हे खुपच छान आहे की.
मी कोल्हापुरात फडतरे मिसळ खाल्ली.
चांगली आहे. तिखटपणा जरा कमी वाटला होता मला.
इतरवेळी देखील कोल्हापुरात नावाची पाटी नसलेल्या ठिकाणी देखील मिसळ खाल्ली आहे ती देखील चांगलीच मिळाली आजवर.
त्यामुळे प्राजुच्या कोल्हापुरात कुठेहि मिसळ चांगलीच मिळते ह्या म्हणण्याला २००% (१००% अनुभवाचे आणि १००% आमच्य कोल्हापुरकराचे:))
अनुमोदन.
केशवसुमार ने जसे लिहिले आहे त्याप्रमाणे आकुर्डी येथील जयश्री मिसळ ही देखील फर्मास आहे.
तात्या जुन्नर मध्ये एक उंब्रज नावाचे छोटे गाव आहे. तिथे "दांगटांची मिसळ" फेमस आहे. :)
गेलो आणि खाल्ली तर इथे लिहिनच शिवाय फोटॉ देखील काढेन :)
धमालचे आभार अशासाठी की मी काटा-किर्र मिसळीचा एक्झॅट पत्ता विचारण्यासाठी रविवारी सक्काळी सक्काळी त्याच्या झोपेचे खोबरे केले तरी त्याने मला शिव्या न घालता (पुणेकर असूनही चक्क) बरोबर पत्ता सा॑गितला..:)
बाय द वे 'रामनाथ' टिळक रोडची मिसळ इतकी चा॑गली असते काय..?चक्कर मारली पाहिजे
अहो डॉ. साहेब रामनाथ म्हणजे काय सांगू लाजवाब... मस्त कोल्हापूरी मिसळ घ्यायची इथली.. ... त्यामधे इथली गोल कांदाभजी कुस्करुन टाकायची..एकदम मस्त.. अहाहाहाहा...
मजा येते मिसळ खाताना. :)
पुण्याचे पेशवे
कालच मी रामनाथची मिसळ खाल्ली. मित्रा॑नी सल्ला दिल्यामुळे त्याला कमी तिखट सा॑गितली (कमी तिखट म्हटल्यावर त्याच्या चेहर्यावरचे भाव बदलेले पाहून मी मान खाली घातली.. पण इलाज नव्हता.. उद्या टेल लाईट पेटला म्हणजे?) पण कमी तिखट मिसळसुद्धा एकदम झणझणीत होती. चवही उत्कृष्ट होती. घाईत असल्याने फोटू काढू नाही शकलो. मिसळप्रेमी॑नी जरूर हाणावी..
जुन्या मु॑बई-पुणे महामार्गावर लोणावळे येथे स्वामी विज्ञानान॑दा॑चा एक आश्रम आहे (मनशक्ति के॑द्र). लहानपणापासून मु॑बई-पुणे प्रवास अस॑ख्य वेळा केला असूनही इथल्या मिसळीचा बरीच वर्षे मला पत्ता नव्हता. एकदा मी आणि माझा मित्र मक्या परा॑जपे बाईकवरून पुण्याला चाललो होते ते॑व्हा त्याने मला इथली दही- मिसळ खाण्याचा सल्ला दिला. पण हरामखोराने मला असेही घाबरविले की इथल्या कॅ॑टीनमधे काही खायचे असेल तर तासभर बसून जप करावा लागतो.. खरे वाटून मी पळच काढणार होतो पण थट्टा करतोय म्हटल्यावर गेलो तिथे. (आता जाता-येता मिसळ खाल्ल्याशिवाय पुढे हलत नाही..) तिथली दही-मिसळ एकदम छान असते. बटाटे वडाही फस्क्लास असतो. हे दोन्ही पदार्थ खाऊन मग त्यावर एक चहा प्यावा अन पुढे सुटावे..
धमाल्या मुळचा बारामतिकर आहे.....अजुन सच्चे पुणेकरी गुण त्याला लागयचे आहेत.
असो.
बापट उपहारग्रुह ( जुन्या राजा केळकर म्युझीअम शेजारी) इथे मिसळीबरोबर साहित्य प्रेम ही मिळते.....झणझणीत मिसळीबरोबर त्यानन्तर मस्त गुळ टाकलेला खरवस मिळतो.......बाकी बापट उपहार्ग्रुह पुण्याला अपवाद नाही इथे पुणेरी पाट्या चक्क मेन्यु कार्ड मधे बघायला मिळतात. उदा: जेवण मोठे....जेवण लहान्.....किंवा ...आमच्या येथे लस्सी खायची असते...इतरत्र ती प्यायची असते.
इथे मिसळी बरोबर असणारा रस्सा.आहाहाहाहा.रसना त्रुप्त होते
मिसळीनंतर खरवस..?? सगळी मजाच गेली मग मिसळीची..
माझी आवडती
श्री उपहार गृह (पुणे)
चोरगे (कोल्हापूर)
कैलास (खेड-शिवापूर)
काटा किर्र (पुणे), फडतारे (कोल्हापूर) आता ट्राय करीन नक्की.
अवांतर :
घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बापट उत्तम पर्याय आहे.
इथला दहीभात अवश्य खाउन बघा.
घरी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर बापट उत्तम पर्याय आहे.
इथला दहीभात अवश्य खाउन बघा.
आणि झुणकाभाकर आणि वांग्याची मसालेदार भाजी सुद्धा. आणि जोडीला सोलकढी ग्लास :)
(हावरट)बेसनलाडू
पुण्यातले सर्वात आद्य मिसळीचे दुकान
वैद्य मिसळ : मोती चौक्/फडके हौद दरम्यान रवीवार पेठ रेल्वे बूकींग शेजारी.
ही मिसळ म्हणजे पुण्यातली आद्य मिसळ्...कित्येक वर्षात चवीत जराही बदल नाही
थोडी सौम्य असते.पण सकाळी ९:३० च्य अगोदरच मिळते.
दुकानातले वातावरण ही आद्य आहे.खुर्च्या टेबले काउंटर काऊटरवरचा माणुस सगळे कसे राजा गोसावी च्या पिक्चर मधुन थेट उचलुन आणल्यासरखे वाटते.भींती वरची चित्रे सुद्धा.
मिसळी मधे नायलॉन चे पोहे ही इथली खासीयत.
करता काय...आम्ही पण पुणे सोडून बंगलोर मधे आलो...आता मारा कपाळावर हात...
असो...गृहलक्ष्मी करुन खाऊ घालते कधी कधी....तुमच्या कडे हि सोय आहे कि नाही? :?
(तर्रिच्या सुगंधाने मदहोश होणारा) पांथस्थ...
टिटवाळ्याला, गणपतीच्या मंदिराबाहेर
पुणे-नगर रोडला, वाघोली फाट्याजवळ
कुणी कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर निदान कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व
आहे!
सगळीकडे मिसळ छानच मिळते ह्या समजुतीला तडा गेला माझ्या. :(
मिसळीची फार तल्लफ आली होती म्हणून कसाबसा वेळ काढुन जवळच म्हणून ष्टँडजवळच्या कॅफे जयभवानी मधे मिसळ खाल्ली.
:(
वाइट्ट.
त्यासोबत दिलेला पाव हा बहुतेक मिल्क ब्रेड होता तो गोड आणि मिसळीचा कट म्हणून बहुतेक पुरी भाजी ची पातळ भाजी होती.
कधीच खाउ नका तिथे.
थोड अजुन लांब जावुन दुसरीकडे खाल्ल्ली असती तर बर झाल असत रावं.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
कोल्हापुरात सगळीकडे छान मिसळ मिळते हा माझाही समज परवा भ॑ग पावला.. कोल्हाप्रास दुपारी तीनला पोचलो, चोरगे, फडतरे इ मिसळी॑ची चौकशी केली पण त्या
फक्त सकाळी मिळतात असे कळले आणि मला तर दुसर्या दिवशी सकाळी लगेच
परतायचे होते. मग स्टॅन्डवर सुब्रैय्या नामक एका हॉटेलात गेलो व मिसळ-पाव खाल्ला.
पाव म्हणजे ब्रेड स्लाईस होता (मोस्टली शिळा) आणि तर्री म्हणजे सकाळचे उरलेले सा॑बार
होते. अर्थात चूक माझीही होतीच, उडप्याकडे मिसळ कशी चा॑गली मिळेल पण मला वाटल॑ हा कोल्हापुरातला उडपी आहे ते॑व्हा.. जाऊ देत.
अवा॑तरः बाकी कोल्हापूर मला फार आवडले, बेष्ट शहर आहे. काय एकेक ब॑गले आहेत, व्वा! हवा आल्हाददायक, माणसेही मेहमाननवाजीत तरबेज. स्वतः पुणेकर असल्याने कोल्हापुरी दिलदारी अन खातीरदारी जास्तच जाणवली.
नमस्कार,
पेण ला चावडी नाक्यावर तांडेल ची मिसळ 'लै भारी ' असते. पण सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंतच मिळते.
आणि
नाशिक ला कॉलेज रोड ला एक गाडीवाला आहे. झक्कासच बनवतो.तो पण सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंतच असतो.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
उत्तम मिसळिचे माझे निकष असे आहेत -
१. मूळ पदार्थ - मोड आलेली मटकिचि उसळ ! यात अत्यंत थोडे फरसाण व बराच कांदा. मिसळिचा दर्जा हा फरसाणाच्या व्यस्त प्रमाणात असतो. काही नाजुक मिसळिमधे भरमसाठ फरसाण असते. काही महान लोक यात बटाट्याची भाजी पण घालतात. ही तर अगदीच फालतु मिसळ.
२. अत्यंत तिखट, गरम, झणझणीत तर्रि - हिच्यावर तेलाचा तवंग असलाच पाहिजे. तर्रि ही डायरेक्ट मोठ्या भांड्यातुनच वाढायला हवी आणि ती ही मागाल तितक्या वेळेला. कमीत कमी ३ / ४ वेळा तर्रि मागीतलिच पाहीजे. वाटीतुन तर्रि मिळ्णारी मिसळ ही मिसळ नव्हेच!
३. थोडासा शिळा वाटणारा गोल पाव.( स्लाइस पाव नव्हे )
४. हॉटेलातल कळकट वातावरण
या सगळ्या निकषाला पावणारी बेस्ट मिसळ मीळते - हॉटेल ज्योती, सोलापुर - पुणे महामार्गावरील भिगवण गाव!
एकदा अवश्य भेट द्यावी!
कुणालाच कोल्हापुरची "बावड्यातली " कशी आठवत नाही ?????????????????
मी पुण्यातुन कोल्हापुर ला गेल्यावर हि "मीसळ" बर्याच वेळा चापली आहे..
नेवाळे आणि बालाजी चिंचवड ही स्थानीक "तीर्थशेत्रे" आहेतच.....
मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
घाटकोपरला पुर्वेकडे, फलाटाच्या कल्याणच्या बाजुच्या असलेल्या रेल्वे पुलावरुन उतरल्या उतरल्या स्थानका बाहेरच लॉटरीच्या दुकाना शेजारी एक छोटेखानी हॉटेल आहे ( नाव आठवत नाही , पण बहुतेक "नित्यानंद" असे असावे). तिथे मिसळ पाव तसेच कांदा भजी ही छान मिळतात....
पुण्यात मिसळ सगळ्यात मस्त मिळते काटाकिर्र्........मधे...
वाई फाट्याला अजिंक्य नावाचं हॉटेल आहे तिथे पण फार मस्त मिसळ मिळते.......
वाई गावात शेवड्यांकडे तिखट मिसळ मिळते.........
पुण्यात लक्ष्मी रस्त्याला विजय(लि.ना.चि.म.) या चित्रपटगृहात जे हाटेल आहे
तिथली मिसळ अतिशय छान असते. तर्री अगदी गरमा गरम आणि त्यात
पाव बुडवून सोबत बटाटा वड़ा खावा. फक्त जरा सकाळी सकाळी जावे.
साधारण १० च्या आसपास.
रत्नागिरीत असताना मिसळ ही आमची फेवरेट डिश होती. कॉलेजातून परतत असताना जयस्तंभावर "सम्राट' नावाच्या हॉटेलात तीन रुपयांना मिसळ मिळायची. डबल पाव घ्यायचा असेल, तर साडेतीन रुपये. त्यात दोनदा रस्सा (कट) मिळायचा. ती चापूनच आम्ही घरची वाट धरायचो.
आणखी एक उत्तम मिसळ आठवडा बाजारात "औदुंबर' नावाच्या हॉटेलात मिळायची. आता तिथली चव फारशी चांगली नाही राहिली.
पुण्यात आल्यावर तुळशीबागेतील श्रीकृष्ण, शनिपाराजवळील "श्री' आणि नारायण पेठेतील "बेडेकर' मिसळींची नावे फार ऐकली होती. तिन्ही बंडल निघाल्या! एकतर पुण्यात प्रसिद्ध म्हणून असलेल्या ठिकाणी खाद्यपदार्थांचा दर्जा अतिशय वाईट असतो, असा माझा पक्का समज झाला आहे. (उदा ः जोशी वडेवाले.) त्यातून हे लोक राजरोस (चाकूबिकू न घेता) ग्राहकांना लुटतात. "वाडेश्वर'ची इडली 16 रुपयांना कशी काय मिळू शकते? शिवाय वर जादा चटणीचे पैसे वेगळे! हा म्हणजे कहरच! इडलीचे उत्पादन मूल्य जास्तीत जास्त पाच रुपये असेल. हॉटेल चालवण्याचा खर्च बिर्च मिळून आठ रुपये. त्याच्या दुप्पट-अडीच पट दर?? "रुपाली'त जाणेही मी म्हणूनच खूप पूर्वीच टाकले. असो.
तर "श्री' आणि "श्रीकृष्ण'च्या मिसळीत कांदेपोहे सापडले. बटाट्याची भाजीसुद्धा! शिवाय, तिथे सोबत स्लाईस ब्रेड देतात. मिसळ हाणायची ती लादीपावाबरोबरच! बेडेकरांची मिसळ म्हणजे चक्क आमटीभात वाटला. पुन्हा कधी फिरकलो नाही तिकडे.
मला आवडलेल्या पुण्यातल्या मिसळी ः
1. शनिवार पेठेतील "रामदास' : अतिशय कळकट हॉटेल, पण "बनविणाऱ्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर भेळेची चव असते,' या पुलंच्या तत्त्वानुसार तिथे उत्तम मिसळ मिळते.
2. टिळक रस्ता "रामनाथ' ः इथे ठीक मिसळ मिळते. फार नाही आवडली, कारण तेसुद्धा पोहे घालतात त्यात. पण तिखटजाळ असते. तिथे सोबत वडा खायची पद्धत आहे.
3. "काटाकिर्र'चे नाव बरेच ऐकले आहे. तिथे एकदा खायची आहे.
4. अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली. छान होती. साधीसुधी, पण उत्तम. वर उल्लेख आला आहेच.
5. नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ नुकतीच खाल्ली. उत्तम आहे.
एकूणच, शहरातल्या प्रसिद्ध मिसळींपेक्षा बाहेर छोट्या गावांत टपऱ्यांवर उत्तम मिसळी मिळतात, असे माझे मत झाले आहे!
पुण्यात आल्यावर तुळशीबागेतील श्रीकृष्ण, शनिपाराजवळील "श्री' आणि नारायण पेठेतील "बेडेकर' मिसळींची नावे फार ऐकली होती. तिन्ही बंडल निघाल्या!
