मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

झांज..

ऋषिकेश ·

विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 07:56
वा ऋषिकेशा, वाचून अगदी प्रसन्न वाटलं! ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली या ओ़ळी सुरेख! आपला, (वारकरी) तात्या.

ऋषिकेश Fri, 02/01/2008 - 19:48
तात्या, धनंजय प्रोत्साहनाबद्दल अनेक आभार! सुनीलराव, मलाहि आता जाणवतय... काहि ठिकाणी खटकतेय रचना, पण तेव्हा एकदम सुचले म्हणून लिहिलं :) तरीही आवडल्याचं कळवल्याबद्दल आभार -ऋषिकेश

प्राजु Fri, 02/01/2008 - 20:15
गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली ही ओळ खूपच आवडली. - प्राजु

चतुरंग Sat, 02/02/2008 - 03:17
मंडळी, ऋषिकेशची, "झांज" ही सुंदर कविता वाचली. मात्रांचा ठेका कुठेतरी चुकतोय असे वाटल्याने ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली आणि ही गज़ल पुन्हा एकदा सादर करत आहे. पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली तेलवाती ह्या निरांजनी लावून झांज आली गजरात माऊलीला ती घेऊन झांज आली हरीनाम आसमंती ते भारुन झांज आली कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली वैष्णवांच्या कोलाहली ही गर्जून झांज आली अबीर गुलाल बुक्क्यात रंगून झांज आली वारीच्या रिंगणाला ओढ लावून झांज आली आली दिंडी वेशीवरी हे सांगून झांज आली इंद्रायणीच्या सोहळ्या मोहरुन झांज आली बेहोष वाळवंटी आज नाचून झांज आली.. चतुरंग

In reply to by चतुरंग

ऋषिकेश Sat, 02/02/2008 - 03:27
ऋषिकेशशी व्य.नि. मधे चर्चा करुन थोडी सुधारणा केली हा तुमचा विनय झाला.. उगाच काय लाजवता राव! अहो त्या एकमेकांत अडकलेल्या उत्फुर्त शब्दांमधून तुम्ही कसदार काव्य तयार केलंत आणि म्हणताय "थोडी" सुधारणा.. कल्पना काय हो छप्पन सुचतात होऽ, त्या लयबद्ध करणं, मात्रांत बसवणं आणि तरीहि हवं ते पोहोचवणं हे येरागबाळ्याचं काम नै भौ... तुमच्यासारख्यांचीच जातिवंत प्रतिभा हवी त्याला :) आधीच सांगितल्याप्रमाणे.. हि कविता फार फार आवडली :)!!!! -(येरागबाळा)ऋषिकेश

प्रमोद देव Sat, 02/02/2008 - 10:36
ऋषिकेश ह्यांच्या मूळ रचनेत सुधारणा करून चतुरंग ह्यांनी त्यांचे 'चतुरंग' हे नाव सार्थ केले. आधीच्या काव्यात अर्थ होताच पण गेयता नव्हती. चतुरंग ह्यांनी ते काम अगदी नेटकेपणे साधलेले आहे. ऋषिकेश आणि चतुरंग ह्या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन!

प्राजु Sat, 02/02/2008 - 21:45
दोघांचेही अगदी मनापासून अभिनंदन... एक उत्तम काव्य तयार झाले आहे. - प्राजु

स्वाती राजेश Sun, 02/03/2008 - 15:35
प्राजु टीचर च्या हाताखाली उत्तम विद्यार्थी तयार होत आहे.. मस्त वाटले. गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली या ओळी आवडल्या. बक अप....

Taxonomy upgrade extras
प्राजू यांची सांज.. ही अप्रतिम कविता वाचून काहि ओळी सुचल्या पंढरीचा ठेका उदरी घेऊन झांज आली चिपळ्या-ढोलकाला साथ देऊन झांज आली गाभार्‍यात पेटलेले निरांजन तेलवातीचे गजरात माऊलीचे समाधान पाहून झांज आली हरीनामाचा गजर आसमंतात भरलेला कृतकृत्य विठ्ठलाला निरखून झांज आली ना संपतो कोलाहल, भोवती गर्दीही लोटलेली गुलाल अबीर बुक्क्यात रंगून झांज आली वारकर्‍यांच्या रिंगणाची, गावास ओढ लागलेली दिंडी पोचली वेशीवरी सांगून झांज आली कृष्णेकाठचा सोहळा पाहूनी शहारली गात्रे बेहोष होऊन वाळवंटी नाचून झांज आली.. -ऋषिकेश

तू असता तर...!

प्राजु ·

इनोबा म्हणे Fri, 02/01/2008 - 01:25
वाह! क्या बात है... अजून येऊ द्या.... बघ क्षितिजाला भेटे नभ हे चढली लाली पटलावर लाली ती मम भाळी भरण्या सजणा, तू असता तर......! फिदा लहरी रूपावरी त्या चंद्रमा झळके अवनीवर चांद तो मम मुखी पाहण्या सजणा, तू असता तर......! या ओळी विशेष आवडल्या...... आम्हीही कविता केल्या असत्या ऐसा मेंदू असता तर.....! असो!तुमची काव्यप्रतिभा अशीच फुलत राहो! (काव्यप्रेमी) -इनोबा

विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 18:55
छान कविता..! बघ क्षितिजाला भेटे नभ हे चढली लाली पटलावर लाली ती मम भाळी भरण्या सजणा, तू असता तर......! या ओळी फार आवडल्या. सुरेख..! अवांतर - थोरामोठ्यांच्या संस्थळावर प्रकाशित झालेले साहित्य मिपाच्या टपरीवरही प्रकाशित केल्याबदल मिपातर्फे मी आपले आभार मानतो! आपला, तात्या, मिसळपाव डॉट कॉम.

प्राजु Fri, 02/01/2008 - 20:17
टोमणे कळतात बरं...! यापेक्षा जोरात हाणाल असे वाटले होते.. हा फारच सौम्य आहे. :))) - प्राजु

लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
एक प्रीतीची मौज राजसा फेसाळते किनाऱ्यावर.. हात घेऊनी माझा हाती सजणा, तू असता तर......! सोनेरी रुपेरी रंगांची ही नक्षी उमटे रेतीवर त्या नक्षीमध्ये रंग भरण्या सजणा, तू असता तर......! बघ क्षितिजाला भेटे नभ हे चढली लाली पटलावर लाली ती मम भाळी भरण्या सजणा, तू असता तर......! फिदा लहरी रूपावरी त्या चंद्रमा झळके अवनीवर चांद तो मम मुखी पाहण्या सजणा, तू असता तर......! खर्जातली ऐक गाज त्याची खारा वारा अंगावर कुंतल माझे मुक्त करण्या सजणा, तू असता तर......! - प्राजु. ( मनोगत दिवाळी अंकात ही कविता प्रकाशित झाली होती.)

सांज..

