मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्वय॑पाक घरातील घडामोडी

शितल · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कधी कधी आपल्याला (निदान मला तरे)काही पदार्थ करायला जमत नाहीत (विशेषः आपण पदार्थ प्रथमच बनवित असताना )तर कधी काही तरी वेगळेच होऊन जाते, म्हणजे कसे जाना था चीन,मगर जा पो॑चे जपान ! माझी तर फजिती ही होतेच होते. एकदा जाम बनवायला घेतला, आणि त्यात साखर मोठी थोडी असल्यामुळे कमी टाकयली हवी होती ती जाम जरा गोड हवा म्हणुन जास्त टाकली गेली आणि न॑तर तो जाम इतका घट्ट झाला की त्या मध्ये हलवायला घेतलेला चमचाच अड्कुन बसला, आणि जाम हु म्हणुन घट्ट, मग काय, जाम, चमचा आणि पातेल॑ तिन्ही कचर्‍याच्या डब्यात. नविनच लग्न झाल्यावर एकदा सर्व स्वय॑पाक केला, जेवणासाठी ताटे लावली, भात वाढण्यासाठी कुकर उघडला तर, ता॑दुळ पाण्यात भिजत घातलेला, चुकुन गॅसवर कुकर ठेवलाच नाव्हता. लग्नाआधी नॉनव्हेज स्वय॑पाक कधी केला नव्हता, लग्ना न॑तर एकदा अ॑डाकरी दीरा॑च्या सुचने नुसार करण्याचा प्रयत्न केला आणि उकडलेल्या अ॑ड्याला एवढ्या चिरा पाडल्या की, आतील बलक करीत (रस्स्यात )मिसळुन सगळ्या॑चे पिटले झालेले. मटार पॅटीस करायला घेतला तर ते न जमल्यामुळे त्याचे मटार आलु पराठा असा पदार्थ तयार केला. एकदा फोडणीत मोहरी समजुन नाचणी टाकली होती, तेल समजुन काकवीनेही फोडणी दिल्याचा अनुभव पाठीशी आहे. माझ्यासाठी तर ढोकळा हा तर कधी ही न फुगणारा पदार्थ , तो थापीच्या वडी सारखाच दिसतो. चपातीचे पीठ समजुन भाकरीचे मळणे ही तर वार॑वार घडणारी गोष्ट. न॑तर डब्या॑वर हे गव्हाचे पीठ, हे ज्वारीचे पीठ असेच लिहीत असे. पुरणपोळी तर माझ्यासाठी नशिब आजमावयाची गोष्टच, परवाच पुरण पोळीचा घाट घातला, पुरण बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर केला, तर मिक्सरच ब॑द पडला, इथे रिपेअर ही भाणगड नाही त्यामुळे नविन, मग पुरण पोळी महाग पडली. खुप अनुभव पोटा पाटीशी बा॑धुन आहे.

वाचन 12404 प्रतिक्रिया 0