Skip to main content

बटाटवडा- वडापाव!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
जमिनीतून वाफा काढणारा टळटळीत उन्हाळा चालू असता॑नाच दुपारी चारच्या सुमारास एकदम वळीव येतो..काळेकुट्ट ढग चाल करून येतात.. ओल्या मातीचा धु॑द सुग॑ध..गार वार्‍याची झुळूक अ॑गावर शहारा आणते, विज कडाडते आणि सरी कोसळू लागतात.. लाईट जातात.. घरातली लहान मुल॑ गच्चीत पळतात तर कानटोपी सरसावत आजोबा खिडकीत उभे राहतात..

एक छोटीशी सकाळ

लेखक सुचेल तसं यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
झेलम एक मोठी सुटकेस, एक हॅंडबॅग आणि सामानाने तुडुंब भरलेली कॅरीबॅग कशीबशी सावरत बसमधुन उतरली. चरफडत तिने आजुबाजुला पाहिले. पण कुठेही अमरचा पत्ता नव्हता. पुणं जवळ आल्यापासुन ती त्याला सारखा फोन लावत होती. पण हा बाबा फोन उचलेल तर शपथ. निदान दहा वेळा तरी याला सांगितलं होत की मी पाच-साडेपाचपर्यंत येईन पुण्यात . तेव्हा वेळेवर न्यायला ये मला. आधीच तिची झोप नीट झाली नव्हती. तिला बसमधे कधीच नीट झोप लागत नाही. याउलट अमर बस सुरु झाली की लगेच डुलायला(डुलकी घ्यायला)लागतो आणि कंडक्टर यायच्या आत गाढ झोपुन पण जातो.

सरकार राज .. वैताग सिनेमा !

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! काल 'सरकार राज' हा चित्रपट पाहिला. का पाहिला याचे उत्तर .. नवा चित्रपट आहे म्हणून पाहिला. अहो, तो चित्रपट पाहून इतका वैताग आला आहे, की जरा मित्रमंडळींसमोर बडबड करुन मन हालके करावे या हेतूने इथे लिहित आहे. ही चित्रपटाची समिक्षा, परिक्षण वगैरे नसून..

मोबाईल

लेखक विकास यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल फोन्स वापरण्यात भारतात सर्वत्रच आणि विशेष करून शहरात, त्यातही तरूण वर्ग बराच पुढे आहे. वर्षानूवर्षे दूरध्वनी क्रमांक मिळण्यासाठी तिष्ठत राहावे लागलेल्या भारतात आता मोबाईल तरी लगेच मिळू शकतो आणि जगाबरोबर दुहेरी संवाद सहजसाध्य होतो. अर्थात त्याच बरोबर शाळा-कॉलेजात मोबाईल्स आले त्याचे दुष्परीणाम, नंतर मोबाईल मधे असलेले कॅमेरा आणि व्हिडीओ कॅमेरा यांचे वाईट उपयोग आदी सुरू झाले. पण अशा गोष्टींना आळा घालणे शक्य असते. आज मात्र म.टा. मधे खालील (सारांशाने दिलेली) बातमी वाचली.

शोध

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले.
Taxonomy upgrade extras

शोध

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
शोध शोध तुझा घेत फिरत राहिले जळी,स्थ्ळी आणि पाशाणी. थकले,त्रासले,कोलमडले, तरीहि भटकतच राहिले.
Taxonomy upgrade extras

दुधसागर - धबधबा

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
दुधसागर - मडगाव पासुन २ तासाच्या अंतरावर मडगाव ( गोवा)- मिरज रेल्वे लाईन वर दुधसागर धबधबा आहे. काहीसा दुर्लक्षीत असा पण अतीशय प्रेक्षणीय धबधबा आहे. पाण्याच्या दुधासारख्या रंगामुळे कदाचीत त्याला हे नाव पडले असावे. सभोवती अतीशय घनदाट जंगल आहे. आपला जसा कर्जत- लोणावळा रेल्वे मार्ग आहे तसाच मडगाव - दुधसागर- लोंढा मार्ग घाटाचा आहे. अतिशय नयनरम्य प्रवास असे वर्णन करता येईल. दुधसागरला रहायची फारशी चांगली व्यवस्था नाही. कर्नाटक सरकारच्या फॉरेस्ट डिपारमेंटचे गेस्ट हाऊस आहे. तेथील व्यवस्थेची फारशी माहिती नाही. मडगावहुन एकादिवसात जाऊन येणे बरे. मडगावहुन रेल्वे तसेच रस्ताने ही जाता येते.

एक तितली मातकट तपकिरी

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नजर पोहोचते तेथवर रखरखीत वाळवंटी टेकड्या. संतप्त झळांनी आसमंत निर्दयपणे भाजून काढल्या जात आहे. घळीतील अडचणीच्या जागेत असलेल्या भुयारी गुहेत, बाहेरचे पेटलेले उन्ह भोकाभोकांनी आत ठिपकले आहे. गुहेत येताच, अंगावरचे घामाने थबथबलेले राखाडी पिवळे रकटे यासीम ओरबाडून फ़ेकून देतो. त्या छोट्याशा जागेत आधीच, त्याच्या सारखी वीस एक अर्धीउघडी शरीरे जागा मिळेल तिथे पडली आहेत. रोज दुपारचे सुखे मटन चावून झाल्यावर मिळणारी अर्धा तासाची विश्रांती सगळ्यांना खूप मोलाची आहे. उकाडा आणि तहानभूक ह्यांनी आलेली ग्लानी यासीमच्या डोळ्यात उतरून त्याची द्रष्टी जडावली आहे. तशातही, त्याचा उघडा बाहू कुरदणारी मक्खी त्याला दिसते.

या पाखरांस आता ---

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
या पाखरांस आता आहे निघून जाणे हे शब्द सूर सरले ओठी न येई गाणे छेडीत रोज तारा येई जुळून गीत ह्रद्यातूनी भरोनी येई फूलून प्रीत सार्‍या स्मृती सुखाच्या दाटून आज आल्या गेली उडून पिल्ले डोळ्यात प्रेमधारा रे माझिया पिलांनो हा जीव गुंतला रे डोळ्यात आज माझ्या बघ प्राण साठला रे फिरता नभांगणात परतून येथ या रे वेड्या जीवास माझ्या रे एक साद द्या रे हे वेड या मनाचे तुंम्हास रे कळावे अन् शब्द सूर ताल पुन्हा जुळून यावे
Taxonomy upgrade extras

बाग - गझल!

लेखक suralesandip यांनी मंगळवार, 17/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ूलही कसे सलते उरात आहे? वादळे कशी या अंतरात आहे? वाट संपता माझा प्रवास होतो पावले कशी वेड्या भरात आहे? चुकवून रस्ते निघुन मरण गेले वेदना अशा माझ्या घरात आहे सोसतो असा आजकाल मज मी आसवे बरी साध्या दरात आहे वाळवंट रे हे बाग का खुलावी? मेघ त्या कितीसे अंबरात आहे? चांदणे ढळाले एकटा पुन्हा मी काजळी कशी ही चांदरात आहे? --शब्द्सखा! (संदीप सुरळे)