Skip to main content

कालाय तस्मै नम:

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ म्हणाली दुपारला ही संध्याकाळ, रोज कुजबुजत असते काळोखाशी ऐकून हे, दुपार सांगे तिला (सकाळला) घेऊन तूं पण जाशी की पहाटेला रोज फिरायला अन, देई निरोप तुला ती (पहाट) लगेच,पाहुनी सूर्याला ऐकूनी त्यांचा संवाद दिवस म्हणे रात्रीला दोष असे हा सूर्याचा करी तो उदय अन अस्थ दिवसाचा ऐकून हे, रात्र सांगे दिवसाला दोश नको देऊं तूं सूर्याला दोष असे हा पृथ्वीचा गर,गर फिरुनी सूर्याभोवती जन्म दिला तिने ह्या सर्वांना पाणावल्या डोळ्याने म्हणे पृथ्वी सूर्याला भलेपणाचे "दिवस"संपले जन्म देऊनी ह्या सर्वांना अन मिळे दोष आपल्या दोघांना स्तिथप्रद्न्य तो सूर्यनारायण समजावी त्या माउलीला आठवशी त्या सुभाषीताला कालाय तस्मै नम: श्रीकृष्ण सामंत (स्यान होझे कॅलिफोरनीया)
लेखनविषय:

वाचने 4423
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आवडली कविता !!!

लय भारी!!! वेगळी कल्पना !!

कल्पना आवडली पण थोडे शब्द नीट हवेत.उदा.स्थितप्रज्ञ.धन्यवाद

कल्पना आवडली पण थोडे शब्द नीट हवेत.उदा.स्थितप्रज्ञ.धन्यवाद

In reply to by वैशाली हसमनीस

एडिट कसं करायचं ते सांगाल का?मला मराठीत इथला एडिटला पर्यायी शब्द माहित नाही म्हणून विचारतो. आपण चूक दाखविलीत त्याबद्दल आभार. सामंत

सामंत साहेब, मिसळपाववर मनपासून स्वागत. छान लिहिलं आहे. आपल्याला जो भाग संपादित (एडिट) करायचा आहे तो किंवा संपूर्ण कविता आपल्या मनासारखी पुन्हा एकदा संपादित करून मला पोष्टकार्डाने पाठवा म्हणजे आपण जशी पाठवाल तशीच्या तशी मी पुनर्प्रकाशित करेन... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आपल्या प्रशंसने बद्दल आभार. आपल्या मदतीती साठी पण मनापासू आभार. मला संपादन हा शब्द माझ्या शोधण्यात मिळाला नाही. माझ्या मुळचा लेख आणून त्याचं संपादन कसं करायचं ही माहिती मला पुढच्या दृष्टीने फायद्याची होईल तेव्हा ते कसं करायचं ते मार्गदर्शन झाल्यास आभारी होईन. मी ह्या साईटवर नविन असल्याने थोडा उताविळ आहे एव्हडेच सामंत

आणि (कंसांचा) कल्पक वापर. पहिले कडवे त्यामुळे जास्त आवडले.

प्रशंसे बद्दल आपल्या सर्वांचे आभार. आपल्या सर्वांच्या प्रशंसेमुळे माझ्या प्रेरणेला उत येतो.आणि माझी जबाबदारी पण वाढते. परंतु आपल्याला आनंदी करायला मी नक्कीच प्रयत्न करीन. सामंत

वाह काय कल्पना आहे ,मस्तच.....