✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्वय॑पाक घरातील घडामोडी

श
शितल यांनी
Wed, 04/30/2008 - 19:24  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12379 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

L
llपुण्याचे पेशवेll Wed, 04/30/2008 - 21:07 नवीन

हा हा हा...

म्हणजे तुम्ही केलेला जाम इतका जाम झाला होता कि ढवळायला घेतलेला चमचा पण त्यात जाम झाला. :)) तसा चहात साखर समजून मीठ घालायचा अनुभव माझ्याही गाठीशी आहे. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
व्यंकट Wed, 04/30/2008 - 23:28 नवीन

ह्म्म

आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! व्यंकट
  • Log in or register to post comments
भ
भावना Wed, 04/30/2008 - 23:28 नवीन

कोळ्सा बनविण्याचा काही अनुभव ?

अग शितल, तु निदान पदार्थ तरी बनविलेस . मी तर दुधापासुण कोळ्सा ही पाकक्रुती अनेकदा बनविली आहे. आमच्या 'ह्यांच्या' मते हा पदार्थ मला उत्तम जमतो !!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 23:46 नवीन

हराभरा कबाब....

आत्ताच दोन दिवसांपूर्वी हराभरा कबाब करावयास घेतले होते पण चुकून पाणी जास्त झाले आणि भज्यांचे पीठ तयार झाले. शेवटी, हरीभरी भजी बनवून वेळ साजरी केली. नवीन लग्न झाले होते तेंव्हा कधी कधी माझी सुविद्य पत्नी जी भाजी बनवायची ती पुढील पैकी २ वर्गात मोडायची. १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... १) घे मेल्या भाजी म्हणजे खूप दिवस आग्रह केला की भोपळी मिरच्यांची पिठ लाऊन भाजी कर एकदा. की एक दिवशी ताटात ती भाजी यायची. ओळखू यायची की ही भोपळी मिरच्यांची पिठ लावून केलेली भाजी आहे. पण, त्याचे रंग, रूप, पोत पाहता ती घे मेल्या भाजी आहे हे सहज लक्षात यायचे. २) ओळखा पाहू भाजी ही सर्व साधारणपणे कुठल्या तरी पाककलेच्या पुस्तकातून वाचलेली टोट्टली नवीनच भाजी असायची. पानात वाढलेला पदार्थ हा काय आहे ह्या विचारातच जेवण संपायचे. त्याला मी ओळखापाहू भाजी असे नांव ठेवले होते. असो.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/01/2008 - 07:50 नवीन

:)

१) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... हे मस्त! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
भ
भाग्यश्री Wed, 04/30/2008 - 23:49 नवीन

मी एकदा

मी एकदा साबूदाणा खिचडी करायला गेले.. आणि सगळं छान केलं, पण काय अवदसा आठवली, आणि मी त्यात धण्याची पावडर टाकली.. :( विनाशकाले विपरीत बुद्धी दुसरं काय.. नेहेमी करायचे मी खिचडी, आणि छान करायचे.. पण इथे नवर्‍याला इम्प्रेस करायला गेले, न मेजर फसले! अतिशय घाण चव येते... सगळी खिचडी फेकून द्यावी लागली.... :( पोळीचा पापड्,भाज्या तेलात पोहतायत वगैरे नेहेमीच्या (अ)यशस्वी प्रयोगांनंतर आता जरा अन्नपुर्णा देवी प्रसन्न झालीय बहुधा.. सद्ध्या इतकं वाईट नाही बिघडत आहे काही... टच वूड !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/01/2008 - 07:52 नवीन

कधी?

नेहेमीच्या (अ)यशस्वी प्रयोगांनंतर आता जरा अन्नपुर्णा देवी प्रसन्न झालीय बहुधा.. सद्ध्या इतकं वाईट नाही बिघडत आहे काही... टच वूड ! चला! बरं आहे. कधी जेवायला येऊ तेवढं बोल! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाग्यश्री
प
प्रभाकर पेठकर Wed, 04/30/2008 - 23:54 नवीन

आयला....

आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील....
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 00:11 नवीन

येस, पेठकर काका!

