Skip to main content

राष्ट्रवाद- एक उन्माद !

लेखक मारवा यांनी बुधवार, 07/05/2014 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रवाद Nationalism ही माणसांच्या मनात एक पराकोटीचा उन्माद निर्माण करणारी संकल्पना मात्र आहे. निरनीराळ्या राष्ट्रांची निर्मीती , भौगोलिक विभाजन हे संपुर्णपणे मानवनिर्मीत आहे. ते काही कुठल्या दैवी वा नैसर्गिक शक्तीने बनविलेले नाही. हे भौगोलिक भुभाग यांची वाटणी ही पुर्णपणे निरनिराळ्या मानवसमुहांच्या स्वार्थ-अहंकाराच्या-सत्ताकांक्षेच्या नकारात्मक हिंसक अशा संघर्षाचा परीपाक आहे. राष्ट्रांच्या सीमा या मानवनिर्मीत आणि कालपरत्वे सातत्याने बदलणारया आहेत. या भौगोलिक सीमा माणसांनी च बनविलेल्या आहेत. काही वर्षांपुर्वी पाकीस्तान हा भारत या राष्ट्राचा भाग होता आज नाही व संपुर्ण पाकीस्तान चा हा भुभाग एक स्वतंत्र राष्ट्र बनविण्यात आलेला आहे. क्रीमीया आता यापुढील काळात रशिया या राष्ट्राचा भाग झालेला आहे. इस्त्रायल या राष्ट्राची संपुर्ण निर्मीती ही तर अगदी अलीकडच्या काळाचीच आहे. व कोण जाणे पॅलेस्टाइन हे आज अस्तित्वात असलेले राष्ट्र उद्या असेल कींवा नसेल. रशिया या एका मोठ्या राष्ट्राचे अनेक तुकडे होउन डझनभर स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली ही देखील अलीकडच्या काळातीलच घटना आहे. So Nationalism is an absolutely man-made-phenomena and nothing sacred about it ! आणि आता ही राष्ट्र व्यवस्था अवघ्या मानवजातीच्याच मुळावरच उठली असेल तर तीला नष्ट करणे हे आपले एक मानव म्हणुन आद्य कर्तव्य च आहे. राष्ट्रवादाच्या मुळाशी असलेल्या प्रेरणाच अतिशय नकारात्मक आहेत. प्रामुख्याने धर्मश्रेष्ठत्व वा वंश-वर्ण श्रेष्ठत्व वा संस्कृतीश्रेष्ठत्व या मुलत: अहंकाराधिष्ठीत सत्ताकांक्षी महत्वाकांक्षी नकारात्मक प्रेरणांतुनच निरनिराळ्या राष्ट्रांची निर्मीती होत असते. Xenophobia म्हणजे आपल्याहुन परक्या वा अनोळखी व्यक्तींविषयी वाटणारी भीती आणि द्वेष ही ही एक आणखी नकारात्मक प्रेरणा राष्ट्र निर्मीतीस उत्तेजन देते. माणुस मग आपल्या सारख्या वर्ण संस्कृती असलेल्यां बरोबर राहण पसंत करतो. एकदा राष्ट्र निर्मीती झाल्यानंतर मग इतर अनेक आनुषंगिक एव्हील्स ची निर्मीती होणे ओघानेच आले. उदा. आपल्या राष्ट्राचा विस्तार करणे , त्यासाठी युद्ध/ शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु करणे या अखेरीस संपुर्ण मानवजातीच्या च विनाशास कारणीभुत होणारया गोष्टींची सुरुवात होते. विवीध राष्ट्रे जो सैन्य निर्मीती व सांभाळ तसेच शस्त्र निर्मीती यासाठी जी अब्जावधी रुपयांची व त्याहुन मोलाच्या अशा ह्युमन अवर्स ची एनर्जी ची गुंतवणुक करतात ती थांबवली तर ही अनमोल अतिप्रचंड गुंतवणुक माणसाचे जीवन सुंदर समृद्ध बनविणारया अनेक महत्वाच्या मुलभुत गोष्टींमध्ये करता येइल. शिक्षण/ आरोग्य/ विकास अशा अनेक क्षेत्रांकडे हे मानवी बळ सकारात्मकरीत्या वळविता येउ शकते. चायना/अमेरीका यांच डीफ़ेन्स बजेट आणि भारत पाकीस्तान सारख्या ज्यांना विकासाची अत्यंत आवश्यकता आहे ते आपल्या एकुण बजेटच्या कीती टक्की रक्कम डीफ़ेन्स वर खर्च करतात हे आकडे बघितले तरी वास्तुस्थीतीची कल्पना येउ शकते. राष्ट्रवाद मग राष्ट्रभक्ती नावाच्या अत्यंत उन्माद आणणारया वेडाला जन्म देतो. प्रत्येक नागरीका कडुन मग त्याने राष्ट्रासाठी प्रसंगी जीवनाचा ही त्याग करण्याची अपेक्षा केली जाते. सैन्याचा जन्म होतो. माणस मारणारी सैनिक घडवली जातात. त्यांच्या मरण्या मारण्याचे सोहळे घडविले जातात. ग्रेलिंग अत्यंत समर्पक शब्दात हा वेडेपणा मांडतो तो म्हणतो “Disguised as patriotism and love of one's country, it trades on the unreason of mass psychology to make a variety of horrors seem acceptable, even honorable. For example: if someone said to you, "I am going to send your son to kill the boy next door" you would hotly protest. But only let him seduce you with "Queen and Country!" "The Fatherland!" "My country right or wrong!" and you would find yourself permitting him to send all our sons to kill not just the sons of other people, but other people indiscriminately – which is what bombs and bullets do.” सैनिकाला स्व-विवेक वापरण्यापासुन कायम परावृत्त केले जाते सैनिंकांकडुन एकच अपेक्षा असते आदेशाचे पालन! सैनिक एरवी मुंगी मारणार नाही पण राष्ट्रभक्तीची अफ़ु खाल्यावर तो अनेक अनोळखी माणसांना कुठल्याही अपराधगंड न बाळगता आपण राष्ट्रासाठी अत्यंत सात्वीक कार्य करत आहोत अशा भावनेतुन मारु शकतो. बर्टान्ड्र रसेल यांचा हा अप्रतिम लेख जरुर वाचावा http://fair-use.org/international-journal-of-ethics/1915/01/the-ethics-… सैनिकाची अविचल मनोवृत्ती घडविण्याचे काम युगानुयुगे सुरु आहे एखाद्या अर्जुनाचा विवेक जागा झालाच चुकुन तर दिशाभुल करण्यासाठी अठरा अठरा अध्यायांपर्यंत मावेल इतक ब्रेनवॉशींग प्रत्यक्ष ईश्वरमुखाने केले जाते.( तु प्यार का सागर है !) व्हरायटी ऑफ़ हॉरर्स सीम्स अक्सेप्टेबल मग यात मांडी फ़ोडुन रक्त प्राशन करणे , उभा चिरुन काढणे, झोपलेल्यांना मारणे सर्व काही अक्सेप्टेबल होते. विवीध संस्कृती अस्तीत्वात असणे ही साहजीक नैसर्गिक बाब आहे. व एकसमान संस्कृतीच्या लोकांना एकमेकासोबत रहावेसे वाटणे हे तर अत्यंत नैसर्गिकच आहे परंतु राष्ट्र या संकल्पनेत आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या संस्कृती जोपासणारयांना एक शत्रु म्हणुन बघणे त्यावर वर्चस्व असणे आवश्यक आहे असे मानणे आपलीच संस्कृती व पर्यायाने मग राष्ट्र हेही श्रेष्ठ व म्हणुन पर्यायाने ठराविक भुभागावर व नैसर्गिक संसाधनांवर केवळ आमचाच हक्क असावा या सर्व वेड्या अट्टाहासी मागण्या या राष्ट्रवादातुन च निर्माण होतात ( वसुधैव कुटुंबकम ) त्यासाठी मग साम दाम दंड भेद आदि सर्व नीतींचा अवलंब राष्ट्रवादाच्या व विस्तारवादाच्या संदर्भात केला जातो. हा अतिशय चुकीचा आहे. परत ग्रेलींग च्या च शब्दात Nationalists take certain unexceptionable desires and muddle them with unacceptable ones. We individually wish to run our own affairs; that is unexceptionable. Most of us value the culture which shaped our development and gave us our sense of personal and group identity; that too is unexceptionable. But the nationalist persuades us that the existence of other groups and cultures somehow puts these things at risk, and that the only way to protect them is to see ourselves as members of a distinct collective, defined by ethnicity, geography, or sameness of language or religion, and to build a wall around ourselves to keep out "foreigners". It is not enough that the others are other; we have to see them as a threat at very least to "our way of life", perhaps to our jobs, even to our daughters. राष्ट्रवादाने आजपर्यंत अनेक माणसांचा बळी घेतलेला आहे. अनेक मौल्यवान मानवी क्षमता युद्धाच्या नावाखाली वाया घालविलेल्या आहेत. राष्ट्रवाद माणसाला मी एक माणुस आहे या पुरेशा न्याय्य योग्य अशा ओळखीवर थांबु देत नाही. तो त्याला कुठल्यातरी राष्ट्राचा नागरीक बनवुन इतर राष्ट्रांतील माणसांशी तोडतो वेगळा पाडतो आयसोलेट करतो. मग अशी परस्परांपासुन वेगळी पाडलेली माणसं एकमेकांच्या विरोधात उभी राहुन परस्पर संघर्षातच आपली बहुमुल्य मानवी क्षमता वाया घालवितात. राष्ट्रवादाने काही राष्ट्रे इतर राष्ट्रावंर अनेक प्रकारे वर्चस्व गाजवितांना दिसतात श्रीमंत राष्ट्रे गरीब राष्ट्रांची अनेक प्रकारे पिळवणुक करतांना दिसतात. काही महान तत्वज्ञ राष्ट्र्वादा संदर्भात काय म्हणतात हे बघण अतिशय इंटरेस्टींग आहे खालील प्रत्येक कोट वैशिष्ट्यपुर्ण अशी टीप्पणी राष्ट्रवादा संदर्भात करते. १ The feeling of patriotism - It is an immoral feeling because, instead of confessing himself a son of God . . . or even a free man guided by his own reason, each man under the influence of patriotism confesses himself the son of his fatherland and the slave of his government, and commits actions contrary to his reason and conscience.” Leo Tolstoy, Patriotism and Government २ “One of the great attractions of patriotism—it fulfills our worst wishes. In the person of our nation we are able, vicariously, to bully and cheat. Bully and cheat, what’s more, with a feeling that we are profoundly virtuous.” Aldous Huxley ३ “To abolish war it is necessary to abolish patriotism, and to abolish patriotism it is necessary first to understand that it is an evil. Tell people that patriotism is bad and most will reply, ‘Yes, bad patriotism is bad, but mine is good patriotism.’” Leo Tolstoy ४ “Patriots always talk of dying for their country and never of killing for their country.” Bertrand Russell ५ I do not believe in nations. I believe that humanity is suffering because of nations. Nations should be destroyed. Too many national anthems have been sung, too many flags have been flown, too many idiocies have happened on this earth. Accept the unity of mankind now. Now, one world and and one mankind... These national governments must go. And until they go man's problems cannot be solved, because man's problems are bigger than nations. Osho To love anything beautiful in a country is normal and natural, but when that love is used by exploiters in their own interest it is called nationalism. Nationalism is fanned into imperialism, and then the stronger people divide and exploit the weaker, with the Bible in one hand and a bayonet in the other. The world is dominated by the spirit of cunning, ruthless exploitation, from which war must ensue. This spirit of nationalism is the greatest stupidity. Every individual should be free to live fully, completely. As long as one tries to liberate one's own particular country and not man, there must be racial hatreds, the divisions of people and classes. The problems of man must be solved as a whole, not as confined to countries or peoples. जे.कृष्णमुर्ती राष्ट्रवादातुन निर्माण होणारया युद्धाच्या निरर्थकतेवर हिप्पी चळवळीने ही फ़ार जोरदार आक्षेप घेतला होता. हिप्पी हे राष्ट्र्वाद आणि युद्धाच्या विरोधात होते. अमेरीका आक्रमक राष्ट्रवादाचे उत्तम प्रतीक च आहे. तर १९६५ नंतर अमेरीकेचे व्हीएतनाम विरोधात सुरु केलेले युद्ध अधिकाअधिक उग्र होत गेले यामध्ये व्हीएतनामींनी गनिमी काव्याने लढुन अमेरीकी सैनिकांना चांगलेच जेरीस आणले होते.मग यात अमेरीकेला अधिकाधिक सैनिकांची गरज भासु लागली व त्यासाठी आक्रमक भरती मोहीम राबवली जाउ लागली. अमेरीकेने व्हीएतनामवर नापाम व एजंट ऑरेंज सारख्या महाभयानक रासायनिक अस्त्रांचा मारा केला ज्याचा अप्रत्यक्ष आर्थिक फ़ायदा डाउ केमीकल्स सारख्या केमीकल कंपन्यांना होत होता. या व अनेक कारणांसाठी अमेरीकन तरुण वर्गाचा युद्धविरोध प्रचंड वाढला अमेरीकन तरुणांनी युद्धासाठीच्या ड्राफ़्ट कार्ड्स ची जाहीर होळी करण्याचा कार्यक्रम सुरु केला. या तरुणांना अनोळखी व्हीएतनामींशी ज्यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता लढण्यात काहीही रस नव्हता. याच्याच विरोधात खालील एक सुंदर उपहासात्मक गीत जे सॅन फ़्रॆन्सीस्को च्या संगीतकार कंट्री ज्यो मॅक्डोनाल्ड ने लिहिले आहे ते फ़ार च सुंदर आहे ते अमरीकन स्वार्थी व निरर्थक राष्ट्रवाद व युद्धाची खील्ली उडविते. Yeah, come on all of you, big strong men, Uncle Sam needs your help again. He's got himself in a terrible jam Way down yonder in Vietnam So put down your books and pick up a gun, We're gonna have a whole lotta fun And it's one, two, three, What are we fighting for ? Don't ask me, I don't give a damn, Next stop is Vietnam; And it's five, six, seven, Open up the pearly gates, Well there ain't no time to wonder why, Whoopee! we're all gonna die. Well, come on Wall Street, don't move slow, Why man, this is war au-go-go. There's plenty good money to be made By supplying the Army with the tools of the trade, Just hope and pray that if they drop the bomb, They drop it on the Viet Cong. Well, come on generals, let's move fast; Your big chance has come at last. Gotta go out and get those reds — The only good commie is the one who's dead And you know that peace can only be won When we've blown 'em all to kingdom come. Well, come on mothers throughout the land, Pack your boys off to Vietnam. Come on fathers, don't hesitate, Send 'em off before it's too late. Be the first one on your block To have your boy come home in a box. अखेरीस मानवजात राष्ट्रांशिवाय सुखात शांतीत अस्तित्वात राहुच शकत नाही असे मानणारया व राष्ट्रांच्या भिंती नसलेले जग हा एक युटोपिया मानणारयांसाठी मी जॉन लेनन यांच हे गाण देउन समारोप करतो. "Imagine" Imagine there's no heaven It's easy if you try No hell below us Above us only sky Imagine all the people Living for today... Imagine there's no countries It isn't hard to do Nothing to kill or die for And no religion too Imagine all the people Living life in peace... You may say I'm a dreamer But I'm not the only one I hope someday you'll join us And the world will be as one Imagine no possessions I wonder if you can No need for greed or hunger A brotherhood of man Imagine all the people Sharing all the world... You may say I'm a dreamer But I'm not the only one I hope someday you'll join us And the world will live as one.

