाव, सँडविच, ताकाच्या टपर्‍या टाकल्या. माझ्या माहितीतले एक वृध्ध दांपत्य, ज्यांनी हयातभर बद्ली कामगार म्हणुन काम केले, ते आज एक चहाची टपरि चालवत आहेत. आज अनेक मराठी कुटुंबे, ह्या व्यवसायांतुन बर्‍यापैकी पैसे मिळवत आहेत, हेच समाधान. संजय अभ्यंकर

मुक्तसुनीत 25/01/2008 - 08:52
सुन्न करणारा लेख. जुन्या आठवणी जाग्या करणारा. ८० च्या दशकात मुंबईमधे वाढणारी अशी एकही मराठी व्यक्ति सापडणे कठीण, जिच्या ओळखीच्यात, रक्ता-नात्याच्या नातेवाईकात कुणी संपातून देशोधडीला लागलेले कुणी नसेल. या विषयावर जयंत पवार यांचे (मला वाटते , "अधांतरी" नावाचे) एक नाटक आले होते. नव्वदीच्या दशकातील महत्त्वाच्या नाटकात आज त्याची गणना होते. पवारानी इतके प्रत्ययकारी नाटक , आणि असे , मर्मस्थानावर प्रहार करणारे, काळीज चरत जाईल असे लिखाण करावे हे नैसर्गिक आहे : ते स्वतः गिरणीकामगाराच्या कुटुंबात वाढले होते. साठीच्या दशकापूर्वीची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि ऐंशीच्या दशकातील हा संप या, महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या आंदोलनांचे पर्यवसान इतके वेगळेवेगळे का यावे , हा एक अभ्यसनीय विषय ठरू शकेल. थोडी कारणीमीमांसा , थोडी तुलना मी माझ्या वकूबाप्रमाणे करू पाहतो. १. संयुक्त महाराष्ट्र - पर्यायाने मुंबईचा ताबा - हा मुद्दा राजकीय दृष्टीने कळीचा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील , सहकारी क्षेत्रातील महत्त्वाच्या पुढार्‍यानी यात आपले वजन खर्च केले असणार. यामुळे मुळात नागरी असणार्‍या या चळवळीचे लोण अन्य भागात पोचले असावे. २. पन्नासचे दशक आणि ऐंशीचे दशक यातील दिल्लीच्या राजकारणात प्रचंड फरक पडलेला असणार. चीनी युद्धाच्या आधीचे जवाहरलाल आणि आणीबाणी-जनता नंतरच्या "बाई". तळागाळातल्या जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे काही झाले तरी एका मानवतावादी दृष्टीने पाहणारे उमदे नेतृत्व आणि चमच्यांच्या गराड्यातले भ्रष्ट, सत्तापिपासू दिल्लीसरकार आणि त्याना चाटणारे अंतुले-भोसले आदिंचे महाराष्ट्र "शासन". अजूनही कित्येक गुंतागुंतीची कारणे असतील. .......हा संप म्हणजे अनेक मुंबईतील कुटुंबांसाठी कर्दन काळ होता. आणि त्याहूनही मोठा तोटा म्हणजे यामुळे झालेले मराठी समाजाच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण :(.. इथे मुंबईतून जो मराठी माणूस उठला तो आजतागायत मुंबईत मान वर करून चालू शकलेला नाहि. ..... हे मात्र अगदी खरे, आणि जिव्हारी झोंबणारे..

इनोबा म्हणे 25/01/2008 - 11:13
हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद! माझे आजोबा यापैकी एका गिरणीत त्यावेळी कामाला होते. नुकतंच ऐकण्यात आले की, गिरण कामगारांना काही रकमेचं वाटप करण्यात आलंय. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमुळे काँग्रेस सरकारचा म्हणजेच गुजरात्यांचा कामगारांवर राग होता कारण ह्या गिरण कामगारांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत महत्वाची भुमिका बजावली होती,म्हणूनच महाराष्ट्र सरकारने १ मे म्हणजेच कामगार दिनी महाराष्ट्र राज्य स्थापनेची घोषणा केली होती. या कामगारांपैकी १०५ जण त्यावेळी काँग्रेस सरकारच्या जुलमी राजवटीमुळे हुतात्मा झाले होते,नंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुंबईत संयुक्त महाराष्ट्र स्मारक उभारण्यात आले. हे स्मारक म्हणजे कामगार पुतळाच आहे. कामगार आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळी संबंधी अधिक माहितीकरिता या संस्थळाला भेट द्या. संयुक्त महाराष्ट्र डॉट ऑर्ग (संतप्त) -इनोबा

झकासराव 25/01/2008 - 12:19
इथे लिन्क दिल्याबद्दल. मला ह्यातील काहीच माहिती नव्हते. बर झाल माहिती झाल ते. लेख वाचुन मन सुन्न झाल खरं. त्यातच काल "गंगुबाई नॉनमेट्रिक" मध्ये ह्याच विषयावर एपिसोड होता. दत्ता सामंतांची हत्या का झाली?? ह्याचे काही माहिती मिळेल का खरच??

याविषयी माहिती मला नव्हती या लेखामुळे आणि आपल्या प्रतिक्रिया वाचल्यामुळे खूप माहिती मिळाली. वाचून डोळ्यात पाणी येते तर जे यातून गेलेत त्यांच्या वर काय परिस्थिती ओढावली असेल?

सुनील 25/01/2008 - 21:07
लेख वाचून लगेच काही विचार मनात गर्दी करू लागले. तेच खाली मांडत आहे. कदाचित थोडे विस्कळीत वाटतील कारण जसे मनात आले तसे लिहित आहे. १) संपाचे टायमिंग - हे पार गंडले. जुनाट यंत्रसामग्रीवरील खर्च केव्हाच भरून निघाला होता आणि मालकवर्गाला आधुनिक यंत्रसामग्रीसह मुंबईत कारखाने अजिबातच चालवायचे नव्ह्ते. मुंबईबाहेर (आणि परराज्यात) अधिक स्वत जमीन आणि मजूरवर्ग उपलब्ध होता. डॉ. सामतांनी संप करून मालकवर्गाच्या हाती कोलीतच दिले, असे मला वाटते. २) पासष्ट गिरण्या एकाचवेळी बंद पडूनदेखील कोठेही कापडाचा तुडवडा भासला नाही की त्याच्या किमती अव्वाच्यासव्वा वाढल्या नाहीत. म्हणजेच, मुंबईत तयार होणार्‍या कापडाला लगेचच पर्याय उबलब्ध झाले (उदा. भिवंडी-मालेगावातील लूम्स). अशा परिस्थितीत गिरण्या पुन्हा सुरू होतील अशी आशा बाळगणे आणि त्याच्या अपेक्षेत वर्षानुवर्षे संप करणे व्यर्थच होते. ३) मुंबईतील जागांचे वाढते भाव लक्षात घेता, उद्योगनगरी म्हणून या शहराची ओळख पुसली जाऊन सेवादाती नगरी म्हणून आज ना उद्या होणारच होती. १९९५ नंतर, विक्रोळी ते मुलुंड आणि ठाण्यातील (वागळे, बाळकूम, बेलापूर रोड इ.) परिसरातील एकेक कारखाने बंद पडून तेथे कार्यालये, वसाहती टॉवर्स, मॉल्स आले. संप जरी झाला नसता तरी याच लाटेत कापड गिरण्यादेखील बंद पडल्याच असत्या. संपामुळे पुढचे मरण आधी आले इतकेच. ४) कामगार चळवळीचे नुकसान - या संपामुळे सर्वाधिक नुकसान कामगार चळवळीचे झाले. नवीन आस्थापनात कामगारांची युनियन उभी राहणारच नाही याची काळजी मालकवर्ग घेऊ लागला. त्यातून उभी राहिलीच तरी ती फारशी प्रबळ होणार नाही किंबहुना ती मालकवर्गाला धर्जिणीच राहील याचीही व्यवस्था होऊ लागली. टीप : डॉ दत्ता सामंत यांची हत्या ही प्रिमियर ऑटोमोबाईल मधील संपाच्या वादातून झाली, गिरणी संपावरून नव्हे. अवांतर : त्यांची हत्या पवईला झाली आणि त्यावेळी (सकाळी सुमारे ११ वाजता) मी विक्रोळी परिसरात होतो. सगळे व्यवहार धडाधड बंद झाले आणि मी ठाण्याला कसाबसा पोहोचू शकलो! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

संगीता 25/01/2008 - 21:22
ही माहिती इथे दिल्याबद्दल. वाचून अस्वस्थ झाले. या संपाची झळ पोह्चलेल्या कुटुंबातील एकाची ओळख झाली होती. त्यांच्याकडून थोडेफार कळाले होते. पण लेख वाचून त्यांच्या वर काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पना आली.

धनंजय 26/01/2008 - 01:59
या बातम्या ताज्या होत्या तेव्हा माझे वय लहान होते. वर्तमानपत्र कळू लागेपर्यंत ही बातमी चर्चेतून गळून गेली होती. तरी या इतिहासाबद्दल आणखी वाचलेच पाहिजे, अशी मला जाणीव होत आहे. या वादाच्या काळात शिवसेनेला प्रथम मुंबईत बळ मिळू लागले, त्यामुळे पुढील राजकारणासाठी, आणि समाजाच्या जडणघडणीसाठी ही घटना महत्त्वाची आहे. प्राजु, लेख इथे दिल्याबाबत धन्यवाद.

गिरणी कामगारांच्या संपाच्या वेळी आम्ही शाळकरी होतो. जुन्या खूप आठवणी जाग्या झाल्या. वरील लेखात त्या वेळच्या परिस्थितीचे सुंदर विश्लेषण केले आहे. प्रेषक "सुनिल" यांनीही छान मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या विचारांशी मी सहमत आहे. माझ्या मते या संपाच्या पराभवाचे आणिक एक कारण आहे आणि ते आर्थिक नसून सामाजिक आहे. ते म्हणजे या संपाला पांढरपेशा मराठी समाजाचा मनापासून पाठिंबा मिळाला नाही (संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मिळाला तसा). माझ्या मते याची कारणे अशी: १. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक तात्विक अधिष्ठान होते. ज्याला इंग्रजीमध्ये "लार्जर दॅन लाईफ" म्हणतात तसे. मराठी माणसाला मराठी राज्य नाकारल्याच्या अन्यायाचा संताप होता. त्या वेळी सगळा मराठी माणूस, मग तो साहित्यिक असो, कामगार असो, सचिवालयातील कर्मचारी असो वा रामा गड्याचे काम करणारा बाल्या असो, पेटून उठला होता. गिरणी संपाच्या वेळी मात्र अशी भावना नव्हती. हा संप फक्त गिरणी कामगारांच्या आर्थिक कारणांसाठी होता. अर्थात, उर्वरित मराठी समाजाची तरी तशी भावना होती. आणि हा उर्वरित मराठी समाजही कसेतरी जेमतेम भागवणाराच होता. तेंव्हा आर्थिक ओढगस्त या समाजाला नवीन नव्हती. त्याविरुध्द संप करायला पाहिजे अशी भावना नव्हती. "अंथरूण पाहून पाय पसरावेत" ही व्रूत्ती व शिकवण होती. २. वर वर्णन केल्याप्रमाणे कामावर जाणारया कामगाराचा पाठलाग करून लोकलमध्ये मारणे हे प्रकार नवीन होते. पूर्वी संप होत (गोदी कामगारांचा वगैरे), भाषणबाजी होई, मारयामारया वा डोकेफोडी ही होई, पण ती मिलच्या/ कारखान्याच्या गेटवर! पाठलाग करून एकट्यादुकट्या कामगाराला मारणे, त्याच्या कुटुम्बियांना धमक्या देणे हे प्रकार नवीन होते. या गुंडगिरीची एक दहशत निर्माण झाली. त्याचा परिणाम म्हणून "नकोरे बाबा यांच्या भानगडीत पडायला, त्यांचे ते बघून घेतील"ही भावना उर्वरित मराठी समाजात निर्माण झाली. संपकर्र्यांबद्दलची सहानुभूती नाहिशी झाली. ३. जसाजसा संप चिघळायला लागला आणि संपकर्यांची आर्थिक परिस्थिती खालावली, तसतशी घर चालवण्यासाठी पैसे उसने मागायचे प्रमाण वाढू लागले. आता मराठी गिरणी कामगार काय टाटा/ बिर्ला कडे उसने मागणार? ते इतर मराठी लोकांकडेच जाऊ लागले. तेंव्हा इतरांची स्थिती "माझं मला थोडं, आणि व्याह्याने धाडलं घोडं" अशी झाली. त्यातून मग, तिकडे गेटवर जाउन रग दाखवता आणि इकडे आमच्याकडे येवून भीड घालता, त्यापेक्षा चुपचाप कामावर का जात नाही? अशी मानसिकता निर्माण झाली. वरील सर्व कारणांचा परिणाम म्हणून इतर मराठी जनांच्या मनातून संप हळुहळु उतरत गेला. आता वरील विचारसरणी योग्य होती की अयोग्य हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो पण त्या वेळीतरी अशीच परिस्थिती होती. कुठ्ल्याही चळवळीचे यश हे ती लोकांच्या मनांत किती ताजी आणि जिवंत आहे यावर अवलंबून असते. गिरणी संपाच्या बाबतीत दुर्दैवाने याच्या उलट परिणाम साधला. डिस्क्लेमरः वरील लिखाणात गिरणी कामगार, त्यांचे नेते, कुटुंबिय वा अन्य कोणाबद्दलही अवमान करण्याचा हेतू नाही. आमचे अनेक नातेवाईक व स्नेही या संपामुळे देशोधडीला लागले होते. त्यामुळे त्यांच्या हालअपेष्टांबद्दल आम्ही पूर्ण परिचय आणि सहानुभूती बाळगतो. इतकी वर्षे झाल्यानंतर केवळ एका विचक्षण नजरेने त्या घटनेचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला आहे. तेंव्हा, चू. भू. द्या. घ्या.

समाजवादी आहे. हे सर्व घडत असतांना मी ३१वर्षांचा होतो. माझ्या ओळखीचे कुणी संपात नव्हते. पण एक संस्कृती नष्ट होत असतांना पाहिल्याचे आठवले आणि ती अस्वस्थता पुन्हा अनुभवली.

अमर 28/01/2008 - 14:57
ह्य फक्त आथ्वनि आइक्ल्या आहेत माझ्य वदिलन कदुन ते देखिल एक उनिओन चे कर्य्कर्ते होते ह लेख त्यन्च्य सथि प्रिन्त करुन घेवुन जातआहे

पुण्यातल्या बजाज ऑटोचे पण तेच होणार आहे. तिथे सॉफ्टवेअर पार्क होणार. कामगारांची (विल्हे)वाट लावणार. पिवळा डांबिस व सुनिल यांनी केलेले विश्लेषण अधिक भावते. समाजतील आर्थिक स्तरातील ही जीवघेणी दरी गुन्हेगारीकडे , अराजकतेकडे नेणारी आहेत. शिका. संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांचा मंत्र पुन्हा एकदा नव्याने जपावा लागणार आहे. सामाजिक जाणीव असणारे श्रीमंत उद्योगपती ही दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करु शकतात. प्रकाश घाटपांडे

In reply to by आशु जोग

सिनेमा एवढा प्रभावी नाहीं ,आपण हा सिनेमा ज्या नाटकावरून बेतला आहे ते अंधातर नाटक आंजा वर आहे ,ते जरूर पहा. गिरणीत नोकरी ही आपली पिढ्यानपिढ्या ची मक्तेदारी आहे , किंबहुना गिरणी ही आपली रोजी रोटी चालविण्यासाठी सेठिया लोक चालवतात अशी काहीशी मते ह्या कामगारांची असावी. गिरणी मुंबईत चालविण्यापेक्षा ती गुजरात धंदा स्वस्त होता. आजच्या काळात ऑउत सोर्स जसा लोकमान्य शब्द आहे तसा त्या काळात नव्हता , कामगारांना समाजवादी त्यांना बहिर्वक भिंगातून त्यांची शक्ती दाखवत होते. दुर्दैवाने गिरणी चालवणे जर मालकांना शक्य नसेल तर त्यावेळी आपण पर्यायी उपाय योजना केल्या पाहिजे , शिकले पाहिजे वेगवेगळ्या शेत्रात उतरले पाहिजे. असा विचार केला नाहीं , ज्या काळात संप होऊन खंगून हे कामगार मारत होते तेव्हा परप्रांतीय नेसत्या वस्त्रानिशी ह्या शहरात येउन आपले बस्तान बसवत होते. फळ विकणारा पुढे ह्या शहरात मंत्री झाला. कारण त्याला त्याच्या लोकांचा पाठिंबा होता. माझे वडील चुनाभट्टी च्या प्रभागात होते. तेव्हा तेथील तलावात आठवड्याला एक आत्महत्या पाहून कळवळून त्या कामगारांना सांगायचे ,तुमच्या घरातील घरटी एक माणूस गिरणी बाहेर नोकरी करू दे म्हणजे सारे घर गिरणीवर अवलंबून नको. गिरणी म्हणजे सरकारी नोकरी नव्हे, ज्या काळात अनेक घरातून महिला नोकरी करायला लागल्या तेथे त्यांच्या कुटुंबाला एकाच पगार पुरणार नाहीं हे ध्यानात यायची बुद्धी होती. मात्र बायकांनी नोकरी करणे ह्या कामगारांच्या घरात चालत नव्हते. त्यामुळे एक कमवता माणूस संपामुळे घरी बसला तेव्हा सर्व कुटुंब उपाशी पडले. त्यांना मार्गदर्शन करणारा योग्य नेता नव्हता हे त्यांचे दुर्दैव ज्या काळात सुशिक्षित माणसे पदवीधर असून बेरोजगार होती. त्या काळात कसेबसे दहावी पर्यंत शिकून पुढे गिरणीत रुजू होणे एवढेच माहित असलेल्या ह्या कामगारांना योग्य मार्गदर्शन करणारे भेटला नाहीं ,आहे धीरु भाईला समस्त गुजराती समाज मानतो कारण त्यांच्यातील उद्योजक अंबानी ह्यांनी स्वतःच्या उदाहरणाने जागवला. असा एक धीरु भाई मराठी माणसात निर्माण व्हायला पाहिजे होता.

आदूबाळ 07/04/2013 - 00:03
जोगसाहेब, हा धागा वर काढल्याबद्दल तुमचे अनेक आभार. सुनील आणि पिडांकाका यांच्या प्रतिक्रिया म्हणजे एखाद्या घटनेचा अनुक्रमे स्थूलार्थशास्त्रीय (macro economics) आणि समाजशास्त्रीय पद्धतीने कसा आढावा घ्यावा याचा वस्तुपाठ आहेत. काही दिवसांपूर्वी "गिरणगावाचा मौखिक इतिहास" नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. या इतिहासाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे.

मैत्र 07/04/2013 - 12:20
अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा धागा.. वर आणल्याबद्दल धन्यवाद. या तपशीलांची काहीच माहिती नव्हती आणि परिचयात कोणीही या ताणातून आणि अनुभवातून गेलं नाही त्यामुळे जाणीवही नव्हती.. तांत्रिक आणि औद्योगिक बदल, मोठ्या परिमाणातले बाह्य पुनर्र्चनात्मक बदल समाजाच्या रचनेवर खूप दूरगामी परिणाम करतात.. त्याचं मोठं उदाहरण. विशेषत: अनुभवी लोकांनी लिहिल्याप्रमाणे कौशल्याचा अभाव, इतर पर्यायांचा अभाव.. कदाचित हे पुढे मागे आपो आप घडलंही असतं पण हे असं तुंबलेल्या, मारहाणीमुळे एकट्या पडलेल्या असहाय्य संपातून घडलं त्यामुळे मानसिक खच्चीकरण जास्त झालं असावं.. अवांतरः भय्या बिहारींना नावं ठेवून काही उपयोग नाही. ते या परिस्थितीत येऊन राहिले आणि सर्व हाल सोसून कमी पैशात कामे आनंदाने करत अजून भाईबंद आणत राहिले कारण त्यांच्यासाठी हे आयुष्य त्यांच्या राज्यात / गावात असलेल्या उपासमारी आणि गुंडगिरीपेक्षा सुसह्य होतं.. आणि आजही आहे.

आशु जोग 07/04/2013 - 13:47
आमच्या अंदाजाप्रमाणे सरकारने गिरणीमालकांना नाममात्र भाड्याने या जागा दिल्या होत्या ९९ वर्षाच्या कराराने जेणेकरून हे लोक रोजगार निर्मिती करतील. आज गिरणी बंद करून टॉवर उभे करत आहेत, पण ही जागा त्यांच्या बापाची नाही. हे सरकारने त्यांना सांगायला हवे होते.

In reply to by आशु जोग

ह्याच.भव्य मिल मध्ये वरळीच्या श्रीराम मिल मध्ये एस कुमार चे मालकांनी भली मोठी जागा तीही मोक्याची विनायसे हातात आल्याने एका मोठा डिस्को ठेक कम स्टुडीयो उभारला. मिलचा प्रचंड मोठा परिसर त्यांच्या आता गंजलेली मोठी यंत्र सामग्री व त्याच्या पार्श्वभूमीवर एका मोठा बंदिस्त नाईट क्लब ज्यात शनिवारी रात्री मुंबई मधील किमान २००० लोक आपली रात्र साजरी करत. व सकाळी ह्या मोठ्या जागेत बॉलीवूड च्या अनेक गाण्याची शूटींग होत. परदेशात शिकायला जाण्याच्या काही महिने अवधी असतांना दोन महिने मी तेथे कार्यरत होतो. काटे मधील इशा कोपीकर च्या गाण्याचे व अश्या अनेक गाण्यांची शूटींग तेथे मी दोन महिन्यात पहिली. सांगायला एक किस्सा म्हणजे काटे मधील गाण्याच्या शूटींग च्या वेळी शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रोडक्शन मधील माणूस माझ्या मित्राकडे आला व गाण्याच्या शेवटच्या काही सेकंदात नाईट क्लब चा फील यावा म्हणून मला बाटल्यांचे फ्लेअरिंग करायला सांगितले ,त्याच्याबद्दल रोख काही पैसे दिले. व ,त्याचा चांगला क्लोजअप येईल असे सुध्धा आमिष दाखवले. पुढे हा सिनेमा भारतात प्रदर्शित झाला तेव्हा त्यांची डीवीडी विकत घेऊन युके मध्ये मोठ्या कौतुकाने मला पाहणासाठी त्या गाण्याची वाट पाहत होतो. पण त्यात त्याचा क्लोज आप अजिबात दिसला नाही. ह्या दोन महिन्यात तेथे क्लब मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून बी टी टि चाळी मधील मराठी मुलांना नोकरी , तसेस , महिलांना व इतर अनेकांना त्या निमित्ताने रोजगार मिळाला. ह्यातील ती जण व्यावसायिक बॉडी बिल्डर होते. त्यांच्या सोबत नेहमीच चाळीत जायचो.त्यातला एका म्हणाला होता माझा बाप येथे काम करायचा ,आता मी करतो फरक एवढाच की तो घाम गाळायचा ,मला तो गाळावा लागत नाही. कारण वातानुकुलीत क्लब मध्ये बाउन्सर्स असल्याने त्यांच्या खुराकापासून सगळी काळजी येथे घेतली जात. येथे अति शहाणपणा करणाऱ्याला त्याची सामाजिक पत विचारात न घेता बकोटीला धरून बाहेरचा रस्ता दाखवणे एवढे त्याला काम होते. त्यातल्या त्यात इंग्रजी बर्‍यापैकी येत असल्याने त्याला आठवड्याला कितीतरी फोन नंबर दिले जायचे, त्यापैकी किती ठिकाणी तो घाम गाळून यायचा ह्याबद्दल सुरस कथा ऐकायला मिळायच्या. अश्या कामगाराचा मुलगा तो , शारिरीक श्रम त्याला चुकले थोडेच होते. त्यांच्या घरी अनेकदा जाणे व्हायचे. गतकाळाच्या जखमा भरून आल्याच होत्या असे नाही , मात्र मुंबापुरीत नव्याने अनेक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या हो त्या. चाळीत मुलांना मुलांना कामे मिळाल्याने भाईगिरी थंडावली होती. कासलीवाल हे एस कुमार चे मालक त्यांची बायको म्हणजे सुरज बडजात्या ची बहिण म्हणून बॉलीवूड वाले येथे शुटींग साठी येत. ह्या लोकांनी सरकारला हाताशी धरून जमिनी जवळ जवळ गिळंकृत केल्या. आता निदान गिरणी कामगाराला ह्याच जमिनींच्या वर कायम स्वरूपी घरे मिळाली पाहिजे अशी आशा करतो. फुकटात जमिनी सरकारशी संगनमत करून लाटल्या. सरकारला ह्या कामगारांना आता फुकटात घरे द्यायला काहीच हरकत नसावी. दुर्दैवाने मराठी माणसाची अस्मिता जागवणारे नेत्यांना गिरणगाव व गिरगाव भगव्या खाली आणता आला पण गिरणगावात व गिरगाव मध्ये मनोमिलन घडवून आणणे शक्य झाले नाही , गिरगाव हळूहळू ठाणे ,पार्ला, डोंबिवली , बोरेवली मध्ये अंतर्धान पावला. त्याला गिरणगावाची दशा दृष्टी आड सृष्टी झाली.

यशोधरा 07/04/2013 - 13:53
अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा धागा.. वर आणल्याबद्दल धन्यवाद. या तपशीलांची काहीच माहिती नव्हती आणि परिचयात कोणीही या ताणातून आणि अनुभवातून गेलं नाही त्यामुळे जाणीवही नव्हती..
असेच म्हणते.

याच विषयावर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती "Tale of two cities" नावाची. भय्ंकर अस्वस्थ करणारा अनुभव आहे. नेमकी अत्ता त्याची लिंक सापडत नाही. त्यात शेवटी एक गाणे होते बदली बदलीसी सुरत है भाई, ये बंबई की सुरत है भाई मील तोडके बनाये टॉवर, टॉवर बनेहै सुपर पॉवर, सुपर पॉवर के सुप्रीमो भाई, इंटर नेट पे बैठे है भाई, जंबो जेट पे बैठे है भाई, जंबो जेट पे बैठे है भाई, खाली पेट हम बैठे है भाई, फॅक्टरी गेट पे बैठे है भाई, असे बरेच काही त्या गाण्यात होते. कोणाला सापले तर प्लीज लिंकवा,

नितिन थत्ते 07/04/2013 - 18:16
धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. दत्ता सामंत यांच्या दहशतीशिवाय इतर कारखान्यांतील संपांमध्ये त्यांना मिळालेले नेत्रदीपक यश हे या संपात गिरणीकामगार त्यांच्या पाठीशी जाण्याचे मुख्य कारण होते. "सामंत संप करून भरघोस फायदा करून देतात" अशी प्रसिद्धी होती. काय घडत आहे/घडले आहे याचा गिरणगावातल्या लोकांना खूप काळपर्यंत पत्ता लागला नव्हता. १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत इंदिराहत्येमुळे आलेल्या सहानुभूतीच्या लाटेत ४८ पैकी केवळ पाच जागा काँग्रेसने गमावल्या होत्या त्यातली एक गिरणगावातली जागा होती. दत्ता सामंत तेथे निवडून आले होते. म्हणजे १९८२ ला सूरुवातीस चालू झालेला संप फसला आहे हे गिरणगावातल्या कामगारांना १९८४ च्या अखेरीसही कळले नव्हते. आंदोलक आणि भविष्य मी लिहिले तेव्हा हा धागा वाचलेला नव्हता. अवांतर : वर्किंग कंडिशनची भरपाई पैशाने करण्याची सुरुवात सामंत यांच्याकडून झाली असे वाटते. आमच्या कारखान्यात काही हॅझार्डस काम करणार्‍या कामगारांना दिवसातून दोन वेळा दूध प्यायला दिले जाई. त्या कामाच्या हॅझार्डवर (Exposure to some chemical fumes) दूध पिणे हा उपाय असावा. सामंतांच्या काळात "दूध देऊ नका... त्या ऐवजी अमूक रुपये जास्त पगार द्या" अशी मागणी कराराच्यावेळी केली गेली असे आठवते. युनियनने वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी न भांडता केवळ पैशासाठी भांडणे ही संकल्पना सामंतांनी आणली.

In reply to by नितिन थत्ते

नाना चेंगट 07/04/2013 - 23:00
>>युनियनने वर्किंग कंडिशन सुधारण्यासाठी न भांडता केवळ पैशासाठी भांडणे ही संकल्पना सामंतांनी आणली. माझ्या मते ७०च्या दशकातच सर्व गोष्टी पैशात तोलणे आणि पैसा हेच सर्वस्व मानणे सुरु झाले होते. त्यामुळे अमुक साधने उपलब्ध करुन देण्याच्या मागणीपेक्षा दोन पैसे जास्त मिळवून आपली घरातील चणचण दूर करावी असा विचार सामान्य माणसे आणि पैसे फे़कून काम करुन घेऊ असा श्रीमंत माणसे विचार करायला लागली असावीत. ९० च्या दशकातील उदारीकरणाने ही भुमिका अजून स्पष्ट आणि रौद्र रुप धारण करती झाली असावी.