लाख बोललात! अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते!;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 00:12 नवीन

छान कल्पना

>> आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील.... हो हो एकदम फसक्लास चालतील, आणि सगळे पतीदेव (ज्या॑च्या बायका सुगरण नाहीत) त्या॑ची ना॑वे स्वतः हुन टाकतील. बाकी तुमची घे मेल्या भाजी आणि ओळखा पाहु भाजी मस्तच ! >>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/01/2008 - 00:17 नवीन

घोटाळा.....

>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच. प्रेषक व्यंकट ( बुध, 04/30/2008 - 23:28) . आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! व्यंकट वरील पुराव्यावरून हेच सिद्ध होते की, ही प्रार्थना माझी नसून श्री. व्यंकट ह्यांची आहे.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 00:23 नवीन

कोळ्सा हा. हा. हा.

>>>तु निदान पदार्थ तरी बनविलेस . मी तर दुधापासुण कोळ्सा ही पाकक्रुती अनेकदा बनविली आहे. :)) >>>आमच्या 'ह्यांच्या' मते हा पदार्थ मला उत्तम जमतो !!! भावना तु एक पायरी पुढे आहेस, मी त्या दुधाची बासु॑दी बनवत होते. :D आणि मी तर फोडणीला इतकी भीत असे की तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी जीरे, मिरची टाके आणि खाली बसे कारण त्या कधी कधी उडतात, मिरचीच्या बीया तर माझ्या तोडा॑वरच उडत, पण आता सफाईतदारपणे फोडणी टाकते.
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/01/2008 - 00:25 नवीन

वाव

नवीन लग्न झाले होते तेंव्हा कधी कधी माझी सुविद्य पत्नी जी भाजी बनवायची ती पुढील पैकी २ वर्गात मोडायची. १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... =))
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/01/2008 - 00:30 नवीन

काका

आयला मला वाटतं पाककलेचे वर्ग सुरू करावेत, जोरदार चालतील.... कधी काढताय क्लास? प्लीज ऑनलाईन काढा मी तुमची पहिली विद्यार्थिनी असणार हे नक्की..... :W स्वगतः चला तात्यांना जेवायला बोलवण्याआधी काही शिकायला जमलं तर बरंच...... ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/01/2008 - 07:53 नवीन

:)

स्वगतः चला तात्यांना जेवायला बोलवण्याआधी काही शिकायला जमलं तर बरंच...... लवकर शिकून घे, वाट पाहतोय.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 00:31 नवीन

असेच.

>>>आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! तुमची ही प्रार्थना अन्नपूर्णा आईच्या चरणी रुचु होईल, आता आईच ती लेकीला लेकीला सावरायला येईलच. प्रेषक व्यंकट ( बुध, 04/30/2008 - 23:28) . आई अन्नपूर्णा तुमच्यावर लवकरात लवकर प्रसन्न होवो ! व्यंकट >>>वरील पुराव्यावरून हेच सिद्ध होते की, ही प्रार्थना माझी नसून श्री. व्यंकट ह्यांची आहे. हो तुम्ही ते छान सिध्द केले आहे, मला माहित आहे मी एकाच प्रतिक्रियेत टाकल ते. मला माफ करा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/01/2008 - 08:32 नवीन

अरे....!

मला माफ करा. अरे...! माफी वगैरे काय मागताय? तुम्ही कोर्ट-कचेरीतील माणसं, म्हंटलं पुराव्यानीशी बोलावं. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 01:16 नवीन

लाडु

मला आठवते,लहानपणी आमच्या शेजारच्या घरातील दोन मुली व त्याचा भाऊ त्याचा दिवाळीचा फराळातील, रव्याचा लाडु आणि श॑करपाळी ते खलबत्यामध्ये कुटुन खाताना पाहिले आहे. आणि माझ्या मावशीचे बेसनाचे लाडु तर तुप खुप घातल्यामुळे पातळ होऊन उचललाकी त्याचा आकार बदलत असे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/01/2008 - 07:53 नवीन

:)

दोन मुली व त्याचा भाऊ त्याचा दिवाळीचा फराळातील, रव्याचा लाडु आणि श॑करपाळी ते खलबत्यामध्ये कुटुन खाताना पाहिले आहे. हा हा हा! :)) बाकी शितल, तुझेही स्वयंपाकघरातले सगळेच किस्से मस्त आहेत... :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 02:18 नवीन

एकदा

एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे. विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! :O कसा संसार करतात देव जाणे! Image removed.देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर. १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... मी समस्त मिपाकरांतर्फे पेठकरकाकांना 'खाद्य क्रांतीकारक' हा पुरस्कार बहाल करतो. अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते! चूक. रंगराव,आमच्या बाजूची मंदी(सौ.मंदाकीनी कोपरखळे) गेली कित्येक वर्षे खानावळीच्या धंद्यात आहे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 03:12 नवीन

इनोबा..

