मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्पंदन

सार्थबोध · · जे न देखे रवी...
कधी चांदणं श्वासात कधी मन चांदण्यात धुंद प्रेमाचं उधाणं तुझ्या माझ्या अंतरात ll १ ll तुझा भास जीवनात तुझी आस हृदयात तुला पाहिले डोळ्यात जसा मोती शिंपल्यात ll २ ll वारा भरून वाहत पान फूल बहरत तुझा हाती येता हात तन मन मोहरत ll ३ ll तुझे असणे माझ्यात जीव तुझ्यात गुंतत तुझे सांगतो अस्तित्व श्वास श्वास स्पंदनात ll ४ ll - सार्थबोध www.saarthbodh.com

वाचने 1650 वाचनखूण प्रतिक्रिया 1