आशु जोग 07/04/2013 - 23:37
> माझ्या मते ७०च्या दशकातच सर्व गोष्टी पैशात तोलणे आणि पैसा हेच सर्वस्व मानणे सुरु झाले होते. अमिताभच्या पिच्चरममुळे झालं हे ७० च्या काळात

In reply to by आशु जोग

नाना चेंगट 07/04/2013 - 23:56
असहमत. चित्रपटांपासून आर्थिक सामाजिक परिणाम एवढे होत नाहीत. ७० च्या दशकात अमेरीकेने गोल्ड स्टँडर्ड रद्द केले त्यामुळे महागाईचा डोंब उसळला. जगभर जास्तीत जास्त पैसा मिळवणे हे जगण्यासाठी आवश्यक झालं.लोकसंख्या बेसुमार वाढत चालल्याने अन्न महाग झालं. दुष्काळ वगैरे इतर पैलू सुद्धा त्यात येतात. असा बहुआयामी प्रभाव या कालखंडावर आहे. केवळ बच्चनचा काही प्रभाव नाही. असेल तर त्याने फक्त जे आहे ते पडद्यावर दाखवले.

In reply to by आशु जोग

१९७१ नंतर अमेरिकेने आपली आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली. ह्यामुळे भारतात हळू हळू बेरोजगारी वाढू लागली. समाजातील तरुणाई मध्ये असलेला हा रोष ,खदखद सलीम जावेद ने हेरला. व पडद्यावर अँग्री यंग मेन सादर केला अमिताभ च्या यशात ५० टक्के त्यांची मेहेनेत , व २५ टक्के तत्कालीन परिस्थिती व २५ टक्के त्या परिस्थिती नुसार कथा लिहिणारे सलीम जावेद ला जाते. ९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतातील आर्थिक स्थिती बदलली व ९० च्या दशकात चोप्राने अनिवासी प्रेम कथांची चक्की उघडली त्यात जोहर , कुणाल कोहली ह्यांनी आपापले पीठ दळून घेतले.

In reply to by निनाद मुक्काम …

नाना चेंगट 08/04/2013 - 08:56
>>९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतातील आर्थिक स्थिती बदलली हे वाक्य ९१ च्या आर्थिक उदारीकरणाने भारतातील काही जणांची आर्थिक स्थिती बदलली असे केल्यास जास्त योग्य होईल. सरकारी सरासरीने जरी गरीबांची संख्या कमी झाली असली तरी त्यामधे दारिद्रयरेशा काय स्तरावर मानली जावी हा भाग मोठा रंजक आहे. चलनवाढ आणि महागाई निर्देषांकाला अनुसरुन ती काढली जात नाही. तसेच एकंदर कर्जबाजारी असण्याचा आणि त्यामुळे आत्महत्यांचा वाढता आकडा उदारीकरणाची फळे आहेत का असा विचार मनात नक्कीच येतो.

In reply to by नाना चेंगट

नितिन थत्ते 08/04/2013 - 21:17
>>दारिद्रयरेशा काय स्तरावर मानली जावी हा भाग मोठा रंजक आहे. चलनवाढ आणि महागाई निर्देषांकाला अनुसरुन ती काढली जात नाही. दारिद्र्य रेषा कशी ठरते तिचे निकष काय असतात याबद्दल काही ठोस माहिती मिळाली तर हवी आहे. वाटल्यास वेगळा लेख लिहावा अशी विनंती. (दारिद्र्य हे रंजक नसले तरी रंजक माहितीच्या अपेक्षेत)नितिन थत्ते

In reply to by नाना चेंगट

नाना चेंगट यानी पिंका टाकायचा आपला प्रन फारच गंभीरपणे घेतलेला दिसतोय. आता बष्काळ विधान केलेच आहे तर स्पष्टीकरण दिले तर उपकार होतील

In reply to by पिंपातला उंदीर

नितिन थत्ते 08/04/2013 - 22:11
दारिद्र्यरेषा काढण्याची पद्धत विषद करण्याची विनंती फक्त नाना चेंगट यांच्यासाठी नाही. जे कोणी 'सरकारी दारिद्र्य रेषा ही योग्य प्रकारे ठरवलेली नसते' असे मानतात त्या सर्वांसाठी ती विनंती आहे.

In reply to by नितिन थत्ते

नाना चेंगट 09/04/2013 - 09:06
तुम्ही जर ' 'सरकारी दारिद्र्य रेषा ही योग्य प्रकारे ठरवलेली असते' असे मानत असाल तर तुम्हीच तसा लेख लिहावा. :)

In reply to by पिंपातला उंदीर

नाना चेंगट 08/04/2013 - 22:57
माझे विधान बाष्कळ आहे हे ज्या गृहितकांच्या आधारे आपण म्हणत आहात त्याचाच आधार घेउन माझे विधान आधी खोडून काढले तर उपकार होतील.

राही 08/04/2013 - 12:42
आता जाणवते की या संपाचे काही फायदेही झाले. 'चार आळशी भाऊ आणि परोपकारी शेजारी' या कथेतल्या शेजार्‍याने जसे त्या भावंडांना आळशीपणाने जगू देणारे शेवग्याचे झाड कठोरपणाने तोडून टाकून त्या मुलांना हातपाय हलवण्यास भाग पाडले तसे या संपाने चाकरमान्यांचे झाले. जगण्याचे अन्य पर्याय त्यांना सक्तीने शोधावे लागले. काही जणांनी कोंकणात परतून पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या.काहीनी मुंबईतच कूरिअरसेवेत नोकर्‍या धरल्या. (तेव्हा ही सेवा काही एका छोट्या वर्गापुरतीच मर्यादित होती. अंगडियाप्रमाणे.)काही शेअरबाजारात हरकामे म्हणून लागले. ही कामे श्रमाची आणि तोकड्या कमाईची होती हे खरे पण त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व विस्तृत झाले.गिरणगावाबाहेरच्या संधी त्यांना दिसू लागल्या. प्रेमाताई पुरवांसारख्यांनी कम्यूनिटी किचन संकल्पनेद्वारे अनेक गृहौद्योगांना चालना दिली. स्त्रीशक्तीचा अर्थार्जनासाठी वापर वाढला. एक पिढी बरबाद झाली खरी पण पुढच्या पिढीचा फायदा झाला. कोंकणाकडे जाणारा मनीऑर्डरींचा ओघ आटला पण स्वयंरोजगाराचा नवीन स्रोत मिळाला. त्याच सुमारास फलोद्यान योजनाही आली. तिच्या सहायाने आंबा, काजू, नारळ, मसाल्याची झाडे यांच्या नवीन लागवडी झाल्या.त्यांची फळे वीस वर्षांनंतर पुरेपूर मिळू लागली. आज कोंकणाचा कायापालट होऊ घातला आहे त्याचे एक कारण हा संप आहे.वर मुक्तसुनीतांनी आणि सुनील यांनी म्हटल्याप्रमाणे या संपाला पांढरपेशांचा पाठिंबा आणि सहानुभूती नव्हती. तो हळू हळू बारगळत गेला तेव्हा कोणी फारसे अश्रू ढाळले नाहीत. तेव्हाच्या बातमी-दुष्काळाच्या काळातही त्याची बातमी झाली नाही. याच सुमारास आणखी एक महत्त्वाची गोष्ट मुंबईत इतरत्र घडत होती. मुंबईतला औषधनिर्मिती उद्योगही या काळात बंद तरी पडत होता किंवा स्थलांतरित तरी होत होता. ग्लॅक्सो, जर्मन रेमिडीस, बरोज वेल्कम अशा अनेक कंपन्यांनी मुंबईतले उत्पादन थांबवले,स्थावर विकून टाकले.पण या क्षेत्रात पगार भरपूर होते त्यामुळे शोषणाचा मुद्दा लावून धरण्याजोगी परिस्थिती नव्हती. कडवी डावी सर्वंकष युनिअन सुधा नव्हती. नोकरलोकांना घसघशीत सानुग्रह रक्कम मिळाली आणि ते गप्प बसले. काहींनी छोट्या सदनिकांमध्ये गुंतवणूक केली आणि त्यांचे भाडे खात राहिले. हा पांढरपेशे आणि कष्टकरी या मधला फरक होता. असो.

