महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी
विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची.
कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.
जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी
ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी.
लढण्यासाठी जन्म आपुला, हेच मजला ठाव असे
हार्-जीत तर चालायाचीच, मजला त्याचे गम्य नसे.
संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.
चाकोरीत राहुनी मी, डाव कधी ना मांडला
फेकले तिथेच फासे जेथे, अद्द्याप कुणी ना जिंकला.
वळुनी मागे अतीत बघता, माझेच मजला वाटते भय
फिरुनी आगीत चाललो मी, आगीचीच मला सवय.
छान
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आभार
दोन्ही कविता
वा मस्तच
छान कविता
छान..