प्राजु ·

विसोबा खेचर Fri, 02/01/2008 - 00:08
वा प्राजू, खरंच छानच कविता केली आहेस. अगदी चित्रदर्शी झाली आहे. कवितेतली सांज डोळ्यासमोर येते...! और भी लिख्खो... संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली या ओळी फार आवडल्या... आपला संध्या-रामरक्षा व पर्वच्याच्या सांजेतला, आणि आपला ग्लेनमोरांजीतल्या सांजेतला, तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सुनील Fri, 02/01/2008 - 01:00
आपला संध्या-रामरक्षा व पर्वच्याच्या सांजेतला, आणि आपला ग्लेनमोरांजीतल्या सांजेतला काय हे तात्या? मी काल संध्याकाळी, संध्या करून, व्याकरणाच्या पुस्तकातील संधी वाचीत शेजारच्या संध्येशी बोलण्याची संधी शोधत होतो!! प्राजू, कविता छान! (संध्यासक्त) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती राजेश Fri, 02/01/2008 - 00:12
पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली या ओळी आवडल्या.

चतुरंग Fri, 02/01/2008 - 00:18
प्राजु सुरेख काव्य झालंय. अवांतर - तुझं गीत वाचून "संधिकालि ह्या अशा धुंदल्या दिशा दिशा" ह्या गाण्यानं मनात एकदम फेर धरला! चतुरंग

इनोबा म्हणे Fri, 02/01/2008 - 00:54
वाह! झकास जमली आहे कविता. घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली या ओळी विशेष आवडल्या

ऋषिकेश Fri, 02/01/2008 - 03:22
अप्रतिम कविता गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली ह्या ओळी विषेश आवडल्या. मला हि कविता वाचून काहि ओळी (त्या इतक्या सशक्त नाहि आहेत पण तरीही) सुचल्या त्या इथे वाचा. -ऋषिकेश

प्रमोद देव Fri, 02/01/2008 - 10:59
गजलसदृष्य कविता आवडली. घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. ह्या ओळी विशेष आवडल्या.

अशीच सुधीर मोघ्यांची ,श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली नादमय कविता आहे. आशा भोसलेंनी जीव ओतून गायली आहे. सांज ये गोकुळी, सावळी सावळी सावळ्याची जणू साउली धूळ उडवीत गाई निघाल्या श्याम रंगात वाटा बुडाल्या परतती त्यासवे, पाखरांचे थवे पैल घंटा घुमे राऊळी पर्वतांची दिसे दूर रांग काजळाची जणू दाट रेघ होई डोहातले चांदणे सावळे भोवती सावळ्या चाहुली माऊली सांज, अंधार पान्हा विश्व सारे जणू होय कान्हा मंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू ओंजळी केशवखुमारांचे यावर विडंबन असेलच. मी एकदा कुठेतरी वाचले होते. पण ते हस्तलिखित होते. पर्वत्यांची दिसे सून लांब काजळाची जरी दाट रेघ ............... असे पुसटसे आठवते आहे. प्रकाश घाटपांडे

प्राजु Fri, 02/01/2008 - 20:20
तात्या, वरदा, स्वाती, विनायक, ऋषिकेश, चतुरंग.. धन्यवाद. प्रमोदराव, अहो गझल सदृश म्हणू नका. कारण मला गझल येत नाही लिहायला आणि या कवितेत तर गझलेचे सगळे नियम मी धाब्यावर बसवले आहेत. आपणा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. - प्राजु

आपला अभिजित गुरुवार, 02/07/2008 - 10:50
संधीकाली `घोट' पोटी रिचवून सांज आली गटाराला नवा पाहुणा देऊन सांज आली वस्त्यावस्त्यांतून पेटली ती भट्टी लपलेली त्रुषार्थाची त्रुष्णा विझवून सांज आली मुले-बाळे अन् माऊली घरी परतलेली `अस्ता'स चैतन्याच्या घेऊन सांज आली सुरू आता कोलाहल अन् शिव्यांची लाखोली आयुष्याची लक्तरे फेडून सांज आली पावलास त्या घराची वाटही न गवसलेली वाटेवरच्या नजरा अन् थिजवून सांज आली उद्ध्वस्त होत मने अन् गात्रेही गोठलेली रक्त शुष्क भावनांचे पिऊन सांज आली -------------

प्राजु Fri, 02/08/2008 - 00:50
वा वा... अभिजीत.. केशवाच्या पाऊलावर पाऊल... माफि वगैरे नका हो मागू... छान जमली आहे.. पण इथे का लिहिली आहे तुम्ही... स्वतंत्र लिहायचित ना? - प्राजु

संधिकालचे गीत ओठी घेऊन सांज आली अंबराला नवी किनार देऊन सांज आली घरांघरांतून पेटली ती चूल लिंपलेली निरांजनाची ज्योत इवली लाऊन सांज आली गुरे वासरे आणि पाखरे घरी परतलेली अस्ताचलाच्या झळाळीला बिलगून सांज आली संपला कोलाहल अन् चाहूल लोपलेली उदास नूर त्या बाजाराला देऊन सांज आली पाऊलाला घरट्याची त्या ओढ लागलेली वाटेवरती नजर कोणती लावून सांज आली तप्त चेतना, शुष्क ओठ अन् गात्रे थरारली गूज रात्रीचे सांगत वेडी लाजून सांज आली.. - प्राजु

ताज्या दमाचे गायक!

चतुरंग ·

विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 23:36
रंगराव, राहूल हा खरंच एक गुणी गायक आहे. मला त्याचे गायन अतिशय आवडते. साधारणपणे वर्ष-दीड वर्षांपूर्वी मी राहूलवर एक लेख लिहिला होता. तो मनोगतावर प्रसिद्ध झाला होता. आता हा लेख आपल्याला इथे वाचता येईल.. राहूललादेखील हा लेख खूप आवडला होता. असो, राहूलकडून मला खूप खूप अपे़क्षा आहेत. मी साधारणपणे वर्षदीड वर्षापूर्वी राहूलचे गाणे ऐकून हा लेख लिहिला होता. त्यानंतर परवाच दूरदर्शनवर ई मराठीवर राहूलचे गाणे ऐकण्याचा योग आला. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की राहूलचे गाणे दिवसेंदिवस अधिक समृद्ध होत आहे, चतुरस्र होत आहे. एक श्रोता म्हणून माझे हे मत मी या निमित्ताने येथे नोंदवत आहे. माझ्या मते एखाद्याचे गाणे किंवा त्याची गायकी आणि त्यातला मजकूर (कंटेन्ट) यात काळानुरूप अशीच प्रगती दिसली पाहिजे, तरच ती व्यक्ति एक उत्तम गवई होऊ शकते आणि खूप काळ लोकांना अधिकाधिक उत्तम व दर्जेदार गाणे ऐकवू शकते. साध्या भाषेत सांगायचे तर परिपक्व गायक होण्यासाठी याच गोष्टीची नितांत आवश्यकता असते. राहूलमध्ये मला ही प्रगती दिसते आहे आणि म्हणूनच मला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. असामान्य प्रतिभा असलेल्या त्याच्या आजोबांचा आशीर्वाद तर त्याला आहेच परंतु त्याचसोबत आमच्यासारख्या रसिक श्रोत्यांच्या शुभेच्छाही त्याच्या पाठीशी आहेत! मिसळपाव परिवारातर्फे मी राहूलचे अभिष्टचिंतन करतो आणि त्याला त्याच्या गान-कारर्किर्दीकरता अनेकोत्तम शुभेच्छा देतो... अवांतर - बरं का रंगराव, मिसळपाववरील सदर चर्चेचा दुवा मी राहूलला विरोपाने कळवत आहे! :) आपला, (गाण्यातला) तात्या.

प्राजु Fri, 02/01/2008 - 00:54
इप्रसारणवर मध्यंतरी त्याची मुलाखत झाली होति. मी अगदि नीट ऐकली. खूप गुणी गायक आहे तो. भरपूर यश त्याला मिळो हिच प्रार्थना. - प्राजु

लेखनप्रकार
यू-ट्यूबवर मध्यंतरी राहुल देशपांडेचे "बगळ्यांची माळ फुले" ऐकायला मिळाले. फारच सुंदर वाटले. पं.वसंतराव देशपांड्यांचा (भाईकाकांच्या भाषेत "वसंत खाँ!") हा नातू. डोळे मिटून ऐकले तर वसंतरावांच्या आवाजातली झार राहुलच्या आवाजातही सहीसही कळते! देवाचे देणे - आपण फक्त ऐकणे!! चतुरंग

दीदीना भाईकाकांच्या नावचा पुरस्कार!

चतुरंग ·

In reply to by सुनील

चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 21:29
मला मूळ बातमी संपादित करता आली नाही. त्यामुळे पुन्हा दुवा टाकून खाली उत्तर दिले आहे त्यात "दुवा" नीट उघडतो आहे. चतुरंग

चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 21:26
काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने! दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!! भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो! काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते! देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!! बातमी वाचा. चतुरंग

विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 22:50
बातमी वाचून धन्य झालो...! रंगराव, आपण दिलेल्या दुव्याबद्दल आभार.. आपला, (भाईकाकांचा शिष्य व दिदीभक्त!) तात्या.

प्राजु Fri, 02/01/2008 - 00:25
दिदिंना भाईकाकांच्या नावाचा पुरस्कार मिळणे.. हा एक दुग्धशर्करा योगच आहे. धन्यवाद बातमी इथे दिल्याबद्दल. - प्राजु.

मुक्तसुनीत Fri, 02/01/2008 - 01:24
पुणे, ता. ३० - वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनी मध्ये गाण्यांना पुलंनी दिलेली दाद आणि अखेरच्या आजारातही आपली मिस्कील विनोदी वृत्ती टिकवलेले पुल.... महाराष्ट्राच्या लाडक्‍या व्यक्तिमत्त्वाच्या अनेक आठवणी उलगडत गानसम्राज्ञी लता मंगेशकरांनी आज विनम्रतेने "पु. ल. स्मृती सन्मान' स्वीकारला. ""पुलंच्या नावाचा सन्मान शिवशाहिरांच्या हस्ते मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. आज माझ्या जीवनातला फार मोठा दिवस आहे,'' असेही त्या म्हणाल्या. "आशय सांस्कृतिक' आणि "परांजपे स्कीम्स' आयोजित पाचव्या "पुलोत्सवा'चे उद्‌घाटन आज साहित्य संमेलनाध्यक्ष म. द. हातकणंगलेकर यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पु. ल. स्मृती सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते लतादीदींना देण्यात आला. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी चंद्रकांत कुडाळ, प्रदीप खिरे, सारंग लागू, विजय वर्मा, श्रीकांत आणि शशांक परांजपे, महोत्सवाचे निमंत्रक डॉ. नरेंद्र जाधव, "सकाळ'चे संचालक-संपादक आनंद आगाशे, सरिता वाकलकर व्यासपीठावर उपस्थित होते. दीदी पुढे म्हणाल्या, ""प्रत्यक्षात पीएल आणि मी फारच कमी वेळा भेटलो. आमची पहिली भेट माझ्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीला झाली. तेव्हा धोतर, पांढरा शर्ट आणि ब्राऊन कोट घातलेले पुल न सांगता आमच्याकडे आले आणि त्यांनी माझ्या गाण्याचे कौतुक केले. मला "यशस्वी होशील', असा आशीर्वाद दिला. दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आणि दोन गाणी त्यांनी मला शिकवली. "करवंदीमागे उभी एकटी पोर' असे त्यातल्या एका गीताचे शब्द होते. त्यानंतर मी मुंबईत आले आणि दीर्घकाळ आमची गाठ पडली नाही. त्यांच्या अखेरच्या आजारात मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हाही त्यांच्यातील मिस्कील विनोदी वृत्ती कायम होती. पायाला सूज आलेली आणि व्हीलचेअरवर बसलेले पुल मला म्हणाले, ""लता, पूर्वी "पाव'ला "डबलपाव' का म्हणत असावेत, हे मला आज समजतेय. आज साठ वर्षांनी त्यांच्या नावाचा सन्मान मिळणे म्हणजे त्यांचा आशीर्वादच आहे, अशी माझी भावना आहे. आताही ते कुठे तरी आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत, असे वाटते आहे.'' पुरंदरे म्हणाले, ""लतादीदींसाठी आता स्तुतिपर विशेषणे सापडत नाहीत, अशी अवस्था आहे. परमेश्‍वराने महाराष्ट्रात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंडे जन्माला घातली आणि त्यानंतर पाच मंगेशकर भावंडे जन्माला घातली. हवेची लाट जर पकडता आली तर त्यातूनही दीदींचे सूर, मध पाझरावा तसे पाझरताना दिसतील. दीदींना हा सन्मान मिळालेला पाहून पुलंचा आत्माही आनंदला असेल.'' प्रा. हातकणंगलेकर यांनी पुलंच्या काही आठवणींना उजाळा दिला. ""बहुआयामी, विविध क्षेत्रांत लीलया संचार करणारे पुल हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. या महोत्सवाच्या रूपाने पुलंचे स्मरण इतक्‍या मोठ्या प्रमाणावर केले जात आहे, ही आनंदाची बाब आहे. पुलंच्या "अंमलदार' नाटकाच्या पहिल्या अंकाचा पहिला श्रोता मी आहे. सांगलीला ते विलिंग्डन कॉलेजमध्ये पेटीवादनासाठी आले होते. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी आले होते,'' असे सांगून जुना स्नेहबंध त्यांनी उलगडला. ""पुलोत्सव हे सर्जनशीलतेचे प्रतीक आहे. जीवन समृद्ध करणाऱ्या या सांस्कृतिक प्रयत्नांची पाठराखण करणे हे कर्तव्य समजून "सकाळ'ने माध्यम प्रायोजकत्व स्वीकारले आहे,'' असे आगाशे यांनी सांगितले. महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविक केले. सतीश जकातदार यांनी स्वागत केले. सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. उत्तरार्धात लतादीदींच्या हीरकमहोत्सवी गान कारकिर्दीचा मागोवा घेणारा "स्वरलता' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

नीलकांत Fri, 02/01/2008 - 09:47
हा सोहळा उत्तम झालाय. एवढे दिग्गज सहज जमल्यावर आणि असा योग असल्यावर कार्यक्रम धन्य वाटावा असाच होणार यात शंका नाही. नीलकांत

पिवळा डांबिस Sat, 02/02/2008 - 05:08
पुरंदरे म्हणाले, ""लतादीदींसाठी आता स्तुतिपर विशेषणे सापडत नाहीत, अशी अवस्था आहे. परमेश्‍वराने महाराष्ट्रात निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही भावंडे जन्माला घातली आणि त्यानंतर पाच मंगेशकर भावंडे जन्माला घातली. हेच पु. लं. नी किती सुंदर शब्दांत सांगितलंय! "आळंदीच्या कुलकर्ण्यांच्या मुलांच्या दारी सोन्याचा पिंपळ होता, या मंगेशकर मुलांच्या दारी सुरांचा पिंपळ आहे" (गुण गाईन आवडी) पुरंदरे, पु. ल. आणि लताभक्त, पिवळा डांबिस

काय मोठा योग आहे, लतादीदींचा सत्कार भाईंच्या नावच्या पुरस्काराने! दीदीही धन्य, पुरस्कारही धन्य आणि ते पाहण्याचे भाग्य मिळालेले त्याहूनही धन्य!! भाईंच्या शेवटच्या दिवसातली दीदीनी सांगितलेली आठवण...भर ऑफिसमधे डोळ्यात पाणी हो! काय व्यक्तिमत्व असेल, जे स्वतःच्या टोकाच्या आजारपणात स्वतःवरच विनोद करु शकते! देवसुद्धा रडला असेल हो भाईकाकांना न्यायला लागलं म्हणून!! बातमी वाचा.

शेण कसे खावे?

आपला अभिजित ·

विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 18:17
आपल्या अभिजिता, सुंदर ओळख करून दिली आहेस हो तुझ्या पुस्तकाची! आवडली...! तुम्हीही हे पुस्तक (कुठे मिळालंच, तर) जरूर वाचा आणि अभिप्राय कळवा. काशीत गेलातच म्हणून समजा! अगदी अवश्य वाचेन आणि अभिप्राय कळवेन. आणि अरे तशीही शेण खाण्याची मलाही आवड आहेच, तेव्हा तुझं हे पुस्तक मी नक्की वाचणार आणि शेण खाण्यात प्राविण्य मिळवणार! :) आपला, (शेण खाणारा!) तात्या.

किशोरी गुरुवार, 01/31/2008 - 18:49
म्हणजे मी रोज शेण खाते हे मला आजच कळाले :)) ती पण एक कठीण कला आहे(आता लोकांना कोण सांगनार) मस्त लिहीले आहे अभीजीतजी पुस्तक फुकट मिळेल का?

ओल्डमंक गुरुवार, 01/31/2008 - 20:51
शेण कसे खावे? शक्य तो एकट्यानेच खावे. सगळ्यांनी मिळून खाल्ले की त्याला श्रावणी म्हणतात.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/31/2008 - 22:12
अभिजितजी, आपण हे पुस्तक लिहून शेण खाणार्‍या समस्त लोकांचे पितळ उघडे पाडले आहे. मी पण नित्यनेमाने शेण खातो पण ते कसे हे मी कधीच कोणाला कळु दिले नाही. आपण मात्र आमचे हे धंद्यातील गुपीत एका दिवसात उघडे केलेत. याबद्दल मी रद्दड कोर्टात आपणावर दावा लावावा असा विचार करत आहे. :) टीपः- लिखाण उत्तम आहे. आम्हाला आवडले. वरील सर्व अभिप्राय हा लोकाना दाखविण्यासाठी असून त्याचा विकल्प मनी धरु नये. मोफत प्रतीची अपेक्षा करत आहे. आपला उद्योगबंधु (शेण खाण्यातला) समजून मला पाठवावी. ;) शेणखाऊशिरोमणी -डॅनी

इनोबा म्हणे गुरुवार, 01/31/2008 - 22:25
चांगला लेख आहे. अवांतरः प्रतिक्रीया लिहायच्या वेळी आम्ही नेहमीच शेण खातो... फारसे काही लिहीता येत नाही. तेव्हा एवढं शेण गोड मानून घ्यावे. तेवढी प्रत पाठवता आली तर बघा हो! आपला हावरट(शेण खायला)-इनोबा

बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 01/31/2008 - 22:30
ह्या पुस्तकाची प्रत शोधायचा खूप प्रयत्न केला.... पण अपयश आले. बाकी पुस्तकाची ओळख मात्र झकास आहे... बिपिन.

प्राजु Fri, 02/01/2008 - 01:31
तुमचं हे पुस्तक न मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न करेन म्हणते.. :))) म्हणजे बरोबर शेण खाले जाईल.. (आवांतर : विनोदी ढंगाचे लेखन आवडले.) - प्राजु

देवदत्त Fri, 02/01/2008 - 02:10
सवडीने नीट वाचेन व प्रतिक्रिया लिहीन. तूर्तास शीर्षकावरून एक विनोद आठवला तो लिहितो. नवरा: काय हा स्वयंपाक बनवला आहे. त्यापेक्षा शेण चांगले. बायको: देवा, काय म्हणावे ह्यांना आता. शेणाचीही चव घेऊन बघितली?

हा तर शासकीय कामाचा मुलमंत्रच आहे.सहकार्‍यांच्या सुचनेनुसार याचे पाठांतर करुन तो जपण्याचा आम्ही खुपच प्रयत्न केला. पण आम्हाला त्यात अपयश आले. मग आम्हि अनिच्छेने कामाला अकाली सोडचिट्ठी दिली आनी त्याला स्वेच्छानिवृत्ती म्हणले. आता आम्ही लोकांना पेढे कसे खावे असा सल्ला देत फिरतो. (श्रावणीत पंचगव्य खाल्लेला) प्रकाश घाटपांडे

विसुनाना Fri, 02/01/2008 - 13:57
'शेण कसे खावे' हे सांगणारा यशस्वी लेख. (त्यामुळे स्वतः शेण खाण्यात लेखक अपयशी ठरल्याने त्याला शेण खाण्यात शेवटी यश आलेच! - म्हणजे काय? ;-) )

बेसनलाडू Fri, 02/01/2008 - 14:42
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०-२० सामन्यात आता या घडीला आपण जसे खातो आहोत तसे खावे. (भारत ३५ / ५, ७.२ षटके) (समालोचक)बेसनलाडू

आपला अभिजित Fri, 02/01/2008 - 18:41
मित्रहो, धन्यवाद! असेच प्रेम राहू द्या. त्यातूनच नव्या लेखनाची उर्मी (मातोंडकर नव्हे!) मिळेल. -आपला, अभिजित पेंढारकर.

बाजारात येता-जाता, गल्ली-बोळातल्या फूटपाथांवर, रेल्वे स्टेशनांवर, बस स्टॅंडांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतची वर्तमानपत्रं, नियतकालिकांत सध्या एकाच प्रकारच्या पुस्तकाची चलती आहे...यश कसे मिळवावे, सुखी कसे व्हावे, यशस्वी होण्याचे शंभर उपाय, अपयशातून यशाकडे वगैरे वगैरे....! ही पुस्तकं एवढ्या संख्येनं सगळीकडे मिळताहेत, खपताहेत, त्यावरून त्यात नक्कीच काहितरी "दम' असला पाहिजे. "नॉन-फिक्‍शन' पुस्तकंच हल्ली खपतात, अशी "रिऍलिस्टिक' माहितीही मिळाली.

IT वाले...तुमच्या चष्म्यातून..आमच्या चष्म्यातून.

धमाल मुलगा ·

स्वाती राजेश गुरुवार, 01/31/2008 - 16:12
अगदी माझ्या मनातील भावना लिहिल्या आहेत. या गोष्टीचा कोणी विचारच करत नाही कि प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. उत्तम लेखन केले आहे. बाकीची प्रतिक्रीया नंतर लिहिन.

मनिष गुरुवार, 01/31/2008 - 16:21
खरा बेसुमार पैसा हा बिझनेस मधे आहे, नोकरीत नाही. करोडोंचे बंगले, मालमत्ता ही नोकरीपेशा माणसांमधे अभावानेच बघायला मिळते. पण नोकरी मधे सर्वात lucrative क्षेत्रांमधे software हे नक्कीच आहे; इतर नोकरीपेशा माणसांना बघितले की आपण software वाले किती सुखी आहोत असे वाटते. हेच काही software वाले मात्र ८-१० लाख वर्षाला मिळत असतांनाही "फार कमी आहे" म्हणून गळे काढतात तेंव्हा वाटते कि ह्यांना जरा बाकीच्या नोकरीपेशा लोकांचे आयुष्य जगायला सांगावे - जमिनीवर येतील जरा.

संजय अभ्यंकर गुरुवार, 01/31/2008 - 21:15
ह्या प्रकारचे आयुष्य केवळ आय. टि. वालेच नव्हे तर असंख्य व्यवसायातले लोक जगतात. आर्थर हेलीने लिहिलेली Airport, Wheels, The Final Diagnosis, Hotel इ. पुस्तके विविध व्यवसायांतील ताण-तणाव दाखवतात. उपहारगृहात काम करणारे, सकाळी ६-७ वा. पासुन रात्री ११ वा. पर्यंत राबतात. वाहन निर्मिती, सतत प्रक्रिया (Continuos Processing - औषधे, रसायने निर्मिती इ.) उद्योगात काम करणारे तंत्रज्ञ, टॅक्सी चालक अशी भली मोठी यादी येथे देता येइल. या पैकी काही उद्योगांत, आय. टी. इतकीच बौद्धिक कसरत व ताण तणाव असतात. परंतु उपरोल्लेखित कामे करणार्‍यांचे उत्पन्न आणी आय. टि. तले उत्पन्न सारखे नाही. आय.टि. वाल्यांना टपलि मारण्यामागे एक वैषम्य दडले आहे, की आमचेही काम तितकेच त्रासदायक असताना उत्पन्नात तफावत का? परंतु हा काळाचा महिमा आहे, त्यामुळे कोणीही वैषम्य वाटुन घेउ नये. एके काळि, दुबईत काम करणारा गवंडी, एका तंत्रज्ञापेक्षा जास्त उत्पन्न मिळवित असे. आय. टि. वाल्यां बद्दल असुया, वैषम्य न बाळगता मान खाली घालुन आपापले काम करण्यात शहाणपण आहे. मासिक उत्पन्नापेक्षा वार्षिक उत्पन्न वाढ जास्त महत्वाची आहे. काळानेच सिद्ध केले आहे की असे, भरमसाठ पगार देणारे व्यवसाय कालांतराने त्या वेगाने पगारवाढ देउ शकत नाहीत. आज दुबईची ओढ कारागिरांतही दिसुन येत नाही. संजय अभ्यंकर smabhyan.blogspot.com

In reply to by संजय अभ्यंकर

सुनील गुरुवार, 01/31/2008 - 21:21
मासिक उत्पन्नापेक्षा वार्षिक उत्पन्न वाढ जास्त महत्वाची आहे. तुमच्या सध्याच्या कामातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते का हे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे! तुमच्या बाकी प्रतिसादाशी सहमत. (आय टी हमाल) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by संजय अभ्यंकर

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/31/2008 - 21:49
एकाच पटावर सोंगट्या आरंभीला एका स्थानात असतात. प्रत्येकाला डाव खेळण्याची म्हणजे फासे टाकण्याची संधी समान असते . कुणाला शिडी मिळते तर कुणाला साप. कधी शिडी तर कधी साप. या खेळात जो शेवटपर्यंत जातो तो यशस्वी. संभवनीयतेचे नियम व कर्तुत्व याचा कुठे संबंध पोहोचतो? एखाद्या पदासाठी स्पर्धेतून दहा उमेदवार गुणवंत व लायक आहेत. निवड एकाचीच करायची आहे. कुठला निकष लावणार? एक निवडला म्हणजे बाकीचे अपात्र टरतात काय?( जे लायक आहेत पण स्पर्धेतच उतरले नाहित हा भाग पुन्हा वेगळा) अच्युत गोडबोले म्हणतात कि आय टी वाले म्हणजे हुषार हा अनेक लोकांचा गैरसमज आहे. आय टी सेक्टर मुळे आलेली विषमता ( हे एकमेव कारण नसले तरी महत्वाचा घटक आहे) ही दुर करण्या साठी याच क्षेत्रातील लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे नाहीतर ही विषमता आपल्याला जगु देणार नाही. प्रकाश घाटपांडे

चतुरंग गुरुवार, 01/31/2008 - 21:48
तुमचे कामाचे स्वरुप आणि त्याचा आर्थिक मोबदला ह्यातील तफावत ही जगात सगळीकडेच दिसते. आणि ती काळाप्रमाणे बदलत असते. सध्या आय्.टी. चा जमाना आहे. पण सगळ्यांनी तिकडेच जाऊन कसे चालेल, कारण पुन्हा मागणी - पुरवठा हा तोलही सांभाळायला हवा. फक्त "गाढवकाम + खूप पैसा" हे समीकरण आणि "खूप मनाजोगे काम + अगदी तुटपुंजी कमाई" हे दोन्ही अंतिमतः तोट्याचेच असते! पहिल्या प्रकारात तुम्ही मानसिक आणि भावनिक पातळीवर पोखरून निघता आणि तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू तडे जातात. ते पैशाने काहीकाळ झाकले जातातही पण नंतर त्याचे रुपांतर निराशेत व्हायची शक्यता बळावते. दुसर्‍या प्रकारात तुम्ही मानसिक आणि भावनिक पातळीवर सुरुवातीला आनंदी असता पण "परिस्थितीचे चटके" तुम्हाला व्यवहाराकडे नेतात त्याने तुमचा आत्मविश्वास ढासळू शकतो आणि शेवटी निराशा! तेव्हा तुलना न करता, आपल्याला आवडणारे काम, जे व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा देते, ते मनापासून करणे महत्त्वाचे. एकीकडे प्रगतीच्या वाटाही धुंडाळव्यात पण त्या आपल्या मूळ पिंडापासून फार दूर नेणार्‍या नसाव्यात, हे श्रेयस्कर. चतुरंग

In reply to by चतुरंग

प्रकाश घाटपांडे गुरुवार, 01/31/2008 - 21:53
तेव्हा तुलना न करता, आपल्याला आवडणारे काम, जे व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा देते, ते मनापासून करणे महत्त्वाचे. एकीकडे प्रगतीच्या वाटाही धुंडाळव्यात पण त्या आपल्या मूळ पिंडापासून फार दूर नेणार्‍या नसाव्यात, हे श्रेयस्कर>> चतुरंगजी आपण अत्यंत समर्पक बोललात. प्रकाश घाटपांडे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 01/31/2008 - 21:54
मी पण सुदैवी (किंवा दुर्दैवी ) असा एक आय्.टी. वालाच आहे. I.T. वाल्याना सर्वसाधारण कोणीही टप्पल मारायचे एक महत्वाचे कारण म्हणजे I.T. च्या तेजीमुळे या क्षेत्रात झालेली खोगीर भरती. आणि या लोकानी मिळणार्‍या पैशाची केलेली मुक्त उधळ्पट्टी यामुळे I.T. वाल्यांच्या नशिबी भाववाढीला कारण ठरलेली मूर्ख माणसे ही बिरूद मिरवण्याची वेळ आली आहे. I.T. वाल्याना मिळणार्‍या शिव्यांच्या मागे इतर क्षेत्रातील लोकांची झालेली आर्थिक कुचंबणा(भाववाढीमुळे झालेली) हेच प्रमुख कारण वाटते. एक उदाहरण इथे द्यावेसे वाटते. मार्केटींग या क्षेत्रात काम करणारा माझा एक मित्र जो M.B.A. करून त्या क्षेत्रात उतरला. तोही दिवसभर भरपूर काम करतो . बराचसा वेळ वितरकाना भेटण्यात, नविन भागात वितरक नेमण्यात, विक्रीचे किमान लक्ष्य साध्य करण्यात तो व्यस्त असतो. पण इतके काम करूनही त्याला मिळणारा पगार मात्र माझ्यापेक्षा कमीच आहे. वास्तविक पाहता एखादा नविन वितरक नेमणे त्याला व्यवस्थित प्रस्थापित करून देणे, त्याच्याकडून विक्रीच्या उद्दीष्टाचे पालन करून घेणे हे एक कसब आहे. तसे बघायला गेले तर त्याच्याकडे उत्तम बोलणे, मिळणार्‍या निधीचा योग्य वापर करणे(हा निधी म्हणजे पगार नव्हे तर कंपनी कडून मिळणारा जाहीरात आणि इतर गोष्टीसाठीचा निधी), विक्रीची बहुविध उद्दीष्टे साध्य करणे अशी माझ्याकडे नसलेली अनेक कसबे(skills) आहेत. पण इतके असूनही पगार कमी. पुण्यात चांगल्या भागात घर घ्यायची क्षमता नाही. अशी एक ना दोन अनेक कारणे आहेत. आणि आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी अविचारी पणाने चालवलेली पैशाची उधळपट्टी याला कारणीभूत आहे असे मला वाटते. पुण्याचे पेशवे

केशवसुमार गुरुवार, 01/31/2008 - 22:27
हे नेहमी तुम्हाला काय येते पेक्षा इतरांना काय येत नाही जे तुम्हाला येते ह्याच्या प्रमाणात मिळतात.. हे प्रमाण कमी जास्त मागणी आणि तुटवडा ह्या तत्वावर आवलंबून असते.. आय.टी. मध्ये पगार जास्त असण्याला कारण भारतीय रुपया आणि परदेशी चलना मधील तफावत हे आहे.. भारता बाहेर राहताना आम्हाला जो पगार मिळतो तो इथल्या स्थानिक लोकांच्या तुलनेत कमीच असतो.. इथे ही आम्ही मध्यम वर्गीच.पण जेव्हा त्याला भारतीय रुपयात बदलण्यात येते तेव्हा ते भारतीय पगारांच्या मानाने खूप जास्त वाटत. श्रमाच्या विषम प्रमाणात पैसे इतर ही क्षेत्रात मिळतात (उदा. चित्रपट / शेअर बाजार इ.) पण त्या मधे आसणार्‍या लोकांची संख्या कमी असल्या मुळे त्या विषयी जास्त बोलले जात नाही.. आय्.टी मधे आलेल्या मध्यमवर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते एकदम डोळ्यात आले आहे इतकेच.. बाकी संजय अभ्यंकरांशी सहमत.. आज आय्.टी. आहे उद्या दुसरे काही असेल.. ( आय्.टी आणि नॉन आय्.टी मधे काम केलेला) केशवसुमार.

In reply to by केशवसुमार

बेसनलाडू Fri, 02/01/2008 - 00:51
हे नेहमी तुम्हाला काय येते पेक्षा इतरांना काय येत नाही जे तुम्हाला येते ह्याच्या प्रमाणात मिळतात.. हे प्रमाण कमी जास्त मागणी आणि तुटवडा ह्या तत्वावर आवलंबून असते.. आय.टी. मध्ये पगार जास्त असण्याला कारण भारतीय रुपया आणि परदेशी चलना मधील तफावत हे आहे.. श्रमाच्या विषम प्रमाणात पैसे इतर ही क्षेत्रात मिळतात (उदा. चित्रपट / शेअर बाजार इ.) पण त्या मधे आसणार्‍या लोकांची संख्या कमी असल्या मुळे त्या विषयी जास्त बोलले जात नाही.. आय्.टी मधे आलेल्या मध्यमवर्गाचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते एकदम डोळ्यात आले आहे इतकेच.. --- सहमत आहे. भारता बाहेर राहताना आम्हाला जो पगार मिळतो तो इथल्या स्थानिक लोकांच्या तुलनेत कमीच असतो.. इथे ही आम्ही मध्यम वर्गीच.पण जेव्हा त्याला भारतीय रुपयात बदलण्यात येते तेव्हा ते भारतीय पगारांच्या मानाने खूप जास्त वाटत. --- हे भारताबाहेर काम करण्याबरोबरच पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून काम करणे की कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणे, यावरही अवलंबून आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांचे वेतन तुलनेने कमी असते. तीच गोष्ट अल्प मुदतीकरता भारताबाहेर जाऊन काम करणार्‍यांची. भारतातील वेतनाच्या तुलनेत मात्र उपरोल्लेखित कोणत्याही प्रकारच्या कर्मचार्‍याचे वेतन जास्तच. बाकी संजय अभ्यंकरांशी सहमत.. आज आय्.टी. आहे उद्या दुसरे काही असेल.. --- असहमत. आय टी ला पर्याय नाही, हे वास्तव स्वीकारायला हवे. खरे तर आय टी इतर व्यवसायक्षेत्रांचेही अविभाज्य अंग बनले आहे. फक्त या व्यवसायक्षेत्राची संतृप्तता आणि या व इतर क्षेत्रात मिळणार्‍या वेतनातील तफावत याबाबत सकारात्मक उपाययोजना करता आल्यास उत्तम. (विश्लेषक)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सुनील Fri, 02/01/2008 - 01:04
आय टी ला पर्याय नाही, हे वास्तव स्वीकारायला हवे आय टी ला पर्याय नाही हे मान्य. परंतु आय टी सेवादाता म्हणून भारताला / भारतीयांना तर पर्याय आहे? आणि तोच तर मुद्दा आहे! (आय टी हमाल) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by सुनील

बेसनलाडू Fri, 02/01/2008 - 03:52
सेवादाता म्हणून उपलब्ध असलेले पर्याय लक्षात घेता निर्मात्याच्या भूमिकेत शिरणे किती महत्त्वाचे, हे आपल्याला कळत नाही, अशातला भाग नाही; त्यावर आपण कृती करत नाही. आणि असे उपलब्ध इतर पर्याय स्वीकारणे निर्मात्यांसाठी कसे फायद्याचे नाही, या विचारात मश्गूल राहून भारतीय सेवादाते आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घेणार नाहीत ना, याची भीती वाटते. सध्याच्या घडीला तरी लॅटिन अमेरिका आणि अतिपूर्वेकडील पर्याय भाषेच्या अडचणीमुळे तसेच युरोपातील पर्याय युरो डॉलरच्या तुलनेत उजवा असल्याने, भारतीयांच्या तुलनेत तितकेसे फायद्याचे नाहीत, असेच दिसते. त्यामुळे सध्यातरी भारतीय सेवादात्यांशिवाय इतर पर्यायांचा कुणी विचार करेलसे दिसत नाही. आणि कुणी तसा करायच्या आधीच निर्माता-सेवादाता अशी दुहेरी भूमिका वठवणे इष्ट! (निर्माता)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

चतुरंग Fri, 02/01/2008 - 04:03
नॉलेज टेक्नॉलॉजी (के.टी) मधे ही आपला ठसा उमटवायला आपण सुरुवात करायला हवी. पाश्चात्य देशांमधल्या एकंदर व्यवस्थेमधली सुसूत्रता लक्षात घेता आपण फार काळ गाफील राहिलो तर पुन्हा आपण गुलाम होऊ. "ज्ञानाधीष्ठित अर्थव्यवस्था" असा एकूण जगाचा तोंडावळा होत जाणार आहे. चतुरंग

संजय अभ्यंकर Fri, 02/01/2008 - 00:18
मी मांडलेल्या मुद्दांना वर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्या बद्दल आभार. १) "तुमच्या सध्याच्या कामातून तुम्हाला आनंद आणि समाधान मिळते का हे त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे आहे!" "आपल्याला आवडणारे काम, जे व्यवस्थित जगण्यासाठी पुरेसा पैसा देते, ते मनापासून करणे महत्त्वाचे. एकीकडे प्रगतीच्या वाटाही धुंडाळव्यात पण त्या आपल्या मूळ पिंडापासून फार दूर नेणार्‍या नसाव्यात, हे श्रेयस्कर." सुनीलजीं व चतुरंगजी नी मांडलेले हे मुद्दे अतिशय महत्वाचे आहेत. केवळ पैशासाठी काम न करता ते आपला छंद म्हणुन करावे. मला आवडलेल्या क्षेत्रात मी काम सुरु केले, तेव्हा अनेक वर्षे माझा पगार माझ्या वर्ग मित्रांपेक्षा कमी होता. परंतु आवडीच्या क्षेत्रात (Machine Tools) मध्ये काम करीत राहिलो, तसेच ह्या क्षेत्रातील जमतील तेव्हडि उपक्षेत्रे शिकत राहीलो (आणी शिकत राहीन). ह्या मुळे ह्या क्षेत्रातील विशिष्ट गुणवत्ता मी मिळवु शकलो आणी ह्या क्षेत्रात उच्च दर्जाचे उत्पन्न मिळवू लागलो. २) मिराशीजींनी मांडलेला मुद्दा: आय.टि. क्षेत्रातील खोगीर भरती तसेच आय. टि. वाल्यांची उधळ्पट्टि आपण सर्वत्र पहात आहोत. ह्या मंडळींना भविष्याचे भान नाही. मी नागपाड्या सारख्या मुस्लिम भागात राहून हे पाहीले आहे. मुलगा आखातात गेला की, काल पर्यंत हाता- तोंडाशी गाठ असलेले लोक जो खर्च करित, त्याने आजुबाजुचा समाज दीपून जात असे, पण हे फार काळ चालू शकले नाही. काळाने त्यांना जमिनीवर आणले. कारण, भारतियांपेक्षा स्वस्त मजूरवर्ग अरबांना बांगलादेश, फिलीपाईन्स, नेपाळ, श्रीलंका इ. देशातुन उपलब्ध झाल्या वर तिथले पगार बरेच खाली आले. अलिकडे आमच्या कं. तला एक तंत्रज्ञ जर्मनीहून परतताना, त्याच्या शेजारी एका अमेरिकन कं. तला मानव संसाधन (H.R. Dept.) अधिकारि बसला होता. तो भारतात सॉफ्टवेअर इं. शोधणार होता. परंतु ते केवळ भारतात शिकलेले आणी नेपाळि, बांगलादेशी नागरिकत्व असलेलेच असावेत ही त्याच्या कं.निची अट होती. जेणेकरुन त्यांचा दर्जा भारतियां इतकाच असेल पण ते भारतियांपेक्षा कमी पगारावर काम करतील. व्यापारीवृत्तीच्या अमेरिकनांना स्वस्त माल कोठे मिळतो हे बरोबर कळते. भारतीय सॉफ्टवेअर इं. कीती काळ आजचा पगार टिकवू शकतिल? ३) केशवसुमारांनी म्हटल्या प्रमाणे, भारतात श्रीमंत भासणारा अनिवासी सॉफ्टवेअर इं. अमेरिकेतला मध्यम वर्गिय असतो. भारतात केवळ तो, तसा भासतो. उच्च उत्पन्न मिळवणारे भारतिय सॉ. इं. फार थोडे आहेत. ४) गिरणी कामगारांच्या विषयी प्राजु ने सुरु केलेल्या चर्चेत मी लिहिले आहे की ज्याने ज्याने शक्य होइल तसे बहुविध कौशल्ये मिळवावित. ही काळाची गरज आहे. जॅक वेल्श ने आपल्या दोन पुस्तकात (Straight From The Gut, Winning) सातत्याने बदलांना तयार रहाण्याचा व बदल आत्मसात करण्याचा सल्ला दिला आहे - "क्षितिजा वर बदल दिसु लागताच त्या साठी सज्ज व्हा" ("Always be on the Radar"). धन्यवाद! संजय अभ्यंकर smabhyan.blogspot.com

हेम गुरुवार, 02/03/2011 - 19:53
भारतात श्रीमंत भासणारा अनिवासी सॉफ्टवेअर इं. अमेरिकेतला मध्यम वर्गिय असतो. भारतात केवळ तो, तसा भासतो. उच्च उत्पन्न मिळवणारे भारतिय सॉ. इं. फार थोडे आहेत. -मुळ लेखांत तुलना भारतातीलच इतर क्षेत्रांत आणि आयटी क्षेत्रांत अशी दिसतेय. अमेरिका आणि भारतातील नव्हे!! - शनीवार-रविवार हक्काच्या सुट्ट्या असतात तरी..!!! मेकॅ. इं.ना विचारा....प्रॉडक्शन टार्गेट, यांव..त्यांव..सुटीच्या दिवशीही कामावर.. कामाची वेळ आयटी सारखीच.. जाण्याची वेळ पक्की असते..(कधी तर आधीच..), पण येण्याची नाय..! तात्पर्य - आयटीयन्सपेक्षा जास्त तास खपूनही पगाराची तफावत ...तिथे जल्ला खुपतां! जाता जाता...-खुर्च्यातील काम नि शॉपफ्लोअरवरील कामगारांबरोबर काम हाही फरक आहेच...तवा उगा बोम नगो!!

वडिल गुरुवार, 02/03/2011 - 22:50
बहुतेक "थ्री इडियटस" मधिल रान्चो नी असेच काहि सांगितले असे वाटले. ह्या चर्चे वरुन एका ओळखिच्या इसमा ची आठवण झाली.... हा इसम आय आय टि मधुन इ. इन्जिनीयरींग करुन .. अमेरीकेतील नामांकित युनिवर्सिटित फेलोशिप घेवुन आला. काहि महिन्यात फोर्ट्रान व सि प्रोग्रामर ( १९९९) म्हणुन जॉब मिळवला. वाय टु के च्या काळात प्रचंड डॉलरस कमवुन कंपनी काढली. ती कंपनी विकुन २००४ साली एच आर कंन्सल्ट्ंन्सी फर्म काढली . २००६ मधे रिअल इस्टेट एजंट म्हणुन मल्टि मिलेनियर झाला. २००८ साली सर्व काहि विकुन भारतात (मुलांचे शिक्षण चांगले व्हावे) म्ह्णुन गेला. भारतात आता हा इसम पुस्तके लिहिणे, कविता लिहिणे असे काहि करतो. धंदा म्हणुन ह्याने भविष्य सांगणे सुरु केले आहे व एक वेबसाइट हि काढली आहे असे ऐकिवात आहे.. पुढे काय करेल काहि सांगता येत नाहि. धन्य असे रान्चो ! बदलाला सामोरे जाणे म्हणजेच यश !

अप्पा जोगळेकर Sat, 02/05/2011 - 16:01
मान्य जास्त पैसा मिळतो म्हणून आम्ही इतरा॑पेक्षा अ॑मळ जास्तच चैन करतो असहमत. अशी अनेक क्षेत्रे आहेत की जिथे याहून जास्त पैसे मिळतात. पोटापुरते पैसे मिळतात हे मान्य. बर॑, ते रोज रोज नवे नवे codes लिहून अन् असलेल्या॑वर डोक॑ आपटून वेड लागायची वेळ येते. deadlines असतात त्या वेगळ्याच. हे रिलेटिव्ह असू शकतं. म्हणजे एकदासगळ्याच गोष्टी ** वर मारायच्या ठरवलं की मग कसली आल्येय चिंता ? आमची स्पेशल आजारपण॑ सोईस्कररित्या नजेरेआड का होतात? अपचन, पित्त इ.इ चिल्लर तर नेहमीचेच, त्याबरोबरीने depression, high BP, heart problems, anxiety वगैरे प्रकार आमच्यासाठीच खास बनवल्यासारखे, डोळ्या॑वर हळू हळू वाढत्या भि॑गाचा दागिना तर हवाच. असेल कदाचित. पण कंपन्या सहसा जिम्नॅशियम, स्विमिंग टँक इ. आरोग्यवर्धक सुविधाही पुरवतात. - कामाचा तिटकारा असलेला उडाणटप्पू

येथेच, दूसर्‍या एका लेखात मा॑डलेल्या एका मतामुळे (कोणिही यावे, अन् अनिवासीया॑ना टपली मारून जावे..) बर्‍याच दिवसा॑पासून माझ्या मनात खदखदणार्‍या "कोणिही यावे अन् आय.टी. प्रोफेशनल्सना टपली मारून जावे" अस॑ का बर॑? ह्या प्रश्नावर येथे चर्चा करावीशी वाटली म्हणून हा खटाटोप. "तू काय बाबा, सॉफ्ट्वेअर क॑पनीत आहेस, तुम्हाला काय पैशाला कमी?" "खोर्‍यानी पैसा ओढतात साले, चार पैसे जास्त लावले त्या॑ना तर कुठे बिघडल॑?" "तुमची काय बुवा, मजा आहे !

प्रेम

विवेकवि ·

शुचि Wed, 05/05/2010 - 04:37
छान आहे. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही रात्री छान च असतात .......... तिच्या स्वप्नानी भरलेल्या देऊन जातात उभारी ..... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला प्रेम कधी सफल होते तर कधी नाही ........

पुस्तक परिचय!

पिवळा डांबिस ·

विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:50
केवळ रसभंग होईल या भीतीने मी कथानक इथे देत नाही पण जमल्यास अवश्य मिळवून वाचा. मी वाचत असतांना माझ्यापुरता तरी काळ थांबला होता! अहो कथानक नको परंतु परिक्षणवजा थोडेबहुत लिहिले असतेत तरी चालले असते! असो, पुस्तक नक्की वाचेन.. आपला, (वाचनोत्सुक) तात्या.

आनंदयात्री गुरुवार, 01/31/2008 - 13:19
ही कादंबरी कशी मिळवावी (विकत घ्यावी) ? कृपया जाणकारांनी अधिक मार्गदर्शन करावे. आभारी -आनंदयात्री

मनिष गुरुवार, 01/31/2008 - 13:37
कुठल्याही पुस्तकांच्या दुकानात किंवा वाचनालयात मिळेल. अप्पा बळवंत चौकात विचारा - "अनंत सामंत" तसे बेस्ट सेलर आहेत. :)

ऋषिकेश गुरुवार, 01/31/2008 - 23:37
एम. टी. आयवा मारू ही फार मस्त कादंबरी आहे. कॉलेजमधे असताना हातात पडली होती आणि एका दमात वाचून काढल्याचे आठवते. त्यावेळी मी भारावून गेलो होतो (तसा मी बर्‍याच पुस्तकांनंतर भारावलो आहे हि गोष्ट अलाहिदा;) ):) प्रत्येक मनाने तरूण असणार्‍याने वाचावी अशी कादंबरी आहे! बाकी परिक्षणात कथा सांगितली नाहि तरी (शेवट न सांगता) गाभा सांगाल अशी अपेक्षा होती . असो या कादंबरीची आठवण करून दिल्या बद्दल आभार -ऋषिकेश

मित्रहो, आज एका मराठी कादंबरीच्या विषयी लिहिणार आहे. कादंबरी तशी जुनी आहे पण त्याविषयी कुठे फारसे लिहुन आलेले वाचले नाही. माझ्या एका साहित्यिक मित्राने मला भेट म्हणून दिली होती. "वेगळी आहे, वाच", म्हणाला. म्हटले तर ही एक प्रेमकथा आहे, म्हटले तर एक शोकांतिका! प्रेमकथा म्हटली तरी प्रचलित विवाहसंस्थेत न बसणारी!! विशेष म्हणजे भारताच्या पूर्णपणे बाहेर घडलेली, किंबहुना जगाच्या सगळ्याच किनारयांपासून दूर घडणारी ही कथा. एक विलक्षण पार्श्वभूमी लाभलेली! एका निराळ्याच विश्वात घेऊन जाणारी!! लेखकाची प्रतिभा ज्वलंत आहे आणि शब्दांची निवड अचूक.