Skip to main content

शून्याची महती

Published on शनीवार, 21/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा "दोन" म्हणे "एकाला" आहेच मी तुझ्या पेक्षा मोठाला ऐकून हे वाटे "तिनाला" माहीत नाही का "एक" आणि "दोनाला" मीच आहे त्यांच्या पेक्षा मोठाला दोन शिंगी "चार" होता आपल्या घरात हे संभाषण गेले त्याच्या कानात ओरडून तो म्हणाला वरच्या आवाजात ऐकल कारे "एक" "दोन" आणि "तिना" "पांच" "सहा" "सात" "आठ"आणि मीना कबूल झालो आहो "नऊना" तेच आहेत आमच्या पेक्षा मोठे "शून्य" बिचारा कोपर्यात होता बसून ऐकून सारे आले त्याला भरभरून स्वतःशीच म्हणाला ठाऊक नाही त्यांना माझी किंमत घेऊन मला शेजारी,जेव्हां एखादा दाखवील हिम्मत वृद्धि होईल त्याची कळत नकळत सूर्य,चन्द्र,तार्यांचा आहे माझ्या सारखा आकार पण सांगतात का ते कधी आमचाच

फायरफॉक्सवाल्यांसाठी - मिसळपाव नीट वाचण्यासाठी च३.० वापरा

लेखक मिसळपाव
Published on शनीवार, 21/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
फायरफॉक्स वापरणारया मिसळपावच्या वाचकांसाठी एक सूचना. फायरफॉक्स ३.० परवाच रीलीझ झाला. तो वापरला तर मिसळपाव.कॉम वर रस्व, दिर्घ व जोडाक्षरं बरोबर दिसतात. फायरफॉक्स २.न वर नीट दिसत नाहित.

कुत्रा आणि मी ... काही अनुभव...

Published on शनीवार, 21/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
".... कुत्रा घराची आणि शेताची राखण करतो.प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून धन्याचे प्राण वाचवतो, असा हा इमानी प्राणी मला खूप आवडतो...." वगैरे वगैरे वगैरे.. हे असलं मी शाळेतल्या निबंधात अनेक वेळा लिहिलं आहे , यातला बराचसा भाग खरा असला तरी कुत्रा प्राण्याचं ते फ़ार एकांगी आणि फ़िल्मी वर्णन असतं...

दातांची व्यथा

Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
एकदा जिभली बोले दातांस मी अशी (बिचारी) एकटी तुम्ही मात्र आहांत पुरे बत्तीस मला नाही हाड न काड मी आहे स्नायूचागोळा चुकून फिरले ईकडे तिकडे तुम्ही करता माझा चोळामोळा करिती ते (लोक) तुमचा उपयोग म्हणती बोललो आम्ही जिभ "चाऊन" ऐकून हे जिभलीचे संभाषण दातं म्हणती तिला वाईट सवंय आहे तुला घेतली जिभ लावली टाळ्याला बडबड करिशी तूं भारी निस्तरावे लागे आम्हांपरी वटवट तुझी ऐकून म्हणती ते (लोक) वैतागून गप्प रहाण्या काय घेशी कां पाडू ती बत्तिशी? (बिचारे दांत) श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)

शब्दहो, याना जरा...!

Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ

आमची प्रेरणा प्रदिप कुलकर्णी यांची अप्रतिम कविता शब्दहो, थांबा जरा...!

.................................
शब्दहो,  याना जरा...!
.................................

शब्दहो, याना जरा! मी गुंफतो वृतात गाणे!
आजच्यापुरते तरी पाडू नका मजला उताणे!!

कृपया ह्या गाण्या बद्दल माहिती द्या..

Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
मित्रहो! कृपया दुव्यातील ह्या नितांत सुंदर गाण्याचे संगीतकार कोण व चित्रपट कोणता? http://www.dishant.com/sharemailsong.php?songid=52381

'टाळी'बाज

Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ

आमची प्रेरणा पुलस्ति यांची सुंदर गझल टाळीबाज

काल ही नव्हती अशी मग आज का?
सर्व अंगाला सुटावी खाज का?

मी कुठे दिसतो दिखाऊ, बायकी
लोक मज म्हणतात 'टाळी'बाज का?

बातम्यांमध्ये सदा आहेच मी
वाटते याची तुम्हाला लाज का?

सायबाचा, ईश्वराचा लागतो
बायकोचा लागतो अंदाज का?

दूर केल्यावर जरा कळले मला -
चेहऱ्यावर मेकपी कोलाज का?

नीट होते, यायची ती तोवरी
नेमके अत्ताच फाटे काज का?

मौशुमी

Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
लाइट गेले, त्यामुळे पंखा बंद झाला आणि पंखा बंद करायचं अन मला जाग यायचं स्विच एकच असल्यासारखं मी खाडकन झोपेतनं जागा झालो. खोलीत चांगलाच उजेड दिसला. हात लांब करुन मोबाईलवर किती वाजले ते पाहिलं. ०९:०० अस दिसताच शिSSSSट अस जोरात ओरडुन पांघरुण बेडच्या दुसर्‍या कोपर्‍यात भिरकावुन दिलं. झोपेतनं नुकतच उठल्यावर बहुतेक वेळा आवाज जड असतो. तो इफेक्ट जायच्या आत बॉसला फोन लावला. बर वाटत नाहीये, त्यामुळे ऑफिसला थोडासा उशीरा येईन अस त्याला सांगितलं. लाइट गेल्यामुळे गिझरचा काही उपयोग नाही. त्यामुळे गार पाण्याने पटकन आंघोळ उरकली.

संवाद-२ [कुठलाही वाचा, ही मालिका नाही]

लेखक चाणक्य
Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
>>>नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं.

राजमुंद्री --एक नयनरम्य ठिकाण

Published on शुक्रवार, 20/06/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
राजमुंद्री--एक नयनरम्य ठिकाण आपल्या भारतात अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत.त्यातील हे एक आहे.आंध्र प्रदेशात एन्.एच.५ ह्या महामार्गापासून जवळच आहे.गोदावरी नदीच्या कांठावर वसलेले अत्यंत देखणे असे हे गाव.जिल्हा-पूर्व गो दावरीं. नाशिकपासून निघालेल्या गोदावरीचे पात्र येथे इतके भव्य होते की जणू समुद्रच!