+१ लै भारी.:) विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! कसा संसार करतात देव जाणे! देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर. अहो पोट आहे तोवर ह्या धंद्याला मरण नाही. इथे कधीही मंदी नसते! चूक. रंगराव,आमच्या बाजूची मंदी(सौ.मंदाकीनी कोपरखळे) गेली कित्येक वर्षे खानावळीच्या धंद्यात आहे. :):):):):) अबब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 05/01/2008 - 08:38 नवीन

धन्यवाद....

इनोबा म्हणेजी, मी समस्त मिपाकरांतर्फे पेठकरकाकांना 'खाद्य क्रांतीकारक' हा पुरस्कार बहाल करतो. धन्यवाद. तसा मी ' खादाड क्रांतिकारक ' हा पुरस्कारही आनंदाने स्विकारला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 17:40 नवीन

असेच

>>एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे. >>विसराळू नवरा आणि वेंधळी बायको! कसा संसार करतात देव जाणे! देवाने डोके लावुन आमची गाठ घातली आहे, मी काही वे॑धळापण केला तरी त्याच्या लक्षात रहात नाही, हीच तर ग॑मत आहे. >>देवा यांचे कालवण कर.स्वारी....स्वारी...! कल्याण कर. बाकी तुझ्या भाषेत कालवण, आमच्या साठी कल्याण, ही आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीस त्या बद्दल मी तुला एकदा आमच्या घरी जेवायला बोलावेण हे, ते धाडस मात्र तु करायला हवे. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे Fri, 05/02/2008 - 02:03 नवीन

ही

ही आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना केलीस त्या बद्दल मी तुला एकदा आमच्या घरी जेवायला बोलावेण हे, ते धाडस मात्र तु करायला हवे. सपशेल माघार. :T कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल
प
पिवळा डांबिस गुरुवार, 05/01/2008 - 03:27 नवीन

काही अनुभव नाही बॉ!

आम्ही स्वतः स्वयंपाकघरात फक्त चहा बनवू शकतो, त्यामुळे स्वतःचा असा काही अनुभव देता येत नाही.:) आणि आम्ही एका फर्मास कायस्थ पोरीबरोबर संसार मांडलेला असल्याने पदार्थ चुकण्याचा प्रकार कधी अनुभवला नाही इतक्या वर्षांत!! सुगरण नसणार्‍या कायस्थ मुली देव जन्मालाच घालत नाही! कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!!:) परमेश्वराच्या कृपेत चिंब न्हाऊन निघालेला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
व
व्यंकट गुरुवार, 05/01/2008 - 04:08 नवीन

:)

परमेश्वराच्या कृपेची वाट पहाणारा... व्यंकट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
ज
जयवी गुरुवार, 05/01/2008 - 11:15 नवीन

जबरी

शितल...एकदम जबरी अनुभव आहेत हं तुझे..... :) १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... हे तर सॉलीडच ;) माझं म्हणाल तर मी लग्नाआधी कधी चहा सुद्धा केला नव्हता..... पण लग्नानंतर मला आईशप्पथ कधीच असा भयंकर अनुभव आला नाही हो.......!! जे पण केलं ना......ते मस्तच झालं ;) (आता नवर्‍याची साक्ष काढू नका म्हणजे झालं :D )
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 05/01/2008 - 17:33 नवीन

असेच

>>>माझं म्हणाल तर मी लग्नाआधी कधी चहा सुद्धा केला नव्हता..... पण लग्नानंतर मला आईशप्पथ कधीच असा भयंकर अनुभव आला नाही हो.......!! जे पण केलं ना......ते मस्तच झालं (आता >>>नवर्‍याची साक्ष काढू नका म्हणजे झालं ) जयवी ताई तुमच्या नवर्‍या॑ची साक्षच आता घेतली पाहिजे. तुमच्या डोळ्या॑च्या धाकात त्या॑नी कुठलेही पदार्थ मस्त मानुन घेतले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयवी
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 13:19 नवीन

हं..

स्वयंपाकातल्या घडामोडी बाकी मस्तच आहेत,एक किस्सा माझाही- एकदा कॉलेजच्या सुट्टीत मला रव्याच्या वड्या करायची हु़क्की आली,काहीतरी बिनसले आणि वड्यांचे मिश्रण घट्टच होईना,मी त्यात बेसन घातले,तरी तसेच.. शेवटी तो रवा बेसनाचा वेलची जायफळ घातलेला चिकचिकीत गोळा तयार झाला,वडी पडायचे नाव नाही.आई ,बाबा नात्यातल्या लग्नाला बाहेरगावी गेले होते आणि मी आणि बहिण तिथे जायचे टाळून घरात हे असले उद्योग करत बसलो होतो.ते घरी यायच्या आत त्या प्रकरणाचा निकाल लावायचा होता..आमच्या सुपिक डोक्यातून आयडीया निघाली आणि आम्ही त्याचे सारण भरुन पोळ्या केल्या.बिघाडाचा पत्ता लागू न देता 'स्पेशल डिश 'म्हणूनआमच्या २ 'बकासूर भाऊमंडळी'ना खाऊ घातल्या .त्या पोळ्या खरोखरच 'उच्च' झाल्या होत्या.(झाल्या खर्‍या!)त्यामुळे त्यांनी पण चढा ओढीने खाल्ल्या. कधीतरी असेच परत एकदा भाऊरायाने त्या पोळीची फर्माईश केली तेव्हा त्याला म्हटले आता माहित नाही परत तशा पोळ्या करता येतील की नाही ते,त्यासाठी 'वड्या बिघडणे 'हा कच्चा माल लागतो. कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!! काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 05/02/2008 - 10:08 नवीन

जरूर! बेशक!!

काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा.. जरूर असतील ना! आमची काहीच हरकत नाही हो!:) आम्हाला त्यांचा अनुभव नाही इतकंच. आम्ही आमचा अनुभव कथन केला.. पण मिपावर तुम्हाला जर अशी गुलबकावली आढळली तर कळवा!!!:) समस्त मिपामैत्रिणींनो, प्लीज, प्लीज, प्लीज प्लीज ह्.घ्या. -खट्याळ डांबिस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
व
वरदा गुरुवार, 05/01/2008 - 18:06 नवीन

पटलं गं स्वाती

कदाचित कधी काही बिघडलंच तर त्या त्याचा दुसराच पदार्थ बनवत असाव्या, असा फक्कड की खाणार्‍याला पत्ताही लागत नाही!! काही काही 'भटणी ' पण असतात हो अशा.. मी उकडीचे मोदक करायला घेतले होते इथे आल्यावर..वळले जातच नव्हते....कळी पाडायला गेलं की तुटायचे..मग मी उकडीच्या करंज्या केल्या.. नवर्‍याला सांगितलं ही मोदकांसारखीच नवीन डीश आहे...चव तर तीच लागली त्याला काही कळ्ळं नाही... ;)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री गुरुवार, 05/01/2008 - 23:00 नवीन

झकास

झकास अनुभव अन खुमासदार प्रतिक्रिया !
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 05/02/2008 - 15:27 नवीन

बर्‍याचदा

बर्‍याचदा मी आणि माझा चुलत भाऊ असे दोघं मिळून काकू ऑफिसातून परत येण्याच्या वेळी कांदेपोहे करत असु! प्रत्येकवेळी आमचा ठरलेला वाद "सुज्या, आपल्याला कांदेपोहे करायचेत कांदेदाणे नाही" इति अस्मादिक. "भैय्या, इतक्या कांद्यातून पोहे वेचून काढून खावे लागणार" इति बंधूराज. आणि अश्या वादातून बडबड करताकरता (म्हणजेच पाचकळ इनोद हो!) फोडणीत कधी दाणे घालायचेच विसरुन जायचो तर कधी कांदा! एकदा तर दोन्ही विसरलो आणि आमच्या बिचार्‍या काकूनं पोह्यांबरोबर कच्चे दाणे आणि कच्चा कांदा खाल्ला :( बाकी, इथल्या समस्त बायांची मनमोकळी कबूली वाचून समस्त अविवाहित बापयगड्यांहो, पदार्थासंदर्भातले ह्यांचे टिपिकल डायलॉग्ज लक्षात ठेवा...पुढं कामाला येतील :) पेठकर काका, १) घे मेल्या भाजी २) ओळखा पाहू भाजी.... दोन्ही अनुभव गाठीशी बांधून आहोत :) फक्त नावं सुचली नव्हती....आभारी आहे...नावांची ओळख करुन दिल्याबद्दल!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 18:23 नवीन

