मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लुब्रा स्वभाव

केशवसुमार ·

मदनबाण 01/05/2008 - 12:41
मज लागले कळाया सारे तिचे इशारे भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो >> व्वा मस्तच !!!!! (एकदमच गांगरून गेलेला) मदनबाण

चतुरंग 01/05/2008 - 15:44
फारच छान! आणि हे विडंबन सुमारे दोन दिवसांपूर्वी अर्धवट लिहिले होते, ते आज पूर्ण करावेसे वाटले / करता आले. विडंबनात इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) ह्या विडंबनात केलेले दिसतील. क्षमस्व. हे तर एकदम ह. ह. पु. वा. :D चतुरंग

केशवसुमार 02/05/2008 - 08:43
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार

अरुण मनोहर 07/05/2008 - 13:40
शंका कुणा न आली की आत काय आहे ग्लासास स्टिलच्या या मी ड्रिंकरून गेलो! :P :P व्वा व्वा.. क्या बात हय. पिते रहो बेसुमार........ ह.घ्या.

मनस्वी 07/05/2008 - 13:47
इतरभाषिक शब्द बेमालूमपणे मिसळण्याचा प्रयोग(!) - केशवसुमार, प्रयोग सफल!

पक्या 07/05/2008 - 14:09
कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!! -- पक्या

ईश्वरी 07/05/2008 - 14:49
):) कवटाळण्या मला ती आली उठून लगबग बाहूंमधे तिच्या त्या मी चेंगरून गेलो कसेबसे सावरले मज ; लागता कसलीशी चाहूल समोर अर्धागिस पाहता मी थरथरून गेलो !!! -- पक्या ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं पक्या तेरा भी जवाब नही...प्रतिसाद सही दिलायस ईश्वरी

ईश्वरी 07/05/2008 - 14:58
--ओरिजिनल लेखनासाठी : के.के ..छान जमलयं ओह ..मला वाटले तुम्ही केशवकुमार..म्हणुन केके लिहिले..क्षमस्व. नन्तर लक्षात आले ..केशवसुमार . ईश्वरी

लेखनविषय:

आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव

भरला बघून पेला मी हंगरून गेलो
गोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या  या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

आनंद घारे ·

नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय चांगला करून दिला आहे.मला त्यांच्या कार्याबद्दल माहिती नव्हती. स्वाती

अभिज्ञ 01/05/2008 - 14:39
आनंदघनजी, नानासाहेब धर्माधिकारींचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद. परिचय थोडासा मोघम वाटतोय.अजुन थोडिशि भर घातल्यास वाचायला निश्चित आवडेल. दोघाहि थोर लोकांचे 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. अबब.

शितल 01/05/2008 - 18:18
कविवर्य मंगेश पाडगांवकर आणि डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑ना 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तसेच, डॉ. नानासाहेब धर्माधिकारीं या॑चा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद.

लेखनप्रकार
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.

आवाज

हेरंब ·

शितल 01/05/2008 - 18:29
:) तुम्ही छान लिहले आहे, अगदी सरळ आणि मनातले. कधी कधी हा आवाज सहन होत नाही चिडचिड होते, त्या गो॑गाटात आपला आतला आवाजच आपल्याला ऐकु येईनासा होतो. पण नैसर्गिक आवाज हा कानाला सुखावतो. मन प्रसन्न करतो. काही काही माणसे फोनवर देखिल इतक्या मोठ्याने बोलतात तेव्हा तर फोन ठेवासा वाटतो. गणपती उत्सव आणि नवरात्रात तर ह्या आवाजाने ह्रदयाचे ठोके ही चुकतात की काय अशी भिती वाटते.

मदनबाण 01/05/2008 - 19:28
दूरदर्शन, रेडिओ, म्युझिक सिस्टिम हे कानठळ्या बसाव्यात यासाठीच तयार केले आहेत असा यांचा दृढविश्वास असतो. खरय तुमच म्हणण आज काल लोकांना वाटत की मोठा आवाज केला तरच एन्जॉय करता येत..... तुझ्या म्युझिक सिस्टिम पेक्षा माझी म्युझिक सिस्टिम कशी जबरदस्त आहे त्याचा खेळ चालतो..... खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. १०००%सहमत..... हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. फिरायला.....अहो मी तर म्हणतो आता तर कायमचेच वास्तव्य करावे..... (ध्वनी प्रदुषणाने त्रस्त ) ~X( मदनबाण

मानस 01/05/2008 - 20:28
या अनुषंगाने संत कबिरांचा एक दोहा आठवला. मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||

वरदा 01/05/2008 - 23:21
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ??? खरच....मी तिथे असताना तर आमच्या घरासमोर लग्नाचा हॉल सुरु झाला..एकाच वेळी एकाच मांडवात ३ लग्न होती आणि ३ जणांनी वेगवेगळे बँड आणले होते..इमॅजिन करा काय प्रचंड आवाज असेल्.....आणि ३ बँड जवळजवळ ६-७ तास सतत वाजत होते....ह्या लोकांचे कान कसले बनलेले असतात कोण जाणे....

माणसाचा बुध्यांक हा त्याच्या आवाज सहन करण्याच्या क्षमतेच्या व्यस्त प्रमाणांत असतो असे कुणा सूज्ञ गोर्‍या साहेबाने लिहून ठेवल्याचे स्मरते आणि हे वाक्य तर भन्नाटच... B)

धमाल मुलगा 02/05/2008 - 14:37
छान लेख. थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा.
हे परमेश्वरा, डोळे बंद करता येतात, नाक मुठीत धरता येते, मग पाहिजे तेंव्हा कान बंद करण्याची विद्या फक्त मनोहरपंतांनाच का दिलीस रे ???
आँ...पंताना चिमटा :) :) :) आणि मानस यांनी इथं उद्घत केलेला कबिरांचा
मुल्ला होकर बांग पुकारे, वो का साहीब बहीरा है | मुंगीके पाव मे घुंगरू बाजे, वो भी अल्ला सुनता है ||
दोहा ही अगदी यथोचित....

जन्माला येणार्‍या बाळाचा पहिला आवाज ऐकायला सगळे किती उत्सुक असतात! खळखळणार्‍या पाण्याचा, वार्‍याचा, पावसाचा किंबहुना निसर्गातील प्रत्येकच गोष्टीचा आवाज हा कानांना सुखदच असतो. हिमालयात फिरायला गेल्यावर तर हे फारच जाणवते. पण हाच आवाज शहरांत फारच भीतिदायक रुप धारण करतो. शांतताप्रिय लोकांचे म्हणणे या गदारोळांत ऐकतो कोण? त्यांत ते संख्येने फारच कमी! तरी त्यातल्या कांहींनी दुर्दम्य चिकाटीने गोंगाट हा आरोग्याला कसा हानिकारक आहे हे सप्रमाण सिद्ध केले आणि सरकारला व न्यायालयांना तसे कायदे करावयास भाग पाडले. पण तिथेही तथाकथित धर्म आडवा आला.

महाराष्ट्रदिवसाच्या शुभेच्छा

चेतन ·

विकि 01/05/2008 - 12:35
संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व मिसळपावकरांना "१ मे महाराष्ट्रदिन" व "कामगारदिनाच्या " हार्दिक शुभेच्छा ! जय हिंद ! जय महाराष्ट्र ! बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!! आपला कॉ.विकि

In reply to by विकि

इनोबा म्हणे 01/05/2008 - 14:04
महाराष्ट्र राज्य संस्थापन दिनाच्या सर्व महाराष्ट्रीय बंधू-भगिनींना हार्दीक शुभेच्छा! बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!! हेच म्हणतो. जय भवानी! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

चेतन 02/05/2008 - 12:28
महाराष्ट्रदिवसाच्या लेखालासुद्धा कढून टाकलं ....... (रामशास्त्रींचे अवतार दिसताय) "मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)" तरी बरं हे नमुद केलं होतं काय करणार दुवा सापड्लाचं नाही बघा तुम्हाला सापड्तोय कां (जय महाराष्ट्र) चेतन

सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा आणि हुतात्म्यांना आदरांजली मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त) सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचावे... -- जनरल डायर.

अस्थीपंजर

केशवसुमार ·

प्राजु 01/05/2008 - 14:52
मस्त मजा आली... खूप दिवसांनी वाचली गमतीदार रचना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 01/05/2008 - 15:38
कुठे जायचे विचारले मी करून आपली करंगळीवर ह्या प्रश्नाला नाही उत्तर! कशास प्या झेपत नाही तर हे दोन तर एकदम सही! चतुरंग

विसोबा खेचर 01/05/2008 - 17:17
हे "केश्या"चे अस्थीपंजर भार किती हा या धरणीवर... हा हा हा! :)

केशवसुमार 02/05/2008 - 08:44
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार

प्राजु 01/05/2008 - 14:52
मस्त मजा आली... खूप दिवसांनी वाचली गमतीदार रचना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

चतुरंग 01/05/2008 - 15:38
कुठे जायचे विचारले मी करून आपली करंगळीवर ह्या प्रश्नाला नाही उत्तर! कशास प्या झेपत नाही तर हे दोन तर एकदम सही! चतुरंग

विसोबा खेचर 01/05/2008 - 17:17
हे "केश्या"चे अस्थीपंजर भार किती हा या धरणीवर... हा हा हा! :)

केशवसुमार 02/05/2008 - 08:44
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार. (आभारी)केशवसुमार
लेखनविषय:

आमची प्रेरणा पुलस्ति यांची अप्रतिम गझल शरपंजर

ग्लासातील संपलेली भर
उजाडले बघ, पुरे अता कर

कुठे जायचे विचारले मी
करून आपली करंगळीवर

'नीळकंठ', 'शंकर्‍या' उचला
मेल्याला, टाका रस्त्यावर 

ह्या प्रश्नाला नाही उत्तर!
कशास प्या झेपत नाही तर

हे "केश्या"चे अस्थीपंजर
भार किती हा या  धरणीवर...

आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

भडकमकर मास्तर ·

चतुरंग 01/05/2008 - 01:33
आमच्या लाडक्या खेळालाच हात घातलात की तुम्ही!;) धन्यवाद! हो मला ते दिवस चांगले आठवतात. आनंद हरला पण त्याआधी त्याने कास्पारोवच्या बालेकिल्ल्यात घुसून त्याला हिसका दाखवला होता! नंतर त्याचा अनुभव थोडा कमी पडला पण माझ्यासारख्या अनेक सामान्य भारतीयांच्या आशा त्याने पल्लवित केल्या हे खरे. त्यानंतरच्या पुढल्या १० वर्षात आपल्याकडे बाल खेळाडूंची फौज तयार झाली. सध्या महाराष्ट्र, आंध्र इथले खेळाडू बरीच प्रगती करीत आहेत ह्याचे फार मोठे श्रेय आनंदला द्यायला हवे. आणि आता तर तो जगज्जेता आहेच. १९९७ पासून सातत्याने जगातल्या पहिल्या तीन खेळाडूत गणना होणे म्हणजे खायची गोष्ट नाही!:) (अवांतर - आनंद बरोबरच माझा दुसरा आवडता खेळाडू मिखाईल ताल आहे. तो फार काळ जगज्जेता वगैरे नव्हता पण विलक्षण प्रतिभावंत होता. त्याच्या डावातल्या एकेक बलिदानांनी चक्रावून जायला होते. ८ ते १० खेळ्यांनंतर पटावर काय स्थिती असेल ह्याचा तो अचून अंदाज करु शके! त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.) चतुरंग

In reply to by चतुरंग

त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.) अरे बापरे... मस्तच..लिहा लिहा ...या गेमबद्दलपण लिहा...

मन 01/05/2008 - 01:35
>>म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं.... द्या टाळी! एकाच माळेचे दिसतोय आपण. अगदि गोखल्यांचे आर्टिकल्स वाचण्यापासुन ते आनंदवर पैज लावे पर्यंत! म्या पामराकडे "बुद्धी" आणि "बळ" दोन्हीचा अभाव्!पण उत्साहाचा नाही. गोखल्यांचे बरेच गेम्स वाचलेत. सर्वात भन्नाट म्हणजे अगदि नवखा असताना कास्परोव ने आंतर राष्ट्रिय स्पर्धेत थेट तत्कालीन प्रथित यश ग्रँड मास्टरला(बहुदा अनातोली कार्पोवच असावा तो.साल १९८५ च्या आस पास कधि तरी.) कसे चित पट केले ,ते पाहिलं तर मजा येइल. पण आनंदने तो चेस चा विश्व चषक जिंकल्यापासुन आपण बेहद्द खुश आहोत. अवांतरः- ज्या स्पर्धेत आनंद जगज्जेता झाला, त्यात टोपोलाव ला सामिल करण्यात आले नाही,ते कोणत्या निकषाखाली तेच कळले नाही. नाही तर आणखिन जोर दार लढती बघाय्ला मिळाल्या असत्या. निदान क्रॅमनिक पेक्षा तरी तो आनंद साठी "धोकादायक" सिद्ध झालाय. अवांतरः- आपण चेस्.कॉम चे सभासद आहात काय?

मन 01/05/2008 - 01:59
बरेचसे अभ्यासक सार्वकालिक सर्व श्रेष्ठ खेळाडु बॉबी फिशर ला मानतात ,असे वाचले आहे. सलग काही काळ त्याचे एलो २७८० च्या आसपास होते.(ratings inflation गृहित धरले, तर हे सर्वाधिक आहे.) पण त्याच्या खेळणे एका एकी बंद का झाले तेही कळत नाहिये. आणि वेग वेगळ्या काळातील खेळाडुंची तुलना कशी काय करता येते तेही सम्जत नाहिये,कारण एलो पॉइंट्स तर शेवटी "काल सापेक्ष" असतात. म्हणजे त्या त्या काळातील ईतर प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही किती दण्क्यात हरवता ,यावर ते अवलम्बुन असतील्, तर कार्किर्दीत साधारण २ दशक फरक असणार्‍या खेळाडुंची तुलना कशी काय करता येइल? (कारण एवढ्या कालावधित बहुतांश प्रतिस्पर्धी बदललेले असातील )

In reply to by मन

रामदास 03/05/2008 - 21:01
पण त्याच्या खेळणे एका एकी बंद का झाले तेही कळत नाहिये> विस -एक वर्ष गायबचं झाला. नंतर एकदा उगवला , परत गायब. या वर्षी जानेवारीत कायमचा गेला.(आइस लँड मध्ये जिथे तो २००५ पासून राह्यला गेला होता.)

द्या टाळी! एकाच माळेचे दिसतोय आपण. अगदि गोखल्यांचे आर्टिकल्स वाचण्यापासुन ते आनंदवर पैज लावे पर्यंत! घ्या हो टाळी...मस्तच... आपण चेस्.कॉम चे सभासद आहात काय? होतो अशाच एका साईटचा मेम्बर मी..पूर्वी..आता जात नाही ..( घरी ब्रॊडबॆंड घेतल्यानंतर मला एकदा हे सापडले आणि मी त्यात ओळीने दोन रात्री रात्रभर चेस खेळत बसलो होतो...अट्टल जुगार्‍यासारखे झाले...पुढची मॅच तरी जिन्कू असे म्हणत म्हणत दोन्ही वेळा पहाट झाली...असल्या प्रकारांचा माझा फ़ार अतिरेक होतो अशा मी घरून नेहमी शिव्या खातो...)

अभिज्ञ 01/05/2008 - 02:35
चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे, वगैरे प्रकार आम्ही अभियांत्रिकीच्या दुस-या/तिस-या वर्षाला असताना केले होते. निव्वळ वेडा झालो होतो अशाने.झपाटलेलाच म्हणा हवे तर.रात्रंदिवस डोक्यात बुद्धिबळाच्याच चाली येत रहायच्या. आमचा आणिक एक उदयोग म्हणजे रविवार टाईम्स ~ओफ इंडिया मधला प्रवीण ठिपसे ह्यांनि दिलेला बुद्धिबळातला डाव सोडवणे. तो हि एक नाद लागला होता. ते सदर बहुतेक अजुनहि चालु आहे.(पण आमचा हा नाद सुटून बरीच वर्षे झालि आता.) भडकमकर ,आपण दिलेल्या दुव्यांबद्दल धन्यवाद. चतुरंगजी, त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो. वा वा! तुम्ही तो "डाव" लिहाच आता लवकर. निश्चितच वाचायला आवडेल. अबब

http://www.india-today.com/itoday/06101997/sport.html १९९७ च्या इन्डिया टूडेतला लेख आहे हा... यात आनंद आपण १९९५ मध्ये का हरलो याचं विश्लेषण करतो..हा एक उत्तम लेख आहे... (यात आनंदची अभ्यासाची पद्धत लिहिली आहे, त्याच्या अचाट मेमरीची टेस्ट घेतलेली आहे... वाचनीय)

रामदास 01/05/2008 - 08:03
मिपा वर समानधर्मा भेटल्याचा आनंद आज झाला. फिशरच्या गेमची आठवण झाली. टाइम मशीन मध्ये बसून परत ३५ वर्षं मागे गेलो.आठवणीनी चष्म्यावर धुकं दाटलं. अमेरीकन स्वातंत्र्यवाद आणि रशिअन दडपशाही यांच्यातली लढत आठवली. हा लेख एक सुन्दर ओपनींग आहे. चला पटाच्या मध्यावर जाउ या. कालोह्यपी निरवधी विपुला च प्रुथ्वी. कोपी अस्ती मम समानधर्मा. (चूका दुरुस्त कराव्या. न्यून ते पुरते करावे.)

आनंद वरचा लेख आवडला, चतुरंगजी, तुमच्या लेखाची फार वाट पहायला लावू नका,लवकर लिहा,वाचायला उत्सुक :) स्वाती

विसोबा खेचर 01/05/2008 - 17:37
वा वा! बुद्धीबळ हा आमचाही अत्यंत आवडता खेळ आहे. भडकमकरांनी दिलेले दोन्ही दुवे छान आहेत... आपला, (बुद्धीबळप्रेमी व कास्पारावभक्त!) तात्या.

मन 01/05/2008 - 17:46
अहो वाचता काय? पहिली मूव खेळली आहे ना आता? आता टाका की ई५ (किंवा तुम्हाला योग्य वाटेल ती मूव) येउ द्यात पुढला लेख्.आमचंही तेवढचं शिकणं होइल.

3

श्रध्दा

भावना ·

चेतन 01/05/2008 - 10:31
कवीता चांगली जमलेयं लगे रहो चेतन अवांतरः ही श्रध्दा कोण आहे

काळा_पहाड 04/05/2008 - 17:13
:/ चांगला प्रयत्न. मात्र विषय हाताळताना भावनांचा गोंधळ उडालाय. अधिक स्पष्टतेची आवश्यकता.

श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, माणसामधले माणुसपण जाते जगण्यामधले जीवन जाते माणसाविना माणसाचे खरचं का कुठे काही अडते ? श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, मनाची कवाडे भकास होतात श्रध्देच मन निराश होते प्रेमाला माणुस पारखा होतो पण कुणाला असा किती फरक पडतो ? श्रध्दा कुणावरही असु शकते, देवावर मानवावर अथवा भावनांवर पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, देव , माणुस भावना सगळेच

स्वय॑पाक घरातील घडामोडी

शितल ·

म्हणजे तुम्ही केलेला जाम इतका जाम झाला होता कि ढवळायला घेतलेला चमचा पण त्यात जाम झाला. :)) तसा चहात साखर समजून मीठ घालायचा अनुभव माझ्याही गाठीशी आहे. पुण्याचे पेशवे

भावना 30/04/2008 - 23:28
अग शितल, तु निदान पदार्थ तरी बनविलेस . मी तर दुधापासुण कोळ्सा ही पाकक्रुती अनेकदा बनविली आहे. आमच्या 'ह्यांच्या' मते हा पदार्थ मला उत्तम जमतो !!!

आत्ताच दोन दिवसांपूर्वी हराभरा कबाब करावयास घेतले होते पण चुकून पाणी जास्त झाले आणि भज्यांचे पीठ तयार झाले. शेवटी, हरीभरी भजी बनवून वेळ साजरी केली. नवीन लग्न झाले होते तेंव्हा कधी कधी माझी सुविद्य पत्नी जी भाजी बनवायची ती पुढील पैकी २ वर्गात मोडायची. १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... १) घे मेल्या भाजी म्हणजे खूप दिवस आग्रह केला की भोपळी मिरच्यांची पिठ लाऊन भाजी कर एकदा. की एक दिवशी ताटात ती भाजी यायची. ओळखू यायची की ही भोपळी मिरच्यांची पिठ लावून केलेली भाजी आहे. पण, त्याचे रंग, रूप, पोत पाहता ती घे मेल्या भाजी आहे हे सहज लक्षात यायचे. २) ओळखा पाहू भाजी ही सर्व साधारणपणे कुठल्या तरी पाककलेच्या पुस्तकातून वाचलेली टोट्टली नवीनच भाजी असायची. पानात वाढलेला पदार्थ हा काय आहे ह्या विचारातच जेवण संपायचे. त्याला मी ओळखापाहू भाजी असे नांव ठेवले होते. असो.

भाग्यश्री 30/04/2008 - 23:49
मी एकदा साबूदाणा खिचडी करायला गेले.. आणि सगळं छान केलं, पण काय अवदसा आठवली, आणि मी त्यात धण्याची पावडर टाकली.. :( विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरं काय.. नेहेमी करायचे मी खिचडी, आणि छान करायचे.. पण इथे नवर्‍याला इम्प्रेस करायला गेले, न मेजर फसले! अतिशय घाण चव येते... सगळी खिचडी फेकून द्यावी लागली.... :( पोळीचा पापड्,भाज्या तेलात पोहतायत वगैरे नेहेमीच्या (अ)यशस्वी प्रयोगांनंतर आता जरा अन्नपुर्णा देवी प्रसन्न झालीय बहुधा.. सद्ध्या इतकं वाईट नाही बिघडत आहे काही... टच वूड !

In reply to by भाग्यश्री

विसोबा खेचर 01/05/2008 - 07:52
नेहेमीच्या (अ)यशस्वी प्रयोगांनंतर आता जरा अन्नपुर्णा देवी प्रसन्न झालीय बहुधा.. सद्ध्या इतकं वाईट नाही बिघडत आहे काही... टच वूड ! चला! बरं आहे. कधी जेवायला येऊ तेवढं बोल! :)

शितल 01/05/2008 - 00:12
>> आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील.... हो हो एकदम फसक्लास चालतील, आणि सगळे पतीदेव (ज्या॑च्या बायका सुगरण नाहीत) त्या॑ची ना॑वे स्वतः हुन टाकतील. बाकी तुमची घे मेल्या भाजी आणि ओळखा पाहु भाजी मस्तच ! >>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच.

>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच. प्रेषक व्यंकट ( बुध, 04/30/2008 - 23:28) . आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! व्यंकट वरील पुराव्यावरून हेच सिद्ध होते की, ही प्रार्थना माझी नसून श्री. व्यंकट ह्यांची आहे.

शितल 01/05/2008 - 00:23
>>>तु निदान पदार्थ तरी बनविलेस . मी तर दुधापासुण कोळ्सा ही पाकक्रुती अनेकदा बनविली आहे. :)) >>>आमच्या 'ह्यांच्या' मते हा पदार्थ मला उत्तम जमतो !!! भावना तु एक पायरी पुढे आहेस, मी त्या दुधाची बासु॑दी बनवत होते. :D आणि मी तर फोडणीला इतकी भीत असे की तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरे, मिरची टाके आणि खाली बसे कारण त्या कधी कधी उडतात, मिरचीच्या बीया तर माझ्या तोडा॑वरच उडत, पण आता सफाईतदारपणे फोडणी टाकते.

वरदा 01/05/2008 - 00:25
नवीन लग्न झाले होते तेंव्हा कधी कधी माझी सुविद्य पत्नी जी भाजी बनवायची ती पुढील पैकी २ वर्गात मोडायची. १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... =))

वरदा 01/05/2008 - 00:30
आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील.... कधी काढताय क्लास? प्लीज ऑनलाईन काढा मी तुमची पहिली विद्यार्थिनी असणार हे नक्की..... :W स्वगतः चला तात्यांना जेवायला बोलवण्याआधी काही शिकायला जमलं तर बरंच...... ;)

In reply to by वरदा

विसोबा खेचर 01/05/2008 - 07:53
स्वगतः चला तात्यांना जेवायला बोलवण्याआधी काही शिकायला जमलं तर बरंच...... लवकर शिकून घे, वाट पाहतोय.... :)

शितल 01/05/2008 - 00:31
>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच. प्रेषक व्यंकट ( बुध, 04/30/2008 - 23:28) . आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! व्यंकट >>>वरील पुराव्यावरून हेच सिद्ध होते की, ही प्रार्थना माझी नसून श्री. व्यंकट ह्यांची आहे. हो तुम्ही ते छान सिध्द केले आहे, मला माहित आहे मी एकाच प्रतिक्रियेत टाकल ते. मला माफ करा.

In reply to by शितल

मला माफ करा. अरे...! माफी वगैरे काय मागताय? तुम्ही कोर्ट-कचेरीतील माणसं, म्हंटलं पुराव्यानीशी बोलावं. बाकी काही नाही.

शितल 01/05/2008 - 01:16
मला आठवते,लहानपणी आमच्या शेजारच्या घरातील दोन मुली व त्याचा भाऊ त्याचा दिवाळीचा फराळातील, रव्याचा लाडु आणि श॑करपाळी ते खलबत्यामध्ये कुटुन खाताना पाहिले आहे. आणि माझ्या मावशीचे बेसनाचे लाडु तर तुप खुप घातल्यामुळे पातळ होऊन उचललाकी त्याचा आकार बदलत असे.

In reply to by शितल

विसोबा खेचर 01/05/2008 - 07:53
दोन मुली व त्याचा भाऊ त्याचा दिवाळीचा फराळातील, रव्याचा लाडु आणि श॑करपाळी ते खलबत्यामध्ये कुटुन खाताना पाहिले आहे. हा हा हा! :)) बाकी शितल, तुझेही स्वयंपाकघरातले सगळेच किस्से मस्त आहेत... :) तात्या.

इनोबा म्हणे 01/05/2008 - 02:18
एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे. विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! :O कसा संसार करतात देव जाणे! देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर. १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... मी समस्त मिपाकरांतर्फे पेठकरकाकांना 'खाद्य क्रांतीकारक' हा पुरस्कार बहाल करतो. अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते! चूक. रंगराव,आमच्या बाजूची मंदी(सौ.मंदाकीनी कोपरखळे) गेली कित्येक वर्षे खानावळीच्या धंद्यात आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

In reply to by इनोबा म्हणे

अभिज्ञ 01/05/2008 - 03:12
+१ लै भारी.:) विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! कसा संसार करतात देव जाणे! देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर. अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते! चूक. रंगराव,आमच्या बाजूची मंदी(सौ.मंदाकीनी कोपरखळे) गेली कित्येक वर्षे खानावळीच्या धंद्यात आहे. :):):):):) अबब.

In reply to by इनोबा म्हणे

इनोबा म्हणेजी, मी समस्त मिपाकरांतर्फे पेठकरकाकांना 'खाद्य क्रांतीकारक' हा पुरस्कार बहाल करतो. धन्यवाद. तसा मी ' खादाड क्रांतिकारक ' हा पुरस्कारही आनंदाने स्विकारला असता.

In reply to by इनोबा म्हणे

शितल 01/05/2008 - 17:40
>>एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे. >>विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! कसा संसार करतात देव जाणे! देवाने डोके लावुन आमची गाठ घातली आहे, मी काही वे॑धळापण केला तरी त्याच्या लक्षात रहात नाही, हीच तर ग॑मत आहे. >>देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर. बाकी तुझ्या भाषेत कालवण, आमच्या साठी कल्याण, ही आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीस त्या बद्दल मी तुला एकदा आमच्या घरी जेवायला बोलावेण हे, ते धाडस मात्र तु करायला हवे. :D

In reply to by शितल

इनोबा म्हणे 02/05/2008 - 02:03
ही आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीस त्या बद्दल मी तुला एकदा आमच्या घरी जेवायला बोलावेण हे, ते धाडस मात्र तु करायला हवे. सपशेल माघार. :T कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे

आम्ही स्वतः स्वयंपाकघरात फक्त चहा बनवू शकतो, त्यामुळे स्वतःचा असा काही अनुभव देता येत नाही.:) आणि आम्ही एका फर्मास कायस्थ पोरीबरोबर संसार मांडलेला असल्याने पदार्थ चुकण्याचा प्रकार कधी अनुभवला नाही इतक्या वर्षांत!! सुगरण नसणार्‍या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही! कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!!:) परमेश्वराच्या कृपेत चिंब न्हाऊन निघालेला, पिवळा डांबिस

जयवी 01/05/2008 - 11:15
शितल...एकदम जबरी अनुभव आहेत हं तुझे..... :) १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... हे तर सॉलीडच ;) माझं म्हणाल तर मी लग्नाआधी कधी चहा सुद्धा केला नव्हता..... पण लग्नानंतर मला आईशप्पथ कधीच असा भयंकर अनुभव आला नाही हो.......!! जे पण केलं ना......ते मस्तच झालं ;) (आता नवर्‍याची साक्ष काढू नका म्हणजे झालं :D )

In reply to by जयवी

शितल 01/05/2008 - 17:33
>>>माझं म्हणाल तर मी लग्नाआधी कधी चहा सुद्धा केला नव्हता..... पण लग्नानंतर मला आईशप्पथ कधीच असा भयंकर अनुभव आला नाही हो.......!! जे पण केलं ना......ते मस्तच झालं (आता >>>नवर्‍याची साक्ष काढू नका म्हणजे झालं ) जयवी ताई तुमच्या नवर्‍या॑ची साक्षच आता घेतली पाहिजे. तुमच्या डोळ्या॑च्या धाकात त्या॑नी कुठलेही पदार्थ मस्त मानुन घेतले. ;)

स्वयंपाकातल्या घडामोडी बाकी मस्तच आहेत,एक किस्सा माझाही- एकदा कॉलेजच्या सुट्टीत मला रव्याच्या वड्या करायची हु़क्की आली,काहीतरी बिनसले आणि वड्यांचे मिश्रण घट्टच होईना,मी त्यात बेसन घातले,तरी तसेच.. शेवटी तो रवा बेसनाचा वेलची जायफळ घातलेला चिकचिकीत गोळा तयार झाला,वडी पडायचे नाव नाही.आई ,बाबा नात्यातल्या लग्नाला बाहेरगावी गेले होते आणि मी आणि बहिण तिथे जायचे टाळून घरात हे असले उद्योग करत बसलो होतो.ते घरी यायच्या आत त्या प्रकरणाचा निकाल लावायचा होता..आमच्या सुपिक डोक्यातून आयडीया निघाली आणि आम्ही त्याचे सारण भरुन पोळ्या केल्या.बिघाडाचा पत्ता लागू न देता 'स्पेशल डिश 'म्हणूनआमच्या २ 'बकासूर भाऊमंडळी'ना खाऊ घातल्या .त्या पोळ्या खरोखरच 'उच्च' झाल्या होत्या.(झाल्या खर्‍या!)त्यामुळे त्यांनी पण चढा ओढीने खाल्ल्या. कधीतरी असेच परत एकदा भाऊरायाने त्या पोळीची फर्माईश केली तेव्हा त्याला म्हटले आता माहित नाही परत तशा पोळ्या करता येतील की नाही ते,त्यासाठी 'वड्या बिघडणे 'हा कच्चा माल लागतो. कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!! काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा.. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा.. जरूर असतील ना! आमची काहीच हरकत नाही हो!:) आम्हाला त्यांचा अनुभव नाही इतकंच. आम्ही आमचा अनुभव कथन केला.. पण मिपावर तुम्हाला जर अशी गुलबकावली आढळली तर कळवा!!!:) समस्त मिपामैत्रिणींनो, प्लीज, प्लीज, प्लीज प्लीज ह्.घ्या. -खट्याळ डांबिस

वरदा 01/05/2008 - 18:06
कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!! काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा.. मी उकडीचे मोदक करायला घेतले होते इथे आल्यावर..वळले जातच नव्हते....कळी पाडायला गेलं की तुटायचे..मग मी उकडीच्या करंज्या केल्या.. नवर्‍याला सांगितलं ही मोदकांसारखीच नवीन डीश आहे...चव तर तीच लागली त्याला काही कळ्ळं नाही... ;)

धमाल मुलगा 02/05/2008 - 15:27
बर्‍याचदा मी आणि माझा चुलत भाऊ असे दोघं मिळून काकू ऑफिसातून परत येण्याच्या वेळी कांदेपोहे करत असु! प्रत्येकवेळी आमचा ठरलेला वाद "सुज्या, आपल्याला कांदेपोहे करायचेत कांदेदाणे नाही" इति अस्मादिक. "भैय्या, इतक्या कांद्यातून पोहे वेचून काढून खावे लागणार" इति बंधूराज. आणि अश्या वादातून बडबड करताकरता (म्हणजेच पाचकळ इनोद हो!) फोडणीत कधी दाणे घालायचेच विसरुन जायचो तर कधी कांदा! एकदा तर दोन्ही विसरलो आणि आमच्या बिचार्‍या काकूनं पोह्यांबरोबर कच्चे दाणे आणि कच्चा कांदा खाल्ला :( बाकी, इथल्या समस्त बायांची मनमोकळी कबूली वाचून समस्त अविवाहित बापयगड्यांहो, पदार्थासंदर्भातले ह्यांचे टिपिकल डायलॉग्ज लक्षात ठेवा...पुढं कामाला येतील :) पेठकर काका, १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... दोन्ही अनुभव गाठीशी बांधून आहोत :) फक्त नावं सुचली नव्हती....आभारी आहे...नावांची ओळख करुन दिल्याबद्दल!!!!

In reply to by धमाल मुलगा

धमाल मुला, कांदे किंवा दाणे किंवा दोन्ही फोडणीत टाकायचे विसरलास तरी काळजी करायला नको. कांदे किंवा दाणे किंवा दोन्ही वेगळ्या फ्रायपॅन मध्ये कमीत कमी तेलावर परतायचे आणि तयार पोह्यात मिसळायचे . परतताना किंचित हळद टाकायची म्हणजे ते पोह्यात बेमालूम मिसळून जातात. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांचा मेक् अप केला की सजली डिश तुमची. (कौतुक करून घ्यायला).

शितल 02/05/2008 - 18:16
प्रतिसादा बद्दल मनापासुन सर्वा॑चे आभार. पदार्थ मजेशिर बनण्याचे अनुभव काहीच्या पाठीशी आहेत, वाचुन बरे वाटले, मी त्यात एकटी नाही , पण माझ्या जरा जास्त होतात इतकेच, आता मला स्वय॑पाक करण्यात धीर येत आहे मी हल्ली घरीच असल्यामुळे मला वेग वेगळे पदार्थ बनवण्यात मजा वाटत आहे.

झकासराव 03/05/2008 - 18:12
उप्पीट करताना दोन ग्लास जास्त पाणी घालुन ते आटण्याची अतोनात वाट पाहिली आहे का??? मी पाहिली आहे आणि ते आटत नाहिये म्हणुन मी रव्याची तिखट खीर म्हणुन तो प्रकार खाल्ला आहे. :) एकदा भात करायचा होता. मग एकट्यासाठी कशाला कुकर म्हणून तसाच एका पातेल्यात ठेवला. मला तर आधीचा अशा प्रकारे भात करण्याचा अनुभव नव्हता. मग काय वरुन पाणीदार आणि भांड्याच्या खालच्या बाजुला करपलेला भात ढकलला पोटात. :)

In reply to by झकासराव

देवदत्त 03/05/2008 - 18:57
आणि ते आटत नाहिये म्हणुन मी रव्याची तिखट खीर म्हणुन तो प्रकार खाल्ला आहे. अहो, अशा प्रसंगातूनच तर खाण्याचे नवीन नवीन प्रकार तयार होतात व आपण मग काहीवेळा ते टीव्हीवर खाण्याच्या कार्यक्रमात किंवा पुस्तकात पाहतो. ह्यावरून आठवले. बंगळुरला असताना मी आणि माझ्या शेजारच्या खोलीतील मुलगा रविवारी खोलीतच नाश्ता बनवायचो. म्हणजे तो शिजवायचा, बाकी मदत मी करायचो. त्यामुळे पोहे/कांदा आणणे हे काम माझ्याकडे होते. एकदा मी आंघोळ झाल्यावर त्याच्याकडे गेलो तर तो म्हणाला, 'अरे बघ काय झालेय?'. पाहतो तर पोह्यांचा लगदा शिजत होता. तो म्हणाला, 'मी पोहे भिजत ठेवले होते नंतर शिजविताना असे झाले.' मला कळले की त्याने जाड्या पोह्यांऐवजी पातळ (कागदी पोहेही म्हणतात ना त्याला?) पोहे आणले असतील दुकानातून. (तिकडे पोह्यांना अवलक्की म्हणतात. ते सांगून मग हातात दिल्यावर सांगावे लागे की हे नाही दुसरे. B) ) मग त्या मित्राला सांगितले काय ते, व म्हणालो ह्याला आपण उपमा समजून खाऊया :)

कधी कधी आपल्याला (निदान मला तरे)काही पदार्थ करायला जमत नाहीत (विशेषः आपण पदार्थ प्रथमच बनवित असताना )तर कधी काही तरी वेगळेच होऊन जाते, म्हणजे कसे जाना था चीन,मगर जा पो॑चे जपान ! माझी तर फजिती ही होतेच होते.

पोरी...

खट्याळ मुलगा... ·

गजाभाऊ 30/04/2008 - 13:16
यमक छान जुळवता येत कि ....... बाकी काहि अनुभव आहे का गाठीशी??? =))

Taxonomy upgrade extras
प्रेमात पडण्या अगोदर विचार करा..
प्रेमाच्या गावात घसरला पाय... पोरीच्या जातीचा भरोसा काय... एकाला हाय ... दुसर्‍याला बाय.... आणि तिसर्‍या बरोबर पळुन जाय...
:)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :)) :))

कुठे आणि कधी जाऊया एकदिवसीय सहलीला?

वेदश्री ·

वेदश्री 30/04/2008 - 13:09
उपलब्ध दिवस ( सध्ध्यातरी ) : १०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१ जावेसे वाटत असलेली ठिकाणे : बनेश्वर किंवा पाटेश्वर सद्यठिकाण : पुणे

मन 30/04/2008 - 16:10
माझ्या कडे एक एक्सेल शीट आहे.त्यात पुण्याजवळ्ची शेक्डो ठिकाणं दिली आहेत. त्या ठिकाणचे अंतर्,जायला लागणारा वेळ्,जिल्हा ...सगळ सगळं आहे त्यात्.मला वाटतं ती नक्किच कामाला येइल सगळ्यांच्या. पण ती ह्या संकेत स्थळावर चढ्वावी कशी(अपलोड कशी करावी), तेच कळत नाहिये. एक तर ते तरी सांगा,किंवा आपला मेल आय डी तरी द्या,जिथे ती मी तुम्हाला पाठवु शकेन. बाकी एक सल्ला. पुण्याजवळ्ची सर्वच ठिकाणे झकास आहेत. उदाहरण द्यायचं तर :-लोह गड्,वज्र गड्,पुरंदर्,कार्ले-भाजे,एकवीरा आइचे मंदीर,जवळ्ची नाथाची गुहा ,माळ्शेज, निघोज लोणावळा,खंडाळा,माथेरान वगैरे वगैरे. (एक शांत ठिकाण :- नारायण गाव) प्रश्नच नाही. पण ही ठिकाणं आपल्यातील बर्‍याच लोकांनी पाहिली असतील(विशेषतः पुणेकर्-मुम्बै करांनी.) आमच्या गावकडे(औ.बाद ला) हि ह्याच तोडिची ठिकाणे आहेत.पण ती तितकिशी प्रसिद्ध नसल्याने,आज त्या ठिकाणांवर वर उल्लेख केलेल्या ठिकाणा इतकी गर्दी,गज्बजाट नसते. माझ्या गावाकड्ली ठिकाणं अजुनही तुलनेनं शांत्,कमी वर्दळ असणारी आहेत. म्हणजे जर तुम्हा लोकांना अशा शांत ठिकाणी जायचं असेल तर काही जागा आहेत ह्या अशा:- वेरुळ्,अजिंठा,पैठण्,बिबि का मकबरा,पाण चक्की हे तर सगळ्यांनाच माहित असणार. पण शिवरायाचे डोंगरी किल्ले पाहिल्यावर जर "दौलताबाद्-देवगिरी" आपण पाहिलतं तर वेगळाच अनुभव येइल. ह्याची रचना,स्थापत्य डोंगरी किल्ल्या पेक्षा जरा वेगळेच आहे. ह्यात "बांध काम" जास्त करण्यात आले आहे. म्हण्जे एक काहि तरी वेगळ पाहिल्याचा तुम्हाला आनंद मिळेल.(तिथल्या एका भुयारातुन्/अंधार्‍या वाटेतुन जरुर जा, भर दुपारी ही तिथे एक कणही प्रकाश नसतो.जाताना भन्नाट वाटतं त्यात.) शूल्-भंजन म्हणुन एक ठिकाण आहे, तिथुन जवळच.(खुल्ताबाद च्या वाटेवर) तिथे स्वतः संत एकनाथ समाधी-तपश्चर्या करण्यासाठी येत्,असे सांगतात. (आता तिथे एक साधसं दत्त्-मंदीर आहे.) तिथे एक मोठि शिळा आहे. तिला खडकाने वाजवले तर सप्त सुर निघतात.(असे पुजारी सांगत होता. मी खडकानी बडवल्यावर एक गोड आवाज आला हे खरं .पण ते काही "सप्त सुर" नव्हते. आणि हे त्या पुजार्‍याला सांगताच त्याचे "तप्त्-सुर" ऐकावे लागले. :-) असो. ) तर , त्याठिकाणी गेल्यावर, एक वेगळिच प्रसन्नता,शांतता अनुभवास येते. तो अनुभवच प्रत्यक्ष घेता येइल,त्याचे वर्णन नेमके शब्दात करता येणार नाही, हे माझे दुर्दैव. (शुल भंजन ला जाणार कसे? :- खुल्ता बादच्या गाडित बसुन मुख्य रस्त्यावर "शुल्-भंजन" फाट्यावर उतरावे. तिथुन पुढे ४ किंवा साडे ४ किलोमिटर एज पायवाट आहे.जाताना दोन्ही कडे काहिच नाही,नुसते पसर्लेले मैदान, त्यावर कधी झाडी तर कधी तळी आहेत्.दिल खुलास एकांत, प्रसन्नता,शांतता अनुभवता येते जाताना.) शिवाय "म्हैस माळ" आहेच. हे आमच्या गावा क्डलं "महा बळेश्वर." पण पुरेसं व्यापारी करण न झाल्यानं अगदी शांत शांत. तिथे अगदि डिक्टो तिरुपती सारखं मंदीर उभार्ण्यात आलयं.तीही छान जागा आहे. काय काय म्हणुन सांगु,किती किती म्हणुन सांगु. तिथे असतो तर एकेकाला पकडुन ह्या सर्वाची सहल घडवलि असती. असो.

In reply to by मन

आनंदयात्री 30/04/2008 - 16:29
शुलीभंजन पहाण्याची खरी मजा पावसाळ्यातच, अर्धा डोंगर अन मंदिर सुद्धा ढगांनी वेढलेले असते, लांबच लांब हिरव्याग्गार डोंगररांगा अन खाली दिसणारी इटुकली गावं-वाड्या, छोटी छोटी तळी अन भिजलेला आसमंत. चिखल तुडवत हुंदडायला जागोजाग उमललेली रानफुले पहातांना स्वर्ग २ बोटे उरायचा, छ्या बॉ ऋषिकेशराव कालेजचे दिवस आठवले. जवळचे गवताळा अभयारण्य तिथली पाटण्याची देवी-मागचा मोठ्ठा धबाबा कोसळणारा धबधबा, दाट्ट जंगल, निसरड्या वाटा अन कधी मधी अवचित ऐकु येणारी डरकाळी. पितळखोर्‍याच्या गुहांचा परिसर सुद्धा मनोहारी, तासनतास निघावे वाटत नाही तिथुन. अजुन काय काय सांगावे बॉ, मेरा गांव हैही ऐसा, अल्टीमेट.

एकदिवसीय सहलीच्या कौलाला एकूण २१ जणांनी मते दिली पैकी ६७% लोकांची होकार भरणारी मते मिळाली आहेत, त्यामुळे किमान १४ लोकांचा ग्रुप बनण्यास हरकत नसायला हवी. आता प्रश्न उरतो कधी आणि कुठे जायचे त्याचा. ऐन मे चा उन्हाळा बघता कुठे काढता येऊ शकेल सहल? मे २००८ मधील विकेंडचे दिवस बघता ( ३,४,१०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१ ) असे दिवस मिळू शकतात असे दिसते. यातले कोणास कोणते दिवस सहलीसाठी बाजूला काढणे जमेल ते सांगावे. एका महिन्यात एकच ( किंवा दोन ) सहल करायचे उद्दिष्ट असूनही एकाहून जास्त दिवस विचारण्यामागचा उद्देश हा की सर्वांच्या तारखा जुळवता येईलसे बघता येईल !