सहमत. त्यातल्या त्यात 'श्री मिसळ' चांगली आहे.
"वाडेश्वर'ची इडली 16 रुपयांना कशी काय मिळू शकते? शिवाय वर जादा चटणीचे पैसे वेगळे! हा म्हणजे कहरच! इडलीचे उत्पादन मूल्य जास्तीत जास्त पाच रुपये असेल. हॉटेल चालवण्याचा खर्च बिर्च मिळून आठ रुपये. त्याच्या दुप्पट-अडीच पट दर??
हॉटेलची गणितं इतकी सोपी नसतात. दक्षिण भारतिय पदार्थांची 'मटेरियल कॉस्ट' बरीच कमी असते. त्या मानाने पंजाबी पदार्थ, थाळी, बिर्याणी, ज्यूस वगैरे पदार्थांची 'मटेरियल कॉस्ट' जास्त असते. शिवाय, मनुष्यबळाचा खर्च, वेस्टेज, विविध हप्ते इत्यादी जास्त असते. म्हणजेच 'कॅपिटल इन्व्हेस्टमेंट' आणि 'रनिंग कॉस्ट' दोन्ही जबरदस्त असते. 'रुपाली' चा दिवसाचा खर्चच मुळी दहा हजाराच्या वर असणार. १६-१६ रुपयांना इडल्या विकून त्याला तितकाच फायदा झाला पाहीजे तरच ते हॉटेल चालू राहिल. एकूणात नफ्याचे प्रमाण जास्त असते पण तसाच नुकसानीचा धोकाही जास्त असतो. असो. प्रसिद्धी लाभली की त्याचे 'मुल्य'ही पदार्थांच्या दरात वाढते. अगदी तशीच किंवा त्याहून चांगली इडली एखाद्या कमी प्रसिद्ध उपहारगृहात मिळू शकेल. पण तिथे 'रुपाली' सारखे वातावरण, तत्पर सेवा, स्वच्छता, 'डेकोर' मिळणार नाही. काही हॉटेल्सना 'स्टेटस' सुद्धा चिटकलेले असते. 'बरिस्ता' ला कॉफी एवढी महाग का? असो.
शिवाय, तिथे सोबत स्लाईस ब्रेड देतात. मिसळ हाणायची ती लादीपावाबरोबरच!
१०० टक्के सहमत.
बेडेकरांची मिसळ म्हणजे चक्क आमटीभात वाटला.
१०० टक्के सहमत.
मला आवडलेल्या पुण्यातल्या मिसळी ः
1. शनिवार पेठेतील "रामदास' : अतिशय कळकट हॉटेल, पण "बनविणाऱ्याच्या कळकटपणाच्या चढत्या श्रेणीवर भेळेची चव असते,' या पुलंच्या तत्त्वानुसार तिथे उत्तम मिसळ मिळते.
अजून चव चाखली नाही. जाऊन खायला पाहिजे.
2. टिळक रस्ता "रामनाथ' ः इथे ठीक मिसळ मिळते. फार नाही आवडली, कारण तेसुद्धा पोहे घालतात त्यात. पण तिखटजाळ असते.
'ठीक' हाच शब्द योग्य.
3. "काटाकिर्र'चे नाव बरेच ऐकले आहे. तिथे एकदा खायची आहे.
झकाऽऽऽऽस..! खाऊन पाहा. नक्कीच आवडेल.
4. अलका टॉकीजसमोर कोल्हापूर मिसळ खाल्ली. छान होती. साधीसुधी, पण उत्तम. वर उल्लेख आला आहेच.
5. नगर रस्त्यावर सरदवाडीची मिसळ नुकतीच खाल्ली. उत्तम आहे.
हम्म्म! खाऊन पाहिल्या पाहिजेत ह्या 'मिसळी'.
निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
रत्नागिरीत कधी आलात, तर ही ठिकाणं नक्की ट्राय करा.
१) वायंगणकर (मारुती मंदिर)
व्यक्तिश: मला फार नाही आवडत, पण इकडे फेमस आहे.
