चर्चिलची "शापवाणी"
लेखनप्रकार
१९४५ साली दुसरे महायुद्ध संपले चर्चील युद्ध जिंकला पण निवडणुक हरला, अटलीच्या मजुर मंत्रीमंडळाने भारताला स्वातंत्र्य देऊ केले. त्यावेळी चर्चिलने विरोधी बाकावरून पुढील समज नोंदवली होती .
"स्वातंत्र्य हा मानवाचा जन्मसिद्ध हक्क आहे, परंतू या क्षणी सुत्रे कॊंग्रेसच्या हवाली करणे याचा अर्थ भारतातील लक्षावधी भुकेल्या प्रजेच्या हितसंबंधाना बदमाषांच्या, दरोडेखोरांच्या आणि चांडाळ लुटारूंच्या स्वाधिन करणे आहे, यांच्या कारकिर्दीत साधी पाण्याची बाटली किंवा पावाचा तुकडाही करमुक्त असणार नाही. फक्त हवा तेव्हडी विनामुल्य उपलब्ध असेल या भुकेकंगाल आत्म्याचे तळतळाट अटलीच्या माथी बसतील. राजकीय साठमारीत देश कायम मग्न राहिल. राजकारण आणि तत्वड्न्यान या विषयातील प्राथमिक धडे गिरविण्यास भारताला निदान एक हजार वर्षे लागतील. आज आपण ज्या मंडळींच्या हाती सत्ता सोपवीत आहोत ती चारित्र्य-शुन्य कःपदार्थ बांडगुळे आहेत, आणखी काही वर्षानंतर त्यांचे नांवही कोणी घेणार नाही,"
चर्चील भारताचा मित्र कधीच नव्हता. ६१ वर्षापुर्वीच्या या शापवाणीत तुच्छता द्वेष पुरेपुर भरलेला होता. या सहा दशकातं युरोपमधल्या सर्व राष्ट्रांचा आणि जपानचा पुनर्जन्म घडला यामागे जी जिद्द प्रत्ययाला आली तिचा मागमुसही आपल्याकडे दिसला नाही. आपल्याला नाझी किंवा जपान सारख्या खुनशी आक्रमणाला प्रत्यक्ष तोंड द्यावे लागले नाही अविश्रांत श्रम तनमनधन अर्पण करणारे निरपेक्ष नेतृत्व आपल्याला लाभले नाही, हे दुर्दैव. वास्तविक या साठ वषात या अद्वितीय देशाचे सोने व्हावयास हवे होते कुठल्याही देशाला हेवा वाटावा असे नद्यांचे जाळे आणि ३५०० कि.मी. लांबीच्या पुर्व पश्चीम किनारपट्टीचे वरदान आपल्याला लाभले आहे. प्रचंड साठा असुनसुद्धा वास्तविक पाण्याचे दुर्भिक्ष्य असण्याचे कारण नाही. विज ,उद्योग धंदे शेती या साठी लागणारी निसर्ग-निर्मित विपुलता एवढ्या प्रमाणात असतांना आपण त्याचा लाभ उठवू शकलो नाही. याचे कारण ब्रिटिशांचा वारसा शिरसावंद्य मानून आपल्या सर्व रंगाच्या राजकारण्यांनी देश लुटण्यास सुरूवात केली.ती नेमकी १५ ऒगस्ट १९४७ ला. दिडसे वर्षे ब्रिटिशांनी जेव्हडा देश पोखरला त्यापेक्षा कैक पटीने आधीक आपल्या राज्यकर्त्यांनी सुलतानी बजावली. आपण आपल्या प्रजेला साधे जंतुविरहित पिण्याचे पाणी आज देत नाही ही शरमेची बाब आहे. आपल्या सर्व नद्या उपनद्या रोगराईने बरबटल्या आहेत. जगात इतरत्र कुठेही आपल्यासारखी धरती, वनस्पती, फळफळावळ यांची विविधता नाही. आपला रुपया डॊलरच्या तुलनेत वधारत आहे या प्रचारी वल्गना ऐकून चीड येते. त्याची स्थानिक क्रय-शक्ती किती क्षीण आहे हे सामान्य माणूस जाणून आहे.
अमुक अब्जाधीश आणि तमुक कोट्याधीश आपल्या देशात आहेत. ही बढाईखोर आकडेवारी अशीच निर्लज्ज्पणाची आहे. सामान्य माणसांची फिकीर अजिबात न करणारी सरकारे कायम आप्ल्या बोकांडी बसली आणि लाचलुचपतीच्या कॆन्सरमुळे सर्व जातीच्या सत्ताधा-यांचे उखळ कैक पिढ्याना पुरणार धनसंचय लाभल्याने पाढरे झाले आहे. माफिया सम्राट बिग बुल चेतन पारेख तेलगी अविनाश भोसले, अशोक मल्होत्रा यांची सरबराई करण्यात धन्यता मानणारी नोकरशाही, मिळत असलेल्या घबाडाकडे कायम लक्ष ठेवुन आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. चर्चिलची शापवाणी खरी करुन दाखवण्याची चढाओढ आपल्या राजकारणातील मंडळीची चालली आहे. अशी दाट शंका येते .
तुम्हाला काय वाटते.?
वाचने
6843
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
कटू सत्य
नकारात्मक दृष्टीकोन
In reply to नकारात्मक दृष्टीकोन by सुनील
सलाम!!!!
अर्धा ग्लास
तुम्हाला काय वाटते.?
In reply to तुम्हाला काय वाटते.? by व्यंकट
दाद
न पटण्याजोगे
मेकॉलेचा खलिता
In reply to मेकॉलेचा खलिता by संजय अभ्यंकर
संजयराव