श्रध्दा

भावना's picture
भावना in जे न देखे रवी...
30 Apr 2008 - 10:35 pm

श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
माणसामधले माणुसपण जाते
जगण्यामधले जीवन जाते
माणसाविना माणसाचे
खरचं का कुठे काही अडते ?

श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
मनाची कवाडे भकास होतात
श्रध्देच मन निराश होते
प्रेमाला माणुस पारखा होतो
पण कुणाला असा किती फरक पडतो ?

श्रध्दा कुणावरही असु शकते,
देवावर मानवावर अथवा भावनांवर
पण श्रध्दा जेव्हा अश्रध्द होते,
देव , माणुस भावना
सगळेच निषिध्द होते .
मला कुणी सांगेल का
श्रध्देच्याच वाट्याला हे का येते ?

कवितावाङ्मयप्रकटनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

चेतन's picture

1 May 2008 - 10:31 am | चेतन

कवीता चांगली जमलेयं

लगे रहो

चेतन

अवांतरः ही श्रध्दा कोण आहे

काळा_पहाड's picture

4 May 2008 - 5:13 pm | काळा_पहाड

:/ चांगला प्रयत्न. मात्र विषय हाताळताना भावनांचा गोंधळ उडालाय.
अधिक स्पष्टतेची आवश्यकता.

आनंदयात्री's picture

3 May 2008 - 2:39 pm | आनंदयात्री

पुढल्या कवितेला शुभेच्छा !

श्रीमंतपेशवे's picture

4 May 2008 - 12:27 am | श्रीमंतपेशवे

कविता जमते आहे . ही तर आवडली . पुढील येउ द्या.