एकदिवसीय सहलीच्या कौलाला एकूण २१ जणांनी मते दिली पैकी ६७% लोकांची होकार भरणारी मते मिळाली आहेत, त्यामुळे किमान १४ लोकांचा ग्रुप बनण्यास हरकत नसायला हवी. आता प्रश्न उरतो कधी आणि कुठे जायचे त्याचा. ऐन मे चा उन्हाळा बघता कुठे काढता येऊ शकेल सहल?
मे २००८ मधील विकेंडचे दिवस बघता ( ३,४,१०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१ ) असे दिवस मिळू शकतात असे दिसते. यातले कोणास कोणते दिवस सहलीसाठी बाजूला काढणे जमेल ते सांगावे. एका महिन्यात एकच ( किंवा दोन ) सहल करायचे उद्दिष्ट असूनही एकाहून जास्त दिवस विचारण्यामागचा उद्देश हा की सर्वांच्या तारखा जुळवता येईलसे बघता येईल !
विजुभाऊंनी पुण्याच्या जवळपास सहलीला जाण्यास योग्य ठिकाणांची सूची बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त काथ्याकूट काढलेला आहे, जो आपल्याला आपली निवड कळवण्यास उपयोगी होईलसे वाटते.
इथे प्रतिसाद देणार्यांनी ( अर्थातच जे सहलीला येऊ इच्छिताहेत त्यांनी ) त्यांचे सद्यठिकाणही प्रतिसादात नमूद केल्यास सोयीचे जाईल, असे वाटते.
वाचने
5734
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे मत
कुणी ऐकतयं का?
शुलीभंजन - पावसाळा
In reply to कुणी ऐकतयं का? by मन