दाढेसाहेब,
मिपावर उत्तम मिसळ मिळाणार्या ठिकाणांचे संकलन करण्याचा हा आपण अत्यंत स्तूत्य उपक्रम सुरू केला आहे. सध्या जरा गडबडीत आहे, परंतु सवडीने मीदेखील यात भर घालीन आणि हे सदर समृद्ध करीन..
मिपावरील सर्व सभासदांनी यात आपल्याला माहीत असलेल्या मिसळीच्या उत्तमोत्तम ठिकाणांबद्दल येथे अवश्य लिहावे अशी कळकळीची विनंती!
तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे,
तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे ! :)
आपला,
(मिसळप्रेमी) तात्या.
संजिवनी- माडिवाले कॉलनी, टिळक रोड
रामनाथ-साहित्य परिषदे जवळ ,टिळक रोड
श्री- शनिपारा जवळ
नेवाळे- चिंचवड
जयश्री- बजाज ऑटो समोर अकुर्डी.
आज पर्यंत सगळ्यात झणझणीत मिसळ 'नेवाळे चिंचवड' येथे मिळाली.
संजिवनी मध्ये उपासाच्या दिवशी , अप्रतिम उपसाची मिसळ मिळते.
निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते
निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते
निखारा दम मिसळ , कोल्हापुरी मिसळ ,पुणेरी मिसळ,उपवासाची मिसळ ,जैन मिसळ,, मिसळ फ्राय ,स्व इच्छा मिसळ असे त्याचे प्रकार आहेत .. सोबत आगळे वेगळे मारवाडी ताक सुद्धा मिळते
फडतरे मिसळ कोल्हापुर, मी खास ही मिसळ खायला जातो कधी कधी तिकडे पुण्याहुन.
बाकी चोरगे मिसळ कोल्हापुर पण चांगली असते.
मिसळ खायला कधीही आवडत असल्यामुळे, कार्यालयाच्या उपहारगृहातील मिसळपण आवडते :)
--
ध्रुव
पुण्यातील गरवारे कॉलेज समोर फारच छान कोल्हापुरी मिसळ मिळते -- पण गर्दी खूप असते आणि मालक (तो पुणेरी नसून कोल्हपुरी आहे) दुकान संध्याकाळई ५ वाजता (!!!) बंद करतो. (का उगाच पुणेकरांना शिव्या घालतात लोक देव जाणे? ;))
दुसरी एक कळकट तपरी आहे अलका टॉकीज समोर तिथेही झणझणीत मिसळ छान मिळते.
नाशिक मधे
शामसुंदर - सातपुर एम आय डी सी ( अतिशय सुंदर मिसळ)
अंबिका - पंचवटी कारंजा ( काळ्या मसाल्याची मिसळ)
तुषार - कोलेज रोड (गोड ब्राह्मण मिसळ)
कमला विजय - दहिपुल (ब्राह्मण मिसळ)
गारवा - अंबड (लाल मिसळ)
अलंकार - मेनरोड ( मिसळी पेक्षा वडारस्सा मस्त)
गुरुदत्त - शिंगाडा तलाव ( कच्चा मसाला मिसळ)
मिसळपाव सेंटर - नेहरु उद्यान (रिक्षावाल्यांचा फर्स्ट चोइस)
अजुन खुप आहेत पण वरचे एकदा चाखाच
आमच्या कोल्हापूरच्या मिसळीपुढे काहीच नाहीत.
१. फडतरे मिसळ
२. खासबागची मिसळ
३. चोरगे मिसळ
४. बावड्याची मिसळ.
खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते...
त्यात कांदेपोहे (पुणेरी) नसतात घातलेले. तर चक्क मोडाची धान्ये असतात.
म्हणूनच कोल्हापूरी मिसळ ती वेगळीच.
- (कोल्हापूरी मिरची)प्राजु
खरे!
कोल्हापुरात कुठेही मिसळीची चव सारखीच असते. अगदी मलकापुरातही बेस्ट मिसळ मिळते.
मिसळ म्हणजे नुसते फरसाण आणि वर तर्री. त्या तर्रीत जी गंमत आहे, ती खरी! पोहे-बटाटे बिटाटे घातलेली मिसळ पाहिली की तळपायाची आग मस्तकाला जाते माझ्या!
प्राजुताई,
खरंतर, कोल्हापूरात कोणत्याही छोट्या टपरीवरसुद्धा मिसळ उत्तम मिळते...
एकदम सहमत बरं का. अगदी ५-८ रुपयातही अनेक छोट्या गाड्यांवर उत्तम मिसळ मिळते.
कोल्हापूरची मोहन ची मिसळ मी गेली अनेक वर्ष अगदी ताव मारुन खात आहे,
आणि चोरग्यांची मिसळ खाउन तर नाकी -डोळी लाल बुंद झालेलो आहे.
(रंकाळ्यावर स्वच्छंद बागडणारा )
मदनबाण
खरे आहे. पण मला सर्व चवींची मिसळ आवडते. कोल्हापूरची फडतरे पण आणि वैद्यची पुणेरी मिसळ पण.
आणि आम्ही महत्व देतो मिसळीच्या सँपल ला. त्यामुळे कांदेपोहे आहेत का चिवडा आहे याला महत्व कमी. झणझणीत सँपल आणि कांदा हे मिसळीचे खरे भरभक्कम खांब.
टीपः वरील मते माझी वैयक्तीक आहेत.
(कोणतीही मिसळ चवीने खाणारा )
धन्या.
पुण्याचे पेशवे
सर्वोदय लंच होम ... करि रोड पुला खाली (डिलाइल रोडची बाजू)
लोअर परळ स्टेशन (पश्चिम) च्या बाहेर पडल्यावर नेताजी लंच होम तसेच तीन - चार लहान लहान उपहारगृहातही झण्झणीत मिसळ मिळते.
दक्षिण-मध्य आणी मध्य मुंबईतील बहुमजली औद्योगीक वसाहतीतल्या बहुसंख्य कँटीन्स मध्ये झण्झणीत मिसळ मिळ्ते.
संजय अभ्यंकर.
बाजीराव रोड वर भिकारदास मारोती जवळ तापीकर काकांचे होटेल आहे. तेथे मिसळ फार उत्तम मिळते.
हॉटेल रामनाथ (टिळक रोड) हे सुध्दा एक झकास आणि झणझणीत मिसळ मिळण्याचे ठिकाण.
नीलकांत
आज सकाळी एक फस्क्लास मिसळ खाल्ली बुवा..कर्वे रोड (पुणे) वरील 'काटा किर्र' ! झकास आहे. धमाल मुलाचे जाहीर आभार!! इतरा॑नाही माझा सल्ला- खाऊन पाहाच, मस्त आहे
प्रतिक्रिया
स्तूत्य..
पुणे,
संजिवनी --
हि घ्या आणखी काही नावें.......
छानच..
मिसळ @ नासिक
मिसळ
मिसळ
मिसळ
मिसळ
फडतरे...
वा !!!
रामनाथ
पुणे...
गरवारे कॉलेज समोर काटाकिर्र :)
+ १
दादरची काही
मामा काणे?
खरेच की
पणशीकर व
प्रकाश न्यू यॉर्क टाईम्स मध्ये!
ओर्कुटवरील यादी
मिसळपाव
नाशिक
नासिक
अजुन काहि
पुणेरी काही
क्षमस्व
या सगळ्या...
हे बरीक
अगदी खर्र
फडतरे मिसळ
सहमत
एकदम सहमत
गिरगावात...
केशवसुमार यांचा (यांची ) मान राखून
हेच,
मुंबईत
सातार्यात......
भाभु माहिती आहे.
दक्षिण-मध्य, मध्य मुंबई...
वाहवा..!!
उत्तम
मुम्बइ
यादी छान बनत चालल्ये....!
तापीकर काकांचे लक्ष्मी विश्रांती गृह...
काटा किर्र् र्र
काय हे
नक्की पता
गरवारे कॉलेज