वाचने 43176
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by arunjoshi123

अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. अशी एक प्राचीन चायनीज म्हण आहे. व स्टीफ़न कोव्हे हे विख्यात लेखक त्यांच्या टाइम मॅनेजमेंट च्या सिद्धांताला एक नाव देतात. फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट. तर मला अस म्हणावयाचे आहे की एक एक मुद्दा क्रमा क्रमा ने शिस्तीत लयीत घेत पुढे सरकलो तरच आपल्या चर्चेला काही अर्थ आकार येउ शकतो व ती काही निर्णायक बिंदु वर पोहोचु शकते. हाच कुठल्याही चांगल्या चर्चेचा हेतु असतो असे मला वाटते. कीमान आपण त्या दिशेने प्रयास तरी करायलाच हवा. मी आपला जुना वाचक आणि चाहता आहे .आपल्या व्यासंगाच्या ,मेहनतीच्या, तळमळीच्या विषयी मी नितांत आदर बाळगुन ही माझे एक मत निर्भीड व प्रांजळपणे मांडतो की आपला प्रतिसाद १-अत्यंत विस्कळीत आहे. २-अनेक परस्पर विरोधी विधानांनी युक्त असा आहे. ३-ज्याचा परीणाम मुळ विषय भरकटवण्यात व कन्फ़्युजन निर्माण करण्यात होतो. माझ्या वरील विधानांच्या स्पष्टीकरणासाठी आपल्या प्रतिसादातील एक उदाहरण घेउ आपल्या प्रतिसादाची सुरुवातच आपण या विधानाने करतात विधान क्र.१ श्री मारवाजी, १. अगदी आदर्श पद्धतीत राबवला गेला तरी राष्ट्रवाद हा अनैसर्गिक, अनावश्यक आहे, २. सद्य परिस्थितीत तो मानवजातीसाठी उपद्रवकारक, घातक , इ प्रकारे उभरला गेला आहे, हे मी मान्य करून चालतो. हे अमान्य करता येतच नाही, म्हणून. अरुण जी नंतर अनेक वळणे घेत आपले खालील दुसरे विधान येते. विधान क्र.२ शेवटी, किती मोकळं व्हावं नि किती आखडतं घ्यावं या मानवांना पडलेल्या प्रश्नाला "राष्ट्र" हे एक उत्तम उत्तर आहे. या संकल्पनेतच खोट आहे असे म्हणण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत तिला अजून कसे रिफाइन करायचे ते पाहू. अरुण जी या विरोधाभासाची कृपया अगोदर विल्हेवाट लावु या म्हणजे तुमची राष्ट्रवादा वरची भुमिका नेमकी काय आहे ते मला स्पष्ट कळेल. तसेच आणखी काही गुढ अनाकलनीय विधाने तुमच्या प्रतिसादात आहेत उदा. हे विधान घेउ या विधान क्र,३ मग आपल्या लेखातील वा प्रतिसादांतील कोणतेही विधान खोडता आले नाही तरी म्हणून इच्छितो कि भारतवाद, भारतीयत्व, भारताभिमान, इ इ संकल्पना खर्याा आहेत नि एका रेंजबाउंड अर्थाने नैसर्गिक, मानवी, आवश्यक, इ इ आहेत. अरुण जी या संकल्पना खरया कशा ? नैसर्गिक कशा ? रेंजबाउंड अर्थाने म्हणजे नेमक काय व आवश्यक कशा ? हे मला तरी अतिशय गुढ असे विधान वाटते अध्यात्मिक निर्वाण वा माया अशा संकल्पनांसारखे कृपया अगोदर हे क्लिअर करावे वरील गोष्टी क्लिअर करण ही मला वाटत आपल्या दोघांसाठी टु पुट फ़र्स्ट थिंग्ज फ़र्स्ट असेल, आणि आपल्या थाउजंड माइल्स जर्नी मधील पहीली च स्टेप आहे. अगोदर ही स्टेप ओलांडु या. मग कीतीही वेळ का लागेना. एकंदरीत प्रतिसादातुन व मुळ लेखातुन आपल्या हे लक्षात आलेलेच असेल की मुळात राष्ट्रवाद हा एक उन्माद आहे या पहील्या स्टेप लाच कीती रेसीस्टन्स आहे. अजुन पुढे सरकायला बराच अवकाश आहे. आपण राष्ट्रवाद हा मुळात काय कसा आहे छान छान आहे की वाइट आहे आवश्य्क की अनावश्यक आहे या निश्चीतीच्या पहील्या केवळ पहील्या पायरी वरच घट्ट पाय रोवुन चर्चा करत आहोत. या पहील्याच पायरीला योग्य न्याय दिल्याशीवाय पुढे जाणं सरकणं हे करु शकतो मात्र ते कीती निरर्थक व निरुपयोगी आहे. हे उघड आहे. अगदी गावठी उदाहरण म्हणजे एखादा अट्टल मद्यपी माझ्या ड्रींक चा काहीच प्रॉब्लेम नाहीये तुम्ही उगाचच बाउ करताय इतक्याशा ने काही होतच नसतं इतक्या प्राथमिक डीनायल( ल्कोहोलिक्स अनोनिमस फ़ेम) स्टेज मध्ये आहे. त्याला या पुढील स्टेजेस विषयी बोलण्यात काही अर्थ आहे का अनलेस तो हे मान्य करतो की येस अल्कोहोल इज एव्हील आणि मी त्याच्या गर्तेत अडकलोय. काही प्रश्न ही कुटील असतात जसे ब्रिटीश भारतीयांना स्वातंत्र्या च्या मागणीच्या प्रत्युत्तरात विचारत की तुम्ही अगोदर हे सांगा की आम्ही गेल्यावर तुम्ही हा देश चालवणार कसा ? मग तुमच्या स्वातंत्र्याच काय ते बघु. इथे सर्वात कुटील भाग असा होता की प्रश्न त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता त्यामागे तेव्हाची स्वातंत्र्याची जी अत्यंत न्याय्य अशी मागणी होती ते देण्याच्या जबाबदारी पासुन हात झटकण्याचा होता. मुळ मागणी कडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष=अवहेलना=टाळण=भरकटवणं असा होता. तुम्ही असे कुटील आहात असे मी म्हणत नाहीये कृपया गैरसमज नसावा. ते प्रश्न पुढील पायरीचे आहेत. इथे अजुन पहीली वरच मारामारी खुप आहे. आणि याचा अर्थ असाही नाही की ते प्रश्न अनावश्यक वा चुकीचे आहेत मात्र अस्थानी व चुकीच्या क्रमाने अगोदर उपस्थित केलेले आहेत. त्याची उत्तरे ही निश्चीतच देण व त्यावर विचार मंथन होण ही मात्र निश्चीतच पुढील पायरी आहे. पण कृपया हे बघा की मुळ विचार अगोदर क्लिअर होण मान्य होण हेच कीती कठीण व तितकच अत्यावश्यक आहे. अरुण जी आपण संवेदनशीलतेने माझ्या भावना व्यक्तीगत न घेता समजुन घ्याल या खात्रीसहीत आपला मारवा

मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे. आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे. 'राष्ट्र' त्यातूनच निर्माण होतं. 'वाद' निर्माण होतो, तो "काही" लोकांच्या सत्तापिपासू वृत्तीतून होतो. आणि कुठलाही सत्तापिपासू माणूस ती लालसा पूर्ण करण्यासाठी इतरांच्या कुठल्याही भावनेला हात घालू शकतोच. कधी राष्ट्र, कधी धर्म, कधी वर्ण, कधी रक्त, कधी विचार ....

In reply to by कवितानागेश

आपल्या जन्मभूमीबद्दल प्रेम वाटणं ही अतिशय नैसर्गिक भावना आहे
जन्मभूमी कुठपर्यंत.. गाव, शहर, जिल्हा,जिथे आपण वावरलो त्या भागाबाबत नैसर्गिक आहे.. पण जिथे कधी आयुष्यात पाउल टाकलं नाही, किंवा भविष्यात टाकायची शक्यता नाही.. त्याभूमीबाबत जन्मभूमी म्हणून प्रेम इतकं आत्यंतिक कसं होउ शकतं..

In reply to by कवितानागेश

बाळ सप्रेंच्या पुस्तकातील प्रतिज्ञा अशी होती: पुणे(जिल्हा)माझा देश आहे. सारे पुणेकर माझे बांधव आहेत. माझ्या पुण्यावर माझे प्रेम आहे. पुणे देशातील सर्व नागरिकांवर माझे प्रेम आहे. माझ्या पुण्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पेठांचा(!) मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता(?)माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझे पुणे आणि माझे पुणेकर देश बांधव यांच्याशीच निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे. मनोरंजन,पर्यटन,देवदर्शन,व्यवसाय,नोकरीसाठी मी माझ्या पुणे देशातच राहीन व येथे नोकरी न मिळाल्यास इतर देशांकडे ढुंकूनही पाहणार नाही. मी पुणे सोडून कधीही बाहेरच्या मुंबई,सातारा,सांगली,कोल्हापूर,गोवा या इतर देशात पायही ठेवणार नाही. आणि माझ्या पुढच्या पिढीलाही पाय ठेवू देणार नाही! जय पुणे! जय जय पुणे!!

In reply to by आयुर्हित

प्रतिज्ञेसंदर्भात एकच प्रश्न पडला आहे: मी माझ्या पुण्यातील पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. यातील सौजन्याने म्हणजे नक्की काय आणि कसे? ;)

In reply to by विकास

सकाळी ९ ते १ आणि ४ ते ९ ह्या वेळेत दृष्टी आणि चेहरा क्षितीजाशी समांतर ठेवणं (इतर वेळी २२अंश आकाशाकडं), बोलताना पूर्ण वाक्यात बोलणं, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणं ऐकून घेणं, जमल्यास क्वचित प्रसंगी ओठांना दोन्ही बाजूंनी वरच्या दिशेनं ७.२५ अंशात वळवणं ह्या सगळ्यास सौजन्य म्हणत असावेत.

In reply to by कवितानागेश

मुळात 'राष्ट्रवाद ही एक मानवनिर्मीत संकल्पना आहे' हीच संकल्पना चुकीची आहे.
इतिहास पाहिला तर वरील वाक्य किती चुकीचे आहे ते वेगळे सांगायला नको. चालूद्या.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन जी आपण जे म्हणताय त्याचा किंचीत विस्तार करुन इतिहासातील एखादे उदाहरण देउन मांडल्यास आपणास नेमके काय म्हणायचे आहे याचे आकलन सुलभ होइल.

राज्य धर्म देव या संकल्पना या देशात लबाड लोकांनी भोळ्या लोकांना फसवण्यासाठीच वापरलेल्या आहेत. अगदी रामायण महाभारत काळातही सत्यवतीने भीष्माला ब्रह्मचारी ठेवणं , कैकेयीने कुणाला तरी वनवास घडवणं , धृवाच्या सावत्र आईने त्याला जंगलात ( की डयरेक्ट स्वर्गात पाठवून देवानं वर पाठवला अशी हूल उठवणं ) , हस्तिनापूरसाठी झालेला संग्राम ... अशा घटनांमधून हेच दिसतं की राष्ट्र चालवून त्यात्ण नफा मिळवणे, आणि ऐषो आरामात जगणे, हाच राजघराण्यांचा धंदा होता. अगदी मोघल , मोघलांना आधी दहा पिढ्या सलाम करणारे आणि नंतर स्वतःची टीचभर राज्ये स्थापन करणारे ... या सगळ्यातून राज्य करणे आणि गोळा होणारा ट्याक्स स्वतःच्या खजिन्यात भरणे इतकेच साध्य केले गेले आहे. जनता मात्र राष्ट्र प्रेम, धर्म प्रेम इ इ च्या नावानं झुंजत राहिली, पण राजाला जाब विचारायचे स्वातंत्र्य जनतेला नव्हते.

वर श्री. मारवा यांनी म्हणले आहे की: अ थाउजंड माइल्स जर्नी बिगीन्स वुइथ वन स्टेप. तर मग आता पहीले पाऊल काय असावे, ते आपण (म्हणजे मारवा) कसे आचरणात आणत आहोत आणि इतरांनी देखील त्याचे कसे अनुकरण करावे, हे पण त्यांनी सांगितले तर या विषयाला अजून सक्रीय चालना मिळेल.

बंटवारे के दो-तीन साल बाद पाकिस्तान और हिंदुस्तान की हुकूमतों को ख़याल आया कि सामान्य क़ैदियों की तरह पागलों का भी तबादला होना चाहिए, यानी जो मुसलमान पागल हिंदुस्तान के पागलख़ानों में हैं, उन्हें पाकिस्तान पहुँचा दिया जाए और जो हिंदू और सिख पाकिस्तान के पागलख़ानो में हैं, उन्हें हिंदुस्तान के हवाले कर दिया जाए। मालूम नहीं, यह बात माक़ूल थी या गै़र माकूल़, बहरहाल दानिशमंदों के फ़ैसले के मुताबिक़ इधर-उधर ऊँची सतह की कान्फ़ेंस हुई और बिल आख़िर पागलों के तबादले के लिए एक दिन मुक़र्रर हो गया। अच्छी तरह छानबीन की गई - वे मुसलमान पागल जिनके संबंधी हिंदुस्तान ही में थे, वहीं रहने दिए गए, बाक़ी जो बचे, उनको सरहद पर रवाना कर दिया गया। पाकिस्तान से चूँकि क़रीब-क़रीब तमाम हिंदू-सिख जा चुके थे, इसलिए किसी को रखने-रखाने का सवाल ही पैदा नहीं हुआ, जितने हिंदू-सिख पागल थे, सबके-सब पुलिस की हिफ़ाज़त में बॉर्डर पर पहुँचा दिए गए। उधर का मालूम नहीं लेकिन इधर लाहौर के पागलख़ाने में जब इस तबादले की ख़बर पहुँची तो बड़ी दिलचस्प गपशप होने लगी। एक मुसलमान पागल जो बारह बरस से, हर रोज़, बाक़ायदगी के साथ 'ज़मींदार' पढ़ता था, उससे जब उसके एक दोस्त ने पूछा, "मौलवी साब, यह पाकिस्तान क्या होता है?" तो उसने बड़े गौरो-फ़िक्र के बाद जवाब दिया, "हिंदुस्तान में एक ऐसी जगह है जहाँ उस्तरे बनते हैं!" यह जवाब सुनकर उसका दोस्त संतुष्ट हो गया। इसी तरह एक सिख पागल ने एक दूसरे सिख पागल से पूछा, "सरदार जी, हमें हिंदुस्तान क्यों भेजा जा रहा है, हमें तो वहाँ की बोली नहीं आती।" दूसरा मुस्कराया, "मुझे तो हिंदुस्तोड़ों की बोली आती है, हिंदुस्तानी बड़े शैतानी आकड़ आकड़ फिरते हैं।" एक दिन, नहाते-नहाते, एक मुसलमान पागल ने 'पाकिस्तान ज़िंदाबाद' का नारा इस ज़ोर से बुलंद किया कि फ़र्श पर फिसलकर गिरा और बेहोश हो गया। बाज़ पागल ऐसे भी थे जो पागल नहीं थे, उनमें बहुतायत ऐसे क़ातिलों की थी जिनके रिश्तेदारों ने अफ़सरों को कुछ दे दिलाकर पागलख़ाने भिजवा दिया था कि वह फाँसी के फंदे से बच जाएँ, यह पागल कुछ-कुछ समझते थे कि हिंदुस्तान क्यों तक़्सीम हुआ है और यह पाकिस्तान क्या है, लेकिन सही वाक़िआत से वह भी बेख़बर थे, अख़बारों से उन्हें कुछ पता नहीं चलता था और पहरेदार सिपाही अनपढ़ और जाहिल थे, जिनकी गुफ़्तगू से भी वह कोई नतीजा बरामद नहीं कर सकते थे। उनको सिर्फ़ इतना मालूम था कि एक आदमी मुहम्मद अली जिन्नाह है जिसको क़ायदे-आज़म कहते हैं, उसने मुसलमानी के लिए एक अलहदा मुल्क बनाया है जिसका नाम पाकिस्तान है, यह कहाँ हैं, इसकी भौगोलिक स्थिति क्या है, इसके मुताल्लिक़ वह कुछ नहीं जानते थे - यही वजह है कि वह सब पागल जिनका दिमाग पूरी तरह बिगड़ा हुआ नहीं हुआ था, इस मखमसे में गिरफ़्तार थे कि वह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, अगर हिंदुस्तान में हैं तो पाकिस्तान कहाँ हैं, अगर वह पाकिस्तान में हैं तो यह कैसे हो सकता है कि वह कुछ अर्से पहले यहीं रहते हुए हिंदुस्तान में थे। एक पागल तो हिंदुस्तान और पाकिस्तान, पाकिस्तान, पाकिस्तान और हिंदुस्तान के चक्कर में कुछ ऐसा गिरफ़्तार हुआ कि और ज़्यादा पागल हो गया। झाडू देते-देते वह एक दिन दरख्त़ पर चढ़ गया और टहने पर बैठकर दो घंटे मुसलसल तक़रीर करता रहा, जो पाकिस्तान और हिंदुस्तान के नाज़ुक मसले पर थी, सिपाहियों ने जब उसे नीचे उतरने को कहा तो वह और ऊपर चढ़ गया। जब उसे डराया-धमकाया गया तो उसने कहा, "मैं हिंदुस्तान में रहना चाहता हूँ न पाकिस्तान में, मैं इस दरख़्त पर रहूँगा।" बड़ी देर के बाद जब उसका दौरा सर्द पड़ा तो वह नीचे उतरा और अपने हिंदू-सिख दोस्तों से गले मिल-मिलकर रोने लगा - इस ख़याल से उसका दिल भर आया था कि वह उसे छोड़कर हिंदुस्तान चले जाएँगे। एक एम.एस-सी. पास रेडियो इंजीनियर में जो मुसलमान था और दूसरे पागलों से बिलकुल अलग-थलग बाग की एक खास पगडंडी पर सारा दिन ख़ामोश टहलता रहता था, यह तब्दीली ज़ाहिर हुई कि उसने अपने तमाम कपड़े उतारकर दफादार के हवाले कर दिए और नंग-धड़ंग सारे बाग में चलना-फिरना शुरू कर दिया। चियौट के एक मोटे मुसलमान ने, जो मुस्लिम लीग का सरगर्म कारकुन रह चुका था और दिन में पंद्रह-सोलह मर्तबा नहाया करता था, एकदम यह आदत तर्क कर दी - उसका नाम मुहम्मद अली था, चुनांचे उसने एक दिन अपने जंगले में एलान कर दिया कि वह क़ायदे-आज़म मुहम्मद अली जिन्नाह है, उसकी देखा-देखी एक सिख पागल मास्टर तारा सिंह बन गया - इससे पहले कि खून-ख़राबा हो जाए, दोनों को ख़तरनाक पागल क़रार देकर अलहदा-अलहदा बंद कर दिया गया। लाहौर का एक नौजवान हिंदू वकील मुहब्बत में नाकाम होकर पागल हो गया था, जब उसने सुना कि अमृतसर हिंदुस्तान में चला गया है तो उसे बहुत दुख हुआ। अमृतसर की एक हिंदू लड़की से उसे मुहब्बत थी जिसने उसे ठुकरा दिया था मगर दीवानगी की हालत में भी वह उस लड़की को नहीं भूला था - वह उन तमाम हिंदू और मुसलमान लीडरों को गालियाँ देने लगा जिन्होंने मिल-मिलाकर हिंदुस्तान के दो टुकडे कर दिए हैं, और उसकी महबूबा हिंदुस्तानी बन गई है और वह पाकिस्तानी। जब तबादले की बात शुरू हुई तो उस वकील को कई पागलों ने समझाया कि वह दिल बुरा न करे, उसे हिंदुस्तान भेज दिया जाएगा, उसी हिंदुस्तान में जहाँ उसकी महबूबा रहती है - मगर वह लाहौर छोड़ना नहीं चाहता था, उसका ख़याल था कि अमृतसर में उसकी प्रैक्टिस नहीं चलेगी। युरोपियन वार्ड में दो एंग्लो इंडियन पागल थे। उनको जब मालूम हुआ कि हिंदुस्तान को आज़ाद करके अंग्रेज़ चले गए हैं तो उनको बहुत सदमा हुआ, वह छुप-छुपकर घंटों आपस में इस अहम मसले पर गुफ़्तगू करते रहते कि पागलख़ाने में अब उनकी हैसियत किस किस्म की होगी, योरोपियन वार्ड रहेगा या उड़ा दिया जाएगा, ब्रेक-फास्ट मिला करेगा या नहीं, क्या उन्हें डबल रोटी के बजाय ब्लडी इंडियन चपाटी तो ज़बरदस्ती नहीं खानी पड़ेगी? एक सिख था, जिसे पागलख़ाने में दाखिल हुए पंद्रह बरस हो चुके थे। हर वक्त उसकी जुबान से यह अजीबो-गरीब अल्फ़ाज़ सुनने में आते थे, "औपड़ दि गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मूँग दि दाल ऑफ दी लालटेन!" वह दिन को सोता था न रात को। पहरेदारों का यह कहना था कि पंद्रह बरस के तबील अर्से में वह एक लहज़े के लिए भी नहीं सोया था, वह लेटता भी नहीं था, अलबत्ता कभी-कभी किसी दीवार के साथ टेक लगा लेता था - हर वक्त खड़ा रहने से उसके पाँव सूज गए थे और पिंडलियाँ भी फूल गई थीं, मगर जिस्मानी तकलीफ़ के बावजूद वह लेटकर आराम नहीं करता था। हिंदुस्तान, पाकिस्तान और पागलों के तबादले के मुताल्लिक़ जब कभी पागलख़ानों में गुफ़्तगू होती थी तो वह गौर से सुनता था, कोई उससे पूछता कि उसका क्या ख़याल है तो वह बड़ी संजीदगी से जवाब देता, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान गवर्नमेंट!" लेकिन बाद में 'आफ दि पाकिस्तान गवर्नमेंट' की जगह 'आफ दि टोबा टेक सिंह गवर्नमेंट' ने ले ली, और उसने दूसरे पागलों से पूछना शुरू कर दिया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जहाँ का वह रहनेवाला है। किसी को भी मालूम नहीं था कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में, जो बताने की कोशिश करते थे वह खुद इस उलझाव में गिरफ़्तार हो जाते थे कि सियालकोट पहले हिंदुस्तान में होता था, पर अब सुना है कि पाकिस्तान में हैं, क्या पता है कि लाहौर जो आज पकिस्तान में हैं, कल हिंदुस्तान में चला जाए या सारा हिंदुस्तान ही पाकिस्तान बन जाए और यह भी कौन सीने पर हाथ रखकर कह सकता है कि हिंदुस्तान और पाकिस्तान, दोनों किसी दिन सिरे से गायब ही हो जाएँ! इस सिख पागल के केश छिदरे होकर बहुत मुख्त़सर रह गए थे, चूँकि बहुत कम नहाता था, इसलिए दाढ़ी और सिर के बाल आपस में जम गए थे जिसके बायस उसकी शक्ल बड़ी भयानक हो गई थी, मगर आदमी हिंसक नहीं था - पंद्रह बरसों में उसने कभी किसी से झगड़ा-फ़साद नहीं किया था। पागलख़ाने के जो पुराने मुलाज़िम थे, वह उसके मुताल्लिक़ इतना जानते थे कि टोबा टेक सिंह में उसकी कई ज़मीनें थी, अच्छा खाता-पीता ज़मींदार था कि अचानक दिमाग उलट गया, उसके रिश्तेदार उसे लोहे की मोटी-मोटी ज़ंजीरों में बाँधकर लाए और पागलख़ाने में दाखिल करा गए। महीने में एक बार मुलाक़ात के लिए यह लोग आते थे और उसकी खैर-ख़ैरियत दरयाफ़्त करके चले जाते थे, एक मुश्त तक यह सिलसिला जारी रहा, पर जब पाकिस्तान, हिंदुस्तान की गड़बड़ शुरू हुई तो उनका आना-जाना बंद हो गया। उसका नाम बिशन सिंह था मगर सब उसे टोबा टेक सिंह कहते थे। उसको यह बिलकुल मालूम नहीं था कि दिन कौन-सा है या कितने साल बीत चुके हैं, लेकिन हर महीने जब उसके निकट संबंधी उससे मिलने के लिए आने के क़रीब होते तो उसे अपने आप पता चल जाता, चुनांचे वह दफादार से कहता कि उसकी मुलाकात आ रही है, उस दिन वह अच्छी तरह नहाता, बदन पर ख़ूब साबुन घिसता और बालों में तेल डालकर कंघा करता, अपने वह कपड़े जो वह कभी इस्तेमाल नहीं करता था, निकलवाकर पहनता और यों सज-बनकर मिलनेवालों के पास जाता। वह उससे कुछ पूछते तो वह ख़ामोश रहता या कभी-कभार 'औपड़ दि गड़ गड़ अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी लालटेन' कह देता। उसकी एक लड़की थी जो हर महीने एक उँगली बढ़ती-बढ़ती पंद्रह बरसों में जवान हो गई थी। बिशन सिंह उसको पहचानता ही नहीं था - वह बच्ची थी जब भी अपने आप को देखकर रोती थी, जवान हुई तब भी उसकी आँखों से आँसू बहते थे। पाकिस्तान और हिंदुस्तान का किस्सा शुरू हुआ तो उसने दूसरे पागलों से पूछना शुरू किया कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, जब उसे इत्मीनानबख्श़ जवाब न मिला तो उसकी कुरेद दिन-ब-दिन बढ़ती गई। अब मुलाक़ात भी नहीं होती थी, पहले तो उसे अपने आप पता चल जाता था कि मिलनेवाले आ रहे हैं, पर अब जैसे उसके दिल की आवाज़ भी बंद हो गई थी जो उसे उनकी आमद की ख़बर दे दिया करती थी - उसकी बड़ी ख़्वाहिश थी कि वह लोग आएं जो उससे हमदर्दी का इज़हार करते थे और उसके लिए फल, मिठाइयाँ और कपड़े लाते थे। वह आएँ तो वह उनसे पूछे कि टोबा टेक सिंह कहाँ हैं, वह उसे यकीनन बता देंगे कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में - उसका ख़याल था कि वह टोबा टेक सिंह ही से आते हैं जहाँ उसकी ज़मीनें हैं। पागलख़ाने में एक पागल ऐसा भी था जो खुद़ को ख़ुदा कहता था। उससे जब एक रोज़ बिशन सिंह ने पूछा कि टोबा टेक सिंह पाकिस्तान में हैं या हिंदुस्तान में तो उसने हस्बे-आदत कहकहा लगाया और कहा, "वह पाकिस्तान में हैं न हिंदुस्तान में, इसलिए कि हमने अभी तक हुक्म ही नहीं दिया!" बिशन सिंह ने उस ख़ुदा से कई मर्तबा बड़ी मिन्नत-समाजत से कहा कि वह हुक़्म दे दें ताकि झंझट ख़त्म हो, मगर ख़ुदा बहुत मसरूफ़ था, इसलिए कि उसे और बे-शुमार हुक़्म देने थे। एक दिन तंग आकर बिशन सिंह खुद़ा पर बरस पड़ा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ वाहे गुरु जी दा खालस एंड वाहे गुरु जी दि फ़तह!" इसका शायद मतलब था कि तुम मुसलमानों के ख़ुदा हो, सिखों के खुद़ा होते तो ज़रूर मेरी सुनते। तबादले से कुछ दिन पहले टोबा टेक सिंह का एक मुसलमान जो बिशन सिंह का दोस्त था, मुलाक़ात के लिए आया, मुसलमान दोस्त पहले कभी नहीं आया था। जब बिशन सिंह ने उसे देखा तो एक तरफ़ हट गया, फिर वापस जाने लगा मगर सिपाहियों ने उसे रोका, "यह तुमसे मिलने आया है, तुम्हारा दोस्त फज़लदीन है!" बिशन सिंह ने फज़लदीन को एक नज़र देखा और कुछ बड़बड़ाने लगा। फज़लदीन ने आगे बढ़कर उसके कंधे पर हाथ रखा, "मैं बहुत दिनों से सोच रहा था कि तुमसे मिलूँ लेकिन फ़ुरसत ही न मिली, तुम्हारे सब आदमी ख़ैरियत से हिंदुस्तान चले गए थे, मुझसे जितनी मदद हो सकी, मैंने की तुम्हारी बेटी रूपकौर..." वह कहते-कहते रुक गया। बिशन सिंह कुछ याद करने लगा, "बेटी रूपकौर..." फज़लदीन ने रुक-रुककर कहा, "हाँ, वह, वह भी ठीक-ठाक है, उनके साथ ही चली गई थी!" बिशन सिंह खामोश रहा। फज़लदीन ने फिर कहना शुरू किया, "उन्होंने मुझे कहा था कि तुम्हारी ख़ैर-ख़ैरियत पूछता रहूँ, अब मैंने सुना है कि तुम हिंदुस्तान जा रहे हो, भाई बलबीर सिंह और भाई वधावा सिंह से मेरा सलाम कहना और बहन अमृतकौर से भी, भाई बलबीर से कहना कि फज़लदीन राजीखुशी है, दो भूरी भैंसे जो वह छोड़ गए थे, उनमें से एक ने कट्टा दिया है, दूसरी के कट्टी हुई थी, पर वह छ: दिन की होके मर गई और मेरे लायक जो खिदमत हो, कहना, मैं हर वक्त तैयार हूँ, और यह तुम्हारे लिए थोड़े-से मरोंडे लाया हूँ!" बिशन सिंह ने मरोंडों की पोटली लेकर पास खड़े सिपाही के हवाले कर दी और फज़लदीन से पूछा, "टोबा टेक सिंह कहाँ है?" फज़लदीन ने कदरे हैरत से कहा, "कहाँ है? वहीं है, जहाँ था!" बिशन सिंह ने फिर पूछा, "पाकिस्तान में है या हिंदुस्तान में?" "हिंदुस्तान में, नहीं, नहीं पाकिस्तान में!" फज़लदीन बौखला-सा गया। बिशन सिंह बड़बड़ाता हुआ चला गया, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी पाकिस्तान एंड हिंदुस्तान आफ दी दुर फिटे मुँह!" तबादले की तैयारियाँ मुकम्मल हो चुकी थीं, इधर से उधर और उधर से इधर आनेवाले पागलों की फ़ेहरिस्तें पहुँच चुकी थीं और तबादले का दिन भी मुक़र्रर हो चुका था। सख्त़ सर्दियाँ थीं जब लाहौर के पागलख़ाने से हिंदू-सिख पागलों से भरी हुई लारियाँ पुलिस के रक्षक दस्ते के साथ रवाना हुई, संबंधित अफ़सर भी हमराह थे - वागह(एक गाँव) के बॉर्डर पर तरफीन (दोनों तरफ़) के सुपरिटेंडेंट एक-दूसरे से मिले और प्रारंभिक कार्रवाई ख़त्म होने के बाद तबादला शुरू हो गया, जो रात-भर जारी रहा। पागलों को लारियों से निकालना और उनको दूसरे अफ़सरों के हवाले करना बड़ा कठिन काम था, बाज़ तो बाहर निकलते ही नहीं थे, जो निकलने पर रज़ामंद होते थे, उनको सँभालना मुश्किल हो जाता था, क्योंकि वह इधर-उधर भाग उठते थे, जो नंगे थे, उनको कपड़े पहनाए जाते तो वह उन्हें फाड़कर अपने तन से जुदा कर देते - कोई गालियाँ बक रहा है, कोई गा रहा है क़ुछ आपस में झगड़ रहे हैं क़ुछ रो रहे हैं, बिलख रहे हैं - कान पड़ी आवाज़ सुनाई नहीं देती थी - पागल औरतों का शोर-शराबा अलग था, और सर्दी इतनी कड़ाके की थी कि दाँत से दाँत बज रहे थे। पागलों की अक्सरीयत इस तबादले के हक़ में नहीं थी, इसलिए कि उनकी समझ में नहीं आ रहा था कि उन्हें अपनी जगह से उखाड़कर कहाँ फेंका जा रहा है, वह चंद जो कुछ सोच-समझ सकते थे, 'पाकिस्तान : जिंदाबाद' और 'पाकिस्तान : मुर्दाबाद' के नारे लगा रहे थे, दो-तीन मर्तबा फ़साद होते-होते बचा, क्योंकि बाज मुसलमानों और सिखों को यह नारे सुनकर तैश आ गया था। जब बिशन सिंह की बारी आई और वागह के उस पार का मुताल्लिक़ अफ़सर उसका नाम रजिस्टर में दर्ज करने लगा तो उसने पूछा : "टोबा टेक सिंह कहाँ है, पाकिस्तान में या हिंदुस्तान में?" यह सुनकर बिशन सिंह उछलकर एक तरफ़ हटा और दौड़कर अपने बचे हुए साथियों के पास पहुँच गया। पाकिस्तानी सिपाहियों ने उसे पकड़ लिया और दूसरी तरफ़ ले जाने लगे, मगर उसने चलने से इनकार कर दिया, "टोबा टेक सिंह यहाँ है!" और ज़ोर-ज़ोर से चिल्लाने लगा, "औपड़ दि गड़ गड़ दि अनैक्स दि बेध्यानां दि मुँग दि दाल आफ दी टोबा टेक सिंह एंड पाकिस्तान!" उसे बहुत समझाया गया कि देखो, अब टोबा टेक सिंह हिंदुस्तान में चला गया है, अगर नहीं गया है तो उसे फौरन वहाँ भेज दिया जाएगा, मगर वह न माना! जब उसको ज़बर्दस्ती दूसरी तरफ़ ले जाने की कोशिश की गई तो वह दरमियान में एक जगह इस अंदाज़ में अपनी सूजी हुई टांगों पर खड़ा हो गया जैसे अब उसे कोई ताकत नहीं हिला सकेगी, आदमी चूँकि सीधा था, इसलिए उससे ज़्यादा ज़बर्दस्ती न की गई, उसको वहीं खड़ा रहने दिया गया, और तबादले का बाक़ी काम होता रहा। सूरज निकलने से पहले शांत पड़े बिशन सिंह के हलक के एक गगन भेदी चीख़ निकली। इधर-उधर से कई दौड़े आए और उन्होने देखा कि वह आदमी जो पंद्रह बरस तक दिन-रात अपनी टाँगों पर खड़ा रहा था, औंधे मुँह लेटा है - उधर खरदार तारों के पीछे हिंदुस्तान था, इधर वैसे ही तारों के पीछे पाकिस्तान, दरमियान में ज़मीन के उस टुकड़े पर जिसका कोई नाम नहीं था, टोबा टेक सिंह पड़ा था।

