दिल्लीत ठेल्यावर छोले भठूरे सोबत मिर्ची ही ताटात असते. लिंबाचा रस आणि मोहरीची डाळ लागलेली ही मिरची छोले भठूरे सोबत तर स्वादिष्ट लागते, पण रोजच्या जेवणाची रंगत ही वाढविते. शिवाय घरी सर्वाना मिरची खायला आवडतेच. (सौ. ला जास्ती कारण ती मूळ विदर्भातली). पुष्कळ दिवसांपासून सौ.च्या मागे लागलो होतो. काल अखेर तिने ही मिरची बनविली.
साहित्य: हिरवी मिरची १०० गरम. (मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या), २-४ लिंबांचा रस (आकारानुसार, मिरच्या रसात बुडल्या पाहिजे), १०-१२ लसुनाच्या पाकळ्या (आवश्यक नाही), २-३ चमचे मोहरीची डाळ (अंदाजानुसार) आणि मीठ.
कृती: प्रथम मिरच्याना मधून कापून ४ तुकडे करून घ्या. एका काचेच्या भांड्यात मिरच्या ,लिंबाचा रस, मोहरीची डाळ आणि मीठ कालवून मिरच्याना १ दिवस मुरु द्या. या मिरच्या फ्रीज मध्ये ठेवल्यास ८-१० दिवस टिकतात. फ्रीज नसल्यास ६-७ दिवस टिकतात.


वाचने
12193
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिरच्या तोंपासु दिसत आहेत
वाह्ह... हल्लीच आमच्या
तोंडी लावायला झकास आहेत..
झक्कास... पण आमच्याकडे बिन
मस्त लिखाण
आम्हीपण बिन लसणाच्या बनवतो.
मस्त!
मस्त
मस्त...
तोंपासु. मोहरीची डाळ विकत
मस्तच.
मस्त
त्रिवेणी,
राई कुरीया.
In reply to त्रिवेणी, by अनिता ठाकूर
>>कारण कांही समजले नाही तर
In reply to राई कुरीया. by प्रभाकर पेठकर
इथल्या म्हणजे कुठल्या ??
In reply to >>कारण कांही समजले नाही तर by सूड
इथल्या म्हणजे पुण्यातल्या !!
In reply to इथल्या म्हणजे कुठल्या ?? by चित्रगुप्त
अखिल ब्रम्हांडाचे केंद्र
In reply to इथल्या म्हणजे पुण्यातल्या !! by सूड
प्रपे,