बाईचे सौंदर्य खरोखरच मादक आहे.
यापूर्वीचे सर्व भागही वाचले. आपण त्या बाजारातल्या एका बाईकडे केवळ एक उपभोगाची वस्तू म्हणून न पाहता तिच्यातले 'माणूसपण' शोधायचा प्रयत्न केलात याचे कौतुक वाटते. एरवी बहुतेक सर्व जण तिथे शेण खायलाच जातात आणि पैसे देऊन शेण खाऊन परत येतात.
लेखनशैली बिनधास्त आणि मोकळीढाकळी आहे तरीही वाचताना कुठेही अश्लील वाटत नाही हे विशेष. बर्याच दिवसांनी इतके प्रामाणिक व उत्तम लेखन वाचले. अभिनंदन!
मागील एका भागात 'त्या बाजारातील बर्याचश्या मावश्या या काळ्याकुट्ट, बेढब, अवाढव्य व लोंबत्या स्तनांच्या असतात' असा काहीसा उल्लेख आहे. हे वाचून त्या मावश्यांचे एक चित्र डोळ्यासमोर आले. रौशनीमावशी मात्र अर्थातच याला अपवाद आहे. असो.
आपल्या सर्वांचाच,
शेणगोळा.
हे फोटू पाहून आपल्याला रौशनीच्या सौंदर्याची कल्पना येणार नाही परंतु प्रत्यक्षात मात्र ती दिसायला अतिशय सुरेख, अन् खानदानी होती एवढंच मी सांगू शकेन!
हे फोटो पाहून कोणीही नक्कीच सांगेल की रोशनी तुम्ही जशी लिहिली आणि वर्णिली त्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि खानदानी देखणेपण लाभलेली होती.
दैवाच्या फेर्यात सापडली आणि तवायफबाजारात आणि वेश्याबाजारत पोहोचली!
तवायफबाजारात आलेल्या कित्येक मुलिंची आणि स्त्रीयांची कहाणी थोड्याफार फरकाने सारखीच असते. दैव आणि परिस्थितीपुढे मान तुकवण्याशिवाय पर्याय नसतो त्यांच्याजवळ.
तात्या,
आज तुमची रोशनी पाहून खूप बरं वाटलं. आणि तिच्या सौंदर्या इतकाच तुमच्यातल्या धाडसाला आणि कलाकारालाही माझा सलाम!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
क्या बात है तात्या!!!
रौशन जमाल-ए- यार से है अंजुमन तमाम
दहका हुआ है आतिश-ए-गुल से चमन तमाम
अल्लाह रे हुस्न-ए-यार की ख़ूबी के ख़ुदबख़ुद
रंगीनियों में डूब गया पैरहन तमाम
देखो तो हुस्न-ए-यार जादू निगाहियाँ
बेहोश एक नज़र में हुई अंजुमन तमाम
उनको मेरा सलाम कहना.
जमाल-सौंदर्य,
आतिश-आग
चमन-बाग, उद्यान, उपवन किंवा इथे मिसळपाव.कॉम असाही अर्थ घेता येईल.
अंजुमन-मैफल किंवा इथे मिसळपाव.कॉम असाही अर्थ घेता येईल.
पैरहन-वस्त्र
निशब्द झालो.
काश मी तुमच्या सोबत असतो ह्या मैफीलीत अस वाटल बघा.
आता तर तुम्ही रोशनी कधी पुर्ण करता ह्याची उत्कंठा आहे.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
खरंच आरस्पानी सौदर्य ! रोशनी चे १ ते ५ भाग पुन्हा वाचून काढले. आता मलाही रोशनीला तसंच त्या वस्तीतल्या बायकांना भेटावसं
वाटतंय, असं वाटतं की खरंच आपण त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्यामुलांसाठी तरी काही तरी करू शकतो बघु कसं जमतंय ते
पण करायचं मात्र नक्की. देव मला नक्कीच काही तरी मार्ग दाखवेल.
तात्या प्रथम तुमचे लाख लाख आभार
खरच अतिशय सुन्दर आणि देखणं रुप आहे ,नाही म्हटले तरी दहा वेळा तरी फोटो पाहिला असेन.
आणि तुमची लेखन शैलीही अतिशय उत्तम आहे.
मी संदीप,एक वाचक
खानदानी सौंदर्य पण ईतके शापीत का असते ??
देवा ,का रे असे करतोस तु ??? दैवा पुढे ईतके का रे तुझे बंदे लाचार :-(
तिच्या सौंदर्या पे़क्शा तुमच्या धाडसाची च कमाल वाटते !!
सगळं वाचुन पोटात गो ळा आला ... काय आयुष्य जगतात या स्त्रियां, कल्पना ही नाही करवत आणी तरीही हसतमुख ??
~ वाहीदा
प्रतिक्रिया
मादक.
हे फोटू
जुलालीची
वा!
रौशन जमाले यार से है अंजुमन तमाम
क्या बात है..
खानदानी
तात्या
हेच म्हणतो.
आरस्पानी ....
अतिशय सुन्दर रुप आहे
शापीत सौंदर्य !! :-(