वेगळे.....

धमाल मुला, कांदे किंवा दाणे किंवा दोन्ही फोडणीत टाकायचे विसरलास तरी काळजी करायला नको. कांदे किंवा दाणे किंवा दोन्ही वेगळ्या फ्रायपॅन मध्ये कमीत कमी तेलावर परतायचे आणि तयार पोह्यात मिसळायचे . परतताना किंचित हळद टाकायची म्हणजे ते पोह्यात बेमालूम मिसळून जातात. वरून ओलं खोबरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांचा मेक् अप केला की सजली डिश तुमची. (कौतुक करून घ्यायला).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
श
शितल Fri, 05/02/2008 - 18:16 नवीन

आभार

प्रतिसादा बद्दल मनापासुन सर्वा॑चे आभार. पदार्थ मजेशिर बनण्याचे अनुभव काहीच्या पाठीशी आहेत, वाचुन बरे वाटले, मी त्यात एकटी नाही , पण माझ्या जरा जास्त होतात इतकेच, आता मला स्वय॑पाक करण्यात धीर येत आहे मी हल्ली घरीच असल्यामुळे मला वेग वेगळे पदार्थ बनवण्यात मजा वाटत आहे.
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Sat, 05/03/2008 - 18:12 नवीन

कोणी

उप्पीट करताना दोन ग्लास जास्त पाणी घालुन ते आटण्याची अतोनात वाट पाहिली आहे का??? मी पाहिली आहे आणि ते आटत नाहिये म्हणुन मी रव्याची तिखट खीर म्हणुन तो प्रकार खाल्ला आहे. :) एकदा भात करायचा होता. मग एकट्यासाठी कशाला कुकर म्हणून तसाच एका पातेल्यात ठेवला. मला तर आधीचा अशा प्रकारे भात करण्याचा अनुभव नव्हता. मग काय वरुन पाणीदार आणि भांड्याच्या खालच्या बाजुला करपलेला भात ढकलला पोटात. :)
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 05/03/2008 - 18:57 नवीन

पोहे

आणि ते आटत नाहिये म्हणुन मी रव्याची तिखट खीर म्हणुन तो प्रकार खाल्ला आहे. अहो, अशा प्रसंगातूनच तर खाण्याचे नवीन नवीन प्रकार तयार होतात व आपण मग काहीवेळा ते टीव्हीवर खाण्याच्या कार्यक्रमात किंवा पुस्तकात पाहतो. ह्यावरून आठवले. बंगळुरला असताना मी आणि माझ्या शेजारच्या खोलीतील मुलगा रविवारी खोलीतच नाश्ता बनवायचो. म्हणजे तो शिजवायचा, बाकी मदत मी करायचो. त्यामुळे पोहे/कांदा आणणे हे काम माझ्याकडे होते. एकदा मी आंघोळ झाल्यावर त्याच्याकडे गेलो तर तो म्हणाला, 'अरे बघ काय झालेय?'. पाहतो तर पोह्यांचा लगदा शिजत होता. तो म्हणाला, 'मी पोहे भिजत ठेवले होते नंतर शिजविताना असे झाले.' मला कळले की त्याने जाड्या पोह्यांऐवजी पातळ (कागदी पोहेही म्हणतात ना त्याला?) पोहे आणले असतील दुकानातून. (तिकडे पोह्यांना अवलक्की म्हणतात. ते सांगून मग हातात दिल्यावर सांगावे लागे की हे नाही दुसरे. B) ) मग त्या मित्राला सांगितले काय ते, व म्हणालो ह्याला आपण उपमा समजून खाऊया :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा