✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

उत्तम मिसळ मिळण्याचे ठिकाण

ड
डॉ.प्रसाद दाढे यांनी
Wed, 01/30/2008 - 10:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
60960 वाचन

💬 प्रतिसाद (124)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 10:31 नवीन

स्तूत्य..

दाढेसाहेब, मिपावर उत्तम मिसळ मिळाणार्‍या ठिकाणांचे संकलन करण्याचा हा आपण अत्यंत स्तूत्य उपक्रम सुरू केला आहे. सध्या जरा गडबडीत आहे, परंतु सवडीने मीदेखील यात भर घालीन आणि हे सदर समृद्ध करीन.. मिपावरील सर्व सभासदांनी यात आपल्याला माहीत असलेल्या मिसळीच्या उत्तमोत्तम ठिकाणांबद्दल येथे अवश्य लिहावे अशी कळकळीची विनंती! तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :) आपला, (मिसळप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 01:35 नवीन

पुणे,

संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड श्री- शनिपारा जवळ नेवाळे- चिंचवड जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी. आज पर्यंत सगळ्यात झणझणीत मिसळ 'नेवाळे चिंचवड' येथे मिळाली. संजिवनी मध्ये उपासाच्या दिवशी , अप्रतिम उपसाची मिसळ मिळते.
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 09/05/2008 - 02:39 नवीन

संजिवनी --

केसु .. हे रेस्टॉरंट तर माझ्या शाळेतल्या मित्राचे आहे पण कधी मिसळ खाण्याचा योग नाही आला तिथे ... आता पुण्याला गेलो की चक्कर मारतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
क
केशवराव Wed, 01/30/2008 - 11:12 नवीन

हि घ्या आणखी काही नावें.......

१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. २] कुंजविहारी , ठाणे स्टेशन .
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 11:25 नवीन

छानच..

१] दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा. दत्त स्नॅक्सची मिसळ बाकी छानच असते! अजून काही, १) जुन्नर बस स्थानक. २) रामनाथ, पुणे. ३) फडतरे, कलानगरी. ४) अनंताश्रम, जेल रोड, इंदौर ५) गोखले उपहार गृह, ठाणे ६) भगवानदास, नाशिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव
ह
हेम गुरुवार, 10/28/2010 - 23:22 नवीन

मिसळ @ नासिक

भगवानदास नांवाची/प्रकारची कुठलीही मिसळ नासिकमध्ये नाही. मेनरोडवर भगवंतराव आहे, पण सध्या एवढी खास नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सौरभ पारखे गुरुवार, 01/05/2017 - 14:23 नवीन

मिसळ

श्री वडोबा , येथे ७ प्रकारची मिसळ आणि ११ प्रकारचे बटाटे वडे मिळतात Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
सौरभ पारखे गुरुवार, 01/05/2017 - 14:26 नवीन

मिसळ

निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ पारखे
स
सौरभ पारखे गुरुवार, 01/05/2017 - 14:26 नवीन

मिसळ

निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ पारखे
स
सौरभ पारखे गुरुवार, 01/05/2017 - 14:26 नवीन

मिसळ

निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सौरभ पारखे
ध
ध्रुव Wed, 01/30/2008 - 11:19 नवीन

फडतरे...

फडतरे मिसळ कोल्हापुर, मी खास ही मिसळ खायला जातो कधी कधी तिकडे पुण्याहुन. बाकी चोरगे मिसळ कोल्हापुर पण चांगली असते. मिसळ खायला कधीही आवडत असल्यामुळे, कार्यालयाच्या उपहारगृहातील मिसळपण आवडते :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Wed, 01/30/2008 - 11:29 नवीन

वा !!!

केशवराव, नेवाळ्याची मिसळ जशी झणझणीत, तशीच "आग" लावणारी रामनाथ - ज्ञानप्रबोधिनी,सदाशिव पेठ ईथे मिळते. कात्रजहून बोपदेव-घाटात जाताना, घाटाच्या आधीच्या गावात एका टपरीवजा "हाटिलात" पण अस्सल मावळी टच असलेली तर्रीदार मिसळ मिळते. (गावाच॑ नाव विसरलो आता.) .
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:00 नवीन

रामनाथ

रामनाथ ला मिसळ खाण्यापेक्षाही तिथली हॉटेल बाहेर ची मेन्यु ची पाटी जास्त मजा आणते. अवांतरः पुणेरी पाट्या मधे ही पाटी नेहमीच टॉप ला असते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनिष Wed, 01/30/2008 - 11:40 नवीन

पुणे...

पुण्यातील गरवारे कॉलेज समोर फारच छान कोल्हापुरी मिसळ मिळते -- पण गर्दी खूप असते आणि मालक (तो पुणेरी नसून कोल्हपुरी आहे) दुकान संध्याकाळई ५ वाजता (!!!) बंद करतो. (का उगाच पुणेकरांना शिव्या घालतात लोक देव जाणे? ;)) दुसरी एक कळकट तपरी आहे अलका टॉकीज समोर तिथेही झणझणीत मिसळ छान मिळते.
  • Log in or register to post comments
फ
फ्रॅक्चर बंड्या Wed, 01/21/2009 - 15:04 नवीन

गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र :)

गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र :) छान मिसळ मिळते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
स
स्वछंदी-पाखरु गुरुवार, 10/28/2010 - 22:47 नवीन

+ १

+१ सहमत लै भारी आहे त्याच्या कडे मिसळ.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फ्रॅक्चर बंड्या
ब
बेसनलाडू Wed, 01/30/2008 - 12:28 नवीन

दादरची काही

प्रकाश, दादर दत्तात्रय, दादर वृंदावन, दादर आस्वाद, दादर आनंदाश्रम, दादर (दादरकर)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 01/30/2008 - 12:56 नवीन

मामा काणे?

राहिले. खासकरून उपवासाची मिसळ :) नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू Wed, 01/30/2008 - 13:22 नवीन

खरेच की

मामा काणे राहिलेच. त्याचबरोबर 'आदर्श', दादर(पूर्व)चे 'समर्थ'ही (अजूनही दादरकर ;))बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
प
पर्नल नेने मराठे Wed, 01/21/2009 - 11:29 नवीन

पणशीकर व

पणशीकर व विनय (गिरगाव) ;;) चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन
ब
बेसनलाडू Tue, 03/23/2010 - 11:47 नवीन

प्रकाश न्यू यॉर्क टाईम्स मध्ये!

अगदी न्यू यॉर्क टाईम्समध्येही प्रकाश पडला आहे. वाचून(च) ढेकर दिला :-( (हावरट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
न
नंदन Wed, 01/30/2008 - 13:05 नवीन

ओर्कुटवरील यादी

ओर्कुटवरील मिसळपाव कम्युनिटीच्या चर्चेतील यादी नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
स
सुकामेवा Wed, 01/30/2008 - 17:42 नवीन

मिसळपाव

बालाजी स्नँक सेंटर चिंचवड येथे गणपती देवळा शेजारी
  • Log in or register to post comments
क
कौटील्य Wed, 01/30/2008 - 18:39 नवीन

नाशिक

नाशिक मधे शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ) अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ) तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मण मिसळ) कमला विजय - दहिपुल (ब्राह्मण मिसळ) गारवा - अंबड (लाल मिसळ) अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त) गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ) मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस) अजुन खुप आहेत पण वरचे एकदा चाखाच
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Wed, 09/04/2013 - 14:37 नवीन

नासिक

क्रुष्ण विजय - गंगापूर रोड (विद्या विकास सर्कल जवळ) विहार - गंगापूर रोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौटील्य
प
पेस्तन काका Tue, 11/26/2013 - 11:31 नवीन

अजुन काहि

भजवति - पंचवटी कारंजा मावशीची मिसळ - रविवार कारंजा मखमलाबाद ला पण आहे. नाव आठवत नाहिये.
तुषार - कोलेज रोड (कॉलेज) (गोड ब्राह्मण मिसळ)
हि गोड नसुन तिखट पाणी मिसळ मिळते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौटील्य
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 01/30/2008 - 23:02 नवीन

पुणेरी काही

श्रीकृष्ण - तुळशीबाग श्री उपाहार गृह - शनिपार , पुणे रामनाथ - साहीत्य परीषदेशेजारी, टिळक रस्ता. वैद्य उपाहार गृह - फडके हौद चौकाजवळ, बुधवार्/रविवार पेठ , पुणे पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 01:39 नवीन

क्षमस्व

मिराशीशेठ, पण ते वैद्य ची मिसळ साला फार टूकार निघाली, अगदी पू sss णे ३० छाप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
प
प्राजु Wed, 01/30/2008 - 23:10 नवीन

या सगळ्या...

आमच्या कोल्हापूरच्या मिसळीपुढे काहीच नाहीत. १. फडतरे मिसळ २. खासबागची मिसळ ३. चोरगे मिसळ ४. बावड्याची मिसळ. खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते... त्यात कांदेपोहे (पुणेरी) नसतात घातलेले. तर चक्क मोडाची धान्ये असतात. म्हणूनच कोल्हापूरी मिसळ ती वेगळीच. - (कोल्हापूरी मिरची)प्राजु
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Fri, 01/23/2009 - 17:43 नवीन

हे बरीक

खरे! कोल्हापुरात कुठेही मिसळीची चव सारखीच असते. अगदी मलकापुरातही बेस्ट मिसळ मिळते. मिसळ म्हणजे नुसते फरसाण आणि वर तर्री. त्या तर्रीत जी गंमत आहे, ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
भ
भुमन्यु Wed, 09/04/2013 - 14:39 नवीन

अगदी खर्र

ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!
१००% सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
स
सुचेल तसं Sat, 01/24/2009 - 12:31 नवीन

फडतरे मिसळ

फडतरे मिसळ १ नं. नो डाऊट!! Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
अ
अन्या दातार Wed, 01/30/2008 - 23:14 नवीन

सहमत

प्राजुताई, खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते... एकदम सहमत बरं का. अगदी ५-८ रुपयातही अनेक छोट्या गाड्यांवर उत्तम मिसळ मिळते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 03/30/2008 - 18:17 नवीन

एकदम सहमत

कोल्हापूरची मोहन ची मिसळ मी गेली अनेक वर्ष अगदी ताव मारुन खात आहे, आणि चोरग्यांची मिसळ खाउन तर नाकी -डोळी लाल बुंद झालेलो आहे. (रंकाळ्यावर स्वच्छंद बागडणारा ) मदनबाण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 01/31/2008 - 01:09 नवीन

गिरगावात...

टेंबे उपहारगृह - ठाकुरद्वार, छत्रे उपहारगृह - मुगभाट लेन च्या दारात. प्रकाश (जोगळेकर), सिक्कानगर - फडकेवाडी मंदिरा समोर संजय अभ्यंकर
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/31/2008 - 02:26 नवीन

केशवसुमार यांचा (यांची ) मान राखून

खरे आहे. पण मला सर्व चवींची मिसळ आवडते. कोल्हापूरची फडतरे पण आणि वैद्यची पुणेरी मिसळ पण. आणि आम्ही महत्व देतो मिसळीच्या सँपल ला. त्यामुळे कांदेपोहे आहेत का चिवडा आहे याला महत्व कमी. झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब. टीपः वरील मते माझी वैयक्तीक आहेत. (कोणतीही मिसळ चवीने खाणारा ) धन्या. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:21 नवीन

हेच,

झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब. हेच म्हणतो...! आपला, (मिसळवेडा) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
म
मानस गुरुवार, 01/31/2008 - 04:00 नवीन

मुंबईत

मुंबईत "पणशीकर" फराळी तसेच साधी मिसळ मुरबाड बस स्थानक सातारा बस स्थानक आणि अनेक ................................ बस स्थानके
  • Log in or register to post comments
म
मनापासुन Mon, 03/31/2008 - 11:11 नवीन

सातार्‍यात......

सातार्‍यात...... पोवई नाक्यावर्..भारत भुवन्.....चन्द्रविलास सातार्‍यात मिसळी सोबत पुरी भाजी ही फेमस आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मानस
ल
लॉरी टांगटूंगकर Wed, 09/04/2013 - 23:57 नवीन

भाभु माहिती आहे.

भाभु माहिती आहे. चंद्रविलास नेमकं कुठंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनापासुन
स
संजय अभ्यंकर गुरुवार, 01/31/2008 - 06:28 नवीन

दक्षिण-मध्य, मध्य मुंबई...

सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू) लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम तसेच तीन - चार लहान लहान उपहारगृहातही झण्झणीत मिसळ मिळते. दक्षिण-मध्य आणी मध्य मुंबईतील बहुमजली औद्योगीक वसाहतीतल्या बहुसंख्य कँटीन्स मध्ये झण्झणीत मिसळ मिळ्ते. संजय अभ्यंकर.
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 01/31/2008 - 18:12 नवीन

वाहवा..!!

हे सर्व वाचल्यावर तो॑डाला भलतेच पाणी सुटले आहे..आता ह्या 'तीर्थस्थळा॑ना' भेटी देऊन मिसळरूपी प्रसाद सेविल्याशिवाय आत्म्यास मुक्ती मिळणार नाही!!
  • Log in or register to post comments
व
विवेकवि गुरुवार, 01/31/2008 - 18:35 नवीन

उत्तम

आपणास शतषहा धन्यवाद चुकी साठी क्षमस्व आपली मिनु जोशी.
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर गुरुवार, 01/31/2008 - 19:33 नवीन

मुम्बइ

मुम्बइ पुन्याबाहेरच्या बस स्थानकावर उत्तम मिसळ मिळ्ते...कुठेही खा....
  • Log in or register to post comments
क
केशवराव Fri, 02/01/2008 - 08:40 नवीन

यादी छान बनत चालल्ये....!

समस्त मिसळ पाव प्रेमींनो, यादी छान बनत चालल्ये. महाराष्ट्रात कुठेही हिंडताना हि यादी उपयोगी पडेल. [ मिसळ पाव खात हिंडणारा] केशवराव.
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Fri, 02/01/2008 - 09:35 नवीन

तापीकर काकांचे लक्ष्मी विश्रांती गृह...

बाजीराव रोड वर भिकारदास मारोती जवळ तापीकर काकांचे होटेल आहे. तेथे मिसळ फार उत्तम मिळते. हॉटेल रामनाथ (टिळक रोड) हे सुध्दा एक झकास आणि झणझणीत मिसळ मिळण्याचे ठिकाण. नीलकांत
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/30/2008 - 18:06 नवीन

काटा किर्र् र्र

आज सकाळी एक फस्क्लास मिसळ खाल्ली बुवा..कर्वे रोड (पुणे) वरील 'काटा किर्र' ! झकास आहे. धमाल मुलाचे जाहीर आभार!! इतरा॑नाही माझा सल्ला- खाऊन पाहाच, मस्त आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 03/31/2008 - 10:06 नवीन

काय हे

काय हे डॉक्टरसाहेब, च्यायला, तुम्ही म्हणजे फार लाजवता बुवा! आभार बिभार कसले आलेत? ए॑जॉय माडी.... -ध मा ल अण्णा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
ध
ध्रुव Mon, 03/31/2008 - 11:09 नवीन

नक्की पता

सांगा... नुसतं कर्वे रोड म्हणले तर फिरत बसावे लागेल... :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
म
मनस्वी Mon, 03/31/2008 - 11:46 नवीन

गरवारे कॉलेज

ला लागून जनता सहकारी बँक आहे.. तिच्या समोर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा