नमस्कार मंडळी,
शिर्षकावरून असं वाटेल की, मी डोळे या विषयावर काही लिहिणार आहे. तसं पाहिलं तर ते थोडं फार खरंही आहे. तिच्या / त्याच्या प्रेमळ डोळ्यांवर आजपर्यंत अनेक कवींनी कवनं रचली, गझला लिहिल्या, शेर लिहिले. निसर्गानं प्रत्येक माणसाला डोळे देताना रंगनिर्मिती कोठून केली असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो. काळे भोर डोळे, भुरे डोळे, पिंगट डोळे, निळसर डोळे, हिरवट डोळे, राखडी छटा असलेले डोळे.. असे कितीतरी प्रकारचे डोळे आपण पाहतो. डोळ्यावरून मनातील भावना लगेच कळतात असं म्हणतात. काही डोळे शांत वाटतात, काही पाणिदार, काही प्रेमळ , काही उथळ, काही खट्याळ, काही भोचक.. काही गंभिर....
शितलताई
वा
छान एकदम.
ऐकदम