Skip to main content

श्रध्दा

लेखक भावना यांनी बुधवार, 30/04/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, माणसामधले माणुसपण जाते जगण्यामधले जीवन जाते माणसाविना माणसाचे खरचं का कुठे काही अडते ? श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, मनाची कवाडे भकास होतात श्रध्देच मन निराश होते प्रेमाला माणुस पारखा होतो पण कुणाला असा किती फरक पडतो ? श्रध्दा कुणावरही असु शकते, देवावर मानवावर अथवा भावनांवर पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते, देव , माणुस भावना सगळेच निषिध्द होते . मला कुणी सांगेल का श्रध्देच्याच वाट्याला हे का येते ?
लेखनविषय:

वाचने 3057
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया