✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

भ
भडकमकर मास्तर यांनी
गुरुवार, 05/01/2008 - 00:43  ·  लेख
लेख
  • ध मु चे लग्न(२)
  • ध मु चे लग्न(३)
  • धमु चे लग्न ( उत्तरार्ध)

Book traversal links for आनंद विरुद्ध कास्पारोव्ह .. सप्टेंबर १९९५... पीसीए वर्ल्ड चॅम्पियनशिप

  • ध मु चे लग्न(२) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10311 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

च
चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 01:33 नवीन

अहो भडकमकर साहेब!

आमच्या लाडक्या खेळालाच हात घातलात की तुम्ही!;) धन्यवाद! हो मला ते दिवस चांगले आठवतात. आनंद हरला पण त्याआधी त्याने कास्पारोवच्या बालेकिल्ल्यात घुसून त्याला हिसका दाखवला होता! नंतर त्याचा अनुभव थोडा कमी पडला पण माझ्यासारख्या अनेक सामान्य भारतीयांच्या आशा त्याने पल्लवित केल्या हे खरे. त्यानंतरच्या पुढल्या १० वर्षात आपल्याकडे बाल खेळाडूंची फौज तयार झाली. सध्या महाराष्ट्र, आंध्र इथले खेळाडू बरीच प्रगती करीत आहेत ह्याचे फार मोठे श्रेय आनंदला द्यायला हवे. आणि आता तर तो जगज्जेता आहेच. १९९७ पासून सातत्याने जगातल्या पहिल्या तीन खेळाडूत गणना होणे म्हणजे खायची गोष्ट नाही!:) (अवांतर - आनंद बरोबरच माझा दुसरा आवडता खेळाडू मिखाईल ताल आहे. तो फार काळ जगज्जेता वगैरे नव्हता पण विलक्षण प्रतिभावंत होता. त्याच्या डावातल्या एकेक बलिदानांनी चक्रावून जायला होते. ८ ते १० खेळ्यांनंतर पटावर काय स्थिती असेल ह्याचा तो अचून अंदाज करु शके! त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.) चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 01:46 नवीन

त्याच्या

त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो.) अरे बापरे... मस्तच..लिहा लिहा ...या गेमबद्दलपण लिहा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मन गुरुवार, 05/01/2008 - 01:35 नवीन

मस्त रे!

>>म्हणजे मला चांगलं खेळता येत नाही, पण चेस येणार्‍या माणसाबरोबर जनरल बोलबच्चनगिरी करण्याइतपत चेस यायला लागलं , पुष्कळ झालं.... द्या टाळी! एकाच माळेचे दिसतोय आपण. अगदि गोखल्यांचे आर्टिकल्स वाचण्यापासुन ते आनंदवर पैज लावे पर्यंत! म्या पामराकडे "बुद्धी" आणि "बळ" दोन्हीचा अभाव्!पण उत्साहाचा नाही. गोखल्यांचे बरेच गेम्स वाचलेत. सर्वात भन्नाट म्हणजे अगदि नवखा असताना कास्परोव ने आंतर राष्ट्रिय स्पर्धेत थेट तत्कालीन प्रथित यश ग्रँड मास्टरला(बहुदा अनातोली कार्पोवच असावा तो.साल १९८५ च्या आस पास कधि तरी.) कसे चित पट केले ,ते पाहिलं तर मजा येइल. पण आनंदने तो चेस चा विश्व चषक जिंकल्यापासुन आपण बेहद्द खुश आहोत. अवांतरः- ज्या स्पर्धेत आनंद जगज्जेता झाला, त्यात टोपोलाव ला सामिल करण्यात आले नाही,ते कोणत्या निकषाखाली तेच कळले नाही. नाही तर आणखिन जोर दार लढती बघाय्ला मिळाल्या असत्या. निदान क्रॅमनिक पेक्षा तरी तो आनंद साठी "धोकादायक" सिद्ध झालाय. अवांतरः- आपण चेस्.कॉम चे सभासद आहात काय?
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/01/2008 - 01:59 नवीन

थोडसं अवांतर....

बरेचसे अभ्यासक सार्वकालिक सर्व श्रेष्ठ खेळाडु बॉबी फिशर ला मानतात ,असे वाचले आहे. सलग काही काळ त्याचे एलो २७८० च्या आसपास होते.(ratings inflation गृहित धरले, तर हे सर्वाधिक आहे.) पण त्याच्या खेळणे एका एकी बंद का झाले तेही कळत नाहिये. आणि वेग वेगळ्या काळातील खेळाडुंची तुलना कशी काय करता येते तेही सम्जत नाहिये,कारण एलो पॉइंट्स तर शेवटी "काल सापेक्ष" असतात. म्हणजे त्या त्या काळातील ईतर प्रतिस्पर्ध्यांना तुम्ही किती दण्क्यात हरवता ,यावर ते अवलम्बुन असतील्, तर कार्किर्दीत साधारण २ दशक फरक असणार्‍या खेळाडुंची तुलना कशी काय करता येइल? (कारण एवढ्या कालावधित बहुतांश प्रतिस्पर्धी बदललेले असातील )
  • Log in or register to post comments
र
रामदास Sat, 05/03/2008 - 21:01 नवीन

पण

पण त्याच्या खेळणे एका एकी बंद का झाले तेही कळत नाहिये> विस -एक वर्ष गायबचं झाला. नंतर एकदा उगवला , परत गायब. या वर्षी जानेवारीत कायमचा गेला.(आइस लँड मध्ये जिथे तो २००५ पासून राह्यला गेला होता.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 02:03 नवीन

द्या टाळी!

द्या टाळी! एकाच माळेचे दिसतोय आपण. अगदि गोखल्यांचे आर्टिकल्स वाचण्यापासुन ते आनंदवर पैज लावे पर्यंत! घ्या हो टाळी...मस्तच... आपण चेस्.कॉम चे सभासद आहात काय? होतो अशाच एका साईटचा मेम्बर मी..पूर्वी..आता जात नाही ..( घरी ब्रॊडबॆंड घेतल्यानंतर मला एकदा हे सापडले आणि मी त्यात ओळीने दोन रात्री रात्रभर चेस खेळत बसलो होतो...अट्टल जुगार्‍यासारखे झाले...पुढची मॅच तरी जिन्कू असे म्हणत म्हणत दोन्ही वेळा पहाट झाली...असल्या प्रकारांचा माझा फ़ार अतिरेक होतो अशा मी घरून नेहमी शिव्या खातो...)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 05/01/2008 - 02:13 नवीन

दोन्ही वेळा पहाट झाली

शेवटी 'उजाडलं' म्हणा की!;) (एकदम ह.घ्या.);) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 02:18 नवीन

(विषय दिलेला नाही)

=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अभिज्ञ गुरुवार, 05/01/2008 - 02:35 नवीन

वेड...

चेसची पुस्तके आणणे, रात्र रात्र गेम्स वाचत बसणे, डोक्यात चेसची चक्रे फिरत राहणे, आपले फालतु गेम्ससुद्धा लिहून काढणे, वगैरे प्रकार आम्ही अभियांत्रिकीच्या दुस-या/तिस-या वर्षाला असताना केले होते. निव्वळ वेडा झालो होतो अशाने.झपाटलेलाच म्हणा हवे तर.रात्रंदिवस डोक्यात बुद्धिबळाच्याच चाली येत रहायच्या. आमचा आणिक एक उदयोग म्हणजे रविवार टाईम्स ~ओफ इंडिया मधला प्रवीण ठिपसे ह्यांनि दिलेला बुद्धिबळातला डाव सोडवणे. तो हि एक नाद लागला होता. ते सदर बहुतेक अजुनहि चालु आहे.(पण आमचा हा नाद सुटून बरीच वर्षे झालि आता.) भडकमकर ,आपण दिलेल्या दुव्यांबद्दल धन्यवाद. चतुरंगजी, त्याच्या एका खेळात त्याने वजिराचे बलिदान देऊन केवळ दोन घोडी पटाच्या मध्यभागातून नाचवत नेऊन प्रतिस्पर्धी राजाचा खातमा केला होता! असो. त्यावर कधीतरी लिहीन म्हणतो. वा वा! तुम्ही तो "डाव" लिहाच आता लवकर. निश्चितच वाचायला आवडेल. अबब
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 02:42 नवीन

त्या १९९५ च्या मॅच चं विश्लेषण असलेला इन्ट्रेष्टिन्ग लेख

http://www.india-today.com/itoday/06101997/sport.html १९९७ च्या इन्डिया टूडेतला लेख आहे हा... यात आनंद आपण १९९५ मध्ये का हरलो याचं विश्लेषण करतो..हा एक उत्तम लेख आहे... (यात आनंदची अभ्यासाची पद्धत लिहिली आहे, त्याच्या अचाट मेमरीची टेस्ट घेतलेली आहे... वाचनीय)
  • Log in or register to post comments
र
रामदास गुरुवार, 05/01/2008 - 08:03 नवीन

फिशर

मिपा वर समानधर्मा भेटल्याचा आनंद आज झाला. फिशरच्या गेमची आठवण झाली. टाइम मशीन मध्ये बसून परत ३५ वर्षं मागे गेलो.आठवणीनी चष्म्यावर धुकं दाटलं. अमेरीकन स्वातंत्र्यवाद आणि रशिअन दडपशाही यांच्यातली लढत आठवली. हा लेख एक सुन्दर ओपनींग आहे. चला पटाच्या मध्यावर जाउ या. कालोह्यपी निरवधी विपुला च प्रुथ्वी. कोपी अस्ती मम समानधर्मा. (चूका दुरुस्त कराव्या. न्यून ते पुरते करावे.)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 05/01/2008 - 15:18 नवीन

वा...

हा लेख एक सुन्दर ओपनींग आहे. चला पटाच्या मध्यावर जाउ या. काय बोललात ... =D> +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
स
स्वाती दिनेश गुरुवार, 05/01/2008 - 14:06 नवीन

लेख

आनंद वरचा लेख आवडला, चतुरंगजी, तुमच्या लेखाची फार वाट पहायला लावू नका,लवकर लिहा,वाचायला उत्सुक :) स्वाती
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 05/01/2008 - 17:37 नवीन

मस्त!

वा वा! बुद्धीबळ हा आमचाही अत्यंत आवडता खेळ आहे. भडकमकरांनी दिलेले दोन्ही दुवे छान आहेत... आपला, (बुद्धीबळप्रेमी व कास्पारावभक्त!) तात्या.
  • Log in or register to post comments
म
मन गुरुवार, 05/01/2008 - 17:46 नवीन

ई ४

अहो वाचता काय? पहिली मूव खेळली आहे ना आता? आता टाका की ई५ (किंवा तुम्हाला योग्य वाटेल ती मूव) येउ द्यात पुढला लेख्.आमचंही तेवढचं शिकणं होइल.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा