मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा

केशवसुमार ·

प्राजु गुरुवार, 01/24/2008 - 00:27
एका क्षणात गेली उतरून ढोसलेली ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा एकदम भारीच.. आपल्या विनोदबुद्धिची दाद द्यावी लागेल. - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 00:39
नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा ओहोहो, खल्लास! केशवा, अरे फार सुरेख आणि गहन अर्थ दडलाय रे या दोन ओळींत! अरे गुत्त्यात भेटणारे सगळे सोयरेच असतात रे! गुत्ता म्हणजे तिच्यायला आयुष्याला फाट्यावर मारणार्‍या जिन्दादिल लोकांचं ते एक छोटेखानी संमेलनच असतं रे! गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा वा वा! क्या केहेने. सुंदर रे केशवा...! एका क्षणात गेली उतरून ढोसलेली ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा ठोकून काढले मज इतके नका विचारू हीच्या परी कसाई थोडा बरा असावा क्या बात है केशवा! केवळ अप्रतिम विडंबन! आपला, (बेवडा) तात्या.

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 00:57
केशवसुमारजी, नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी> व्हिस्की म्हणून प्याला, तुम्ही ठर्रा असावा! आमची आपली एक शंका!! :) (शंकेखोर) पिवळा डांबिस

चतुरंग गुरुवार, 01/24/2008 - 00:58
तुझ्या प्रतिभेला साष्टांग प्रणिपात!! अतिशय उच्च आणि अर्थपूर्ण विडंबन. चतुरंग

अनिला गुरुवार, 01/24/2008 - 01:04
जबरदस्त!!! एका क्षणात गेली उतरून ढोसलेली ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा बहोत खूब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/24/2008 - 09:44
केशवसुमार, लै भारी इडंबन लिव्हलं :) नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा आणि एका क्षणात गेली उतरून ढोसलेली ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा याला पै च्या पै मार्क दिले आहेत ! बाकीच्या वळी बी तेव्हढ्याच झॅक हायेत बरं का लिव्हीत राव्हा !!! गुत्यात भेटलेला, तो सोयरा प्रा.डॉ....................

आजानुकर्ण गुरुवार, 01/24/2008 - 09:56
एका क्षणात गेली उतरून ढोसलेली ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा झकास सुमारशेठ. आवडले (हसरा) आजानुकर्ण

बहुरंगी गुरुवार, 01/24/2008 - 16:01
वा रे वा केशवा, अगदी झ्याक विडंबन केलस. आवडलं मला ... आपला, बहुरंगी मिसळे

सर्वसाक्षी गुरुवार, 01/24/2008 - 16:13
केसुमहाराज, भन्नाट आहे काम! तात्या, लग्न कर . त्यामुळे: ठोकून काढले मज इतके नका विचारू हीच्या परी कसाई थोडा बरा असावा > या ओळीतले दर्द अधिक समजेल.

अविनाश ओगले गुरुवार, 01/24/2008 - 20:44
लै म्हंजे लैच जबरदस्त विडंबन. दारात ती उभी अन्‌, हातात लाटणे रे रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ? आमच्याकडे एवढाच तपशीलाचा फरक... बा़की तुमचे आणि आमचे अगदी सेम असते... आपला (समदु:खी) अविनाश ओगले

केशवसुमार Fri, 01/25/2008 - 13:56
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार केशवसुमार

In reply to by केशवसुमार

विसोबा खेचर Sat, 01/26/2008 - 01:28
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार यातले 'प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार' हे आवडले! :) अवांतर - अहो तरी प्रतिसाद न देण्याचे प्रकार 'त्या तिथे पलिकडे' फार आहेत! म्हणजे अलिकडे असे फार जाणवते. आम्ही तिथे होतो तेव्हा जरा बरे दिवस होते. सतत सगळ्यांना चालते बोलते हिंडते फिरते ठेवले होते! जळ्ळं प्रतिसाद द्यायलादेखील जिन्दादिली लागते! सभ्य-सुसंस्कृत, आणि चेहेर्‍यावरची सभ्यतेची आणि शिष्टाचारची घडी हलू न देणार्‍यांना आणि त्यातच धन्यता मानणार्‍यांकडे अशी जिन्दादिली अभावानेच आढळते! अहो मी म्हणतो, वा वा, छान छान असे प्रतिसाद नका देऊ फार तर! वाटल्यास नावे ठेवा, पण काहीतरी मोकळेपणाने बोलाल की नाही? असो, त्या मानाने अवघ्या चारशे साडेचारशे लोकवस्ती असलेल्या आपल्या मिपावरील मंडळींची ओव्हरऑल सरासरी प्रतिसाद देण्याची जिन्दादिली नक्कीच कौतुकास्पद आहे असे वाटते! एक बरं आहे, त्या तेथील पलिकडील सभ्य आणि सुसंस्कृतीचे बुरखे पांघरलेली मंडळी मिपावर आलीच नाहीत! जी आली होती ती मन उडून चालती झाली हेही बरे झाले! :) असो, आपला, तात्या.

राजे Fri, 01/25/2008 - 19:36
गजब !!!!! क्या बात है... खरोखर नितांत सुंदर .. ह्याला विडंबन असे न म्हणता काही तरी वेगळेच म्हणावे लागेल.... वा... खरोखर सुंदर.. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....

धोंडोपंत Fri, 01/25/2008 - 22:48
केश्या केश्या केश्या................ तुझ्या चरणाकमलांवर आमचे मस्तक. तुझ्या प्रतिभेला साष्टांग दंडवत. क्या बात है!!!! बहोत बढिया. अप्रतिम विडंबन. आपला, (आपला) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

गुंडोपंत गुरुवार, 12/09/2010 - 05:23
लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो? की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा! नाही अखेर कळले, आलो कसा घरी मी गुत्यात भेटलेला, तो सोयरा असावा दारात ती उभी अन्‌, हाती तयार झाडू रणचंडिके प्रमाणे का चेहरा असावा ? एका क्षणात गेली उतरून ढोसलेली ज्याच्या वरून पडलो, तो, उंबरा असावा इतके जबरी लिहून जाणारे तुम्ही.... कुठे आहात? केसू, रंगा आणि इतरही दिग्गज मंडळी - तुमच्या विडंबनांची उणीव हल्ली फार जाणवते हो.

In reply to by गुंडोपंत

बेसनलाडू गुरुवार, 12/09/2010 - 05:38
केसू, रंगा आणि इतरही दिग्गज मंडळी - तुमच्या विडंबनांची उणीव हल्ली फार जाणवते हो. आवश्यक प्रतीच्या कच्च्या मालाची उणीव हे तर याचे कारण नसावे? (शोधक)बेसनलाडू

चिगो Wed, 07/25/2012 - 18:33
तूफान, तूफान... त्रिवार तूफान.. व्वाह.. क्या बात है! जियो..

लेखनविषय:
आमची प्रेरणा इलाही जमादार ह्यांची नितांतसुंदर गज़ल अंदाज तारखांचा, चुकला जरा असावा बहुतेक बायकोचा, होरा खरा असावा येतोय वास मजला अजुनी कसा सुगंधी हातात बांधलेला, तो मोगरा असावा लपवून तोंड अपुले का घेतले तुम्ही हो? की वाटले तुम्हाला, तो सासरा असावा!

वाच पुस्तके

अविनाश ओगले ·

इनोबा म्हणे Wed, 01/23/2008 - 20:53
अप्रतिम काव्य... वा! अविनाशराव....अशाच कविता करित रहा.... स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके या ओळी विशेष आवडल्या..

सुनील Wed, 01/23/2008 - 20:58
अशा विषयावरदेखील उत्तम गझल लिहिता येते असे वाटले नव्हते! रामदासस्वामींच्या प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ह्या ओळीची आठवण झाली! (वाचक) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 21:43
हॅट्स ऑफ अविनाशराव..ही बघा टोपी उडवली :) एक गझल म्हणूनहि परिपूर्ण आहे -ऋषिकेश

प्राजु Wed, 01/23/2008 - 23:13
खूप छान आहे ही गजल... अशीच आणखी ही येऊदे. - प्राजु.

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:23
आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके वा! सुंदर गझल... तात्या.

तळीराम Sat, 01/26/2008 - 22:02
गझल म्हणजे फक्त प्रेम, विरह, मद्य, साकी वगैरे अशीच आमची समजूत होती. या असल्या विषयावर गझल? सरकार इकडे लक्ष देईल काय?

Taxonomy upgrade extras
वाच पुस्तके जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके! जगती जर सन्मान पाहिजे, वाच पुस्तके! साहित्याविण अर्थहीन हे अवघे जीवन जिंदगीत जर जान पाहिजे, वाच पुस्तके संस्कारांनी घडतो माणूस... मोठा होतो मानाचे जर पान पाहिजे, वाच पुस्तके सहा रिपूंच्या हल्ल्यापासून वाचवणारा हृदयी जर भगवान पाहिजे, वाच पुस्तके आयुष्याच्या रुक्ष कोरड्या वाटेवरती हिरवे जर तुज रान पाहिजे, वाच पुस्तके स्वत्व संस्कृती माय मराठी हवी जपाया मातीचा अभिमान पाहिजे, वाच पुस्तके ----अविनाश ओगले

दारोळ्या आणि चषक माझा... आता वाचा ओरि"जिन"ल.

अविनाश ओगले ·

सुनील Wed, 01/23/2008 - 20:28
आमच्या कार्यालयात ऑर्कूटला अग्नीभिंतीत रोखल्यामुळे दारोळ्या वाचता आल्या नाहीत, त्या आता घरी गेल्यावर वाचेन. अन्यथा दिवसाची सुरुवात चहाऐवजी दारोळ्यांनी झाली असती!!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छोटा डॉन Wed, 01/23/2008 - 20:31
"मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत." मी केव्हा म्हटले की त्या मी लिहल्या आहेत, त्यात तळटीप ""नेटवरून साभार" यासाठीच टाकली होती..... असो. नव्या पूस्तकाचा पत्ता दिल्याबद्दल अनेक धन्यवाद !!! निर्व्यसनी [ छोटा डॉन ]

In reply to by छोटा डॉन

अविनाश ओगले Wed, 01/23/2008 - 21:19
डॉन, प्लीज गैरसमज नको. नेट वरुन साभार या तळटीपेबद्दलच मी नेट वरुन घेतलेल्या असे म्हटले आहे. त्या मिसळपाव वरील सर्वाना पाजवल्याबद्दल तुझे आभारही मानले आहेत. उर्वरित दारोळ्या वाचाव्यात म्हणून पुर्ण पत्ता दिला.

मिसळपाव या संकेतस्थळावर छोटा डॉन यांनी नेट वरुन घेतलेल्या दारोळ्या माझ्या "चषक माझा" या विडंबनातील आहेत. त्या मिसळपावच्या सदस्यांना पाजवल्याबद्दल आभार. ऑर्कूटवर हे पुस्तक खालील पत्त्यावर ऊपलब्ध आहे. http://www.orkut.com/Community.aspx?cmm=30757858 ..अविनाश ओगले

इंग्रजीचा वापर करावा की नाही?

इनोबा म्हणे ·

In reply to by रचनाद्लाल

विकेड बनी Wed, 01/23/2008 - 16:31
सर्वांना मराठी येते असे नाही. अणी येथे येउनच तर ते शिकणार ना. शिकायला कोण नाही म्हणेल पण मग बिगरीतल्या पोरांनी पीएचडीचे प्रबंध तरी लिहू नये. मराठी वाचा, त्यातील खुबी जाणा, प्रतिसादातून लिहायचा प्रयत्न करा आणि मग साहित्यनिर्मिती. उलटा प्रवास तुम्हाला झेपला तरी संकेतस्थळाला झेपायला हवा ना!

आय ऍग्री विथ यु इनायकभौ. यु नो वुई ऑल आर मराठी अँड वुई शुड राईट इन मराठी ऑन मिसळपाव ;) युवर्स, - 'स्मॉल' टिंगी ;) अवांतर - माझे वैयक्तिक मत : शक्यतो मराठीचाच वापर करावा.

अनिला गुरुवार, 01/24/2008 - 01:00
अगदी बरोबर कित्तीवेळ लागला बाई तरी लिहावेच मराठीतच. त्याशिवाय गोडी लागणार नाही.

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 01:26
त्याचं असं आहे, की हा मिसळपाव आहे. इतर काही मराठी संकेतस्थळांप्रमाणे ही बासुंदीपुरी (म्हणजे "तुम्ही गोड, आम्ही गोड") नाही. अस्सल (आणि इरसाल!) मराठी आल्याशिवाय या स्थळावर निभाव लागणे कठिण! इथे इंग्रजीमधुन लिहिणे (अगदीच निरुपाय झाल्याखेरीज) म्हणजे शेरेटन मध्ये जाउन मिसळ मागण्यापैकी आहे!!! काय सरपंच! मी बोलतो ते सच्ची का झूठ? (मराठमोळा) पिवळा डांबिस

In reply to by इनोबा म्हणे

धनंजय गुरुवार, 01/24/2008 - 01:58
कोणी भलतीच गीता हातात धरतो, त्यापेक्षा पिवळा डांबीस वाचलेला काय वाईट? वगैरे, वगैरे. हा बहुतेक "तुझे आहे तुजपाशी" नाटकातला उल्लेख असावा. पण नेमके "पिवळा डांबीस" हा सदस्यच सांगू शकेल.

In reply to by धनंजय

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 02:38
आम्ही अनंत पारायणे केलेल्या पु. लं. च्या साहित्यात हा उल्लेख आहे! पण त्याहिपेक्षा, फार फार वर्षांपूर्वी मामलेदाराच्या मिसळीच्या हाटेलात आम्हाला मिळालेली ती उपाधि आहे. ("साला दिसतो भट, पण पिवळा डांबिस आहे, रस्सा मागून खाईल!") मिसळपाव डॉट कॉम ने ती आठवण जागी केली. शिवाय नुसता डांबिस म्हणजे कुणी लफंगा वाटतो, पिवळा डांबिस म्हणजे "अर्क"! सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारा! तुमचं लक्ष घेतलं की नाही वेधून! :) शेवटी नांवात काय आहे? उगाच नांव घ्यायचं "साहित्यसूर्य" आणि टाकायच्या "साहित्यलेंड्या", काय उपयोग? लक्ष्मी बेचे उपल्या (गोवरया) भीक मांगे धनपाल अमरसिंह तो मर गये भला बिचारा ठणठणपाळ आपला (नम्र) पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 06:59
इतर काही मराठी संकेतस्थळांप्रमाणे ही बासुंदीपुरी (म्हणजे "तुम्ही गोड, आम्ही गोड") नाही. हा हा हा! :) खरं बोललास रे पिवळ्या डांबिसा, इतर काही संस्थळांवर आहे खरी अशी परिस्थिती! तुम्ही गोड, आम्ही गोड, तुम्ही शुचिर्भूत, आम्ही शुचिर्भूत, तुम्ही सभ्यसुसंस्कृत, आम्ही सभ्यसुसंस्कृत! घ्या घालून तुमची ती सभ्यता तिच्यायला! मिसळपावचं काहीच म्हणणं नाही! :)) बरं, ते असो..! अस्सल (आणि इरसाल!) मराठी आल्याशिवाय या स्थळावर निभाव लागणे कठिण! इथे इंग्रजीमधुन लिहिणे (अगदीच निरुपाय झाल्याखेरीज) म्हणजे शेरेटन मध्ये जाउन मिसळ मागण्यापैकी आहे!!! अगदी खरं! मिपावर शक्यतोवर देवनागरीतच लिहावे. अगदी नाईलाज असेल तेव्हाच रोमन अक्षरांचा उपयोग करावा. तसेच, देवनागरीतून लिहितानादेखील शक्यतोवर मराठी शब्दच वापरावेत. अर्थात, 'इमेल' करता 'विरोप', किंवा 'डेटा' करता 'विदा', असले चमत्कारिक शब्द वापरण्याचा द्वारकानाथी अट्टाहास करू नये! :) काय सरपंच! मी बोलतो ते सच्ची का झूठ? एकदम सच्ची! आपला, मथुरादास जलंत्री! :)

ऋषिकेश गुरुवार, 01/24/2008 - 01:31
मी तर म्हणतो इंग्रजी लिपित लिहायची सुविधाच नको. म्हणजे प्रश्नच नाहि. केवळ दुवे डकवता आले पाहिजेत. (देवनागरी) ऋषिकेश

बहुरंगी गुरुवार, 01/24/2008 - 16:16
खर आहे मंडळी, केवळ मराठीतुन लिहायला मिळत म्हणुन तर इथे आपण सगळे जमतो. हिंदी, इंग्रजी वगैरे सोय ठेवली तर न जाणो इथे पण परप्रांतियांची घुसखोरी होईल. मिपा वर आल्या पासुन तर इतकं मस्त वाटत की आजकाल प्रथम दर्ज्याच्या डब्यातुन प्रवास करताना चुकुन कधी वादावादीचा प्रसंग आलाच तर भो*/%$#त गेल्या इतर भाषा, सरळ मराठी तुनच सुरुवात आणि शेवट देखिल. समोरचा जर कुणी गुज्जु, भैय्या किंवा अण्णा असेल तर अजुनच मज्जा येते. करा प्रयत्न करुन कधी योग आला तर. बर, मिसळ पावला इंग्रजीमध्ये काय म्हणतात हो? आपला, बहुरंगी मिसळे

"अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी , सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ" मिसळपावचे हे ब्रिदवाक्य. मिसळपाव लोकप्रिय होत आहे,आणि दिवसेंदिवस नवनविन सदस्यांची भर पडते आहे. आजकाल येणार्‍या नव्या सदस्यांच्या नावामधे मात्र इंग्रजीचा वापर अधिक दिसतो आहे. त्यातीलच एका सदस्याने तर इंग्रजीतूनच चारोळ्या आणि कविता टाकल्या होत्या. मराठीचा वापर करण्यासाठी इतकी सोपी सोय असताना देखील इंग्रजीचा वापर करणे योग्य आहे का?

ईमेल पाठवण्यात अडचण?

सरपंच ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिसळपाव वर नोंदणी केल्यावर संकेताक्षर ईमेल द्वारे पाठवल्या जातो. सध्या काही सदस्यांना अशी ईमेल पोहोचलेली नाही अशी तक्रार आलेली आहे. ज्यांनी अशी तक्रार केली आहे त्यांची अडचण सोडवण्यात आलेली आहे. आणि कुणाला अशीच अडचण आहे का? असल्यास sarpanch.misalpav@gmail.com वर ईमेल पाठवून कळवावे. यापुढे मिसळपाव वर नोंदणी करतांना आपण स्वतःला हवा तो संकेताक्षर निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. ईमेल पत्ता देणे मात्र बंधनकारक आहे. धन्यवाद.

मिसळ पाव

मीनल गद्रे. ·

विसोबा खेचर Wed, 01/23/2008 - 08:26
वा! 'मिसळगीत' आवडले..:) तुजसाठी मरण ते जनन तुजवीण जनन ते मरण असंच नेहमी मिसळपाव या पदार्थाच्या बाबतीत म्हणावंसं वाटतं! असो... मीनल मॅडम, सुंदर काव्य केले आहे. अजूनही येऊ द्यात ही विनंती.. आपला, (मिसळप्रेमी) तात्या.

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:27
मीनल... लय भारी... अशीच भारी अन वॉव.. कविता तुझी इथे याव मिसळपाव मिसळपाव... एकदम खूश... -प्राजु

ही कविता मिसळपाव चे राष्ट्रगीत म्हणून वापरली जावी असा आमचा प्रस्ताव आम्ही येथे मांडत आहोत. सरपंच आणि इतर सदस्य, काय म्हणणे आहे आपले? बिपिन.

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:33
मस्तच आहे.. ही कविता वाचून शाळेमधील निवडणुकांचे दिवस आठवले. आम्ही सर्व मित्र मंडळी मधल्या सुट्टीत आपल्या उमेदवाराच्या नावाने घोषणा देत शाळेभर फिरायचो. येऊन येऊन येणार कोण, ..... शिवाय आहे कोण. तुझी कविता याप्रमाणे चाल लावून वाचली.मजा आली.

बर झालं ष्टार मारला त्ये. नाही त मंग आमाला वाटल आता ह्यो रसात "स्त्राव" कंचा आला? प्रकाश घाटपांडे

अन्या दातार गुरुवार, 01/24/2008 - 22:58
मिसळपाव संकेतस्थळाची ही प्रार्थना म्हणून मान्यता (संजूबाबाची नव्हे) मिळायला हरकत नसावी. आपला, (अजूनही शाळेत रमणारा) अनिरुद्ध दातार

पोटात कावळे काव काव, नकोस आणू उगीच आव. मिळेल शहरी अन गावोगाव, मस्त चव आणि स्वस्त भाव. पावमिसळ कुणा नाही ठाव ? मिसळ पाव, मिसळ पाव.

नामवंत कवी प्रवीण दवणे यांचा एक आशयगर्भ लेख

चतुरंग ·

भडकमकर मास्तर Wed, 01/23/2008 - 11:36
लेख छान आहे यात वादच नाही.... येथे दिल्याबद्दल धन्यवाद...गरीबीतून मोठा झालेला माणूस श्रीमंतीचा माज कधीच करणार नाही, हे खरंय....... (पण आजची सगळीच मुले श्रीमंत आहेत आणि त्यांना पैशाची किंमत नाही, सगळीच आजची मुले पुस्तकांचे दोन सेट वापरतात आणि त्यासाठी हट्ट धरतात ...नोटा पर्स मध्ये बाळंत होतात असे आजच्या सर्व मुलांना वाटते का??? दवणे यांचे पुष्कळ लेख आणि पुस्तके सावर रे भाग १ भाग २ वाचले आहेत...बरेचसे पूर्वग्रहदूषित असतात, असे माझे मत का बरं बनते आहे ??....त्या पुस्तकांची लोकप्रियता शिक्षक आणि पालक यांच्यात प्रचंड आहे, पण युवकांना ते एकांगी का वाटणार नाहीत?)........कदाचित हा वयाचा परिणाम असावा.... मला वाटतं की पंचेचाळीस पन्नास या वयात सर्वच पालकांना मुलांच्या वागण्यामुळे असुरक्षित वाटते, त्यात ते प्राध्यापक ..ते असली खूप मुले पाहत असणार..!!! ... ..................."आजची तरूण पिढी वाया तर जात नाहीये ना?" असे गेल्या कित्येक शतकांपासून प्रत्येक प्रौढ पिढीला वाटत आलेले आहे....त्यांच्या तरूण वयात त्यांचे प्राध्यापक असेच म्हणत असतील्...फक्त संदर्भ बदललेले असतील्......आज वर्षाला पुस्तकांचे दोन सेट वापरणारा मुलगा जेव्हा पंचेचाळीस वयाला आपल्या पोराला सांगेल, "अरे आम्ही फक्त बाईक चालवत कष्टातून कोलेज केलं आणि तुला ११ वी त कार हवी....( तेव्हा कार चालवायचे कायदेशीर वय १६ झालेल असेल, त्यावर सुद्धा तो मन लावून वाचकांच्या पत्रांमध्ये आवाज उठवेल).....मुलगा म्हणेल , "शेजारचा **** आणायला सुद्धा लागलाय कार "..... ....................आणि जर तोच दोन सेट वर्षाला वापरणारा मुलगा आज प्राध्यापकांना म्हणाला, " सर, तुमच्या काळात मास्तर कसे डेडिकेटेड होते, शाळा कोलेजात मन लावून शिकवायचे....आज आमचे आदर्श कोण? ....वगैरे...". मग याच द्रुष्टिकोनातून एक एकांगी लेख पाडायचा, की आज कसे आदर्श नाहीत, त्यामुळे तरूण वाया चालले आहेत्....सगळं पैशांवर अवलंबून झालेलं आहे वगैरे.... माझ्या मते दोन्ही लेख छान होतील, परंतु सत्य या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे.....

In reply to by भडकमकर मास्तर

सहज Wed, 01/23/2008 - 15:22
>>...बरेचसे पूर्वग्रहदूषित असतात, असे माझे मत का बरं बनते आहे ??.... +१ >>परंतु सत्य या दोन्हींच्या मध्ये कुठेतरी आहे..... खरय.

In reply to by भडकमकर मास्तर

पिवळा डांबिस Sat, 01/26/2008 - 11:50
सतलज, तुमचं अगदी बरोबर आहे. अहो पिढ्यापिढ्यांमधील मतभेद हा तर खूपच जुना विषय आहे. असं बघा, नऊवारी नेसणारया आजीला आईची पाचवारी खटकायची, पाचवारी नेसणारया आईला बायकोचा पंजाबी ड्रेस् पसंत नव्हता, पंजाबी ड्रेस मधल्या बायकोला मुली/ सुनांचे स्पाघेट्टी टॉप्स बघवत नाहीत म्हणे!!! (च्यायला! कुठुनतरी किटकिट करून पुरुषांची काशी करुन ठेवायची!! :)) पुरुषांचे म्हणाल तर फार फरक नाही, वडिल चाळीतून ब्लॉक मध्ये आलेले आजोबांना पसंत नव्हतं....... ("नवराबायकोला झोपायला वेगळी खोली कशाला पाहिजे? आम्ही काय संसार केले नाहीत?") चंदूने अमेरिकेला बंगला घेतलेला वडिलांना पसंत नाही.......("तिथे जाउन बसलाय! इथे काय नोकरया मिळत नाहित? आणि इनमिन तीन माणसांना करायचाय काय तो बंगला?") चंदू म्हणतो माझा मुलगा सायन्स घ्यायचं सोडून लिबरल आर्टस घेतोय........("मूर्ख लेकाचा! मॅक्डोनाल्डस मध्ये फ्राईज विकायची लक्षणं दिसता आहेत") तेंव्हा अश्या लोकाचं बोलणं फार गांभिर्याने घ्यायचं नाही. संस्क्रूती ही नदीप्रमाणे पुढेच वहात असते. आपला, (तत्वचिंतक) पिवळा डांबिस

भडकमकर मास्तर Wed, 01/23/2008 - 11:45
कोणत्याही प्रश्नासाठी राजकारण्यांना शिव्या घालणं सेफ असतं, तसं कोणत्याही प्रश्नासाठी तरूण पिढीला शिव्या घातल्या तरी चालून जातं..........

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:29
चांगला लेख आहे.. अवांतर - दवणेसर आणि अशोक वागवे सर आम्हाला इयत्ता अकरावी आणि बारावीला शिकवायला होते.. आपला, (दवणेसरांचा आणि बागवेसरांचा विद्यार्थी) तात्या.

भडकमकर मास्तर Fri, 01/25/2008 - 16:30
प्रकाश घाटपांडे यांच्या पूर्वीच्या लेखामधली काही वाक्ये...फ़ारच छान. इथे चपखल बसतात... एकेकाळची विकृती ही आता प्रकृती बनत चालली आहे. कुणी म्हणेल आताची पिढी वाहवत चालली आहे. पण दुटांगी धोतर नेसून महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणाला वा पाचवारी साडी नेसून सायकलवर जाणाऱ्या तरुणीला बघून त्या त्या काळी आजची पिढी वाहवत चालली आहे असे म्हणणारे बुजुर्ग होतेच. पॅंट शर्ट घालून इराण्याच्या हॉटेल मधे जाउन चहा पिणारा तरुण किती वाया गेला? प्रत्येक पिढीत हेच घडत आले आहे. काळाची गती आपल्याला सहन होत नाही. काळाच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेता येत नाही. काळ तर कुणासाठी थांबत नाही. याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या शिवाय. त्याचा उगमही समजत नाही आणि अंतही.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

सुधीर कांदळकर Mon, 01/28/2008 - 19:32
लेख. धन्यवाद. सतलजचे म्हणने बरोबर आहे. त्याचा व्यत्यास देखील सत्य आहे. कोणत्याहि प्रश्नावरून तरूण पिढीला तसेच माग्ल्याहि पिढीला शिव्या घालता येतात.

बर्‍याच दिवसांपूर्वी वाचनात आला होता. फारा दिवसांनी काही कारणाने त्याची आठवण जागी झाली. मि.पा.करांनाही त्याचा आस्वाद घेता यावा ह्या कारणाने तो लेख येथे देत आहे.

माझी नवी मैत्रेण

सर्वसाक्षी ·

ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 00:36
फार छान! आम्हाला बॉ शेवटपर्यंट चाई येन् मोठी वाटली होती.. हा हा ! एकदम गंडलो.. मजा आली . बाकी छान वर्णन व त्या निमित्ताने येणारे स्थळ डोळ्यापुढे फोटोशिवाय उभे राहिले. अवांतरः ह्या चित्रा मागच्या टेबलवर सगळे झाकून ठेवले आहे. तिथे अशीच पद्धत आहे की फोटोपुरतं? बाकी लेखनशैली (नेहमीप्रमाणे) ग्रेटच :) -ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

सर्वसाक्षी Wed, 01/23/2008 - 16:44
धन्यवाद ॠषिकेश, मागची झाक्-पाक अशासाठी की ज्या मेजावर लोक बसतील त्यावेळीच आच्छादन काढाचे. आणखी एक चांगला प्रकार म्हणजे जर आपण खुर्चीवर काही सामान वा कोट वगैरे ठेवले तर ताबडतोब त्या वस्तू सकट खूर्चीला एक गडद कापडाची खोळ आणून घालतात ज्यायोगे वस्तू काही सांडून खराब होत नाही व वेगळ्या रंगाच्या फुगीर आच्छादनमुळे आपली वस्तू घ्यायचे लक्षात राहते. खरेतर अशा मोठ्या दालनात अनेक मेजांची रचना करण्यापेक्षा बर्‍याच चांगल्या उपाहारगृहांमध्ये गोल मेज, वर सरकती तबकडी, शीतकपाट, दूरचित्रवाणीसंच यानी सुसज्ज अशा अनेक स्वतंत्र खोल्या असतात. अगदी ५-६ ते १२-१५ पर्यंत माणसे बसू शकतील अशा आकाराच्या खोल्या असतात व प्रत्येक खोलीतच लगतचे प्रसाधनगृह देखिल असते. मात्र खाद्य्पदार्थ प्रदर्शित करण्याची पद्धत फारच आकर्षक असते. मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो.

In reply to by सर्वसाक्षी

ऋषिकेश Wed, 01/23/2008 - 19:30
मत्स्य व जलचर प्रेमींना तर पर्वणी असते, सांगाल तो जीव पेटीतून फर्माईश करणार्‍याच्या देखत जीवंत काढुन नेला जातो व हवा तसा बनविला जातो. हे वाचून विषेश आनंद जाहला :).. माहितीबद्दल आभार

In reply to by ऋषिकेश

लई भारी हाये. चीन म्हनल आमच्या डोळ्यासामनी हे फेंगशुईच म्हनजे काय? अस येत पघा. आन त्या गल्लासात काय हाय? पानिय कि काय समजाना? प्रकाश घाटपांडे

सुनील Wed, 01/23/2008 - 00:47
एकदम ऍन्टी-क्लायमॅक्स!!! मैत्रीण म्हटल्यावर उत्सुकता अधिकच चाळवली आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण! लेख उत्तम! असेच चीन भेटीवर अजून लिखाण येऊदेत! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज Wed, 01/23/2008 - 07:56
मैत्रीण कोण असेल याचा अंदाज आला होता पण तरी देखील वाचायला छान मजा आली. मागे तुमचा "चहा व चहाचे चषक" विषयी लेख वाचल्याचे स्मरते. तुमच्या प्रवासविषयक लेखांची एक चांगला संग्रह होऊ शकेल. कृपया अजुन लिहावे.

विसोबा खेचर Wed, 01/23/2008 - 08:19
साक्षिदेवा, शेवट क्लासच केला आहेस, मजा आली! :) आणि निघाली ती ही गोड, निरागस मैत्रीण! सुनीलरावांसारखं मीही हेच म्हणतो! सुंदर, दिलखुलास लेख! साक्षिदेवा, तू आता ठाणेकर राहिला नसून बराचसा चिनीच झाला आहेस! :) असो, मिसळपाववर तुझं मनापासून स्वागत. पुढच्या लेखांची वाट पाहात आहे... आपला, (गाववाला) तात्या.

प्राजु Wed, 01/23/2008 - 08:30
हे म्हणजे... एकदम सिक्सरच मारलात... मस्त लेख. फसले मी... बाकी मैत्रिण एकदम गोड आहे... - प्राजु

In reply to by विसुनाना

केशवसुमार गुरुवार, 01/24/2008 - 16:38
साक्षीशेठ, उत्तम लेख.. मधे मधे येणारे चीनी शब्द/नावे जरा मनातल्या मनात उच्चारुन वाचायला त्रास झाला पण झकास लेख.. बरेच दिवसांनी आपले लिखाण वाचायला मिळाल्याचा आनंद झाला. मध्यंतरी एकदमच जालावरून गायब होता.. बाकी ते मालक वर्गाबद्दल एकदम सहमत..( आम्ही जुमानत नाही ते सोडा) पुढचे लेख लवकर लवकर येऊदेत.. केशवसुमार

सर्वसाक्षी Wed, 01/23/2008 - 16:54
धकाधकीच्या आयुष्यात असे विरंगुळ्याचे क्षणही येतात. आपल्याला आवडले हे वाचून बरे वाटले, धन्यवाद. या कथेचा प्रयोग घरी परत येताच प्रथम पत्नीवर व मग एकदा सासुरवाडी गेलो असता केला होता. सुरुवातीचे मैत्रीण प्रकरण ऐकताच सौ. च्या मामांनी ताबडतोब तिला हाक मारुन विचारले की या मैत्रीणी वगैरे तुला कशा चालतात? मग आम्ही दोघे खो खो हसू लागलो व सौ. ने मामांना चाई येनचे वय सांगताच मामा समजून चुकले की भाची व भाचे जावई यांना आपल्याला 'मामा' बनविले आहे:)) हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. (दुष्ट मालक वर्ग चार दमड्यांच्या बदल्यात हली फार काम करून घेतो, त्यातून वेळ असलाच तर नसते उद्योग असतात). असो. तात्यासकट सर्वांचे पुन्हा आभार. असाच लोभ असूद्या! आपला स्नेहांकित साक्षी

In reply to by सर्वसाक्षी

विसोबा खेचर Wed, 01/23/2008 - 17:12
हा लेख आमचे परमस्नेही व मिसळपंथी मा. तात्यामहाराज यांचे आग्रहास्तव काल खास लिहुन काढला, न पेक्षा गेल्या अनेक महिन्यात काहीही लेखन घडले नव्हते. साक्षीदेवा, माझ्या विनंतीला मान देऊन तू लिहिलेस याचे बरे वाटले. यापुढेही रोजच्या कामकाजाच्या रगाड्यातून मिपाकरता दोन घटका वेळ काढत जा आणि असंच इथे चांगलंचुंगलं लिहीत रहा हीच तुला गाववाला म्हणून आग्रहाची विनंती... आपला, (मामलेदारची मिसळप्रेमी गाववाला) तात्या. अवांतर - एकदा केव्हातरी सवडीने वेळ काढ. दोघं मामलेदाराला जाऊ आणि यथास्थित मिसळ हाणू! :)

स्वाती राजेश Wed, 01/23/2008 - 16:55
आमची पण फसगत झाली. लेख फारच छान लिहिला आहे. वर्णन डोळ्यासमोर उभे राहते. तुमची मैत्रिण फारच छान आहे.

सिरुसेरि Mon, 01/04/2016 - 08:50
मध्यंतरी व्हॉटसअ‍ॅपवर एका छोट्या चिनी मुलीचा गाणे म्हणतानाचा २,३ मिनीटाचा व्हिडीओ खुप फिरत होता. त्यामध्ये हि मुलगी स्टेजवर येऊन धिटपणे गाणे म्ह्णते , मधेच थोडा नाच करते , चहा पिण्याची नक्कल करते असे काहिसे होते . भाषा , शब्द कळत नसूनही ते गाणे लक्षात राहते .

गजर झाला आणि झोपमोड झाली. मस्त गुबगुबित बिछान्यात रज‌ईत गुरफटलेला देह बाहेर पडायला राजी नव्हता. पाठोपाठ दूरध्वनी किणकीणू लागला आणि उठणे भाग पडले. दहाचे उड्डाण म्हणजे न‌ऊला हजेरी, म्हणजे साधारण आठला बाहेर पडणे आले. म्हणजे सातला उठलेले बरे. जरा आळसावायचे, एक चहा, जरा टंगळमंगळ, पुन्हा चहा, मग दाढी, तुषारस्नान, मग सामानाचा ताळेबंद एवढे सगळे जमवयला तास तरी हवाच. आठ दिवसाच्या दौर्‍यात पाच गावे पालथी घालायची तर ’विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर’ अशी स्थिती. रोज नवे गाव, नवे हॉटेल, रोज सामान उघडा आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा बांधा. चालायचेच!

दाल बाटी व दाल बाफले

संजय अभ्यंकर ·

विसोबा खेचर गुरुवार, 01/24/2008 - 07:11
वा वा! ही आमची आवडती पापकृती.. संजयराव, अजूनही पाककृत्या येऊ द्यात! तात्या. अवांतर - शक्य झाल्यास आपले नांव (लॉगीन आयडी) देवनागरीत करा ही विनंती.. आपला, (मराठी) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 22:30
तात्या, संजय अभ्यंकर हे मान्य! पण तुम्ही आणि केशवसुमार कसले "अभ्यंकर"? तुम्ही तर "भयंकर"! :)) (थट्टेखोर) पिवळा डांबिस

In reply to by विसोबा खेचर

पिवळा डांबिस गुरुवार, 01/24/2008 - 22:56
थोडकी थट्टा केली, राग नसावा. तुझ्या लिखाणावर मी फिदा आहे रे!!!

चटोरी वैशू Fri, 08/15/2008 - 09:40
अय्या असाच कहिसा थोडा वेगळा ... प्रकार म्हणजे बट्टी .... जाड्सर गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. १/२ च. जीरा आणि १/२ च.ओवा ., चवीनुसार मीठ.... ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. मग ते गोळे गार झाल्यावर त्याचे २-२ तुकडे करावे. कढईत तेल्/तूप गरम करुन ते तुकडे मस्त पैकी तळून घ्यावे. कुर्कुरित .. ही झाली बट्टी ... ही तुम्ही साध्या वरणा सोबत्...मस्तपैकि मोडुन त्यावर साधे वरण ... गावराण तूप... आणि सोबत वान्ग्याची भाजी... आहा !.... हा झाला... खान्देशी वरण बट्टी चा बेत....

विंजिनेर Fri, 03/06/2009 - 05:38
जरी गोवर्‍या मिळत नसतील तरी कोळशाची शेगडी सहजी मिळते. त्यात सुद्धा बट्ट्या खुसखुशीत भाजता येवू शकतात. ओवन पेक्षा हा पर्याय नक्कीच खुमासदार चव आणतो.

3

गडकर्‍यांचे किस्से.

चतुरंग ·

मुक्तसुनीत Tue, 01/22/2008 - 23:23
गडकर्‍यांच्या सर्व नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत - "एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) ------------------ अजून काही: भावबंधन राजसंन्यास

सुनील Tue, 01/22/2008 - 23:24
"एकच प्याला", "पुण्यप्रभाव" (अजून आठवत नाहीयेत - कोणी मदत करेल?) काही आठवतात ती - संयस्त खड्ग राजसंन्यास (बहुधा हे अपूर्ण राहिले) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

अहो व्हती गडबड कदि कदि. त्ये "जेथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट पहाते " ह्ये गानं बी सावरकरांचे म्हनून वाटतय. आता "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ह्या सावरकरांच्या गान्याने तो घोटाळा व्हतोय. प्रकाश घाटपांडे

भडकमकर मास्तर Wed, 01/23/2008 - 13:29
"वेड्यांचा बाजार" नावाचे सुद्धा अपूर्ण राहिले बहुतेक.... त्या अपूर्ण नाटकाचे स्क्रिप्ट मी वाचले आहे फार पूर्वी...त्यात एक कोट्या करणारे पात्र असते, एवढेच आठव्तेय.......

नंदन Wed, 01/23/2008 - 13:49
राम गणेश गडकर्‍यांचे समग्र साहित्य इ-पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध असल्याची बातमी मागे वाचली होती. [दुवा - येथे] कुणाला याबाबत अधिक माहिती आहे का? नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर Wed, 01/23/2008 - 17:19
चतुरंगराव, गडकरी मास्तरांचे छोटेखानी किस्से वाचायला मजा आली. कृपया येऊ द्यात अजूनही... तात्या.

मुक्तसुनीत Wed, 01/23/2008 - 19:59
मला वाटते, गडकर्‍यांच्या स्मृतिंची ज्योत पिढ्यानुपिढ्यांकरता तेवत ठेवण्याचे सारे श्रेय अत्र्यांना द्यायला हवे. चतुरंगरावानी लिहिलेले बहुतेक किस्से अत्र्यांच्या लेखांतून, भाषणांच्या संग्रहातून आलेले असावेत असा माझा अंदाज आहे. अत्र्यांची लोकप्रियता , आणि मुख्य म्हणजे एखाद्या व्यक्तिची योग्यता जाणून ती आपल्या ओघवत्या शैलीत लिहिण्या-सांगण्याची त्यांची हातोटी याचा सर्वात सुंदर मिलाफ झाला , तो गडकर्‍यांच्या गुणवर्णनात. केवळ गडकर्‍यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यानी शेकडो भाषणे केली, डझनावारी लेख लिहिले. सुदैवाने , हे सारे परचुर्‍यांसारख्या अत्रेभक्तामुळे मुद्रितस्वरूपात उपलब्ध आहे ....

In reply to by मुक्तसुनीत

चतुरंग Wed, 01/23/2008 - 20:10
ह्यातले बहुतेक किस्से मी माझ्या वडिलांशी बोलताना त्यांच्याकडून ऐकले आहेत. काही माझ्या वाचनात आलेत. आपण उल्लेख केलेले परचुर्‍यांचे पुस्तक कोणते ते सांगू शकाल का? ते मिळवून मी जरुर वाचेन. अवांतर - वाचनाची गोडी ही आयुष्य संपन्न करते. माझ्या आजोबांचा पुस्तकांचा संग्रह जवळपास २००० पुस्तकांचा होता. त्यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली आणि ती वडिलांमुळे टिकून राहिली. चतुरंग

मुक्तसुनीत Wed, 01/23/2008 - 20:52
अत्र्यांची अनेक पुस्तके आहेत, आणि गडकर्‍यांचे संदर्भ बर्‍याच लेख आणि भाषणसंग्रहातून मिळतात. मला चटकन आठवणारी २ नावे : "क‍र्‍हेचे पाणी" या अत्र्यांच्या आत्मचरित्रामधे गडकरी, त्याकाळातले पुणे आदिंची रसाळ वर्णने आहेत. "आषाढस्य प्रथम दिवसे" नावाच्या लेखसंग्रहात गडकर्‍यांवर एक सोडून दोन-तीन लेख आहेत असे मला आठवते ... (परचुरे हे लेखक नव्हेत. ते अत्र्यांचे प्रकाशक. सावरकर आणि अत्र्यांचे खूपसे लिखाण "परचुरे प्रकाशन मंदिर" यांनी छापले आहे. या दोन लेखकांशिवाय परचुर्‍यांची मोठी कामगिरी म्हणजे जी एंच्या शेवटच्या वर्षातली (आणि त्यांच्या मृत्यूनंतरची त्यांची) पुस्तके या प्रकाशनाने काढली ...

सुनील Wed, 01/23/2008 - 21:04
सहजच मनात विचार आला - गडकर्‍यांचे सर्वात गाजलेले नाटक - एकच प्याला. त्यांचे नाव, राम - दोन अक्षरी. वडिलांचे नाव, गणेश - तीन अक्षरी. आडनाव, गडकरी - चार अक्षरी. कवी म्हणून टोपणनाव, गोविंदाग्रज - पाच अक्षरी. (आकडेबहाद्दर) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

चतुरंग Wed, 01/23/2008 - 21:24
अजून एक दुर्दैवी योगायोग - गडकर्‍यांचा जन्म गुजरातेतल्या 'नवसारी' चा (१८८५) आणि मृत्यू विदर्भातल्या 'सावनेर' चा (१९१९)! अवघं ३४ वर्षांचं आयुष्य! ही 'मोठी' माणसं लहान वयात का जातात?? चतुरंग

डॉ.प्रसाद दाढे Wed, 01/30/2008 - 09:34
समग्र गडकरी नामक पुस्तकात त्या॑चे सर्व साहित्य आहे. कर्‍हेचे पाणीमध्येसुद्धा गडकर्‍या॑चे पुष्कळ किस्से दिले आहेत. पर॑तु त्यातील सत्या-असत्त्याबद्दल प्रवाद आहेत. काही तत्कालीन टीकाकारा॑च्या मते गडकरी आणि अत्रे या॑ची कधी भेटच झाली नव्हती. अर्थात ह्या वादात आता पडण्याचे काही कारण नाही..

नाटककार राम गणेश गडकरी हे एक हजरजबाबी व्यक्तिमत्व होते त्यांचे काही किस्से. अत्रे गडकर्‍यांना गुरुस्थानी मानत. आपला पहिला काव्यसंग्रह 'फुलबाग' लिहून झाल्यावर, त्याची वही घेऊन अत्रे राम गणेशांकडे अभिप्रायासाठी गेले. काही दिवसांनी अत्रे वही आणायला गेले. त्यांनी विचारलं "कशी काय वाटली फुलबाग?" वहीच्या फाटलेल्या आवरणाकडे बोट दाखवत गडकरी म्हणाले "फुलबाग चांगली आहे, कुंपण तेवढं नीट घाला!" ---------------------------------------------------------- नाटक रंगभूमीवर येण्यापूर्वी गडकर्‍यांच्या घरी नाट्यवाचनाचे प्रयोग होत.