Skip to main content

ईश्वराचे कोडे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 20/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणे "वनसृष्टी" ईश्वराला केलास तूं दुजा भाव देवूनी वाचा अन चाल "जीवसृष्टीला" हंसला ईश्वर मनांत अपुल्या म्हणे तो "वनसृष्टीला" पस्तावलो मी वाटते मला देऊन ते "जीवसृष्टीला" एका बिजा पोटी तरुं कोटी जन्म घेती सुमनें फळें परी वाचाळ होवूनी केली "मानवानें" सदैव भांडणे दूर जावूनी विसरला हा "मानव" अपुली मुळे श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया) shrikrishnas@gmail.com

दुःख ही न थांबणारी क्रिया आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"ते त्या आईचं मुल,एका खोल दरीत पडतं.ती आई त्या दरीच्या उंचवट्यावरून आपलेच कपडे फेकून देते.ते कपडे हवेत तरंगू देते.त्या कपड्यांची सुंदर फुलपाखरं होवून ती जणू भुर्कन उडून जातात" आज प्रो.देसाई तिच्या भाचीला घेवून तळ्यावर आले होते.माझी ओळख करून देताना मला म्हणाले, "ही वृंदा करंदीकर.ही कॉलेजात फिलॉसॉफीची प्राध्यापिका आहे." तिचा विषय़ लक्षात घेवून मी तिला म्हणालो, "वृंदा, मला एक तू सांग त्या दिवशी माझं आणि प्रो.देसायांच "दुःखात सुद्धा आनंदाची छटा असूं शकते" ह्या विषयावर चर्चा झाली होती.त्यावर प्रो.देसाई मला म्हणाले की, " वृंदाने मला एक कल्पित गोष्ट उदाहरण म्हणून सांगितली होती.ती मला जशास तशी आता आठव

जर उपवर मुला॑नी असे केले तर

लेखक शितल यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात आम्ही ७/८ मैत्रीणी नी एका मैत्रीणीच्या घरी रात्रीची मैफिल ठरविली होती, मस्त गप्पा टप्पा- खाणे पिणे, पत्याचे खेळ असा मस्त कार्यक्रम आखला होता. ठरल्या प्रमाणे सगळ्या जणी जमलो, आमच्या ग्रुप मध्ये गृहीणी, नोकरी करणार्‍या आणि काही जणी मुले झाल्यावर मुले लहान असल्या मुळे करिअरला तात्पुरता राम राम ठोकलेल्या अशा सगळ्या जणी आहोत.

संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट !

लेखक सचीन जी यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काथ्याकूट करण्यासाठी नवीन विषय हाजीर आहे. कोणत्याही संगीतकाराचा तुम्हाला आवडलेला चित्रपट ! सुरवात नवीन संगीतकारांपासुन करुयात. नंतर ओघात जुने संगीतकाराही येतीलच. १. हिमेश - तेरे नाम - ( तुमसे मिलना, तेरे नाम, लगन लगी , ओ जाना ही गाणी श्रवणीय होती. आपण अभिनेता आणि गायक आहोत हा साक्षात्कार होण्याआधी हिमेश तसा बरा होता) २. विशाल शेखर - मुसाफिर - (कोणि काही म्हणो, मुसाफिरची गाणी ट्रेंड सेटर होती. ईलेक्ट्रॉनिक संगित आणि क्लब मिक्स ताजे होते. एकाच गाण्याचे २ /३ वर्जन हा प्रकारही बराच चांगला वठला होता. सु सु सुनियो ऐकयला (आणि पहायलाही ) मस्त ! ३.

रवा डोसा

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
रवा डोसा साहित्य---प्रत्येकी एक कप रवा,मैदा,तांदूळ पीठ,कांदा बारीक ,मीठ, जिरे, काजूकाप,तेल,डोसा तवा क्रुती-वरील मिश्रणात पाणी घालून ते अगदी पात्तळ करावे.तवा तापवून घ्यावा.तयार मिश्रण साधारणपणे अर्धा कप तव्यावर ओतावे.बाजूने तेल सोडावे.मिश्रण पात्तळ असेल तरच जाळी पडेल.डोसा कोणत्याही चट्णीबरोबर खावा.

स्वयंपाकी देता का हो कोणी ??

लेखक अभिरत भिरभि-या यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंपाकी देता का हो कोणी ?? ।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।। बंग़ळूर ज्येष्ठ कृष्ण १ पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली. आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो. नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती. तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती.

मिसळपाव राज्यस्तरिय दंगल

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, परवा दिनांक २१ जुन २००८ रोजी मौजे पुणे येथे आपल्या लाडक्या मिसळपाव वरिल रथी, अतिरथी, महारथी मल्लांची दंगल आयोजित करण्याचा मानस आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन दस्तुरखुद्द मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे सरदार तसेच आद्य सात्विक कट्टा प्रणेते महारथी छोटा डॉन उर्फ ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर उपस्थित रहाणार असुन ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथा ते सांगणार आहेत. या काथ्याकुटाचा उद्देश इच्छुक मल्लांची (अन मल्लीणींची पन ;) ) नावनोंदणी तसेच आखाड्याची जागा अन सोयीची वेळ ठरवणे हा आहे.

संवाद

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, हि काही कथा नाही किंवा कुठल्या कथेचा भागही नाही.हा आहे संवाद... दोघांमधला...दोन मित्रांमधला, प्रियकर- प्रेयसी मधला... दोन माणसांमधला....! हे संवाद मी जसे सुचले तसे लिहिले आहेत. यातुन काही सांगायचे वगैरे नाही. त्या त्या क्षणी जे विचार मनात याय्चे ते कागदावर उतरवायचो. ते बरोबर असतीलही किंवा नसतीलही. या संवादातल्या पात्रांना नाव नाहीत, किंबहुना त्याची गरज भासत नाही इतके लहान संवाद आहेत हे. हे संवाद कुठलीही पार्श्वभुमी न देता अचानक सुरु होतात. एखादं गाणं जसं अंत-यापासुन सुरु व्हावं तसं. जसे सुरु होतात तसेच संपतातही हा प्रकार जरा वेगळा असल्यामुळे मि.पा.

फादरस डे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले "मूड" संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. फादरस डे वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो "माफ करा"असे म्हणून मी त्याच्या पासून सटकलो "करा माफ"मला पण म्हणत थांबला तो क्षणभर औचित्याच्या वागण्याने सुखावलो आम्ही दोघे वरवर आपल्या घरी स्थिती असते निराळी लाहान थोरासी चटकन आपण वागतो फटकून झाली त्यादिवशी गम्मत होतो कामात मी दंग चिमुकल्या माझ्या मुलाने के

ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/06/2008 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मडळी, आज रौशनी -५ हा भाग शैलेन्द्र यांनी प्रतिसाद देऊन वर आणला आणि मी पुन्हा एकदा रौशनीच्या आठवणीत गुंतलो. दिवस थोडासा अपसेटच गेला. मंडळी, रौशनीचं लेखन बरंच म्हणजे बरंच लांबलं आहे हे अगदी कबूल! तसं माझं लेखन सुरू आहे, पूर्णही होत आलं आहे आणि मी ते वेळोवेळी सेव्हही करून ठेवलं आहे. आता लेखन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ते प्रसिद्ध करीन म्हणजे वाचकांची गैरसोय होणार नाही. असो.. मंडळी, रौशनी हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव. ही बया खूपच वेगळी होती.