कालाय तस्मै नम:
लेखनविषय:
सकाळ म्हणाली दुपारला
ही संध्याकाळ,
रोज कुजबुजत असते काळोखाशी
ऐकून हे,
दुपार सांगे तिला (सकाळला)
घेऊन तूं पण जाशी की
पहाटेला रोज फिरायला
अन,
देई निरोप तुला ती (पहाट)
लगेच,पाहुनी सूर्याला
ऐकूनी त्यांचा संवाद
दिवस म्हणे रात्रीला
दोष असे हा सूर्याचा
करी तो
उदय अन अस्थ दिवसाचा
ऐकून हे,
रात्र सांगे दिवसाला
दोश नको देऊं तूं सूर्याला
दोष असे हा पृथ्वीचा
गर,गर फिरुनी सूर्याभोवती
जन्म दिला तिने ह्या सर्वांना
पाणावल्या डोळ्याने
म्हणे पृथ्वी सूर्याला
भलेपणाचे "दिवस"संपले
जन्म देऊनी ह्या सर्वांना
अन
मिळे दोष आपल्या दोघांना
स्तिथप्रद्न्य तो सूर्यनारायण
समजावी त्या माउलीला
आठवशी त्या सुभाषीताला
कालाय तस्मै नम:
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
वाचने
4418
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
कल्पना छान
सुंदर
लय
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by वैशाली हसमनीस
स्थितप्रज्ञ
सामंत साहेब,
In reply to सामंत साहेब, by विसोबा खेचर
संपादना विषयी
छान काल्पना
अतिशय कल्पक!
प्रशंसा
अप्रतीम
धन्यवाद