कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले "मूड" संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे.
फादरस डे
वाटेत एका अनोळख्याला
जवळ जवळ आपटलो
"माफ करा"असे म्हणून मी
त्याच्या पासून सटकलो
"करा माफ"मला पण
म्हणत थांबला तो क्षणभर
औचित्याच्या वागण्याने
सुखावलो आम्ही दोघे वरवर
आपल्या घरी
स्थिती असते निराळी
लाहान थोरासी चटकन
आपण वागतो फटकून
झाली त्यादिवशी गम्मत
होतो कामात मी दंग
चिमुकल्या माझ्या मुलाने
केला माझ्या एकाग्रतेचा भंग
"हो बाजूला"
म्हणालो मी वैतागून
गेला तो निघून
हिरमुसला होऊन
रात्री पडलो
असता बिछान्यात
आला विचार
माझ्या मनात
औचित्याच्या भारा खाली
अमुची रदबदली झाली
वागलो चांगले अनोळख्याशी
अशी समजूत करून
मी घेतली मनाशी
पाहता फुलांच्या पाकळ्या
पडल्या होत्या दाराशी
लाल, पिवळी अन निळी
खुडली होती
फूले त्याने सकाळी
आला होता घेऊन ती हातात
टाकण्या मला आश्चर्यात
आठवून तो प्रसंग पून्हा
वाटे मजकडून झाला गून्हा
जाऊन त्याच्या बिछान्याशी
जवळ घेतले मी त्या उराशी
पुसता फुलांच्या पाकळ्या विषयी
हसला तो मला बिलगूनी
बोले तो मज भारावूनी
"घेऊनी ती सर्व फूले
आलो होतो तुमच्याकडे
कारण आजच आहे "फादर्स डे"
मागूनी त्याची माफी
पुटपुटलो मी त्याच्या कानाशी
चूक केली मी सकाळी तुझ्याशी
पुसून अश्रू माझे त्याने
हसून बोलला तो पून्हा एकदा
करतो प्रेम मी
तुमच्यावर सदासर्वदा
रहावे ना मला ते ऐकून
म्हणालो मी ही भारावून
आवडशी तू मला अन
मुकलो मी तुझ्या
आच्छर्याच्या आनंदाला
दिसलास सुंदर तू फुलांमुळे
होते सुंदर तुझे ते फूल निळे
श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
आवडली कविता.
अजून येऊ द्या !!! आपल्या सुरेख कविता.
आभार
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपुलेच बोट धरूनी
आलो ह्या सुंदर संकेस्थळी
वाचकांची प्रतिक्रीया पाहूनी
अचंबित झालो ततक्षणी
धन्यवाद
सामंत
दोन्ही कविता
आपल्या दोन्ही कविता वाचल्या.
चांगला आशय छान कल्पना.
पु.ले.शु.
एक विनंती - कृपया आपले नाव माझे खाते- संपादन मधे जाउन श्रीकृष्ण सामंत असे करावे.
वा मस्तच
छान झाली आहे.... खरंच आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तिंना नेहमी ग्रुहीत धरतो
छान कविता
छान कविता आहेत !!!!
येउ द्यात अजुन !!!!!
छान..
सामंतसाहेब,
कविता छान आहे...
तात्या.