२) दत्त मिसळ (टॉकीजवरची / गांध्याची मिसळ)
उत्तम तर्री, झणझणीत. पण दुपारनंतर तर्री संपते. लवकर जाऊन खावे, हे ठीक.
३) माऊली हॉटेल ( KBS होस्टेल समोर)
४) हॉटेलचं नाव आठवत नाही. पण टॉकीज जवळच्या भाजी मार्केटशेजारी शाळेसमोर एक छोटंसं हॉटेल आहे. तिथे सुंदर मिसळ असते. झणझणीत, साधी, पण चविष्ट.
पुण्यात कोथरुडात कर्वेनगरला शिवदीप स्नॅक्सची मिसळ चांगली असते असं ऐकलंय... खात्री करायची आहे! :-)
त्याखेरीज पुण्यातल्या फेमश मिसळींची यादी वर आलीच आहे.
माझ्या आवडत्या
१. श्रीकृष्ण भुवन, तुळशीबाग
२. श्री उपाहारगृह शनिपार
३. बादशाही बोर्डिंग हाऊस - अगदी पेठी मिसळ मिळते हो! अजिबात तिखट नाही!
४. स्वीट होम - येथेही पेठी मिसळ मिळते! तर्री मात्र खूप तिखटजाळ करतात कधीकधी.
मिसळ हा सर्दीवरचा रामबाण इलाज आहे!! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
पाटणकर उपहार गृह, भोर ----- हे भोर मध्ये आहे राजवाडा चौका जवळ
आळेफाटा येथील मिसळ ----- आळेफाटा चौकातून माळशेज घाटाकडे जायला वळलो कि लगेच उजव्या हाताला (नाव लक्षात नाही )
नसरापूर एस टी थांब्या जवळ ------ राजगड ला जायला (गुंजवणी,वाजेघर)जिथे वडाप थांबतात त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला एक हॉटेल आहे
कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकले तरी मिसळीच्या लोकप्रियतेबाबत मात्र सर्वदूर एकमत असेल यांत शंका नाही.
स्वतःला मिसळभोक्ते म्हणवत असाल तर तुम्ही सकाळी मिसळवाला फोडणी देत असलेल्या वेळीच तिथे हजर असायलाच हवं. सूर्य वर चढत जातांना ज्याप्रमाणे नीरेची ताडी होते त्याप्रमाणे मिसळीची उसळ होत जाते. नाक झणझणावून टाकणार्या फोडणीच्या वासासारखा ब्रह्मानंद नाही. 'पंगतीत बसल्यावर वाढपी ओळखीचा हवा.कारण तुम्ही कुठेही कोपर्यांत बसला असाल तरी तुम्हांला हवे ते व्यवस्थित मिळते' असे पूर्वीचे लोक म्हणत, त्यांवरून जर मिसळवाला तुमच्या ओळखीचा असला तर तुमच्या मिसळीला बाकीच्यांपेक्षा चव आलेली असते.
मिसळस्थानांचे प्रकार दोन. पहिला प्रकार म्हणजे ज्या ठिकाणी आपण कुटुंबासहित बसून सुटसुटीतपणे मिसळ खाऊ शकतो, अशी hotel किंवा तत्सम जागा. दुसरा प्रकार म्हणजे रीक्षावाले वा तत्सम मंडळींबरोबर पंगतीला उभे राहून गाडयाच्या तिन बाजूंस असलेल्या लाकडी तटबंदीवर ठेवलेल्या पलेटमधला पाव हातांत धरुन दुसर्या हाताने तुकडे मिसळीच्या रश्श्यांत भिजवत मिसळ हाणणे.
मिसळीला फाकडू बनवण्यांत तिच्यात असलेल्या घटकांचा 'वाटा' फार महत्त्वाचा ठरतो. पहिला म्हणजे मिसळीचा बेस असलेली उसळ. ही जर व्यवस्थित मोड आलेली असली तर मजा आणते. त्याच्यावरचा थर हा प्रत्येक मिसळवाल्यासाठी optional असतो. यांत पोहे, भावनगरी, शेव, साबुदाणा खिचडी, चिवडा इ. पदार्थांपैकी काहिही असू शकते. या सर्वांवर कडी करणारा तिसरा थर आणि प्रत्येक मिसळीचा अतीमहत्त्वाचा घटक म्हणजे मिसळीचा रस्सा आणि त्यांवर तरंगणारी तर्री! 'मिसळीची तर्री' हा शब्द जरी उच्चारला तरी भल्याभल्यांच्या (आता हे वाचणार्यांच्यासुद्धां!) लाळग्रंथींचे नळ धो धो वहायला सुरुवात होते, आणि शेवटी कांदा, कोथिंबीर, लिंबू वगैरे मंडळी लज्जत वाढवण्यास मदतीला असतातच. मिसळ ही मूळ चवीप्रमाणे तिखटच खायला हवी. तिखटपणा झेपत नाही म्हणून मग दही, पापड इत्यादींशी सलगी करून मिसळ खाणार्यांना काटकोनाच्याच पंगतीत बसवायला हवं! हे म्हणजे मूळच्या गोडसर असलेल्या भोपळयावर फोडणी व तिखटमिठाचे संस्कार करून तथाकथित भाजी करण्यासारखं झालं! त्यापेक्षा भोपळयाचे घारगे केले तर किती दणादण संपतात! असो.
नासिकमध्ये श्यामसुंदर, तुषार,गंगा टी हाऊस, अंबिका, भगवंतराव या प्रस्थापित मिसळींशिवायदेखिल अनेक मिसळस्थाने आहेत. गंगापूर रोडवर Modern Cafe, विहार, रेणुका, अंकल्स, मेनरोडवर अगत्य, मखमलाबाद गांवात सुदर्शन हॉटेल, सणसणीत रश्शासाठी आडगांव नाक्यावर ओमसाई नाहीतर नेहरु गार्डन, सिडकोत शिवाजी चौकांत भामरे, साक्षी गणेश जवळ ओम टी हाउस, म्हसरुळ- पेठरोड रस्त्यावरचं सोहम्, सीतागुंफेच्या पुढे प्रविण टी उर्फ देवा, रविवार कारंजावरची बाळासाहेबांची मिसळ, रविवार पेठेतली लोकमान्य, कथडा भागातली सीतामाईंची हिरव्या रश्शाची मिसळ, बागवानपुर्यांत शिरसाट ही काही नांवे.
प्रतिक्रिया
धन्यवाद...
मुंबईकर लोक .....
वा!
इथे
हम्म!
धमालचे
रामनाथ...
मस्त
रामनाथ
मनशक्ति
दही-मिसळ...
बापट उपहारग्रुह
बापट
झुणकाभाकर आणि वांग्याची मसालेदार भाजी
पुण्यातले सर्वात आद्य मिसळीचे दुकान
महाराष्ट्
आमच्या घरलाच या की राव!
करता
इथे मिशीगन मध्ये
माझ्या माहीतीत
कोल्हापुरात
कोल्हापूरी मिसळ
सरदवाडी
डॉक,
पुणे नाशिक
मिसळ
पेण आणि नाशिक
गणुची मिसळ
उत्तम मिसळिचे निकष
करवीर वासीयांनो
उत्तम मिसळ
घाटकोपरला ...
मिसळ....
मिसळ
कोल्हापुर
मिसळ इथली सुद्धा...
मित्रांनो
कोल्हापुर मिसळ हाउस
चाकणची मिसळ
अरेच्चा!
आवडेलेले, नावडलेले...
बराचसा सहमत..
रत्नागिरीतल्या मिसळी...
पुण्यात
मिसळ
मिसळ
नसरापूर एस टी थांब्या जवळची मिसळ अप्रतिम
पाटणकर उपहार गृह, भोर -----
बादशाही उपहार गृह
मिसळ