Skip to main content

गरजांच पोलिटिक्स

लेखक फुंटी यांनी सोमवार, 26/05/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुणी लेखक नाही,मला लेखक व्हायचं पण नाही...मनातली घुसमट बाहेर पडावी म्हणून लिहितोय....डुप्लिकेट आयडी वरून ...घुसमट....मला सहन नाही होत ....इमोशनल चुतीया बनणं काय असत ते मला विचारा ...प्रेम असो कि कुणाला केलेली मदत .....त्या एका क्षणी वाटत असत कि आपण नसतो तर हे शक्य झाल नसत...हे आपल्यामुळे झालंय ,काडीचाही फायदा नसताना उगाचच छाती फुगून येते अभिमानाने.....कसला वांझोटा अभिमान तो.... तरीही घालवलीत ७-८ वर्ष या दुनियादारी मध्ये...कुणाला काही फरक पडत नसतो आपल्या असण्या नसण्याने ...आपण नसलो कि दुसरा कुणी असतो...हे ज्या क्षणी लक्षात येत तो क्षण असतो कोसळण्याचा ,कोलमडून पडण्याचा ...अनुभवतोय मी तेच क्षण...आसपास दिसत नाही कुणी व्यक्ती जी हे सगळ समजून घेईल....मला सावरेल....हेही बरच आहे...किती सहज तुटून जातात माणस गरजा संपल्या कि...सतत हे गरजांच पोलिटिक्स मला कधी जमलंच नाही......यातना कठीण खऱ्याच...आता मात्र हिम्मत होत नाहीये कुणासाठी काही करण्याची....उरंगल आहे सगळच ....सेल्फिश जगावं ..साला दुसर्यांना त्रास होतो आपल्याला नाही...आणि निस्वार्थी बनलं कि दुनिया मजा मारून घेते आपण राहतो तोंड पाहत....हाट साला....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2932
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

असे वैतागाचे क्षण येतातच. थंड व्हा... परोपकारही स्वार्थी हेतूनेच करायचा असतो. दुसर्‍याला मदत करून आपल्याला बरं वाटतं - हा तो स्वार्थ. समोरच्याने "जाण" ठेवावी वगैरे लोड करून घेण्यात काही अर्थ नाही.

दासबोध वाचायला लागा...बरीच उत्तरे मिळतील

असे नसते हो भाऊ, दुनियादारी करणारे आहेत म्हणून दुनिया चालते. पण लोकं मात्र हे कबूल करत नाहीत. तसेच आपल्यावाचून कुणाचे अडत नाही हे ही तितकेच खरे कारण "आपल्यासारखाच" ते दुसरा शोधतात. पण यामुळे आपले महत्व कमी होत नाही. त्रास आपल्याला होतो कारण १०० टक्के निस्वार्थी आपल्याला जगता येत नाही, आपण केलेल्या मदतीची परोपकाराची लोकांनी पोच द्यावी हा स्वार्थ कुठेतरी राहतोच. आणि त्या हलक्याश्या स्वार्थाची तुम्हाला आज जाणीव झाली म्हणून तुम्ही पुर्ण स्वार्थी व्हायचा निर्णय घ्याल तर चुकालच. जर कोणी तुम्ही केलेल्या मदतीची जाण ठेवली नाही तर तुम्ही यापुढे कोणालाच मदत न करायचे ठरवल्यास ते एकाचा राग दुसर्‍यावर झाले आणि सरतेशेवटी ते आपल्या स्वभावाला अनुसरून नसल्याने त्रास आपल्या स्वतालाच. त्यामुळे लिहिलेत, हलके झालात, आता इथून पुढे चला :)

अवांतर - तुम्ही स्वताला शब्दात व्यक्त करू शकलात, तुम्ही लेखक झाला आहात, सो पुलेशु :)

प्रत्येकाला च असे वाटते की "हे आपल्यामुळे झालय" पण कोणाला ते कळत नाहीये. प्रत्येकाला च वाटते की दुसरे कीती स्वार्थी आणि आपल्याला वापरुन घेतायत. थोडे थांबा आणि विचार करा की आपली ही मते rational आहेत का? म्हणजे १. आपल्या विचार्/मतांना काही वस्तुस्थिती मधले पुरावे आहेत का? २. आपल्या विचारांनी आपला किंवा आपल्याला जवळच्या माणसांना काही गुणात्मक फायदा होतो आहे का?

In reply to by प्रसाद१९७१

प्रत्येकाला च असे वाटते की "हे आपल्यामुळे झालय" पण कोणाला ते कळत नाहीये.
आज पाऊस पडला माझ्यामुळं. भावजी पास झाले माझ्यामुळं. त्या ह्यांना मुलगा झाला तोही माझ्यामुळं ;) ह.घ्या.हेवेसांनल. संदर्भ लक्षात आला असेलच.

In reply to by प्रसाद१९७१

१)माझ्या मताला वस्तुस्थिती मधले पुरावे आहेत. २) समोरच्याने गुणात्मक फायदा घेऊनच नंतर एका क्षणी गरज संपली अशी भावना निर्माण झाली..अर्थात या उद्वेगाची दुसरी बाजू म्हणजे कमालीच मोकळेपण मिळतंय...जे होत ते भल्यासाठीच असाही वाटू लागलाय आजकाल....