उपास 09/04/2013 - 01:21
लहानपणी ह्या संपाविषयी भरपूर उलटसुलट वाचनात यायचं. पद्धतशीर पणे संप आणि कामगार दोन्ही मोडून काढण्याचं हे उदाहरण ठरावं, झालं ते वाईटचं पण वरती अनेकांनी म्हटल्याप्रमाणे 'तुटेपर्यंत ताणल्याने' गिरणीकामगारांनि सहानुभूती गमावली, दोष नेतृत्वाकडेच जाणारच अशावेळी. मिल बंद पडल्यामुळे जी मध्य आणि दक्शिणमध्य मुंबईतली कुटुंब देशोधडीला लागली, त्यातून गुन्हेगारी विश्वालाही बरीच तरुण मुलं मिळाली. पैसा काय चीज आहे, उपासमार काय असते हे मुंबईतल्या ह्या वर्गाने अगदी जवळून अनुभवलं. लेख वाचताना गिरगावतलं लहानपण, गिरणगावातले मित्र सगळं झर्रकन डोळ्यासमोर आलं. अत्ता सुद्धा गिरणीकामगारांना जागा द्याव्यात की कसे अशा चर्चा रंगतात तेव्हा खरं काय ते कळत नाही. कामगारांनी जिथे काम केलं तेथील जागेवर मालकी हक्क सांगावा हे पटत नाही. त्या धनदांडग्यांना (ह्या शब्दाच्या अनुचित आणि उठसूठ वापरामुळे मराठी समाजाचं फार नुकसान झालं असं माझ वैयक्तिक मत आहे) मिळू नयेत हे जितकं खरं आहे तितकच त्या सरकारकडे राहाव्यात असं वाटतं.

गजानन५९ 25/11/2013 - 12:12
धागाकार्त्यांना व संपादक मंडळाला एक विनंती होती कि हा लेख मी माझ्या मेल मधून इतरांना पाठवला तर चालणार आहे का ? ( अर्थात लेखकाच्या नावासकट ) या मागचा हेतू इतकाच कि या सर्वांची वेदना इतरांपर्यंत निदान फोचावण्याचे काम केल्याचे निदान समाधान तरी लाभेल. :(

वरिल संजय अभ्यंकर , सुनिल लेखाचे प्रतिसाद पट्तात. माझे वडिल सुद्धा तेव्हा कळव्यातील मफतलाल गिरणीत कामाला होते. तिथे संप १९८६ ला झाला. तेव्हा आम्ही भावंडे ९,१० वी त शिकत होतो. बेकारीचे चटके अनुभवले. रोज केळ्यचे शिकरण आणि चपाती. १९८६ एप्रिल महिन्याच्या पगार सुद्धा कंपनिने अजुन दिलेला नाही.वडील रोज गेट वर जावून काय झाले हे पाहत होते. खूप मारामारी झाल्या. पुढे ही केस मुंम्बै कोर्टात २ वेळा तर सुप्रिम कोर्टात सुद्धा कामगारांच्या बाजूने निकाल लगला. पण काहीच उपयोग झाला नाही. आमची आइ मोठ्या धीराची तिने लगेच लहान मुलांना सांभाळायला सुरुवात केली. वडील सुद्धा काही न काही कामे बेलापूर पट्यात शोधू लागले. माझा भावू पेपर टाकू लगला.(आत्त पर्यंत २२/२३ नोकर्या झाल्यात त्याच्या) पुढे इलेक्ट्रिशियन झाला. मी पुढे १२ वी नंतर office Asst. ची मुंबई त नोकरी शोधली. पुढे आमच्या समोर राहणारे शेजारी यांच्या मदतीने त्यांच्या कंपनीत Rs.३५०/- पगारावर Apprenticeship केली. पण पक्की नोकरी कुठेच नाही. कारण शिक्षण अर्धवट राहिले. आता त्या मफतलाल कंपनीच्या आतील मशिनी मात्र गंजल्या आणि बाहेरच्या जागेत सगळे बाहेरगावाचे १८ पगड जातीचे लोक येवून जागा बळकावून राहिले आहेत. अनाधिक्रुत झोपड्पट्टी आणि नुसती दादागिरी चाललिये. कधी म्हणतात कि हि जागा विकून कामगारांचे पगार देणार आहेत तर कधी म्हणतात कामगारांसाठी इथेच घरे बांधणार आहेत. कसचे काय. आम्ही आशा सोडुन दिली आहे. सध्या जे चाललंय ते बरे म्हणायचे अणि दिवस ढकलायचे. वर राही यांनी सांगितल्या प्रमाणे जगण्याचे अन्य पर्याय सक्तीने शोधावे लागले हेच खरे.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला हा लेख मनाला भिडला. ७९ साली जन्मलेल्या मला यातील काहीच कल्पना नव्हती. फक्त दत्ता सामंत यांच नाव कधितरी कानावर पडलं होतं. पण या लेखाने मन हेलावून गेलं. डॉ. दत्ता सामंत प्रणित मुंबईच्या गिरणी संपाला यावर्षीच्या १८ जानेवारीला पंचवीस वर्षं पूर्ण झाली. ६५ गिरण्यांतल्या अडीच लाख कामगारांनी या संपात भाग घेतला होता. या संपाची संपूर्ण जगाने नोंद घेतली. अधिकृतपणे हा संप आजही मागे घेतलेला नाही. अनेक कामगारांना उद्ध्वस्त करणारा आणि कामगार संस्कृतीला ग्रहण लावणारा हा संप त्यामुळेच ऐतिहासिक ठरतो.

खराखुरा पीजे !! ऐकावं ते नवलचं !!!

सुनील ·

प्राजु 24/01/2008 - 23:45
मज्जा आहे देवांची हि आणि त्या न्यायाधिश महराजांची ही... - प्राजु

ऋषिकेश 25/01/2008 - 00:28
या बातमीत हे अगदी सार्थ आहे. भरपूर हसु आलं आनि कीवही कराविशी वाटली. असो. अवांतरः ऐकावं ते नवलच! अश्य नावाचं एक सदर एका मासिकात असायचं ... 'ठक् ठक् ' का? -(जुना 'ठक् ठक्' प्रेमी)ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सुनील 25/01/2008 - 00:58
मलाही निश्चित आठवत नाही पण ते कुठल्याशा वृत्तपत्राचे व्यंगचित्राचे शीर्षक होते असे वाटते. जसे - कसं बोललात (मटा). कदाचित जुन्या लोकसताचे? Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सुनील 25/01/2008 - 01:05
राम आणि हनुमानाचा पत्ता आम्हाला ठाऊक नाही हे खरेच! परंतु, सांता क्लॉजला हा प्रश्न पडणार नाही, त्याचा पत्ता आहे - सांता क्लॉज नॉर्थ पोल कॅनडा H0H 0H0 टीप - या पत्त्यावर दरवर्षी हजारो पत्रे कॅनडाच्या पोस्ट कचेरीत येतात!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

इनोबा म्हणे 25/01/2008 - 01:14
आजकालच्या न्यायव्यवस्थेत 'राम' राहिलेला नाही. कोण कोणाच्या नावाने समन्स काढेल काही सांगता येत नाही. साधारणपणे एक वर्षभरापुर्वी कोणा एका जॉर्ज बुश नामक पामराने आमच्या नावाचे समन्स काढले होते. (दाम करी काम,झोपा काढी राम) -इनोबा

धनंजय 25/01/2008 - 01:21
हा अतिरेक झाला, पण कायद्याच्या बाबतीत हा गंभीर मुद्दा आहे. अनेक वेळा इतका मूर्खासारखा समन्स न काढता हाच विचार कायद्याला करावा लागतो. पुरातन श्रद्धास्थानाच्या स्थावर (आणि जंगम) मालमत्तेची मालकी कोणापाशी असावी? कोणा व्यक्तीची असू नये असे काही लोक म्हणतात - म्हणजे काशीविश्वेश्वरासारखे अति-पुरातन मंदिर त्याच्या हल्लीच्या पुजार्‍यांच्या मालकीचे नसावे. त्यासाठी ट्रस्ट केले तर? पण ट्रस्ट हे आताच तयार झालेले आहे, त्या मालमत्तेची मालकी असलेले कुठलेतरी एकक आधीपासून आहे असे मानावे लागेल. ट्रस्ट त्या खर्‍या मालकाचे केवळ विश्वस्त आहे - मालक नव्हे. ते एकक म्हणजे भक्तगण तर नाहीतच. प्रत्येक देवळाच्या महत्त्वाच्या निर्णयांबाबत मते घेण्यासाठी त्याच्या भक्तांची जनगणना घ्यावी लागेल! विठोबाच्या देवस्थानावर वारकर्‍यांची आणि विठोबाचे नावही माहीत नसलेल्या झुमरीतलैयामधील कोण्या ऐर्‍यागैर्‍याची समसमान मालकी असावी काय? मग महत्त्वाच्या निर्णयासाठी झुमरीतलैयात मतपत्रांचा गठ्ठा का पाठवू नये - नाही पाठवल्यास ती हक्कांची पायमल्ली होईल - छे छे - भक्तांची देवस्थानाच्या स्थावर-जंगम मालमत्तेवर मालकी अव्यवहार्य आहे. अर्थातच खरा मालक म्हणजे ते-ते विशिष्ट दैवत हेच आहे. अमेरिकेत "एपिस्कोपल" नामक ख्रिस्ती पंथ फुटण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. आज या पंथात फार लोक नसले, तरी पूर्वी खूप होते. त्यामुळे या पंथाकडे बरीच मालमत्ता आहे, प्रार्थनास्थळे समृद्ध आहेत. ही मालमत्ता कित्येक पिढ्यांची आहे - म्हणजे आजच्या भक्तांची नाही. ट्रस्ट फुटत असल्यामुळे कायदेशीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ती मालमत्ता आपली नसून देवाची/पंथाची आहे, आपण केवळ विश्वस्त आहोत, असे दोन्ही गट मानतात. पण प्रत्येक फुटीर गट स्वतःला खरा, आणि दुसर्‍या गटा "चुकलेला" मानतो. म्हणजे "देवाचे प्रतिनिधित्व करण्यास दुसर्‍या गटातील विश्वस्त योग्य नाहीत" असे प्रत्येक गट मनापासून मानतो. ही फूट खरीच पडली तर "खर्‍या देवाच्या" मालकीहक्काच्या प्रश्नात कोर्टाला शिरावे लागेल. पंथ फुटू नये असे वाटणारे भक्त (ज्यांना धर्मगुरूंचा तंटा बाष्कळ वाद वाटतो) गमतीने म्हणतात की या कायदेशीर दलदलीच्या भीतीने तरी फुटीर गटांनी समेट करून घ्यावी. तात्पर्य हे उदाहरण हास्यास्पद असले तरी कमीअधीक अशीच उदाहरणे अनेक देवस्थानांबाबत वादग्रस्त आहेत. काहीच्या बाबतीत (भारतातही) हास्याच्याच नव्हे तर रक्ताच्याही चिळकांड्या उडालेल्या आहेत.

दिसते. कितपत सत्य आहे कोण जाणे. पत्रकारांना पुरावा देण्याचे बंधन नाही. जर खोटी असेल तर कोर्टाची बीबीसी वर बदनामीचा खटला घालण्याची हिंमत आहे का? कोर्टे तर सामान्यांना शिक्षा करण्यात व गुन्हेगारांना मोकळे सोडण्यात पटाईत आहे असे ऐकून आहे. म्हणून तर अशा बातम्या छापून येतात.

झारखंडच्या एका न्यायाधिशाने राम आणि हनुमान यांच्या विरुद्ध समन्स काढले. अपूर्ण पत्यामुळे ते परत आले तेव्हा त्यांनी स्थनिक वृत्तपत्रात जाहिरात देऊन राम आणि हनुमान यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले!!! हा पहा दुवा - बातमी

एक सूचना...

सरपंच ·
एक विनम्र सूचना... मिसळपाववरील ज्या मंडळींचे लॉगईन आयडी रोमन अक्षरात असतील त्यांनी कृपया ते बदलून देवनागरीत करावे, ही विनंती... धन्यवाद, आपला नम्र, सरपंच.

पहिले जागतीक(ऑनलाईन) मिसळपाव साहित्य संमेलन

इनोबा म्हणे ·

ऋषिकेश 24/01/2008 - 21:28
हे फार आवडलं.. सहमत आहे. फक्त एक सुचना क्र.४ बद्दल ४)दिग्गज ग्रामस्थांकडून या साहित्याचे परीक्षण करुन त्यानुसार त्यांना गुण देण्यात यावेत. या ऐवजी मते नाहि का घेता येणार. परिक्षक फक्त प्रत्यक गटात ५ नॉमिनेशन्स घोषित करतील व त्यातील विजेते मात्र सगळे गावकरी मिळून ठरवतील. आणि हे संमेलन आठवडाभर चालून त्याची सांगता पुण्याला होणार्‍या प्रत्यक्ष संमेलनात करता येईल. काय म्हणजे जे भेटु शकतात ते भेटतीलच पण आमच्या सारख्या दूरस्थ गावकर्‍यांनाही सहभागी होता येईल -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

इनोबा म्हणे 25/01/2008 - 00:28
तुमच्या सुचनांबद्दल धन्यवाद! या ऐवजी मते नाहि का घेता येणार मते घेण्याची कल्पना चांगली आहे,पण मते घेण्यात एक अडचण आहे;बरेचसे सदस्य एकावेळी अनेक सदस्यनामांचा उपयोग करतात. काही सदस्य आपल्या साहित्याला प्रथम क्रमांक मिळवण्याकरिता बनावट मतांचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी गुणी साहित्यीकालाच त्याचा फायदा मिळावा यासाठी परीक्षकांचा मुद्दा मी उपस्थीत केला होता. हे संमेलन आठवडाभर चालून त्याची सांगता पुण्याला होणार्‍या प्रत्यक्ष संमेलनात करता येईल ही कल्पना छान आहे. (उत्सूक) -इनोबा

विसोबा खेचर 24/01/2008 - 22:08
अनिवसे साहेबांची कल्पना खरोखरंच चांगली आहे. इच्छुकांनी या बाबतीत काय ते धोरण ठरवून संबंधित योजना जाहीर करावी असे वाटते! अवांतर - आम्ही काही व्यक्तिगत कारणांमुळे संबंधित साहित्यस्पर्धेत भाग घेऊ इच्छित नाही, तसेच आमच्या नांवाचा या स्पर्धेकरता कधीही विचार होऊ नये अशी संबंधितांना आमची विनम्र विनंती आहे. आमचे साहित्य हे नेहमी 'नंबर वन'च असते असे आम्ही मानतो तसेच ते कसे आहे, चांगलं आहे, की बरे आहे, की वाईट आहे, स्पर्धेसंदर्भात इतरांच्या तुलनेत ते कसे आहे हे ठरवण्याचा भाईकाका आणि कुसुमाग्रज यांच्याव्यतिरिक्त कुणालाही अधिकार नाही असे आम्ही मानतो! कळावे, आपला, (अत्यंत मुजोर!) तात्या अभ्यंकर.

In reply to by विसोबा खेचर

इनोबा म्हणे 25/01/2008 - 00:38
तात्याबा,तुम्ही एक साहित्यीक म्हणून या संमेलनात भाग घेऊ शकत नसलात तरी आमच्या दिग्गजांपैकी एक असल्याने आपण या संमेलनात परीक्षक म्हणून काम पहावे, अशी आमची नम्र विनंती! इच्छुकांनी या बाबतीत काय ते धोरण ठरवून संबंधित योजना जाहीर करावी असे वाटते! योजना जाहीर करणारे आम्ही कोण? इथे व्यक्त झालेल्या मतांचा आदर ठेवून आपणच काय ती योजना जाहीर करावी. (नम्र) -इनोबा

In reply to by विसोबा खेचर

चतुरंग 25/01/2008 - 00:49
भाईकाका आणि कुसुमाग्रज यांना 'भेटल्याखेरीज' तुमचं साहित्यिक मोल आम्हाला समजणार नाही तर. असो, आपली 'तिकडे' गाठ पडल्यावर आम्ही ते समजून घेऊ!! चतुरंग

प्राजु 24/01/2008 - 23:52
पण उत्तम साहीत्य कोणते .. किंवा बक्षीस ... इ. गोष्टी नसतील तरी चालतील.. एक आठवड्याच्या या सम्मेलनात.. वेगवेगळ्या विषयांवर इ-परिसंवाद, किंवा विनोदी काव्य , एकाच विषयावर कविता लिहिणे... अशा गोष्टी करू शकतो.. विचार करून बघू. - प्राजु

In reply to by प्राजु

इनोबा म्हणे 25/01/2008 - 00:56
कल्पना चांगली! पण नव्या साहित्यीकांना प्रोत्साहन मिळावे हा या योजनेमागचा हेतू आहे. तसे तर परिसंवाद,गप्पा टप्पा ह्या होणारच आहेत. (धोरणी) -इनोबा

विनायकराव, ऑनलाइन साहित्य संमेलनाची कल्पना फारच उत्तम आहे. आम्हीही त्यात सहभागी होऊ !!! आमचे याबाबत मत असे- कविता स्पर्धा दि. ते दि. चोरोळी / आरोळी -//- कथा स्पर्धा ( शब्द मर्यादा ) -//- विडंबन - //- एकांकिका ( अगदी लहाण ) -//- विनोदी लेखन -//- वादविवाद / परिसंवाद -//- शेला पागोटे -//- आणखी काही (सुचवा ) १)समजा कविता स्पर्धा सुरु झाली तर त्यात मत व्यक्त करता येणार नाही ( प्रतिसाद देऊ नये ) लगेच दुसरी कविता त्यापाठोपाठ आली पाहिजे. ( कविता स्पर्धा -साहित्य संमेलन त्याचा असा उल्लेख करावा ) २) इथे काही परिक्षक निवडू ,त्यांनी त्याचे परिक्षण करावे !!! किंवा लेखनावर मिसळप्रेमींच्या प्रतिक्रिया व्य. नि. ने घ्याव्यात. ३) अजून काही सुचले तर टाकतो इथे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इनोबा म्हणे 25/01/2008 - 10:40
अगदी बरोबर.... २) इथे काही परिक्षक निवडू ,त्यांनी त्याचे परिक्षण करावे !!! किंवा लेखनावर मिसळप्रेमींच्या प्रतिक्रिया व्य. नि. ने घ्याव्यात. हे बरे होईल,परिक्षकांकडेच व्य. नि. पाठवावे लागतील ना. आणखी काही कल्पना असल्यास सुचवा.

झकासराव 25/01/2008 - 12:24
काय सुपिक डोके आहे विनायका तुझ :) चला अजुन सुपिक डोक्याच्या मालकानी त्यात भर घाला बघु.

मनीष पाठक 25/01/2008 - 12:46
२) या आठवड्यात प्रसिद्ध होणारे सर्व साहित्य स्पर्धेत समाविष्ट करण्यात यावे. या ऐवजी आतापर्यंतचे सर्व साहित्य यात समाविष्ट करावे. कारण त्यातही खुपसे दर्जेदार साहीत्य आहे व ते वगळले जाउ नये असे वाटते. (वाचक) मनीष पाठक

प्रमोद देव 25/01/2008 - 13:46
मी लिहितो त्याला "साहित्य" म्हणतात असे मला मुळीच वाटत नाही.त्यामुळे मी ह्यात भाग घेणार नाही. तेव्हा पुलं म्हणतात, "नट म्हणून अपयशी ठरला तर अभिनय कसा करावा हे इतरांना शिकवावे अथवा स्वतः लेखक म्हणून काही प्रभाव पाडता आले नाही की संपादक बनावे!" च्या चालीवर म्हणतो की हवे तर परीक्षक म्हणून राहीन. कारण त्यासाठी काही विशेष पात्रता लागते असे वाटत नाही. स्वतःला ज्येष्ठ म्हणवून घेतले की झाले. त्यातून मी इथल्या सदस्यांच्या सरासरी वयापेक्षा बराच(वयाने हो) मोठा आहे म्हणजेच ज्येष्ठ आहे हे सिद्ध करू शकतो. तेवढीच कॉलर टाईट! :D काय मंडली मंग कंदी करताय सुर्वात? आपुण तैय्यार हाय! प्रमोदकाका स्वघोषित संपादक

वरील स्पर्धेमध्ये पाककले चा सुद्धा विचार करावा जेणेकरून भगिनींबरोबर पुरुषांना देखील यामध्ये भाग घेता येइल. असे पदार्थ सांगावेत कि ते सुद्धा या स्पर्धेत भाग घेतील.

अघळ पघळ 28/01/2008 - 08:21
कल्पना छान आहे. आम्ही आस्वादरुपी सहभाग घ्यायला आहोतच. तारीख पक्की झाली का संमेलनाची? सुचवणी: सदर संमेलनातल्या लेखक लेखिकांची विजेतेपदासाठी समस पाठवून निवड करावी. ज्याला सर्वात जास्त समस तो विजेता!! काय सरपंच कशी वाटली कल्पना?? :)

मा. सरपंच महोदय श्री. तात्याबा यांच्या कल्पनेतील पहिले जागतीक मिसळपाव संमेलन होणार होणार म्हणता पुढे ढकलले गेले.मिसळपावचे गावकरी जगभर विखुरले गेले आहेत. पुण्यात होणार्‍या या संमेलनाकरिता बर्‍याच गावकर्‍यांना वेळेअभावी उपस्थीत राहता येणार नाही,हे उघड आहे. अशावेळी मिसळपावच्या प्रतिभावान ग्रामस्थांकरिता एखादे ऑनलाईन साहित्य संमेलन भरावे अशी कल्पना आमच्या डोक्यात आली. या संमेलनादरम्यान साहित्यस्पर्धा आयोजीत करता येईल व या साहित्याचे परीक्षण करण्याकरिता मिपाच्या दिग्गजांची परीक्षक म्हणून मदत होईल. पुरस्कार म्हणून मिपाची प्रमाणपत्रे(हि सुद्धा ऑनलाईन) देता येतील.