कट्टा: दादर पूर्व ऋषी हॅाटेल
व्हाट्सअॅपवर मिपाकरांचे असे चार ग्रूप आहेत. कोणते ते विचारु नका, अभ्यास वाढवा असं उत्तर मिळेल. त्यातल्या एका ग्रूपवर मेसेज आला शन्वारी सांच्याला कोण कोण भेटू शकतं. मेसेज अर्थातच विमेंचा होता. शन्वार संध्याकाळ असल्यामुळे तसाही उंडारायला वाव असतो, मग मी तर मेसेज आल्याआल्या हो म्हणून सांगितलं. त्यातही दादरसारख्या ठिकाणी कट्टा होणार होता. आता हल्लीच्या फ्याशनीनुसार मध्यवर्ती समजली जाणारी ठिकाणे न निवडता आल्याची खंत होतीच म्हणा, पण असो. कट्टा ठरला, पण बा़कीचे डिटेल्स विमे बैजवार देणार असल्याचं म्हणून तिथेच विषय संपला. आणि शुक्रवारी मिपावर लॉगिन करतो तर "बेसनलाडू समवेत मुंबई कट्टा" हा धागा पाह्यला.
मग शन्वारी बदलापूर मुक्कामी येऊन किसनराव यांसि फोन करुन ते कधी निघणार असल्याचा अंदाज घेतला आणि त्याप्रमाणे निघालो. दादर स्टेशनावर भेटून दोघांनीही कट्ट्याच्या ठिकाणी कूच केले. प्रास व योगी९०० आलेले होतेच. मग चौघे जमलो आहोतच म्हणताना हाटेलात आसनस्थ होण्याचे सर्वानुमते ठरले. काही अपरिहार्य कामात गुंतल्यामुळे विमेंचे येणे साधारण अर्धा तास उशिराने होणार होते. मग गप्पांना सुरुवात झाली. गप्पा जरा थांबवून काहीतरी मागवावे असे ठरले. तेव्हा मागवलेली ही व्हेज प्लॅटर. नंतर गप्पांच्या ओघात एकाही खाद्यपदार्थाचा फोटो घेण्याचे लक्षात आले नाही.
व्हेज प्लॅटर येतेय तोवर बेसनलाडू यांचे आगमन झाले. नंतर त्यांच्याशी गप्पा रंगल्या. मिपाचे जुने सदस्य असल्याने 'तेव्हाचं मिपा आणि आताचं मिपा' ही नेहमीचीच चर्चा पुन्हा नव्याने झाली. योगी९०० यांनी हॉटेलसमोर कट्टेकर्यांची वाट बघताना झालेल्या काही गमती सांगितल्या.
गप्पांत गुंग प्रास, योगी९०० व बेसनलाडू (डावीकडून उजवीकडे)
थोड्याच वेळात विमेकाकांचे आगमन झाले. त्यांचे आगमन झाल्यानंतर पुर्वीचं ऋषी आताचं ऋषी यावर थोडी चर्चा झाली. दादरमध्ये हिंदीत बोलणार्या वेटरशी लोक मराठीत न बिचकता बोलतात याचं अपार कौतुक अर्थातच मला वाटलं मग इथे मराठीतच बोलतो, बोलत नाही काथ्याकूट होऊ पाहत होता पण तो काही फार काळ तग धरु शकला नाही.
प्रास, योगी९००, बेसनलाडू, विमे व किसन शिंदे (डावीकडून उजवीकडे)
'असारे खलु संसारे नास्ति श्वशुरमंदिरसमसुखम्' या उक्तीचा प्रत्यय यावा की काय अशा ढंगात किसन शिंदे यांनी काही अपरिहार्य कारणास्तव कट्टेकर्यांचा जरा लवकर निरोप घेतला.
त्यानंतर मेन कोर्स आला. त्यात मग रोटी/ पोळी/ फुलके डावीकडे आणि भाजी उजवीकडे अशी का वाढतात यावर सुरु झालेली चर्चा डावं-उजवं पान कसं आणि का वाढतात इथवर पोचून थोडी थांबली. लोक मन लावून जेवू लागले, पण काहीच काळ!! पुन्हा काही ना काही गप्पा सुरु होत्याच. आयपीएल, मोदी, राजकारण असे विषय निघत होते. मध्येच कोणीतरी मिपावर जगप्रसिद्ध असलेल्या रानडे रोडची आठवण काढली.
प्रास, योगी९००, बेसनलाडू, विमे व सूड (डावीकडून उजवीकडे)
जेवण उरकून बाहेर आईस्क्रीमचा एकेक स्कूप हादडला गेला. आमच्या गप्पा चालूच होत्या, तेवढ्यात योगी९०० यांनी निरोप घेतला. शेवटी मी, विमे आणि प्रास यांनी दादरच्या रस्त्यांवर शतपावली करत करत शेवटी माटुंगा स्थानकापाशी एकमेकांचा निरोप घेऊन मार्गस्थ झालो.
तळटीपः कट्टेकर्यांनी आपले चार शब्द लिहून धाग्याची शोभा वाढवावी ही विनंती.

तळटीपः कट्टेकर्यांनी आपले चार शब्द लिहून धाग्याची शोभा वाढवावी ही विनंती.वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी
मस्त व्रुत्तांत
व्वा व्वा... मज्जा करा
झेलेआण्णा आपल्याला तर एकच
ह्या चार मधल्या एका ग्रूपात
हा मंग ठीक आहे.
हम्म्म्म्म!!!!!!
अरे योगी बाबा कसे आहात ?
म.बा..
म.बा.... एकाच ऑफिसला असून
कट्टा झकास...
हाहा
[गडाबडा लोळण्याची स्माईली]... !
@त्यांच्याकडे गेलो अणि
झक्कास लिहीताय!
कट्ट्यासाठीच काय पण कुठल्याही
हम्मम्
>>माझे पुर्वी खादाडमाऊ हे
त्यामुळे माऊ आहे असे वाटून
माझे पुर्वी खादाडमाऊ हे
बोकोबांचे किस्से..
>
चित्रे
बेलाला भेटायचे राहून गेले.
सूड स्टायल
प्रत्येक फोटोमध्ये दिलेला
"मिसळपाव?"
मिसळ्पाव
मस्त फोटो (खाद्य पदार्थाने
छान!
जरूर....
या माझ्या चार विटा....
बाळबोध..
मस्तच झाला की कट्टा.
>> यात आमच्या ओळखीचा एक
(No subject)
या निमित्ताने आमच्या
@मीनाक्षीची आठवण आली>>>