बरीच गडबड आहे संकल्पना समजावून घेण्यात असे वाटते ! राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात , राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे,आणि म्हणून राष्ट्र्वाद हा शब्द संस्कृतीवाचक आहे ! मात्र राज्याला सीमा असतात, असायला हव्यात.राज्य अथवा देश हे प्रशासकीय सोयीसाठी बनविलेले असतात. बाकी सारी पृथ्वी ( विश्व ) एकच आहे आपण अशी प्रार्थना देखील करतो ....पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळीती.... असो टंकायचा कंटाळा आला...... उदा. युरोप हे एक राष्ट्र ( देश नाही ) असू शकेल पण एक राज्य नव्हे ! आपण रुढार्थाने भारतीय उपखंड असे ज्याला म्हणतो ते रुढार्थाने भारत - राष्ट्र आहे.

देश=राष्ट्र=कंट्री=नेशन उदा. भारत-फ्रान्स-चीन इ. देश म्हणा राष्ट्र म्हणा नेशन म्हणा कंट्री म्हणा या संदर्भात वरील विवेचन आहे हे नमुद करतो. तुम्ही म्हणता राष्ट्र आणि राज्य ( स्टेट आणि नेशन ) या दोन वेगळ्या संकल्पना आहेत मान्य मी राज्य या संकल्पने संदर्भात चकार शब्द ही काढत नाही महाराष्ट्र गुजरात बंगाल आदि राज्य आहेत अशी माझी माहीती आहे त्यांचे मिळुन एकत्र बनलेला भारत हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे. या राष्ट्र संदर्भात वरील मांडणी आहे. उदा. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरीका हा देश=राष्ट्र=कंट्री=नेशन काहीही म्हणा आहे त्यातील राज्ये टेक्सास इ. मिळुन तो बनला आहे. देशीवाद असे म्हणावयाचे टाळले कारण तो नेटीव्हीझम अथवा साहीत्यातील देशीवाद या संकल्पनेशी गल्लत गैरसमज करु शकतो म्हणुन राष्ट्रवाद हा शब्द नेशनलिझम या अर्थाने वापरला. या नेंतर आपण म्हणतात की राष्ट्राला भौगोलिक सीमा नसतात आता यावर काय बोलायच याने सुन्न झालोय बधिर झालोय हा धक्का पचण फारच अवघड आहे. असो

तुम्ही तुमच्या प्रतिसादात म्हट्ले आहे त्याप्रमाणे .. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे असू शकते.. कारण तो अनेक संस्कृतींनी बनलेला देश आहे. म्हणजे काही वर्षापूर्वी असले काही अस्तित्वात च नव्हते. १८७६ ( चू. भू द्या.घ्या) नंतर हा " देश" म्हणून जन्माला आला.. सोयीसाठी म्हणून! असो. जर तुम्ही झी मराठी वरची मालीका 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' पहात असाल तर त्यातील कृत्रिम कुटुंबासारखी.. परस्परांच्या सोयी ने एकत्र आलेले.. अश्या लोकांचे राष्ट्र नसते.. राष्ट्र बनण्याची प्रक्रिया ही काही हजार वर्षांची असावी लागते... भारताचे ( अथवा ग्रीक , युनान ,रोमन)तसे नाही . अनादी अनंत कालापासून भारत हे एक एकसंध राष्ट्र म्हणून अस्तित्वात होते. राजकीय आक्रमणामुळे काही तुकडे पड्ले. काही स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले - हे अर्थात आजच्या संदर्भात !कदाचित पुढच्या २-५०० वर्षात ते पुन्हा एक होतील ही ! कारण या सार्यांचा "आत्मा" एक आहे. एका समान सांस्कृतिक धाग्याने हे सारे बांधलेले आहेत. आणि म्हनून युनायटेड स्टेत्स ऑफ भारत असा शब्दप्रयोग केला जात नाही. कारण तो चुकीचाच आहे. धर्म हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे. ( धर्म म्हणजे उपासना पद्धती ( रिलीजन ) नव्हे , तो वैयक्तिक भाग आहे !) धर्म हा समाजाची धारणा करतो. धर्म आणि राष्ट्र हे दोन शब्द राजकारणी अतिशय मुक्त हस्ते वापरतात आणि त्यामुळे ते वापरुन अतिशय गुळगुळीत झाले आहेत ! आणखी एक उदाहरण म्हणजे ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड किंगडम .. असो अशी अनेक उदाहरणे असतील. जाता- जाता : महाराष्ट्रातील " राष्ट्रवादी " या शब्दाचा वापर करणार्‍या राजकीय पक्षाचा आणि राष्ट्रवादाचा सुतराम संबंध नाही!! त्यांना ' राष्ट्र-खा-खा-खाती " हे नांव अधिक संयुक्तिक आहे ! असो, काही शब्दाचा वापर करण्यावर कायद्याने बंदी आणायला हवी आहे ! (निळी अक्षरे संपादित करायला हरकत नाही..धरण भरु शकणारे दादा आणि त्यांचे हस्तक अफाट ताकदीचे आहेत,ते मिपावर पोहोचू शकतात !)