✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

टाळण्याची कला

आ
आपला अभिजित यांनी
Tue, 01/29/2008 - 18:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9119 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

स
स्वाती राजेश Tue, 01/29/2008 - 22:36 नवीन

....

..........प्रतिक्रिया लिहायची टाळली.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 01/29/2008 - 23:14 नवीन

...स्वातीताई, आपली

"टाळलेली" प्रतिक्रिया जाम आवडली!! अतिशय मार्मिक. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
ए
एक Tue, 01/29/2008 - 23:56 नवीन

साईनफिल्ड ने दिलेलं उत्तर बघा.

स्टँडअप कॉमेडियन साईनफिल्ड च्या एका एपिसोड मधे त्याने अश्या टेलीमार्केटीयर ला दिलेलं उत्तर बघा.. http://www.youtube.com/watch?v=hllDWSbuDsQ
  • Log in or register to post comments
प
प्राजु Wed, 01/30/2008 - 00:13 नवीन

सह्ही...

स्वातीची प्रतिक्रीया आवडली... मी सुद्धा प्रतिक्रिया टाळणेच पसंत करेन :)) - प्राजु
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 01/30/2008 - 00:24 नवीन

मस्त...

अजून पुढे लिहायचे टाळतोय.... (आमचे प्रेरणास्थानः स्वाती राजेश) बिपिन.
  • Log in or register to post comments
B
bipin Wed, 01/30/2008 - 01:09 नवीन

सगळ्या प्रतिक्रियाना...

टाळ्..या
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 01/30/2008 - 06:25 नवीन

शिष्यत्व!

आम्हीही स्वातीताईंचेच शिष्यत्व पत्करून प्रतिक्रिया देण्याचे टाळतो आहोत! :) तात्या. अवांतर - टाळण्याची कला ज्यांना येते त्यांच्याकडून ती शिकून घ्यावी, हे बरं. उद्या त्यांनाच टाळायचं झाल्यास "गुरूची विद्या गुरूला' वापरता येईल. असो. टाळाटाळीवर बरीच टकळी चालवली. अभिजितराव, लेख बाकी छान आहे... आपला, (टाळाटाळ करणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 01/30/2008 - 09:09 नवीन

"नाही" म्हणा

मला वाटते, असे टाळण्यापेक्षा थेट "नाही" म्हणणे अधिक श्रेयस्कर! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Wed, 01/30/2008 - 10:07 नवीन

टाळण्यासाठी काही उपाय ..........

"अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना." बरोबरच आहे. पण सभ्यपणे त्यांना न दूखवता "टाळण्याचे " काही उपाय देत आहे. बघा जमलं तर एखद्यावेळी प्रयोग करून बघा ....... [ अर्थातच नेटवरून साभार .......... ] १. फोनवरून त्याने/तिने बोलणं संपवताक्षणी म्हणायचं , '' तुझा आवाज मला खूप आवडला. मी प्रेमातच पडलो/लेय तुझ्या. लग्न करशील माझ्याशी ?'' २. टेलिमाकेर्टिंगवाल्याला सांगा , '' मी आत्ता जरा बिझी आहे. तुमचा घरचा नंबर द्याल का प्लीज! मी मोकळा झाल्यावर करतो तुम्हाला फोन. '' ३. एकदा माहिती दिली की पुन्हा विचारा , '' हं , काय सांगत होतात तुम्ही ?'' असं तीन चार वेळा करा. ४. तुम्ही जेवत असताना असा फोन आला की सांगा , '' मी जेवतोय. दोन मिनिटं जरा होल्ड करा हां. '' मग स्पीकर फोन ऑन करून फोन बाजूला ठेवा आणि आरामात जेवत राहा. खाण्याचे मचमच आवाज करा आणि इतरांशी गप्पाही मारत राहा. ५. फोनवरच्या माणसाला सांगा, ''माझे सर्व व्यवहार माझा मुलगा पाहतो, त्याच्याशी बोला.' आणि फोन आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या हातात द्या (किंवा स्वत:च पाच वर्षांच्या मुलाच्या आवाजात बोलू लागा.) ६. ''हॅलो, हां कोण बोलतंय? हॅलो, कोण बोलतंय? जरा मोठ्यानं बोला... आणखी मोठ्यानं बोला हो जरा... अजिबात ऐकायला येत नाहीये तुमचं... फोन आहे का चुन्याची डबी? हॅलो... आणखी मोठ्याने बोला...'' ही वैश्विक युक्ती टेलिमाकेर्टिंगवाल्यांवरही लागू पडतेच. ७. त्यांना सांगा, ''एक मिनिट. एकेक शब्द बोला. मी तुमचं सगळं बोलणं लिहून घेतोय. माझ्या काहीही लक्षात राहात नाही. एकेक शब्द आणि अगदी हळूहळू... घाई नको... हां कुठून फोन केलाय तुम्ही... आय... सी... आय... हळू हळू सांगा...'' ७. त्यांनी विचारलं, ''हाऊ आर यू सर?'' की लगेच सुरुवात करा, ''मला हे तुमचं फार आवडलं. तुम्ही फक्त व्यापार करत नाही. माणुसकी जपता. आजकाल कोण कुणाला विचारतं हो की कसे आहात? माझे तर तुम्हाला सांगतो इतके प्रॉब्लेम सुरू आहेत...'' टेलिमार्केटिंगमुळे 'टाळके' हललेला [ छोटा डॉन ]
  • Log in or register to post comments
ध
ध्रुव Wed, 01/30/2008 - 10:49 नवीन

हा हा

छान आहे.... बाकी लेखाला प्रतिक्रिया मी पण टाळली आहे :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
प
पिवळा डांबिस Fri, 02/01/2008 - 10:56 नवीन

क्या बात है, छोटा डॉन!

झकास आयडिया आहेत एकेक! आमचे हे २ पैसे... १. फोनवर त्याने/तिने प्रस्तावना केल्यावर आपण लगेच गंभीर खर्जातल्या स्वरात म्हणायचं, "यू हॅव रीचड अ सिक्युअर नंबर. धिस कॉल इज बीइंग रेकॉर्डेड फॉर सिक्युरिटी रीझन्स. अ कॉपी विल बी फॉरवर्डेड टू *** (इथे तुम्ही जिथे रहात असाल त्याप्रमाणे सीबीआय, एम आय, एफबीआय वगैरे!)" बरयाच टेलेमार्केटर्सचा धीर सुटतो. २. आपली भाषा बदलत रहायची. म्हणजे असं की तो/ती इंग्रजीतून बोलली की आपण हिंदीतून सुरवात करायची. त्याला/तिला हिंदी येत असेल तर मग तो/ती हिंदीतून जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी आपण लगेच मराठी सुरु करायचं. मग वरहाडी/ कोकणी असं हळूहळू सुक्ष्मात जात रहायचं. हा एक चांगला खेळही आहे, कोण हरतो ते पहायचा! बहुतेक वेळा आपण जिंकतो कारण कधी कोणत्या भाषेत बदल करायचा हे आपल्याच हातात असतं. समोरचा/ची हरतात तरी किंवा कंटाळून फोन ठेवतात तरी. :) आपला, पिवळा डांबिस ता. क. : मध्येच कुठे गायब झाला होता इतके दिवस? तुम्हाला आम्ही मिस केलं राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ध
धमाल मुलगा Wed, 01/30/2008 - 11:21 नवीन

:))

च्यायला... हे म्हणजे अथपासून इतिपर्य॑त सगळच "हाण तिच्याआयला" (काय करणार, आमच्यामध्ये शिरलेले रावसाहेब काही केल्या बाहेरच पडत नाहियेत.) अभिजीत, एकदम "कल्ला" लिहिलय, अन् डॉनभाव, ते तुमच॑ एक एक कल्पना तर यकदम फर्मास हा॑ ! हे सगळे क्रेडिट कार्डवाले तिच्याआयला नेऊन घातले पायजेत तिकड॑...सात गडगड्याच्या विहीरीत. - ("कोल्ड कॉल" वाल्या॑नी विस्कटवलेला) धमाल.
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 01/30/2008 - 22:38 नवीन

वाव

सहीच्..खरंच टाळाटाळ करणं सोप्पं नाही....चांगला लेख्...डॉन तुमच्या सगळ्या आयडीया झक्कास...
  • Log in or register to post comments
व
वरदा Wed, 01/30/2008 - 22:42 नवीन

अजुन एक

महत्वाच्या किंवा आपल्या चांगल्या मैत्रीणींशी मेसेंजर वर बोलत असताना नको त्या ऑनलाईन असलेल्या लोकांना कसं टाळावं? जीमेल वर स्टेल्थ सेटींग्ज पण नाहीयेत. बिझी स्टेटस असूनही बोलणारे लोक असतात आणि उत्तर दिलं नाही की ओळख नाही ठेवत असं म्हणायला मोकळे.....जाम कंटाळा येतो कधी कधी.....
  • Log in or register to post comments
ए
एक गुरुवार, 01/31/2008 - 02:32 नवीन

गुगल टॉक...वर

अश्या लोकांना ब्लॉक करता येतं. (नावापुढे राईट क्लिक करून सिलेक्ट ब्लॉक) माझ्या एका मैत्रिणीला मी ही ट्रीक सांगितली होती.. बरेच दिवस झाले पण त्या नंतर ती कधी ऑनलाईन आलीच नाही. :-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
स
सुनील गुरुवार, 01/31/2008 - 02:35 नवीन

तीच टाळत असावी !!

बरेच दिवस झाले पण त्या नंतर ती कधी ऑनलाईन आलीच नाही. ती तुम्हाला टाळत असावी!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 01/31/2008 - 03:49 नवीन

कर्जाचा आग्रह

मला एकदा आय सी आय सी आय मधून फोन आलेला की १ लाखाचे कर्ज १८% च्या कमी व्याज दरावर देण्यास तयार आहेत; मी काही कर्ज मागितलं नव्हतं, पण आवाज गोड होता, लगेच फोन ठेऊन द्यावा वाटला नाही. त्यांना १६% च्या दरानी २ लाखाचे कर्ज मी बँकेला देतो अशी ऑफर दिली.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 01/31/2008 - 09:29 नवीन

इंटरेस्टेड!

त्यांना १६% च्या दरानी २ लाखाचे कर्ज मी बँकेला देतो अशी ऑफर दिली. मी इंटरेस्टेड आहे बरं का व्यंकटराव! :) आपला, (धंदेवाईक) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: व्यंकट
व
विवेकवि गुरुवार, 01/31/2008 - 17:56 नवीन

प्रतिक्रिया

काय लिहावे सुचत नाहीये......... पण टाळलेलीच बरी नाही का ? असो मिनु जोशी.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 02/21/2008 - 14:55 नवीन

टेली

टेली मार्केटर ला टाळ्ण्याचा आण्खी एक प्रकारः कोणि काहि म्हणाले कि त्यान म्हणयचे कि थाम्बा ....एक मिनिट्......एक मिनिट हं..... मी जरा टोइलेट ल जाउन येतो .....तो पर्यन्त थाम्बा हं..... किंवा मी आत्ता टोइलेट मधे आहे. तुम्ही बोल्णे चालु ठेवा.... ह प्रकार मी मझ्या एक नातेवैकान्सठी वापरला होता...... त्यानी त्यानन्तर आयुश्यात पुन्हा फोन नाही केला.....( अरे नातेवाइकाना टाळण्याची एक नविन युक्ति मि तुमच्याशी शेअर केली .........) वापरून बघा. (कोणाचातरी नातेवाइक)विजुभाऊ
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 11/13/2008 - 13:08 नवीन

या विषयावर

एक लेख पूर्वी इथे लिहिला होता. या पोस्टशी संबंधित त्यातील काही मुद्दे : काही काही अनुभव तर भीषण असतात. आता हेच एक उदाहरण पाहा... एका खासगी बॅंकेच्या मधाळ आवाजाच्या युवतीनं एका ग्राहकाला फोन केला आणि कुठल्याशा "पर्सनल लोन' योजनेची माहिती दिली. कुठल्याही कागदपत्रांशिवाय, काही क्षणांत 50 हजारांचं कर्ज मिळू शकतं वगैरे. तिचं बोलणं संपल्यावर म्हणाली, "मग हवंय ना तुम्हाला कर्ज?' तो म्हणाला..."नाही'. तर म्हणाली, "का सर?'...तिला भयंकर नैराश्‍य आलं होतं. एवढी चांगली योजना असूनही हा बाबा कर्ज का घेत नाही, याचं. अरे...? पण त्याला कर्ज नकोच असेल, तर कशाला घ्यायचं? उद्या तुम्ही म्हणाल, हजार रुपयांच्या हप्त्यावर विमान देतो. ते काय गच्चीवर उडवू की काय? अशा लोकांना टाळणं अवघड जातं. विशेषतः अशा मधाळ आवाजाच्या युवतींना. वरील अनुभव माझ्या बाबतीतला आहे. एकदा मी ऑफिसात असताना असाच एका मधाळ आवाजाच्या युवतीचा फोन आला. मी तिच्या प्रतिनिधीला (तिला नव्हे बरं का राजकुमारा!) भेटण्याची वेळ दिली. ऑफिसचा पत्ता दिला. जवळची खूण (लॅंडमार्क) विचारल्यावर `शनिवारवाडा' असं सांगितलं. त्यावर ती म्हणते, `सर, कोई `लॅंडमार्क' नहीं हैं क्या?` मी कोसळायचाच बाकी होतो. शनिवारवाड्याव्यतिरिक्त कुठला दुसरा लॅंडमार्क ह्या बयेला हवा होता? `वो पेशवा का पुराना हवेली है ना, उसके बाजू में जो नीरा का दुकान है ना, उसके सामने हैं हमारा कार्यालय' असं सांगायला हवं होतं का हिला?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा